सडा अठवणींचा
बकुळीच्या झाडाखाली
सडा अठवणींचा पडला
तुझ्या नी माझ्या अव्यक्त
प्रेमाचा गंध की रे मुरला
किती केली फुले गोळा
किती ओवल्या तीथेच माळा
सख्या तुझ्या वियोगच्या
इथेच लागल्या रे झळा
आली प्रेमाची झुळक
सांगितला तीने निरोप
जीव एकवटून सारा
तन, मन धावले तडक
नका बघू दिवास्वप्ने
नका मनोमनी जळू
दर तीन महिन्यांनी इथेच
यायचा कल्हईवाला काळू
-कसरत
२४-१२-१९६५
प्रतिक्रिया
23 Dec 2021 - 3:15 pm | चौथा कोनाडा
छान जमलीय कवितेची कसरत !
हा शेवट वाचून मनोमन वाईट वाटले !
23 Dec 2021 - 5:02 pm | चांदणे संदीप
कविता आवडली.
बकुळीवरून हे एक नितांतसुंदर गाणे आठवले. नक्की ऐका.
सं - दी - प
23 Dec 2021 - 9:41 pm | कर्नलतपस्वी
बकुळीचं झाड!
वयाचा अंदाज नाही पण साधारण सव्वाशे दिडशे कुणी म्हणतात सहाशे वर्ष पण गेली पासष्ठ वर्षे तर मी त्याचा व तो माझा साक्षीदार गावातल्त्याय बकुळी चा सुगंध आज अखेर हरपला. नावाला फक्त एक झाड.पण या झाडाची नाळ गावातल्या पिढ्यां पीढ्यांशी जोडली आहे. आज झाड मुळासकट काढलं, हे ऐकलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. दुष्ट माणसानं झाडाच्या खोडावर घातलेले घाव व त्यांचे झालेले तुकडे याचा पण फोटो शेअर केला. कधीकाळी याच खंडाच्या पाठीमागे लपंडाव रंगायचा. रहावल नाही एक मुक्तक लिहून काढले. त्याच बरोबर
वसंत बापटाची ही कवीता आठवली. वाटलं आपल्या गावातल्या बकुळीच्या झाडाखाली बसून लिहीली असावी.......
या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नांसाठी, एक रेशमी झुला झुले
इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी
झाडाखालच्या असंख्य आठवणी, पाणी दिसू नये म्हणून त्यातलीच एक पण थोडी वेगळी आपल्या बरोबर शेअर केली.
25 Dec 2021 - 11:17 am | चांदणे संदीप
वाईट!
सं - दी - प
28 Dec 2021 - 8:25 am | प्राची अश्विनी
अरेरे...
23 Dec 2021 - 9:49 pm | कर्नलतपस्वी
संदीप चांदणे, चौथा कोनाडा प्रतीसादा बद्दल धन्यवाद.
प्रतीसादा मधे काही टंकलेखन चुका तशाच राहिल्या. आहेत वाचताना दुरुस्ती करावी.
क लो आ
25 Dec 2021 - 10:42 pm | पाषाणभेद
इतक्या चांगल्या काव्यात शेवटच्या कडव्याचे काय काय होते?
26 Dec 2021 - 10:33 am | कर्नलतपस्वी
धन्यवाद पाभे,
इथेच दिसला चंद्र मला रे
इथेच फुलले मनी चांदणे
तुझ्या प्रितीचे रोप सख्या रे
इथेच की ते रुजले रे
आसे काही लिहावं असं काही झालच नाही पण बालपणीच्या खुप आठवणी. पितळी भाड्यानं कल्हई लावून घेणे हे अनिवार्य असायचे. दर तीन महिन्यांनी इथेच तो यायचा आपल्या मुलाबाळांना घेऊन. मग खड्डा करणे, हाताने फिरणारी फुकंणी पुणे, त्यावर निखारा फुलणे व कल्हई चा धूर, आ हा हा काय वास यायचा. तीथे बसून धुराचा आनंद घेणे सिगरेट वीडीच्या आनंदा पेक्षा कमी नसायचा, म्हणून तीच आठवण सागंत कवीता संपवली.
काय करणार खोटेपणा जमत नाही.
26 Dec 2021 - 10:43 am | कर्नलतपस्वी
फुकंणी पुरणे असे वाचावे.
28 Dec 2021 - 8:25 am | प्राची अश्विनी
कविता आवडली.