मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो.
कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता.
कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे.
या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले.
यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.
त्या फोनवरच्या माणसाला मला ही सर्वीस नको आहे असे साम्गितले.
तरीही आज ही रक्कम क्रेडीट कार्डमधून वळती झालेली दिसतेय.
या बद्दल आयसीआयसी आय च्या पोर्टलवर कुठेही असे ट्रांजेक्षन कॅन्सल करण्यासाठी काही लिंक दिसत नाही.
कस्टमर केअर च्या नावाखाली त्यांना पोर्टलवरुन एक ईमेल करा अशी सूचना दिसतेय.
त्याप्रमाणे ईमेल केला. त्याचे उत्तर ४८ तसाम्मधे येईल असा मेसेज मिळाला.
रक्कम खूप मोठे नाही मात्र मी ती सर्वीस घेतली नसतानाही त्यांनी चार्ज केली आहे.
याबद्दल तक्रार कुठे करता येईल
तसेच अशी नको असलेली सर्व्हीस रद्द कशी करता येईल
आपल्या माहितीवाचून झालेला व्यवहार कॅन्सल करुन रक्कम परत आपल्या खात्यात कशी मिळवता येते.
याबद्दल माहिती हवी आहे
प्रतिक्रिया
29 Jul 2021 - 9:10 pm | गॉडजिला
कॉलसेंटरवर संभाषण हे एक शास्त्र आहे
सर्व प्रथम कॉलसेंटर वर फोन करून बोलणे सोयीचे असते... तिथं फॉलोअप मधे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर बोलताना अधून मधून तु बाजूला हो तुझ्या फ्लोअर मॅनेजर सोबत मला बोलू दे , फोन जोड असे सूनवायचे, तो आला फोनवर त्यानेही सेम कॅसेट लावली तर डीव्हिजन इन्चार्ज सोबत फोन जोडून दे वगैरे वगैरे बोलत वरवर हुद्यावर जात रहायचे.
एकूणच काम झाले नाही तर परत फोन करुन हा अनुभव मी इमेल करेन अशी धमकी द्यायची त्यावर ते हो ठीक आहे करायचे ते करा असे सुणावतात पण आतून ते थोडे चपापलेले असतात कारण त्यांनी प्रकरण मिटवलेले नसते त्यामूळे इमेल करुन झाल्यावर शक्यतो फोन येतोच.
इमेलवर फोन सारखे चटकन जरी काम होतेच असे नसले तरी हा शेवटचा पण उपयोगी पर्याय असतो कारण सर्व प्रकरण लेखी असल्याने आपल्या सोयीचे जाते. इमेल वर आपण जर सर्व परिस्थिती व्यवस्थित विषद केली असेल तर काम होऊन रिफंड मिळून जाईल.
जर उत्तर द्यायला अधिकृत वेळेपेक्षा जास्त उशीर झाला तर अजून एक reminder email व तरीही उत्तर न आल्यास ग्राहक न्यायालयात भेटू असा अजून एक इमेल मोर डेन पुरेसा आहे.
क्रेडिट कार्ड ही सेप्रेट डिविजन असते त्यामुळे कधी कधी सेम बँक असूनही गोंधळ उडतो कम्युनिकेशनमधे पण तक्रार निवारण होउन जाते. चिंता नसावी
मी स्वतः न स्वीकारलेल्या कार्डचे स्वीकारल्या नंतर लागू होणारे मूलभूत चार्ज refund घेतले आहेत. त्यांचा बराच गोंधळ झाला होता की जर मी कुरिअर कडून कार्डच घेतले नाही तर मला चार्जेस लागलेच कसे पण अर्थात कोणीतरी कार्यतत्परता दाखवत मी कार्ड स्वीकारेन हा गेस मारून चार्जेस ठोकायचा उद्योग केला असावा अथवा कुरिअर वाल्यांनी वेळेत त्यांना माहिती दिली नसावी आसा अंदाज करुन विषय सोडून दिला
29 Jul 2021 - 10:21 pm | राघव
सगळे क्रेडीट कार्ड रेग्युलेशन आरबीआय च्याच हाताखाली असते हे नक्की. त्यामुळे त्याअनुषंगानेही जरा गुगलावे लागेल.
पण शक्यतो नोडल ऑफिसर हा प्रकार प्रत्येक डिजिटल सेवेसाठी असतो. नाव बदलत असेल हुद्द्याचे, पण साधारण रिजनल मॅनेजर लेवल वर तो असतो. कस्टमर केअर ला इमेल करतांना त्याला सीसीत ठेवायचा. सोबत त्या बँकेच्या नोडल ऑफिसर/रिजनल मॅनेजर चा ईमेल आयडी सुद्धा सीसीत ठेवायचा. बर्याचवेळा काम होते.
30 Jul 2021 - 2:12 am | कंजूस
एका नवीन कार्डाचा फॉर्म पाहा.
त्यात या सर्विससाठीच्या ' auto renewal' बॉक्समध्ये
Default check असेल व ते uncheck करायचे राहिले असेल.
त्यामुळे त्यांनी चार पाच दिवस आधी फोन केला असेल. कन्फर्म करायला.
तर असं असेल तर दुरुस्तीचा मेल पाठवा. सर्विस चार्जेस हे आगामी कालासाठी असतात. म्हणजे येत्या वर्षभरासाठी.
इमेल करा व सब्जेक्ट : discontinuation of auto renewal of ***** service लिहा.
Bank portal चे app घेऊन त्यातून ही सुधारणा करता येते का पाहा.
30 Jul 2021 - 10:41 am | सर्वसाक्षी
जालावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मॅनेजेर चा मेल आय डी मिळेल
तिथे काम अझालं नाही तर सरळ एम डी ना पत्र पाठ्वा, त्यांच्या कचेरीतून हमखास फोन येईल.
30 Jul 2021 - 11:39 am | विजुभाऊ
त्याच्या कस्टमर सर्व्हिस शी बोललो. त्यांनी एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर दिला. दहा दिवसात पैसे तुमच्या कार्डवर जमा होतील असे म्हणाला आहे.
30 Jul 2021 - 12:43 pm | चौथा कोनाडा
ग्रेट. आनंदाची गोष्ट !
एखादा वर्ष क्रेडिट कार्ड वापरल्यावर मला प्रश्न पडला मी हे कार्ड का घेतलंय ? मग पुन्हा कधीच घेतलं नाही !
30 Jul 2021 - 1:35 pm | shashu
मीसुद्धा तुमच्याच वर्गातला. 3 क्रेडिट कार्ड काही अपरिहार्य कारणामुळे गळ्यात मारून घेतलेत. अजून एक ही वापरले नाही. एक किंवा दोन तर अजून ऍक्टिव्हेट सुद्धा केले नाही आहेत मुळात त्याचा योग्य वापर कसा करावा हेच मुळात कळत नाही मला. अज्ञान आणखी काय.
31 Jul 2021 - 12:59 pm | चौथा कोनाडा
क्रेडिट कार्ड वापरायला चलाखी हवी !
त्याचं शेअरमार्केट सारखं आहे, सारखं लक्ष ठेवायला लागतं !
जो शेअर घेतो आणि ल़क्ष ठेऊन खरेदी विक्री करत नाही त्याला "गाढवाला गुळाची चव" काय ही म्हण लागू होते !
क्रेडिट कार्ड डिस्काउंट्स कडे सारखं लक्ष ठेऊन कुठून कुठून फायदा सवलती उपटता येतील या बद्दल चलाखीनं ते वापरलं तर उपयोग आहे !
नाही तर दंड आणि पश्चातापाशिवाय काही पदरी पडणार नाही !
मी मर्यादित उत्पन्न आणि सारखी सारखी खरेदी या मानसिकतेचा नसल्यामुळे क्रेडिट कार्डाला तेव्हांच रामराम केला !
30 Jul 2021 - 3:55 pm | गॉडजिला
Panic तेंव्हा व्हायचे जेंव्हा कार्ड आपल्या खिशात असताना त्यावरून खरेदी झाल्याचा मेसेज येईल.... बाकि हे बँक जे चार्जेस लावते सर्व्हिस नको असताना वगैरे, त्यात चिंतेचे विशेष कारण नसते.
