शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
3 Oct 2021 - 4:52 pm

तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best.
नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess.
यावर मी बिचारी उलटं काय बोलणार?
"तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार??
( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत
आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.)
पण ते असूदेच.
थोडं यमक जुळू देच.
हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं,
पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं.
आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर..
आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर.
साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून
छान खुलतो रंग तुझ्यावर.. तारीफ नजर लववून.
रेस्तराँ मध्ये गेलोच तर समोरासमोर बसायचं,
एक आईस्क्रीम मागवलं तरी दोन बोलमधून खायचं.
शेजारी लगटून बसणं?? छे छे अब्रम्हण्यम्
प्रेमाने जवळ घेणं तर दूरदूरवर असम्भवम्..
अरे वेड्या, स्पर्श म्हणजे संस्कारशून्य नसतं रे..
खळखळणा-या झ-यातलं पाणी शुद्धच असतं रे..
नजरेतून स्पर्शातून खूप काही सांगता येतं..
शब्दांना जे जमणार नाही तेदेखील मांडता येतं.
संस्कारांची स्पर्शासंगं उगा मोट जुळवू नये.
वाहू द्यावं मोकळेपणी, पाणी उगा वळवू नये..
पाण्यालाही अगदी पक्का ठाऊक असतो ऐलतीर
अवघडलेलं नातं नाहीतर कसा गाठेल पैलतीर?
पण ते असोच.
तसे तुझे "संस्कारीपण" तुला बरीक शोभते.
आणि त्याच्या धाकाने मी शहाण्यासारखी वागते.

(बाजीगर यांच्या एका प्रतिसादावरून लिहिलेली कविता. धन्यवाद, विषय दिल्याबद्दल:))

स्पर्शमुक्तक

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

3 Oct 2021 - 8:02 pm | गॉडजिला

आवडली...

(संस्कारी) - गॉडजिला

Bhakti's picture

3 Oct 2021 - 9:12 pm | Bhakti

तसे तुझे "संस्कारीपण" तुला बरीक शोभते.
आणि त्याच्या धाकाने मी शहाण्यासारखी वागते.

फारच समंजस :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2021 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! आवडलं..! थेट भिडलं. यावरुन आठवण झाली. मी तिला नेहमी म्हणायचो, स्पर्श, शब्द, संवाद आणि अधुन मधून भेटनं, प्रेमासाठी आवश्यक असतं. प्रेम केवळ समजून घेणे, तुझ्यावर खुप प्रेम आहे वगैरे यावर काही नसतं.

तुझं माझं, संस्कारी मन. लोक काय म्हणतात. वगैरे याचा विचार करीत राहिलो तर आपलं जगणं राहून जाईल. आणि नेमकं 'नको रे, तुझ्याशी फक्त बोलत बसले तरी खुप आहे' (च्यायला माझं काय आणि तिचं काय )

-दिलीप बिरुटे
(स्वप्नाळु)

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2021 - 10:03 pm | श्रीगुरुजी

अरे वा. छान लिहिलंय.

प्राची अश्विनी's picture

4 Oct 2021 - 6:36 am | प्राची अश्विनी

गॉडजिला, bhakti, श्रीगुरुजी, बिरुटे सर धन्यवाद!
बिरुटे सरांचा प्रतिसाद गायब????

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Oct 2021 - 8:08 am | ज्ञानोबाचे पैजार

प्रत्यक्ष प्रा डाँच्या प्रतिसादाला पंख लागले? बाबौ...असे काय लिहिले होते त्यांनी या कवितेवर?

पैजारबुवा?

गॉडजिला's picture

4 Oct 2021 - 10:52 am | गॉडजिला

प्रत्यक्ष प्रा डाँच्या प्रतिसादाला पंख लागले?

ही बाजू नवी असेल नसेल, अनोळखी मात्र नक्कीचं. मी चिमटा घेऊन बघितला स्वप्नात तर नाहीं ना...

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Oct 2021 - 8:06 am | ज्ञानोबाचे पैजार

संस्कारांच्या धाकाला भिती असे म्हणतात,
सर्कशीतले सिंह सुध्दा अग्नीगोलातून उडी मारतात,

लोक काय म्हणतील? आई बाबांना काय वाटेल?
याचा विचार करता करता डोके मात्र फाटेल,

पण तरीही आईच्या डोळ्यात पाणी असेल
आणि बाबांच्या कपाळावर अठीच असेल

मुक्त मनमुराद प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगता आले पाहिजे
आणि मोहाच्या प्रत्येक क्षणी स्वतःला सावरता आले पाहिजे

शहाणपणा म्हणजे काय हे मला आजपर्यंत कधी कळलेच नाही
कारण एक सुध्दा शहाणी मुलगी मला आज पर्यंत भेटलेली नाही

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

4 Oct 2021 - 8:33 am | प्राची अश्विनी

क्या बात!

