पुस्तक –द विच ऑफ पोर्टोबेलो
लेखक-पाउलो कोएलो
इकडे पलिकडेच खफवर धारपांच्या पुस्तकांची चर्चा चालू होती.वाचनालयात धारपांची दोन तीन पुस्तक चाळली.झोपेत भूतखेत येण्याचे पर्याय दिसू लागले,पुस्तक तिथेच ठेवली.तेवढ्यात हि बया दिसली !भुतासारखी खाली वाकलेली..पांढरी फटक उघडी पाठ असलेली...मुखपृष्ठावर !लेखकही माझा आवडताच होता.काय हरकत आहे थोड धाडस केलं पाहिजेच म्हणत पुस्तक घेऊन आले.
नेहमी प्रमाणे माझ्या हातात नवीन पुस्तक दिसल्याबरोबर मुलीले प्रश्नांची सरबत्ती सुरु केली “ही कोण आहे ,अशी काय करतेय”
तिला म्हणाले “चेटकीण आहे” “ओके चुटकीन” तिचा भाषेत चेट्कीनीला चुटकीन म्हणतात.
चेटकीणचे नाव अथेना.सुरुवातीलाच समजते तिचा खून झाला आहे.तिचा थक्क प्रवास तिच्या संपर्कातले विविध व्यक्तींच्या मनोगतातून उलगडत जातो.ज्यामध्ये हेरॉन (पत्रकार),समीरा खलील (अथेनाची आई),ड्राय डे (उपाख्य एडा),आंद्रिया मकेन (अभिनेत्री ),फादर ,आत्वान लोकादु (इतिहास तझ) हे प्रमुख तर इतर आणखीन व्यक्तींच्या मनोगतांचा समावेश आहे.
सुरुवातीलाच अथेनाच्या रहस्यमयी बालकाळ तिच्या आईच्या भाषेत समजतो रोमानियात जन्मलेली नंतर बैरुतमध्ये दत्तक गेलेली आहे.लवकरच हिंसाचाराच्या वाटेवर असलेले बैरुत सोडून तिच्या कुटुंबाला लंडनची वाट धरावी लागते.लहानपणापासूनच प्रत्येक परिस्थिती स्वत:च्या कसोटीवर पडताळून पहाण्याचे धारिष्ट्य अथेनात असते याची चुणूक दिसते.बाळाला जन्म देण्यासाठी आतुर झालेली वेडी पण धीर गंभीर अशी कच्च्या वयातली अथेना लग्न करते.पण लग्न फार काळ टिकत नाही.
पदरी असलेला तिच्या मुलाला एकटीच ती स्वत: वाढवण्याचा मोठा निर्णय ती घेते.संगीताद्वारे ईश्वराच्या जवळ जाण्याचे दार म्हणजे चर्च अशा भावनेत वाहणाऱ्या अथेनाला ,घटस्फोटीत असल्यामुळे प्रवेश निषिद्ध केला जातो.या अपमानाच्या ज्वाळा फेकतच एक बंडखोर अथेना अजूनच रहस्यमयी होत जाते.एकाकी वाटेवर चालत असतानाच तिला आधार मिळतो ‘मातृशक्ती’ या विस्मृतीत जाणारया परंपरेचा! पुरुष देवतांआधी केवळ स्त्री शक्तीची पूजा होत असे.
अथेना बेफान नृत्याद्वारे अशा अदृश्य शक्तींशी एकरूप होत असे.मंत्रमुग्ध नाचणाऱ्या अठेनाकडे अनेक पुरुष आकर्षित होत असतात.अथेना पर्वताप्रमाणे जराही डगमगत नसे.नृत्याची कला तिने अनेकांना शिकवली.अथेना कार्यात ,सामाजिक,आर्थिक सगळ्यात अव्वल आणि स्वावलंबी झाली.तरीही ती समाधानी नव्हती.गूढ हस्ताक्षराची कलाही ती शिकली तरी तीच असमाधानी परिस्थिती कायम होती.कदाचित आपल्याला जिने जन्म दिला तिला आपण आता पर्यंत कधीच भेटलो नाही,त्यामुळे ही रिक्तात भरून निघत नाही.या विचाराने ती जिप्सी असलेल्या खऱ्या आईचा शोध घेते.अजूनही अथेना असमाधानीच राहते.
तेव्हा तिला अनवट वाटेवर ड्राय डे भेटते.अथेनेला कुशीत घेणारी गूढ स्त्री !अथेनाला ती आरसा दाखवते ज्यात तिला ज्वाळांमध्ये मातृशक्तीचा साक्षात्कार होतो.अथेना त्या प्रेरणेने समाधानी होऊ लागते.एके दिवशी आपली कला शिकवतांना अथेनाट ‘हाजीया सोफिया’ प्रगट होते.लोकांच्या अनेक समस्या ती सांगते आणि त्याचे निराकरणही सांगते.आणि इथेच अथेनाची कीर्ती सर्वदूर पोहचते.तिच्या या विक्षिप्त वागण्याने तिला पोर्टोबेलोची चेटकीण ही उपरोधिक उपाधी मिळते.अथेना स्वत:मध्येच मश्गुल असते.
