स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी
कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी
रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत
सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत
डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा
दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा
स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले
रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले
माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती
स्वैर वारा मंद झाला , परतली लाल माती
==================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
25 Jun 2021 - 10:51 pm | सौन्दर्य
बैलगाडीच्या छायेत चालणाऱ्या कुत्र्याला वाटते की बैलगाडी आपणच ओढत आहोत, ह्या गोष्टीची आठवण झाली.
25 Jun 2021 - 11:54 pm | पाषाणभेद
वा! अगदी छान काव्य!
धूलीकणांना त्यांची जागा अंतीमतः मिळालीच.
>>स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले
वारा स्वैर आहे, नंतर तो मंदही झाला आहे. अशा स्थितीत तो स्थितप्रज्ञ कसा?