हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कटाक्ष-
लेखक: मुनव्वर शाह
संपादन: शुभदा गोगटे
प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन
प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७)
पृष्ठ संख्या: २००
किंमत: ₹१००
ओळख-
१९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा. 'येस, आय ॲम् गिल्टी!' ही या मुनव्वर शाहची आत्मकथा किंवा आत्मविवंचना!
आजकालच्या मम्मी-पप्पांच्या आवडत्या चौकटीत तंतोतंत बसावा असा बालवयातला हरहुन्नरी मुनव्वर ते फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार हा प्रवास एवढ्यापुरतेच हे पुस्तक मर्यादित नाही. खरेतर अगदी गुन्हा घडायच्या काही महिने आधीपर्यंत मुनव्वर सर्वांना आवडणारा, मनमिळाऊ, जो शाळा-कॉलेजात भरपूर क्षेत्रांत रमतो असा शिक्षकप्रिय विद्यार्थी होता. परंतु पुढे 'असंगाशी संग, प्राणाशी गाठ' हे अनुभवण्यासाठीच मुनव्वर जन्माला आला होता की काय असे वाटण्याइतपत तो स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण गमावून बसतो.
आयुष्यात एकदा आडमार्गाची चव चाखली की मनुष्यातला सैतान काय थैमान घालू शकतो हे मुनव्वर स्वतःच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना उलगडत जातो. ही कहाणी वाचताना वाचकाला आपल्याविषयी सहानुभूति उत्पन्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुनव्वर पुनः पुन्हा गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्याची तयारी आणि आवश्यकता व्यक्त करतो. फक्त ती फाशी(च) असावी की इतर काही हा प्रश्न तो समाजाच्या पदरात टाकतो. मुनव्वरने प्रकाशक शरद गोगटेंशी केलेला पत्रव्यवहार पाहिला की विश्राम बेडेकरांच्या 'रणांगण' मधील हॅर्टाने चक्रधरला पाठवलेल्या पत्रांची आठवण व्हावी, एवढा आशयगर्भ त्यांत भरलेला आहे.
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उडालेल्या गदारोळाचा मागोवाही या पुस्तकाच्या शेवटी घेण्यात आला आहे. तेव्हा मुनव्वरने सहानुभूती मिळविण्यासाठी असत्याचा आधार घेत ही कहाणी रचली असाही आरोप झाला. वाद नको म्हणून ही कहाणी शंभर टक्के असत्य मानली तरी मुनव्वर ने मांडलेले विचार कोणाही सद्सद्विवेक शाबूत असणाऱ्या मनुष्याला कधीही नाकारता येणार नाहीत.
पुस्तकानंतरची शिल्लक-
एक माफीचा साक्षीदार वगळता जोशी-अभ्यंकर हत्याकांडात इतर चार आरोपींना १९८३ मध्ये फाशी चढवण्यात आले. फाशीची वाट पाहताना झालेली आयुष्याची उपरती किंवा सहानुभूती मिळवण्याचा एक फोल प्रयत्न म्हणून दुर्लक्ष करावेत असे उथळ मुनव्वरचे विचार नाहीत. काही ठिकाणी अक्षरशः हा कुणी फाशी मिळालेला गुन्हेगार नसून अध्यात्माच्या वाटेवर स्वार झालेला एक प्रेषित आहे असे वाटावे असा विचार मुनव्वर मांडतो. या पुस्तकाचे साहित्यिक मूल्य काय यावर टिप्पणी करण्याचा माझा अधिकार नाही. परंतु मूल्याधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी 'येस, आय ॲम् गिल्टी!' पथदर्शक आहे हे नक्की.
प्रतिक्रिया
मरणाच्या दारात सगळेच प्रेषित ?
स्मशान वैराग्य
दोघांशी सहमत.
चांगली ओळख
श्याम भूतकर यांनी याविषयी
पुस्तकाशी सुसंगत आहे.
आयुष्य विचित्र आहे
मनो
:)
मनो,
या पुस्तकाची पहिली आवृत्ती वाचली होती
नक्की वाचा.
हे पुस्तक प्रसिद्ध झाले
नाना पाटेकर आणि मोहन गोखले
आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे......
व्यक्ती आणि तत्त्वज्ञान भिन्न
गॉडझिला + सौन्दर्य
स्व - समर्थन
तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.
ओ के बॉस हे पुस्तक कूठे मिले मिळेल ?
वाचलेय हे पुस्तक
वाचलेय हे पुस्तक
Paanch (English: Five) is an
होय
अगदी बरोबर.
वर्णन व समर्थन