30 Jul 2021 - 2:19 pm | कंजूस
कुणाच्या हातात पडलं तर ब्लॉक करेपर्यंत धुणार ना तो?
30 Jul 2021 - 4:17 pm | shashu
30 Jul 2021 - 4:17 pm | shashu
30 Jul 2021 - 3:03 pm | Rajesh188
क्रेडिट कार्ड मी पण घेतले आहे त्या मध्ये बँकेचे सारखे पाठी लागणे हे महत्वाचे कारण आहे.पण मी ते कधीच वापरले नाही. आता क्रेडिट लिमिट इतके वाढवले जावू शकते असा सारखा संदेश येतो .पण सरळ दुर्लक्ष करतो .
कधी खूप मोठी अडचण आली तर च ते असावे म्हणून मी अजून ठेवले आहे.
पण वापरायची बिलकुल इच्छा नाही.
ह्याचे कारण क्रेडिट card fraud मोठ्या प्रमाणात होतात.आपली बँक त्याची काहीच जबाबदारी घेत नाही सरळ हात वर करते.
ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी सक्षम यंत्रणाच च क्रेडिट कार्ड वाल्या कडे नाही.
आणि तिसरे महत्वाचे कारण त्यांचे सावकार लोकांनाच पण लाजे नी मान खाली खलावी लागेल असे व्याज आणि त्या वर चक्रवाढ व्याज
ह्या क्रेडिट card वाल्यांना भारतीय कायद्या अंतर्गत कठोर निर्बंध केंद्र सरकार नी लागू केले पाहिजेत.
30 Jul 2021 - 9:58 pm | गॉडजिला
कमकुवत मन किंव्हा जॉब सिक्योरीटी नसेल तर कार्ड पासुन दुरच रहाणे उत्तम, मन खंबीर आहे आर्थिक निर्णय नेहमी तारतम्य ठेवुन घ्यायची सवय आहे आणी पुढील रिसेशनमधे जॉब कट होणार नाही हा विश्वास असेल तर क्रेडीटकार्ड वापरणे फार सोयीचे असतेच.
30 Jul 2021 - 5:43 pm | चामुंडराय
क्रेडिट कार्ड्स नुसतेच घेऊन ठेवले आणि कधीच वापरले नाही तर त्याचा क्रेडिट रेटिंग वर नकारात्मक परिणाम होतो का?
30 Jul 2021 - 6:27 pm | श्रीगुरुजी
क्रेडिट कार्ड वापरून जे व्यवहार करता येतात, त्यातील जवळपास सर्व व्यवहार डेबिट कार्ड वापरून करता येतात. तस्मात् सुमारे १२ वर्षांपासून मी क्रेडिट कार्ड घेणे थांबविले आहे.
30 Jul 2021 - 7:08 pm | Rajesh188
खात्यात पैसे शिल्लक नसताना अचानक काही खर्च निघाला ,काही खरेदी करायचे असेल तर क्रेडिट चा वापर जास्त करून केला जातो.
30 Jul 2021 - 7:30 pm | मदनबाण
मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरु नये या मताचा होतो... नव्हे क्रेडिट कार्ड ने फ्रॉड होउन पैसे जातील अशी भिती किंवा डेबिट कार्ड असताना क्रेडिट कार्डचा धोका का पत्करायचा ? अशा मताचा होतो. पण रचनाचा क्रेडिट कार्डवरचा व्हिडियो पाहिल्यावर मला त्यातला विचार पटला आणि कोणतीही अॅन्युअल फी नसलेले चकटफु कार्ड जे मला उपलब्ध होते ते घेतले. तेव्हा पासुन मी माझे बरेचसे व्यवहार [ जिथे जिथे शक्य आहे. ] हे क्रेडिट कार्डनेच करु लागलो आहे. रचनाचा तो व्हिडियो खाली देत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism
30 Jul 2021 - 9:05 pm | कंजूस
पटत नाही.
