फालुदा
साहित्यः
१/२ कप बारीक शेवया
१ ग्लास फिजमधील चिल्ड दुध
२ च.पिठी साखर/साधी साखर चवीनुसार
३ च्.सब्जाचे बी/ बासिल बी.
१/२ कप पिस्ता आणि बदाम प्रत्येकी. ब्लांच करून, साले काढणे.
६ च्.रोझ सिरप /रुह अफजा
२ स्कूप आईस्क्रिम /कुल्फी (ऐच्छिक)
चेरीज (ऐच्छिक)
१.प्रथम शेवया उकळत्या पाण्यात शिजवून पाणी काढून फ्रिजमध्ये चिल्ड करणे करता ठेवणे.
२.६-७ पिस्ता आणि बदाम बाजुला काढून त्याचे काप करणे सजावटी साठी.
३.उरलेले पिस्ता,बदाम,दुध्,साखर मिक्सर मधून काढणे स्मूथ होइपर्यंत, आणि फ्रिजमध्ये चिल्ड करणे.
४.सब्जाचे बी पाण्यात भिजवत ठेवणे (ट्रान्स्फरंट होइपर्यंत).
सर्व्ह करताना:
२ उंच ग्लास घेणे.
अर्ध्या शिजवलेल्या शेवया
अर्धे सब्जाचे बी
नंतर अर्धे चिल्ड दुध
अर्धे रोझ सिरप
त्यावर सर्वात शेवटी आईसक्रिम घालणे,आणि
रोझ सिरपचे काही थेंब त्यावर टाकणे. पिस्ता, बदाम ने सजवणे
जमल्यास चेरीने सजवणे.
वरदा, लवकरच बदाम मिल्क शेक ची रेसिपी टाकेन.
प्रतिक्रिया
20 Feb 2008 - 4:36 pm | राजमुद्रा
आईस्क्रिमच्या आणखी रेसिपी हव्यात.
आता उन्हाळा येत आहे ना!
राजमुद्रा :)
20 Feb 2008 - 4:59 pm | सृष्टीलावण्या
चवीचं खाणार त्याला देव पाककृत्या देणार आणि इतके छान लिखाण
वाचून करून बघण्याची प्रेरणा पण...
माझी ही प्रतिक्रिया तुमच्या सर्व पाकृंना अनंत काळासाठी लागू.
20 Feb 2008 - 5:08 pm | स्वाती राजेश
आभारी आहे सृस्ष्टीलावण्य. नविन नविन रेसिपी देइनच.:)
राजमुद्रा लवकरच आइस क्रिम च्या रेसिपी येतील.
खरेतर मी करून पाहिलेल्या रेसिपी देते कारण करताना काय काय वेगळे बदल केले ते व्यवस्थीत लिहीता येते. किंवा कुणी विचारले तर त्यातील बारकावे माहित असणे गरजेचे असते असे मला वाटते.
धन्यवाद.
20 Feb 2008 - 5:32 pm | विसोबा खेचर
केवळ अप्रतिम पा कृ! शब्द नाहीत...!
अवांतर - मुंबईला पोलिस कमिशनरच्या हापिसासमोर 'बादशहा कोल्ड्रिंक हाऊस' आहे, तिथेही अतिशय उत्तम दर्जाचा फालुदा मिळतो! क्रॉफर्ड मार्केट जवळच्या ग्रँट हाऊस कँटीन मध्ये खिमापाव खावा आणि त्यानंतर बादशहा मधला फालुदा! खल्लास!
तात्या.
20 Feb 2008 - 7:30 pm | प्रभाकर पेठकर
उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना वरील सुंदर , टेस्टफुल आणि थंडगाऽऽऽर फालुद्याचा पहिला सिप घेतला की मेंदू एखाद्या तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसला आहे असा भास होतो.
20 Feb 2008 - 7:40 pm | डॉ.प्रसाद दाढे
फालुदा हा आमचा फारच लाडका पदार्थ आहे..त्याची पाक-कृती देऊन स्वाती-राजेश या॑नी खूप मोठे काम केले आहे..त्या॑ना आमचे लाख लाख धन्यवाद!!