मंदिराची मालमत्ता
तिथे देवाची सत्ता
विकायचा विचार
कसा करे नोकर
पुजारी केवळ सेवक
मालक असतो देवक
पुजा-याला नाही जमीननोंदी
कोर्टाने केले स्पष्ट तोंडी
वापरकर्ता या रकान्यातही
लिहिण्याची नाही गरज,
मध्यप्रदेश कोर्टाने पुजा-यांचा
अर्ज केला खारीज
OMG चा हा जणू पुढील भाग
न खात्या देवाचा नैवेद्य च नव्हे
तर भुखंडाचे श्रीखंड ही
खाण्याला कोर्टाची चपराक.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/temple-property-deity-pujari-m...
प्रतिक्रिया
7 Sep 2021 - 6:56 pm | गॉडजिला
...
7 Sep 2021 - 9:16 pm | Rajesh188
गावातील मंदिर असतील किंवा देशातील महत्वाची मंदिर .
ह्यांना पूर्वीच्या राजा महाराजा नी जमिनी इनाम दिलेल्या आहेतः आणि ब्रिटिश नी ते तसेच चालू ठेवले आणि भारत सरकार नी पण ते इनाम तसेच चालू ठेवले आहेत.
मंदिराची रोज ची दिवाबत्ती ,पूजा ह्याचा खर्च भागवण्यासाठी त्या जमिनी इनाम दिलेल्या आहेत.
त्या जमिनी विविध लोक कुळ म्हणून कसत आहेत आणि ते देवाच्या खर्चाची जबाबदारी खंड म्हणून उचलत आहेत.
मालक हे देव च आहेत पुजारी नाहीत.
पण आता हाव सुटल्या मुळे ही पुजारी लोक देवस्थान च्या मालमत्तेवर मालकी हक्क दाखवत आहेत..
ह्या स्थितीत कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे.
8 Sep 2021 - 7:20 am | बाजीगर
धन्यवाद राजेशसर.
"हाव सुटल्या मुळे ही पुजारी लोक देवस्थान च्या मालमत्तेवर मालकी हक्क दाखवत आहेत.."
मळे राखी तो तळे चाखी
हा न्याय इथे लागू नाही.
8 Sep 2021 - 9:16 am | १.५ शहाणा
कसेल त्याची जमिन तसे पुजेल त्याचा देव असे हवे
8 Sep 2021 - 9:38 am | बाजीगर
शहाणा महाशय विचार आवडला.
तसाही विठोबा,उन्हातानातून,पावसातून,वादळवा-यातून येवून विठोबाच्या पायावर डोके ठेवून, विठोबाचे पाय झिजवणा-या वारक-चाच आहे.