30 Jul 2021 - 9:24 pm | मदनबाण
हरकत नाही... प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटायला हवी असा आग्रह नाहीच. माझा स्वानुभव अजुन तरी उत्तम आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism
1 Aug 2021 - 9:28 am | कंजूस
विचार बदलला आहे.
2 Aug 2021 - 9:16 am | चंद्रसूर्यकुमार
रचना फडके रानडेचे व्हिडिओ चांगले असतात. एक तर मराठी माणसाला पैशातले फार कळत नाही हा एक आणि स्त्रियांना पैशातले फार कळत नाही असे दोनही स्टिरिओटाईप्स तिने व्हिडिओमधून मोडले आहेत हे बघून चांगले वाटते. मी त्या चॅनेलवरील व्हिडिओ मधूनमधून बघत असतो.
30 Jul 2021 - 11:11 pm | Rajesh188
क्रेडिट कार्ड नाही तर डेबिट card वरून व्यवहार करणे १००% सुरक्षित नाही.अनेक फसवणुकीच्या घटना देशात घडत असतात.
इंटरनेट बँकिंग किंवा कार्ड चे व्यवहार जास्त सुरक्षित होणे गरजेचे आहे.
ग्राहकांची सुरक्षा हे बँकाचे कर्तव्य च आहे.पण अशा वेळी बँका जबाबदारी झटकून टाकतात.
ज्याची फसवणूक झाली आहे त्यालाच पोलिस चोकित चकरा माराव्या लागतात.
आणि पोलिस खाते किती तत्पर आहे हे सर्वांना माहीत च आहे.
31 Jul 2021 - 12:03 am | श्रीरंग_जोशी
तुमची समस्या सुटत आहे असे तुमच्या प्रतिसादावरुन दिसत आहे.
तुम्ही व इतर काही प्रतिसादकांनी क्रेडिट कार्डचा वापर जाणूनबुजून टाळतो असे लिहिले आहे.
मी तर स्वतः कमावू लागल्यापासून वर्षभराने क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला अन जिथेही शक्य होईल तिथे आवर्जून क्रेडीट कार्डच वापरले आहे.
भारतातही अन अमेरिकेत दोन्हीकडे रिवॉर्डस / कॅशबॅकच्या माध्यमातून भरपूर पैसे वाचवले आहेत अन काही वेळा माझ्या कामाच्या ऑफर्सचा उपयोग केला आहे.
माझा पहिला डिजिटल कॅमेरासुद्धा २००६ साली आयसीआयसीआयच्या क्रेडीट कार्डावर शुन्य व्याजावर २४ मासिक हप्त्यांमधे घेता आला.
गेली काही वर्षे अंदाजे वर्षाला ५०० डॉलर्स क्रेडीट कार्डच्या वापराने वाचवत असेल.
एवढ्या वर्षात केवळ एकदा माझ्या क्रेडीट कार्डवर फ्रॉड्युलंट चार्ज लागला. मी काही तासातच तक्रार केल्याने कार्ड ब्लॉक झाले व चार्जचे पैसे माझ्या बिलात जोडले गेले नाही अन काही दिवसांत रिप्लेसमेंट कार्ड मिळाले.
केवळ क्रेडिट कार्ड आहेत म्हणून अगदी दोन-चार प्रसंग वगळता कुठलेही अनावश्यक खर्च केले नसतील.
31 Jul 2021 - 12:37 am | शलभ
+1
जेव्हा गरज आहे तेव्हाच कार्ड वापरले, वेळच्या वेळी म्हणजे 50 दिवसांचा पूर्ण वापर करून लास्ट डे च्या एक दिवस आधी बिल पे केले. पॉइंट्स, कॅशबॅक सगळ्यांचा पुरेपूर वापर केला. 3 कार्ड्स आहेत. कधी काही प्रॉब्लेम नाही आला. खूप चांगला क्रेडिट स्कोअर आहे. जो आता होम लोन साठी सुद्धा उपयोगी आला.
31 Jul 2021 - 7:23 pm | सुबोध खरे
बाडीस
१९८८ पासून क्रेडिट कार्ड वापरतो आहे. आजतागायत एक पैसा व्याजाचा भरला नाही.
तीन वेळेस आणीबाणीच्या प्रसंगात क्रेडिट कार्ड कामाला आले.
एकदा परदेशात गेलो असता तातडीने विमानाचे तिकीट काढावे लागले
एकदा आईच्या उपचारांसाठी टाटा रुग्णालयात रोख पैसे घेऊन गेले असताना सुद्धा सरकारी नियमाप्रमाणे १ लाख ८० हजार पेक्षा जास्त रोकड भरता येत नाही
तेंव्हा २ लाख क्रेडिट कार्ड वापरून भरले
नुकतेच वडिलांना रुग्णालयात तातडीने भरती करावे लागले तेंव्हा २५ हजार अनामत रक्कम नंतर तातडीचे औषध आणण्यास ३१ हजार रुपये नंतर अधिक बिल भरण्यासाठी असे क्रेडिट कार्ड कामास आले.
महिना पूर्ण होण्याच्या अगोदर सर्व बिल भरून एक रुपया व्याज न देता मोकळा झालो.
31 Jul 2021 - 2:20 am | मनो
क्रेडिट कार्ड वापरले नाही, किंवा activate केले नाही म्हणजे त्यावरून गैरव्यवहार होणार नाहीत, ही समजूत चुकीची आहे. उलट जर ते योग्य प्रकारे इमेल अथवा फोन नंबरशी जोडलेले नसेल तर असं काही झाल्याचं काळणारसुद्धा नाही. त्यामुळं जर कार्ड हातात असेल तर त्याचा वापर करणे, आणि त्यातील गोष्टी समजून घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
डेबिट कार्डद्वारे ऐपतीपेक्षा जास्त खरेदी तर टळते, पण गैरव्यवहार झाल्यास अकौंटमधून पैसे लगेच गेलेले असतात, त्यामुळं नुसतं कार्डच नव्हे तर अकौंटही धोक्यात येते.
नकोच असेल तर कार्ड घेऊच नये, पण एकदा घेतले की मग पुढे वापर करणे जास्त सुरक्षित आहे.
31 Jul 2021 - 10:22 am | Rajesh188
Activate केले नाही तरी card च दुरुपयोग कसा काय होतो.कृपया माहिती द्यावी.
31 Jul 2021 - 11:36 pm | मनो
तुमचे कार्ड जर दुसऱ्या कुणी त्याच्या नावाने त्याचा मोबाईल आणि ई-मेल देऊन activate केले तर तुम्हाला त्याचा पत्ता लागणार नाही.
1 Aug 2021 - 2:38 pm | गॉडजिला
ते एकदा आपण स्पष्ट केलेत की जेंव्हा मला नवीन कार्ड येईल ते मीच माझ्या मित्राच्या नावावर activate करून वापरून बघावे म्हणतो की हे घडू शकते का ते
1 Aug 2021 - 3:15 pm | Rajesh188
मोबाईल नंबर हा आपल्या बँकेत असणारा register मोबाईल नंबर च क्रेडिट कार्ड शी लिंक असावा.
कारण सर्व सूचना त्याच नंबर वर येत असतात.
अगदी card active करा,वार्षिक शुल्क भरा.
मग काही ही बदल करायचा झाला तर otp register मोबाईल नंबर वर च येईल ना.
1 Aug 2021 - 4:04 pm | मराठी_माणूस
दुसर्याला त्या कार्ड ची माहीती अॅक्टीव्हेट करायला कशी मिळेल ?
31 Jul 2021 - 1:59 pm | सुक्या
माझ्या मते डेबीट कार्ड वर फ्रॉड होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात डेबीट कार्ड बँक अकाउंटला जोडलेले असल्यामुळे पैसा लगेच वळता होतो. बँक बहुतेक वेळी हात वर करते. त्यांच्या मते ते ट्रांजॅक्क्षण असते त्यामुळे बहुतेक फ्रॉड डेबीट कार्ड वर होतात.
