`पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
1 Apr 2009 - 4:54 pm

akshay1 अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं.
मुंबईच्या लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला. लेविस जीन्स (आणि वर टी-शर्ट) घालून. दोन वर्षांपूर्वी याच फॅशन महोत्सवात कुणा मॉडेलचं (अनवधानानं) वस्त्रहरण झाल्यानं कोण गदारोळ उठला होता! अक्षयला दोन वर्षांत काही चर्चा झाली नसल्याचं वैषम्य वाटलं असावं. त्यानं स्वतःच आपलं वस्त्रहरण करून घेतलं, तेही चारचौघात! आणि स्वतःच्या अधिकृत धर्मपत्नीच्याच हातून!
"दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा...मैं तुमसे प्यार कर लूँगी' म्हणणारी लाजाळू नायिका काळाच्या पडद्याआड गेली. आता जमाना आहे "जरा जरा टच मी किस मी होल्ड मी' वगैरे म्हणून नायकाला थेट आव्हान देणाऱ्या मदमस्त फटाकड्यांचा! "टल्ली हो गई' म्हणून भर मैफलीत धिंगाणा घालणाऱ्या बिनधास्त युवतींचा. बॉलिवूडच्या एका हॉट जोडीनं या बदलत्या जमान्याचं प्रात्यक्षिक 30 मार्चच्या संध्याकाळी दाखवून सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.
झालं असं, की मुंबईच्या फॅशन वीक मध्ये लेविस जीन्सची जाहिरात करण्यासाठी रॅम्पवर आलेल्या अक्षयकुमारला समोर धर्मपत्नी ट्‌विंकल बसलेली पाहून एक "खट्याळ' प्रकार सुचला. तो रॅम्पवरून खाली उतरला आणि थेट तिच्यासमोर उभा राहिला. शर्ट वर करून त्यानं तिला (आपल्या!) पॅंटचं बटण काढायला सांगितलं. कशी का होइना, भारतीय नारीच ती! बावरली हो बिच्चारी! पती झाला म्हणून काय झालं, त्याच्या पॅंटचं बटण काढायचं? चारचौघांदेखत?
ती लाजली. हा हुरळला. मग यानंच लाडंलाडं तिचा हात आपल्या पॅंटजवळ घेतला आणि तिला बटण काढायला लावलं. शेजारीपाजारी बसलेल्यांनी अगदी कौतुकभरल्या नजरेनं हा "सोहळा' पाहिला. मग तो तसाच रॅम्पवर चढला आणि पडद्याआड गेला.
कित्ती छान नै? परंपरेच्या, लाजाळूपणाच्या, तथाकथित संस्कृतिबंधनांच्या जाळ्यात अडकून पडलेल्या भारतीय नारीला या सगळ्यातून मुक्त करणाऱ्या अक्षयच्या या धाडसी कृतीबद्दल "पद्मश्री' नव्हे, "भारतरत्न' मिळायला हवं, असं नाही वाटत तुम्हाला?

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

1 Apr 2009 - 5:02 pm | लिखाळ

पँट सुद्धा स्त्रीलींगीच आहे. ती सुद्धा बटणाच्या जोखडातून मुक्त व्हायला पाहिजे यासाठी ते आंदोलन होते.

-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Apr 2009 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ठ्यॉ करून हसायला आलं! =))

पण ती प्यांट 'ते' बटणाच्या जोखडात कशी रे अडकली? ;-)

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2009 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार

जळा जळा लेको आमच्या अक्षयवर !
आजकाल लोक दुसर्‍याच्या बायकोला हे असले प्रकार करायला सांगतात, आणी काहि काहि बायका करतात पण म्हणे. अशा कलीयुगात स्वतःच्या धर्मपत्नीला तिचा हक्क बजावु देणार्‍या एकपत्नीव्रती तेजपुंज धर्मरक्षक भाटिया कुलोत्पन्न चिरंजीवांना खरेतर भारतरत्ना बरोबरच, जगातील अद्ययावत महान पुरस्कारांनी सम्मानीत केले पाहिजे !

