पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141
(कळेना मला)
डोळ्या समोर तारे कसे चमकतात
हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर...
...मला कळालं!
जीभ कशी अडखळते
हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर...
...मला कळालं!
हृदय कसे धडधडते
हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना...
...मला कळालं!
आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही
घरी जाताना, दरवेळी
गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!
पैजारबुवा
प्रतिक्रिया
16 Aug 2021 - 1:27 pm | सोत्रि
छान :=))
- (कळेनासं झालेला) सोकाजी
16 Aug 2021 - 2:30 pm | चांदणे संदीप
वाटलेलंच मला. =))
सं - दी - प
16 Aug 2021 - 5:41 pm | तुषार काळभोर
वाटलेलंच मला. =))
हे येणार याची खात्री होती!
16 Aug 2021 - 2:37 pm | टवाळ कार्टा
खिक्क
16 Aug 2021 - 4:41 pm | श्रीगुरुजी
मस्त!
17 Aug 2021 - 7:36 am | शानबा५१२
खरोखर मस्त.
17 Aug 2021 - 9:07 am | प्रचेतस
_/\_ कहर आहात माऊली
17 Aug 2021 - 10:01 am | प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
पैजारबुवांचे विडंबन आले की त्यातील पेरणेच्या लिन्क वर जाऊन आम्ही मुळ कविता वाचतो =))))
18 Aug 2021 - 9:47 pm | संजय पाटिल
कच्चा माल आवडला तरच करागीर नग घडवायला घेतो........
17 Aug 2021 - 10:38 am | विवेकपटाईत
मस्त
19 Aug 2021 - 6:04 am | तुषार काळभोर
इथला हा शाळेतला निरागस, भाबडा, भोळा विद्यार्थी ...
हाच पुढे जाऊन निरागस, भाबडा, भोळा प्रियकर झालाय...
19 Aug 2021 - 5:51 pm | कुमार१
गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी >>> भारीच !
22 Aug 2021 - 7:22 pm | पाषाणभेद
खरे तर हे करूण काव्य आहे. विद्यार्थ्यांची पिढी दहशतीच्या खाली गाडली गेलीय.
24 Aug 2021 - 9:43 am | राघव
द्येवा... _/\_
24 Aug 2021 - 9:53 am | सुबोध खरे
मस्त
24 Aug 2021 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वतंत्र कविता व्हावी, वाटावी इतकं छान.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे