बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ
देव आनंद साहेबांचा चा अव्वल नंबर आठवतो ? त्यात देव आनंद क्रिकेट टीम चा अध्यक्ष पण असतात,पोलीस कंमीनेर पण असतो(dig ) ,बोर्ड प्रेसिडेंट पण असतो ,हेलिकॉप्टर मध्ये बसून जमिनीवरच्या लोकांशी बोलू शकता आणि चक्क cindy crowferd च्या पोटी जन्म घेतात
अक्षय कुमार इंटरनॅशनल चेस प्लेअर असतो ,upsc चा अभ्यास पण करतो ,जर्मन आणि फ्रेंच पण येते ,चित्रपटात सगळे हिरो गाणे गातात पण हा ऑफिसिअल्ली गाणे गातो आणि ते पण आई बायको ह्यांची जबाबदारी सांभाळून
(आणि जसा बायकांचा समाधान होत नसते ,टिपिकल बायकांसारखे त्याची बायको म्हणते फुटबॉल खेळ,स्टॅमिना वाढेल )
आणि हो ,इंदिरा गांधी ह्यांना डायरेक्ट सल्ला देतो ना विचारता
वाणी कपूर ने ह्या आधी फक्त ३ रोले केले होते आणि ह्यात पण छोटा रोल आहे ,पण पण पण चित्रपटाच्या शेवटी २ जबरदस्त ट्विस्ट आहे ज्यामुळे तमाम महिलामंडळाला हा चित्रपट खास आवडेल ,वाणी कपूर आणि हुमा दोघींचे रोल खास आहेत
मध्यंतराआधीच भाग तास कंटाळवाणा आहे ,पण नंतर मजा येते
बुद्धिबळासारखे डाव प्रतिदाव, जे लोग बुद्धिबळ खेळात नाहीत त्यांना समजणार नाही पण बरेच कन्सेप्ट इथे टाकण्यात आले आहे
कंटाळवाणा भुज बघून वैतागलेअसाल तर नक्की बघा ,
अक्षय कुमार सहसा पाकिस्तान विरोध भूमिका घेत नाही पण बहुतेक पहिल्यांदा त्याने असा रोल ,केलाय बेबी मध्ये पण सरळ सरळ पाकिस्तान विरोधी नव्हता
सगळ्यात जास्त कमाल मेकअप आर्टिस्ट्स ची,लारा दत्ता ला इंदिरा गांधी हुबे हब केले ,दुसरिकोनी असती तरी फरक नसता पडला ,तिचा बहुतेक अक्षय बरोबर १३ वा चित्रपट आहे
पण बाकी चित्रपट बघतात मजा येते ,बघूनच घ्यावा ,महाराष्ट्रात चित्रपट गृहे खुलेहोते आहे ,किंवा ऍमेझॉन prime वर पण आला आहे
बाकी जास्त परीक्षण देता येते नाही ,स्पॉईलर्स येतील,प्रतिसाद देतानां पण स्पॉईलर्स चे ध्यान ठेवावे हि माफक अपेक्षा
प्रतिक्रिया
29 Sep 2021 - 2:45 pm | अमरेंद्र बाहुबली
मिपाकरांच्या परिक्षणावरून शेरशहा पाहीला अजुनही धक्क्यात आहे. तरी हा पाहीन म्हणतो.
29 Sep 2021 - 2:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
जो म्हातार्या सलमानचा राधे पाहु शकतो तो हा चित्रपटही बघु शकेल.
29 Sep 2021 - 3:12 pm | रावसाहेब चिंगभूतकर
असं वाचलं. हस्तर साहेबांच्या वयाबद्दल अंमळ शंका आली.
29 Sep 2021 - 3:18 pm | हस्तर
तुम्बाड बघा
माझे वय कळेल
29 Sep 2021 - 11:09 pm | किल्लेदार
"जो म्हाताऱ्या सलमानचा राधे पाहु शकतो तो हा चित्रपटही बघु शकेल"
असे म्हणायचे असावे
29 Sep 2021 - 7:26 pm | गॉडजिला
काय ते भव्य सीन्स, काय ते विएफेक्स, काय ते कथानक...शेवटी मारामारी
कृपया शेर्शहा अन याची मात्र तुलना नको...
29 Sep 2021 - 8:01 pm | सतिश गावडे
चित्रपटाचे नाव गुजराती आहे का?
30 Sep 2021 - 12:30 am | तर्कवादी
फारच ठोकळेबाज चित्रपट वाटला.. यापेक्षा बेबी कैकपटींनी बरा... मला तर सैफचा फँटम खूप आवडतो. बुद्धीबळाच्या खेळाप्रमाणे डाव /व्युव्हरचना वगैरेची खरी मजा घ्यायची असेल तर फँटम सर्वोत्तम..
30 Sep 2021 - 1:27 am | अनन्त अवधुत
बरा वाटला बेल बॉटम पुढे.
पुढच्या चित्रपटात अक्षयने नुसत्या देशभक्तीपर प्रवचनाने एखाद्या देशद्रोह्याला ठार केले असा सीन दाखवता येईल, ह्यात अक्षयने इतके बोर केले आहे.