क्रेडीट कार्ड वर झालेले ट्रांजॅक्क्षण बहुदा नगदी नसते. त्यात अजुन एक पार्टी येते जो सामान विकतो. जेव्हा हे ट्रांजॅक्क्षण कार्ड वर येते तेव्हा त्याला आक्षेप घेउन तोडगा काढता येतो. परंतु क्रेडीट कार्ड ही दुधारी तलवार आहे. ऐपती पेक्षा जास्त खर्च केला तर पाय अजुन खोलात जातो.
क्रेडीट कार्ड हे उसणवारी आहे .. तो पैसा परत करायचा आहे .. हे लक्षात घेउन खर्चा वर ताबा ठेवला तर बरेच फायदे आहेत. मी तर अगदी गरज असेल तरच डेबीट कार्ड वापरतो. रिवॉर्डस, कॅशबॅक, स्पेशल ओफर यात बरेच पैसे वाचवले आहेत.
फक्त खर्चावर ताबा महत्त्वाचा ... फक्त आहे म्हणुन वापरले तर कर्जाचा डोंगर ...
31 Jul 2021 - 7:31 pm | गॉडजिला
चर्चा मूळ धाग्यापासून भरकटली आहे असे वाटते.
2 Aug 2021 - 1:22 am | सुक्या
मान्य ... समस्या सुटत आहे हे वाचल्यावर बाकी गोष्टी सुरु झाल्या ...
आवांतराबद्दल क्षमा ..
1 Aug 2021 - 7:39 am | चौकस२१२
साधारण असाच अनुभव आहे.. यातील जून एक क्लुप्ती ( आपापल्या देशात उपलब्ध असेल तर एरवी)
नवीन ग्राहक मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या कधी कधी "बॅलन्स ट्रान्स्फर करा आणि ६ महिने ०% दराने हे क्रेडिट मिळवा "
तेवहा मी काय केलय कि आहे त्या क्रेडिट कार्ड वर पैसे काढायचे ( कॅश ऍडव्हान्स ( ज्याचा व्याजाचा दर खूपच राक्षसी असतो ) आणि लगेच १-२ दिवसात त्या कार्ड बॅलन्स नवीन कार्ड वर घ्यायचा... आणि हे पैसे घर कर्जाच्या ऑफसेट अकाउंट मध्ये ठेवायचे.
अर्थात त्या आधी नवीन कार्डची वार्षिक फी किती आहे ते बघने जरुरी आहे आणि त्यानंतर हे पथ्य पाळणे कि त्या कार्ड वर इतर खरेदी पुढील ६ म्हणीने ना करणे , इतर कार्ड वापरणे . म्हणजे शेवटी काय कि ६ महिने ०% दराने कर्ज मिळाले
1 Aug 2021 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेटीयमचं खातंही बंद करायची प्रोसीजर कठीण आहे, फॉलोअप घेणारा थकून जावा इतका तो त्रास आहे, अकाउंट सुरु करायला शुन्यमिनिट वेळ लागत नाही. पण डिलिट करायला माय गॉड भयंकर अनुभव असतो. आधार कार्डचा फोटो टाका, आधारकार्ड असलेला स्वतःचा फोटो टाका. फोटो अपलोड करायची साइज दोन एमबीपेक्षा जास्त झाली तर तो फोटो अपलोड होत नाही. पुन्हा पुन्हा अपलोड करा. मग मेसेज येईल त्याला क्लिक करायचं की मेलवर आलेल्या मेसेजेसला क्लिक करायचं काहीही स्पष्ट केलेले नसतं. भयंकर त्रासातून नुकतीच सुटका झाली.
-दिलीप बिरुटे
1 Aug 2021 - 4:09 pm | वामन देशमुख
पेटिएम् चा वापर मी क्वचित करतो, एकूणच त्या वॉलेटबद्दल, मी थोडा साशंकच (uncomfortable) आहे.
पेमेंटसाठी मी शक्य त्या ठिकाणी भीम यूपीआइ वापरतो, काही वेळा गुगलपे वापरतो.
1 Aug 2021 - 4:13 pm | वामन देशमुख
क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे आहेत आणि जबाबदारीने कार्ड वापरल्यास माझ्या मते तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत.
