नमस्कार,
कसे आहात?
सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच.
मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे.
अशा, खरोखरी लोकशाही तत्वावर, एकमेकांना साथ देत चालणार्या, सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रतिक्रिया
14 Jan 2022 - 10:11 am | कुमार१
सर्वांना माझ्यातर्फेही हार्दिक शुभेच्छा !
14 Jan 2022 - 11:38 am | कर्नलतपस्वी
तीळ भाजले भाजले
गुळामंदी राधंले
मन बांधले बाधंले
तेच्यामंदी
तिळगूळ घ्या रे
अन गोड गोड बोला
मागलं सगळे सोडा
पाण्यामंदी
14 Jan 2022 - 11:46 am | कपिलमुनी
त्ये माजी नौसैनिक मारहाण टाकायच राहिले की हो !
14 Jan 2022 - 11:53 am | मुक्त विहारि
मिपाकर, वादविवाद करतील, प्रसंगी शाब्दिक टोमणे मारतील, पण हात उचलणे, हा मिपाकरांचा स्वभाव नाही ...
14 Jan 2022 - 12:07 pm | सर टोबी
शासकीय अधिकाऱ्यास घरी बोलावून मारहाण करणे, आझाद मैदानावरील दंगल वगैरे. आणि नंतर ठळक अक्षरात भाजपाबद्दल उतू जाणाऱ्या प्रेमाचा अविष्कार. तरी बरे कि नुसता उद्देश चांगला असून उपयोगाचे नाही तर अनुसरलेला मार्गही योग्य असावा हि हिंदू धर्माचीच शिकवण आहे. तरी यांच्या निष्ठाच सद्सदविवेकावर स्वार होतात.
14 Jan 2022 - 1:35 pm | मुक्त विहारि
जोपर्यंत भाजप, हिंदू हितवादी आहे, तोपर्य॔त भाजप माझा
उद्या शिवसेनेनेच कशाला? एखाद्या साम्यवादी पक्षाने जरी, हिंदू हितवादी भुमिका घेतली तरी तो पक्ष माझा ....
आमच्या निष्ठा, हिंदू हितवादी पक्षालाच होत्या, आहेत आणि राहतील..
14 Jan 2022 - 2:01 pm | Trump
+१
14 Jan 2022 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) हहपुवा झाली. त्यांच्या एकोळी दळणासाठी स्वतंत्र विभाग झालाच पाहिजे.
होत कसा नै झालाच पाहिजे.
-दिलीप बिरुटे
14 Jan 2022 - 12:44 pm | प्रसाद गोडबोले
नमस्कार मुवी काका
तिळगुळ घ्या गोडगोड बोला !
सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !
14 Jan 2022 - 1:08 pm | चौथा कोनाडा
छान लिहिलंय मुवि साहेब !
तिळगुळ घ्या गोडगोड बोला !
सर्व सक्रीय मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !
14 Jan 2022 - 2:05 pm | Trump
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.
मतभेद फक्त शाब्दिक ठेवा. हिंदुना आणि भारताला नुकसान होईल असे कोणतीही गोष्ट करु नका.
हिंदुत्व हेच भारतीयत्व
14 Jan 2022 - 6:29 pm | श्रीगणेशा
मकर संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोडगोड बोला,
खूप काही वाचा, अन् मिपावर लिहा :-)
14 Jan 2022 - 6:48 pm | कर्नलतपस्वी
मकर संक्रांती, उत्सव, लोक भेटणार म्हणजे लोकशाही, म्हणजेच पक्ष, राजकारण, खळफट्याक, हिंदुत्व तिळगूळ घ्या आणि गोड बोला.
हे सगळं शोले मधल्या बसंतीच्या टांग्या सारखच वाटतय चार चक्कर मारके फिर रामगढ जाण्यासारखच वाटलं।
14 Jan 2022 - 8:55 pm | मुक्त विहारि
धाग्याचे काश्मीर आणि परत....
14 Jan 2022 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा
तीलगुळासह फुले घ्या... आणि गोड हसरे आंनदी मानवतावादी रहा!
![https://scontent.fpnq13-1.fna.fbcdn.net/v/t1.18169-9/fr/cp0/e15/q65/10906240_768267149926240_5512139374671153645_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=110474&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=bmH0miPQyEcAX9KqJ7m&tn=l6ZmBuCeDmx9BDZ0&_nc_ht=scontent.fpnq13-1.fna&oh=00_AT9nfnbXwHNS7KkVdEzIygMOd0qEkA9hJoADg1kVFDmtLg&oe=6208F455](https://scontent.fpnq13-1.fna.fbcdn.net/v/t1.18169-9/fr/cp0/e15/q65/10906240_768267149926240_5512139374671153645_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=110474&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=bmH0miPQyEcAX9KqJ7m&tn=l6ZmBuCeDmx9BDZ0&_nc_ht=scontent.fpnq13-1.fna&oh=00_AT9nfnbXwHNS7KkVdEzIygMOd0qEkA9hJoADg1kVFDmtLg&oe=6208F455)
15 Jan 2022 - 7:24 pm | Nitin Palkar
सर्व मिपाकरांना शुभेच्छा .