परा खन्ना
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चिरोटा's picture

1 Apr 2009 - 6:42 pm | चिरोटा

हे 'पद्म' पुरस्कार मिळवण्यासाठी कुठे कुठे 'सेटिन्ग' करावे लागते ,कोणाला किती 'खिलवावे' लागते ह्याची सुरस माहिती एका पत्रकाराने पुर्वी दिली होती्. ह्या वर्षी बॉलीवूड मधल्या मन्डळीना बरेच पुरस्कार मिळावेत हा योगायोग नव्हता.
एकदा पद्म पुरस्कार मिळाला की मिळणार्याला पण जीवन सार्थकी लागल्यासारखे होते.मानकरी मग त्याच्या/तिच्या क्षेत्राबाबत व्याख्याने/परिसन्वादात अधिकारवाणीने पोपटासारखे बोलू लागतो. म्हणजे उद्या अक्षय कुमार एखाद्या परिसन्वादात 'भारतिय सिनेमा आणि त्याचा भावी पिढीवर होणारा परिणाम' ह्यावर व्याख्यान देउ शकेल.श्रोते आणि पत्रकार त्यावर माना डोलावतील.टाईम्स सारख्या टुकार व्रुत्तपत्रात सम्पादकिय पानावर तो 'भारतिय सिनेमा ग्लोबल कसा होइल' ह्यावर लेख लिहील.
आपल्याला काय, तेवढाच टाइम पास.!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 7:28 pm | क्रान्ति

चौदाव रत्न दाखवाव अशांना!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

भडकमकर मास्तर's picture

1 Apr 2009 - 9:02 pm | भडकमकर मास्तर

खूप छान अक्षय...
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाउदेत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

1 Apr 2009 - 9:05 pm | मिसळभोक्ता

च्यामारी, स्वतःच्या धर्मपत्नीलाच प्यांटचे बटन काढायला लावले ना ? मग त्यात धर्म कुठे भ्रष्ट होतोय ? आणखी कुणाला लावले असते, तर मग प्रश्न होता.

-- मिसळभोक्ता

संदीप चित्रे's picture

1 Apr 2009 - 9:49 pm | संदीप चित्रे

'पद्म' पुरस्कार त्याच्या चित्रपटांतील कामगिरीसाठी मिळाला असावा आणि अशा 'काम'गिरीसाठी नसावा ही शंका घेण्यास वाव आहे हे ही नसे थोडके :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

2 Apr 2009 - 12:15 am | धनंजय

रामजोशांची एखादी नायिका "नवरा दूर गेलाय, तर तू ये, अमुकतमुक करू" असे प्रियकराला म्हणे. तो जमाना गेला आणि लाजाळू नायिकांचा जमाना आला. आता लाजाळू नायिकांचा जमाना गेला, किस-मी-टच-मी म्हणणार्‍या नायिकांचा जमाना (?परत?) आला.

कालचक्र फिरते आहे, कदाचित पुन्हा लाजाळू नायिका परत येतील... आणि त्या अक्षय कलाकृतींमधले नायही.

सुनील's picture

2 Apr 2009 - 2:42 pm | सुनील

ताजा कलम

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

2 Apr 2009 - 2:57 pm | चिरोटा

वाचल्यावर अक्षय कुमार ह्यास मनातून बरेच वाटेल्.शिवाय 'जीन्स त्याची,बटण त्याचे,उघडण्याचा अधिकार त्याने कोणाला द्यावा हा त्याचा प्रश्न आहे' असे व्यक्ती स्वातन्त्र्यवाले म्हणतील्.प्रकरण अगदीच अन्गाशी आले तर ' सन्डासला जायची घाई झाली होती,माझ्याच्याने बटण उघडत नव्हते म्हणून बायकोला उघडायला सान्गितले' असा बचाव तो करेल.
मग काय बोलणार भाऊ?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

Nile's picture

20 Apr 2009 - 6:09 am | Nile

मुळात sponsor ने बटन कुणा सुंदरीने उघडावे अशी अट/theme होती.

पतिव्रता twinkle व पत्निव्रता अक्षय ने विरोध करुन हे "नाट्य केले". आता काय बरोबर काय चुक ते आपण "माय बाप" पब्लीकच ठरवा!