मी अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, तेव्हाच्या पगार खाते असलेल्या बँकेचं लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्या कार्डाची वापर मर्यादा वेळोवेळी वाढवत नेली आहे.
माझा शक्य तेवढा सर्व खर्च मी क्रेडिट कार्डावरूनच करतो.
नोकॉस्ट् ईएमआइची सुविधा (याला थोडासा चार्ज लागतो), वेगवेगळ्या ऑफर्स्, कॅशबॅक्स्, रिवॉर्ड पॉइंट्स् यांचा लाभ मिळाला आहे.
भारतातली विमानतळांवर लाऊंज एक्सेस मिळाला आहे.
पेट्रोल, डिझेल भरल्यावर पाऊण टक्का रक्कम परत मिळाली आहे.
४९ दिवसांची क्रेडिट मर्यादा मिळते, तिचा पुरेपूर लाभ घेतला आहे.
म्हणजे १४ मेला केलेल्या खरेदीचं बिल १३ जूनला जनरेट होतं आणि मी ते बिल २ जुलैला भरतो.
बचत खात्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशी भरण्याची सूचना दिलेली आहे म्हणून बिल भरणा विसरणं हा प्रकार होत नाही.
अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगळता माझ्या बचत खात्यात जेवढे रुपये आहेत त्याच मर्यादेत मी क्रेडिट कार्ड वापरतो.
खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे होणारा अवास्तव खर्च हा एक तोटा वगळता, क्रेडिट कार्डाच्या वापरातील धोके हे इतर सगळ्याच प्रकारच्या बँकिंग मध्ये आहेत.
कार्डावरचा सीवीवी मिटवून टाकणे आणि टॅपिंग् सुविधा (इथे "वायफाय कार्ड" म्हणतात) बंद करणे या सूचना उपयुक्त आहेत लगेच अंमलबजावणी करीन.
2 Aug 2021 - 11:21 pm | अमरेंद्र बाहुबली
मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो नाही. पण २०१६ साली एक्सिस बँकेचे माय झोन क्रेडिट कार्ड मिळाले. ज्याला कुठलीही वार्षिक फी नाही, फुकट मिळाल्यामुळे मी ते वापरू लागलो.
क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे केलेल्या खरेदीवर रेव्हरंड पॉईंट्स मिळतात ज्याचा वापर करून मध्ये मला दोन हजार रुपयांचा reyban गॉगल फुकट मिळाला.
क्रेडिट कार्ड चा फायदा जो कुणीच सांगत नाही पण मला खूप होतो, तो म्हणजे हा "नेहमी आपण काही न काही खरेदी करतच असतो ज्याचे पैसे आपण कॅश ने देतो त्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड वापरले तर ते पैसे आपाल्याला पन्नास दिवस वापरायला मिळतात, पण मी सांगतोय तो फायदा हा नाही. क्रेडिट कार्ड वर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती statement मध्ये असते. उदा. मागच्य महिन्यात मी c टाईप चार्जिंग केबल खरेदी केली ती किती वाजता कुठून किती रुपयात हा सर्व डेटा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये असतो.
ऑनलाईन खरेदी करताना कधीही क्रेडिट कार्ड वापरावे, समज उद्या फ्रॉड झाला तर गेलेले पैसे बँकेचे असतात आपण पोलीस तक्रार देऊन हात वर करू शकतो, बँकेने विचारले तर पोलिसांना विचार हे सांगू शकतो, ह्याउलट डेबिट कार्ड मधून पैसे गेले तर बँकेला काही घेणे देने नसते कारण पैसे आपले गेलेले असतात.
Lounge वगैरे, सिनेमा तिकीट ह्या काही नेहमीच उपयोगात येणाऱ्या गोष्टी नाहीत.
माझ्या मते फुकट मिळणार असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे,
मागच्या महिन्यात काही घेणं देणं नसताना एक्सिस बँकेने 1000 रुपये लेट फी म्हणून घेतले, त्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्ररावर फोन केला आणी तक्रार दिली, refund मिळाला.