कंदील २

आंबोळी's picture
आंबोळी in जनातलं, मनातलं
20 Apr 2009 - 4:20 pm

माझ्याकडच्या कंदीलाची कथा तुम्ही पुर्वी वाचली असेलच.
गेले ४ -५ वर्षे तो कंदील माळ्यावर कुठे तरी अडगळीत पडला होता. इथे त्याची कथा लिहील्या पासून मलाच त्याच्या विषयी थोडे कुतुहल वाटू लागले होते. दर वेळी सुट्टीत घरी गेलो की तो कंदील माळ्यावरच्या अडगळीत शोधायचे प्रयत्न सुरू होते. पण काही यश येत नव्हते. पण गेल्या आठवड्यात घरी गेलो असता २-३ दिवस नेटाने सगळा माळा धुंडाळला आणि परवा दिवशी (शनिवार) सकाळी एका खोक्यात तो कर्दनकाळ कंदील शांत पहूडलेला दिसला....
माझा आनंद गगनात मावेना...
लगेच तो कंदील खाली काढला. त्या वर साठलेली ४-५ वर्षाची धूळ / जळमट साफ केली. स्वछ पुसून तो कंदील आणून हॉल मधे ठेवला. नेहमी प्रमाणे बायको आणि आई या वेळीही एक होउन माझ्या नावे शंख करू लागल्या ...
" कशाला काढलाय तो कंदील " .. "आपण तो नदीत सोडूया"... "कुठल्या तरी देवळात देउन टाकूया"... वगैरे वगैर्रे.

"अग पूर्वी घडलेल्या गोष्टी योगायोगाने घडल्या होत्या.... असे कंदील लाउन लोक जायला लागले तर कसे होणार? आणि असा कुठे मंतरलेला आहे हा कंदील? त्या अमुक अमुक नी आपल्या बरोबरच घेतला होता असाच कंदील ... त्यानी तर तो देवघरात लावलाय... रोज चालू करतात ते.... इतका सुंदर शोपीस तुम्ही नदीत कशाला टाकताय? मी मुंबईला घेउन जातो..." इति अस्मादीक.
आणि शेवटी घरातल्या सगळ्याना बोलावून त्या कंदीलाचे समारंभ पूर्वक प्रज्वलन केले. आणि.........................
कंदील छान पेटला... शोकेस मधे अगदी खुलून दिसत होता.. प्रकाशही छान पडला होता... याच्या पलिकडे काहीच झाले नाही.

"जर काही घडले तर तो कंदील मुंबईला न्यायचा नाही." बायकोने सज्जड दम भरला. "काही होत नाही ग... काळजी नको करू" आमची सारवासारवी.
तो दिवस विशेष काहीही न घडता सरला.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून ब्यागा भरून गाडीत टाकल्या. बागेतल्या झाडाचे नारळ, कैर्‍या, आवळे झालेच तर गव्हा तांदळाची बारकी ठिकी यामुळे गाडी आधीच फुल्ल झाली होती. कंदीलाला जागाच उरली नाही. त्यामुळे जड अंतःकरणाने कंदील घेउन जायचा बेत रद्द केला आणि पुढच्या फेरीत नक्की नेउ असे ठरवून गाडीला स्टार्टर मारला.
दुपारी ४ पर्यंत नविमुंबईत घरी पोचलो. चहा वगैरे घेउन निट पोचल्याचे घरी कळवण्यासाठी फोन केला. आम्ही सुखरूप पोचल्याचे कळाल्यावर आई म्हणाली,

"अरे आपला कंदील लागला बरका.... ती आपली अमुक तमुक... तिचे सासरे... तुम्ही गेला होता ना परवा भेटायला.... ते गेले आज सकाळी... तुम्ही इथून बाहेर पडलात आणि ५ मिनीटात फोन आला होता... "

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

20 Apr 2009 - 4:22 pm | आनंदयात्री

आयला भेंडी ... साल्या कंदिल्या रामोश्या !!
कशाला लावलास बे ते अपशकुनी दळभद्री खंदील !!

निखिल देशपांडे's picture

20 Apr 2009 - 4:28 pm | निखिल देशपांडे

कंदिल आला का तुमचा परत.........
कशाला लावला तो कंदिल्????अजुन किति लोकांना हा कंदिल खपवणार????
फेका कि हो नदीत

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

बाबा आंबोळ्या का रे असा लोकांच्या जिवावर उठतोस?
(खुद के साथ बातां : ह्या आंबोळ्याच्या धाकानं, हल्ली घरी दिवे गेले तरी, लोक साधा नेहेमीचा कंदील सुद्धा लावेनासे झालेत म्हणे! :T :O :S )

चतुरंग

मदनबाण's picture

20 Apr 2009 - 4:57 pm | मदनबाण

माझा आनंद गगनात मावेना...

काय रे राजा तु नक्की मणुस हायस ना ? ;)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

धमाल मुलगा's picture

20 Apr 2009 - 5:07 pm | धमाल मुलगा

आयला, खरंच हा कंदील काय तरी जबराट दिसतोय.
आंबोळ्या, भावा, लै मोठ्ठी लिश्ट करुन ठेवलीये नावांची, ह्या विकांताला मारायची का चक्कर तुझ्या गावाकडं? कंदीलाखाली सगळी लिश्ट ठेऊन देऊ कंदील पेटवून ;)

च्यायला, तुलातरी किती हौस भौ, दिसला कंदील की पेटीव....दिसला कंदील की पेटीव....
आरं बाबा तू काय लोकसंख्या कमी करायचं कंत्राट घेतलंयस का?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अभिज्ञ's picture

20 Apr 2009 - 5:27 pm | अभिज्ञ

कंदिलाच्या ह्या चमत्कारावर काहि लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.त्याबद्दल एवढेच सांगेन,

कंदिलाच्या ह्या चमत्काराचे अस्तित्व पडताळण्यासाठी उच्च शास्त्रीय दृष्टिकोन असणं आवश्यक आहे; कारण तर्क, सारासार विवेक आणि शास्त्रीय दृष्टिकोनाला लागणारी चिकित्सक वृत्ती ह्यांचं नियमन करणा-या प्रबुद्ध मेंदूतूनच पराबुद्धीचा (higher conscience) विकास होतो आणि अशा विकसित पराबुद्धीच्या सहाय्याने कंदिलाच्या ह्या चमत्काराचे सर्वव्यापी स्वरूप जाणता येते. अकंदिलवाद्यांकडे असा प्रबुद्ध मेंदू (consciously operating part of brain) नसल्यामुळे त्यांच्यात शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. शास्त्रीय दृष्टिकोनाच्या अभावामुळेच अकंदिलवादी बालबुद्धीतून "अंधश्रध्दा समाजाला घातक " सारखे बिनबुडाचे सिद्धांत बाहेर पडतात. म्हणजेच अकंदिलवादि बिनडोक होते हे सिद्ध करण्याने "कंदिलाच्या ह्या चमत्काराचे अस्तित्व जाणण्याची कुवत अकंदिलवाद्यांकडे नाही" हे अनुमान काढता येते.

;)

अभिज्ञ.

धमाल मुलगा's picture

20 Apr 2009 - 5:38 pm | धमाल मुलगा

प्रबुद्ध मेंदूची लक्षणे कळली तर बरे. म्हणजे आमच्याकडे प्रबुद्ध मेंदू आहे की नाही हे तपासता येईल आणि तो नसल्याचे कळूल्यावर वृथा वाद घालणे थांबविता येईल.

अवांतरः आपण हा वैचारिक दहशतवाद थांबवाल काय? ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अभिज्ञ's picture

20 Apr 2009 - 5:54 pm | अभिज्ञ

आमच्या एवढ्या साध्या बोलण्याला आपण वैचारिक दहशतवाद समजत असाल तर तो आपला प्रश्न आहे. ;)
कंदिलवादी विरुद्ध अकंदिलवादी असा वाद मागच्या लेखात बराच जोमदार होता. अकंदिलवाद्यांच्या मते कंदिलवाद्यांना विज्ञान क्षेत्रातलं काहीही कळत नाही. अंधश्रध्दा निर्मुलनाचे अनेक अकंदिलवाद्यांनी जोरदार समर्थन केलेलं आहे. त्यामुळे "अंधश्रध्दा निर्मुलन हे आय पी एल च्या तमाशा सारखेच (ह्या विषयावर मी एक कविता पण टाकणार आहेच) बिनबुडाचे आहे" हे सिद्ध करण्यात आमच्यासारख्या कंदिलवाद्यांना जास्त स्वारस्य आहे.
सेक्युलरवाले, मार्क्सवादी, राज/वरुण समर्थक ही मंडळीं अनेकदा अकंदिलवादी उडाणटप्पूंची री ओढतांना दिसतात. म्हणून त्यांची ह्या विषयातली भूमिका अगोदरच माहीत असायला हवी. नाहीतर आमच्याकडून अकंदिलवाल्यांचं (कंदिल लावून) शिरकाण झाल्यावर हे "आय पी एल वाले अकंदिलवादी" मोकाट सुटतील... ह्यात काहि शंका नाहि.

;) ;)

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2009 - 7:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काल मी फार उन्हाळा होता म्हणून थोड्याऐवजी बरंच कोकम सरबत घेतलं. पण त्यामुळे मला डोळ्यांना शांतता मिळालीच नाही म्हणून मी साधा बल्बवाला कंदील लावला. तेव्हा बरेच लोकं अंगण्यात बसून गप्पा मारताना दिसले. त्यांच्या मलमलच्या सद्र्यांवर घुबड छाप कंदीलाच्या जाहीराती होत्या.

