या गर्द नील नयनी... !
काही दिवसांपुर्वी प्राजु ने एक कविता पुर्ण करायला सांगितली होती..
मला त्यावर जे सुचले ते मी लिहीलेय..
या गर्द नील नयनी.. दाटून मेघ आले..
का मोर पापण्यांचे.. मिटवून पंख बसले...
क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी..
परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले.. [१]
सखये स्मृतीत तुझिया.. बावरा भ्रमर मी झालो..
भिरभिरलो तुज शोधाया.. विरहात श्वास तुटले.. [२]
हा मंद धुंद वारा.. अन गंधीत रातराणी...
हा चंद्र हेच तारे... मज छळावयास उरले... [३]
व्याकुळल्या मनाला... आता तुझीच आस...
ओठी तुझेच नांव.... चित्ती तुलाच स्मरले... [४]
-चंद्रशेखर.
प्रतिक्रिया
21 Apr 2009 - 10:54 pm | प्राजु
क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी..
परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले
हे आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Apr 2009 - 12:10 am | लवंगी
खूपच आवडली
22 Apr 2009 - 5:50 am | क्रान्ति
कविता आवडली.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
22 Apr 2009 - 7:59 am | चन्द्रशेखर गोखले
सुंदर गीत
22 Apr 2009 - 5:56 pm | चंद्रशेखर महामुनी
प्राजु, लवंगी, क्रांती आणि चंद्रशेखर जी आपणा सर्वांचे...... मनापासुन आभार !
22 Apr 2009 - 6:08 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त !
तुम्ही पण शिकला की गाळलेल्या जागा भरायला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
22 Apr 2009 - 6:13 pm | सालोमालो
चंद्रशेखर,
छान झालीये कविता!
सालो
22 Apr 2009 - 6:50 pm | जयवी
छान :)
25 Apr 2009 - 11:16 pm | चंद्रशेखर महामुनी
परा... सालोमालो..आणि जयवि...
खुप आभार !