शेर भाई's picture

17 Oct 2021 - 11:08 am | शेर भाई

|मुक्त मनमुराद प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगता आले पाहिजे
|आणि मोहाच्या प्रत्येक क्षणी स्वतःला सावरता आले पाहिजे

उत्कट तरीही संयमी

प्रसाद गोडबोले's picture

4 Oct 2021 - 9:55 am | प्रसाद गोडबोले

संस्कारी असणंच असतं एकदम best.

अहो ते संस्कार संस्कार नाय , भीतीतुन आलेली रीअ‍ॅक्शन आहे . ह्या फेमीनाझी बैकांनी सगळ्या रोमान्स संकल्पनेची वाट लावली आहे . स्पर्श म्हणजे संस्कारशून्य नसतं रे. हे असं तुम्ही ह्या इथं कवितेत म्हणताय , पण दुसरी कोणी फेमीनाझी निघाली तर नुसता हातात हात घेतला तरी ती बोभाटा करेल ना ! शेजारी लगटून बसणं? बापरे भयंकर. विषयच सोडून द्या !
आणि बरं समजा त्या क्षणी तिनेही संस्कार बिंस्कार बाजुला ठेऊन तो क्षण "एन्जोय" केला तरी उद्या भविष्यात बोभाटा करणार नाही ह्याची काय खात्री ? इथं बैका २०-२५ वर्षं जुनी प्रकरणं काढुन सामन्य लोकांची लाईफ हेल करायला लागल्यात आजकाल ! नाना पाटेकर च्या बाबतीतले #मीटू प्रकरण पहिलं नाही का ?

पुर्वी आम्हीही रोमान्स अन शृंगारावर प्रवचने द्यायचो , पण गेल्या काही वर्षात सगळ्या पॅराडाईमच शिफ्ट झालाय , ह्या फेमीनाझींनी सगळा रोमान्स / फ्लर्टिंग / डेटिंग / सगळ्याच मेल फिमेल इन्टर्पर्सनल रिलेशनशिपचा कॅन्व्हास नासवून टाकलाय .

त्यामुळे अगदी १००% क्लियर सिग्नल असेल तरीही पोरींपासुन दोन हात लांबच रहा , अगदी १०००% क्लियर सिग्नल आला तर आणि तरच मेक युवर मूव्ह हाच आमचा आता सल्ला आहे !

ह्या सगळ्या रोमान्सच्या भानगडीत न पडणे हेच शहाणापण आहे .

संस्कार च बेस्ट !

-
#शहाणा आणि प्रॅक्टिकल मुलगा !

#जायी ओ तू माते | न करी सायास | आम्ही विष्णू दास | तैसे न हो ।।

गॉडजिला's picture

4 Oct 2021 - 1:20 pm | गॉडजिला

टोटल ट्विस्ट करून टाकला... हाहाहा.

पणं खरंय, ताकही फुंकून प्यायचे दिस आहेत

प्राची अश्विनी's picture

4 Oct 2021 - 8:00 pm | प्राची अश्विनी

बरं झालं आमच्या तरूणपणी असली मीटुची भिती नव्हती.
पण तुम्ही आता "सांप्रत काळातील रोमान्स आणि शृंगारातील संभाव्य धोके"यावर प्रवचन द्याच.

बाजीगर's picture

4 Oct 2021 - 1:09 pm | बाजीगर

ह्या पामराच्या प्रतिक्रियेवर कविता म्हणजे...
आम्ही करेक्टं वेव लेंथ वर पोचलो ,
बाण निशाण्यावर लागला.

तेच म्हणतो, इतकं संस्कारी असणं बर नव्हे,
त्याला काही फिल्म्स दाखवल्या पाहिजे की प्रेम हळूहळू फ़ुलण्यात काय मजा असते.

शुरू ये सिलसिला तो उसी दिन से हुआ था
अचानक तूने जिस दिन मुझे यूँ ही छुआ था
अचानक तूने जिस दिन मुझे यूँ ही छुआ था
लहर जागी जो उस पल तन-बदन में
वो मन को आज भी बहका रही हैं
ये पहले प्यार की खुशबू
तेरी साँसों से शायद आ रही हैं

असो एखादी माती च असते खूप नरम,
कुछ न ही हो सकता...

मौका घालवला त्याने.
तुम्ही मन आंदोलने छान लिहिता.

प्राची अश्विनी's picture

4 Oct 2021 - 8:00 pm | प्राची अश्विनी

:) धन्यवाद.

श्रीगणेशा's picture

7 Oct 2021 - 12:39 am | श्रीगणेशा

नजरेतून स्पर्शातून खूप काही सांगता येतं..
शब्दांना जे जमणार नाही तेदेखील मांडता येतं.

छान!

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2021 - 9:16 am | प्राची अश्विनी

धन्यवाद श्रीगणेशा!

शेर भाई's picture

17 Oct 2021 - 11:04 am | शेर भाई

शहाणी मुलगी २ मुळे शहाणी मुलगी १ ला भेटावेसे वाटले, १ ची लिंक मिळेल का ??

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2021 - 11:27 am | प्राची अश्विनी