चर्च घाबरते.तिला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागतात.अथेना मुळीच घाबरत नाही.जेव्हा बालकायाद्यानुसार जेव्हा तिचा मुलगा वियोरेल तिच्यापासून दुरावाण्याचे शंका येऊ घालते ,तेव्हा अथेना भानावर येते.या हक्रातून बाहेर पाडण्यासाठी तिचा कधीही जगासमोर ण आलेला प्रियकर स्काटलंडचा गुप्त पोलीस मदत करतो.गूढ वादळाचा प्रवास गुम्नामित लुप्त पावतो.
अगदी हिंदी सिनेमाला शोभावा असा शेवट वाचायलाच पाहिजे.
“उन्माद ,स्वतंत्र विचारांच्या स्त्रीयांना चर्चोत्तर काळ जगू देत नाही”असा खुल्लम खुल्ला संदेश यात दिलाय.
अथेना म्हणजे स्वत:च्या आत्म्याला भेदून दुसर्यांच्या आत्म्याला सहज स्पर्श करणारी साक्षात आदिमायाच भासते.
यातले अनेक निरामय माया, प्रेम,संभोग,स्वत:चा शोध कसा घ्यावा इतर विचार स्पष्ट आणि सुंदर मांडले आहेत.
आदिमाया अथेनाला दंडवत.
-भक्ती
प्रतिक्रिया
16 Nov 2021 - 10:03 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद..
17 Nov 2021 - 8:16 am | Bhakti
धन्यवाद!
17 Nov 2021 - 8:33 am | कुमार१
छान परिचय
17 Nov 2021 - 5:31 pm | Bhakti
धन्यवाद!
18 Nov 2021 - 10:39 am | तुषार काळभोर
अथेना स्वतंत्र विचारांची अन् बंडखोर प्रवृत्तीची दिसते.
बहुतेक सर्व समाज पुरुषसत्ताक असल्याने ते अशा स्त्रियांना सहन करत नाहीत. मध्ययुगात युरोपात झालेलं विच हंटिंग हे त्याचाच एक भाग समजलं जातं. अशा स्वतंत्र विचारांच्या, अभ्यास करणार्या, शिकलेल्या स्त्रियांना 'चेटकीण' म्हणून निवडून निवडून मारलं गेलं होतं.
पीडीएफ सापडली आहे, पुस्तक आवडेल याची खात्री आहे.
18 Nov 2021 - 1:22 pm | Bhakti
धन्यवाद!
ब्राउनच्या विंची द कोड मध्ये हाच धागा आहे.
मध्ययुगात युरोपात झालेलं विच हंटिंग हे त्याचाच एक भाग समजलं जातं. अशा स्वतंत्र विचारांच्या, अभ्यास करणार्या, शिकलेल्या स्त्रियांना 'चेटकीण' म्हणून निवडून निवडून मारलं गेलं होतं.
या पुस्तकात याचा पुसटसा उल्लेख आहे.
एखाद्या असाधारण व्यक्तीच्या भोवती जो पंथ प्रकार तयार होतो,तो समाजाला आणि त्या व्यक्तीला घातकच असतो.अथेनाला यातून बाहेर पडते हे महत्त्वाचे.
मी मराठी भाषांतरीत वाचले आहे.तुषार तुला कोणते मिळाले मराठी/इंग्लिश?पाउलो कोएलो कमाल लेखक आहे.विचारांच्या सुंदर जगात स्वतः पुन्हा शोधायला मदत करतो.
18 Nov 2021 - 5:38 pm | तुषार काळभोर
दा व्हिन्ची कोडः हो , मेरी मॅग्दलीन ही येशूच्या शिष्यांतील हुशार स्त्री असल्याने, ती पुढे जाऊन संप्रदायाची (जो पुढे जाऊन 'चर्च' नावाने ओळखला जातो) प्रमुख होईल या भितीने तिची prostitute म्हणून बदनामी केली गेली. तीही पाचशे वर्षांनंतर!
18 Nov 2021 - 1:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
पाउलो कोएलो म्हणजे "अलकेमिस्ट" हे डोक्यात पक्के बसले आहे. त्यांची दुसरी कोणती पुस्तके वाचायाला जमले नाही.
हे पुस्तक मराठी मधे आहे ही चांगली बातमी तुम्ही दिलीत. आता वाचतोच.
पैजारबुवा,
18 Nov 2021 - 4:03 pm | Bhakti
धन्यवाद!
अलकेमिस्ट हे पुस्तक मला वयाच्या बरोबर टप्प्यावर मिळालं होतं आणि हे विच ओफ पोर्टोबेलो पण!
पाएलो यांचं आणखिन एक पुस्तक मी वाचलंय.त्याचा हा धागा.
लाइक फ्लोइंग रिव्हर