अशा पद्धतीने मला मलमलच्या जगाबद्दलचे नवीन ज्ञान मिळाले, ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण!!!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

यशोधरा's picture

20 Apr 2009 - 9:02 pm | यशोधरा

अरे काय लावलय काय हे धम्या आणि आभिज्ञ!! =))

अवलिया's picture

20 Apr 2009 - 6:00 pm | अवलिया

तुमच्या ह्या कंदिलाने सापेक्षतावादावर काही प्रकाश टाकता येईल का? :?

(डोक्यावर घोंगडी घेउन बसलेला महाबळेश्वरवादी) अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

20 Apr 2009 - 6:02 pm | पर्नल नेने मराठे

:SS
चुचु

मदनबाण's picture

20 Apr 2009 - 6:06 pm | मदनबाण

त री च म्हं ट ले अ जु न चु चु बा ई आ ल्या क शा ना ही त ते फो टु घे ऊ न . . .
अं बो ळी रा व हा न वी न व्ह र्ज न चा कं दी ल क सा वा ट तो ? प ण हा पे ट ले ला मा त्र दि स त ना ही ! ! !

(टि व टि व)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2009 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार

काय हो यमाचे सोल एजंट ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

20 Apr 2009 - 6:24 pm | भडकमकर मास्तर

एकाद्याच्या मरनाची अशी मजा गेने बरे न्हाई...
तो कन्दिल तुम्हि ताकुन द्या.
..
प्लिज मजे ऐका..
हस्न्यावारि नेउ नक...
...
तुम्माला सग्लिच मजा वात्ते..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

20 Apr 2009 - 6:28 pm | चतुरंग

=)) =)) =)) =))

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2009 - 7:16 pm | बिपिन कार्यकर्ते

तो कंदिल लावून मारतोय लोकांना, तुम्ही हसवून हसवून माराल हो...

=))

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

20 Apr 2009 - 9:01 pm | यशोधरा

=)) हसून हसून कंदिलाशिवायच मेले!

प्राजु's picture

20 Apr 2009 - 6:33 pm | प्राजु

कंदिलाचा प्रकाश असाच पडत राहिला तर मानवजातीवर संकट लवकरच येणार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

20 Apr 2009 - 8:42 pm | दशानन

मानवजातीच्या सुरक्षेसाठी मी युफओ वाल्यांशी बोलणी केली आहेत, दोनचार पॅग घेताच ते दिसतील अशी आशा तो पर्यंत धीर धरा ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Apr 2009 - 12:10 pm | घाशीराम कोतवाल १.२

दोनचार पॅग घेताच ते दिसतील

राजे तुमच्या डाक्तर ने तुम्हाला दवा दारु प्यायची पर्मीशन दिली काय थांबा
ईचारतो त्यास्नी गुरगावात फोन करुन :)] :)] :)]

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 3:40 pm | विजुभाऊ

अर्रे कंदील बरेच दिवस माळ्यावरच राहिला होता वाटते?
अंबोळ्या तुझ्याकडे त्या कंदीलासारख्या अशा कितीक गोष्टी आहेत?

हे काय बोलणं झालं?


आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ

सहज's picture

14 May 2009 - 3:45 pm | सहज

अरे जरा निवडणुकीच्या दिवशी लावायचा की नाही रे!!!!!

रेवती's picture

14 May 2009 - 6:42 pm | रेवती

ओ भौ,
का माझ्यासारख्या भित्र्या लोकांना अजून घाबरवताय?

रेवती

नील_गंधार's picture

13 May 2010 - 4:32 pm | नील_गंधार

हा पण किस्सा जबर्याच.

तो कंदील माळ्यावरच्या अडगळीत शोधायचे प्रयत्न सुरू होते. पण काही यश येत नव्हते. पण गेल्या आठवड्यात घरी गेलो असता २-३ दिवस नेटाने सगळा माळा धुंडाळला आणि परवा दिवशी (शनिवार) सकाळी एका खोक्यात तो कर्दनकाळ कंदील शांत पहूडलेला दिसला....
माझा आनंद गगनात मावेना...

हे तर फारच खास.

नील.

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 9:31 pm | सतिश गावडे

प्रगोने चर्चेत या कथेचा उल्लेख केला आणि कथा पुन्हा वाचली.

नव-मिपाकरांना या "क्लासिकची" माहिती व्हावी म्हणून प्रतिसाद देऊन वर आणत आहे.

या भागावरील प्रतिसादही कथेइतकेच भारी आहेत.

भिंगरी's picture

20 Sep 2017 - 3:10 pm | भिंगरी

या दिवाळीत लावून पहा.
मात्र आम्ही मिपाकर तुमच्या अजिबात ओळखीचे नाही.