राघू

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
23 Jun 2021 - 5:53 pm

आज झालो भ्रष्ट मी

पसरले माझे दोन हात

पाठीवरती वार करुनि

केला साहेबा कुर्निसात

लावूनी चरणधूळ ललाटी

पकडून धरली गच गोटी

मागे वळूनी पाहतो तर

त्याचीही हिरवी शेपटी

कोण खोटा कोण खरा

हिशेब मनी नाही लागला

ज्याला मी साहेब समजलो

तोपण साला राघू निपजला

=======================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

पण चालायचे, तेंडुलकरही डक वर जातोच अधून मधून

(राघूवर जीवापाड प्रेम करणारा) - गॉडजिला

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2021 - 1:31 pm | चौथा कोनाडा

लावूनी चरणधूळ ललाटी
पकडून धरली गच गोटी

गोटी योग्य वेळी सापडणं हे देखील नशिबात लागतं,
नाही तर जे हाताशी लागेल ते पकडून वाटचाल करावी लागते, मिळेल ते यश्/अपयश पत्करावं लागतं !

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jun 2021 - 2:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

सगळे सेटींग केल्या नंतर शेवटच्या क्षणी जेव्हा आर्डरली साहेब म्हणतात "आमाला पावर नाय" तेव्हा आपला पोपट झाल्याचे लक्षात येउन जाम संताप येतो.

पैजारबुवा,

दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेक लक्षण असल्याचे गंगाधर गाडगीळ सांगून गेलेत त्याची प्रचिती आली. आमच्या बालबुद्धीला काही कळलेच आही.

सौन्दर्य's picture

24 Jun 2021 - 11:09 pm | सौन्दर्य

ह्यावरून एक घटना आठवली -

कॉलेजात असताना एक विरह कविता लिहिली होती पण मुलीच्या भावाकडून फटके बसण्याची शक्यता होती म्हणून ती जाणीवपूर्वक बऱ्यापैकी दुर्बोध लिहिली. कसे ते आठवत नाही पण आमच्या मराठीच्या प्राध्यापकांच्या हाती ती कविता लागली व वर्गात ते रसग्रहण करायला लागले.
"कवीला ह्या कवितेत द्वैत-अद्वैताचे द्वंद्व मांडायचे आहे, मनाच्या गाभ्यातून उत्स्फूर्तपणे उमललेले पुष्प ईश्वराचरणी समर्पित करायचे आहे, --------वगैरे." खरं सांगतो तसं काहीही माझ्या मनात नव्हतं.

थोडक्यात दुर्बोध काव्यातून वाटेल ते अर्थ किंवा अनर्थ काढता येतात.

खिलजि's picture

25 Jun 2021 - 5:40 pm | खिलजि

चित्रगुप्त काका , हि कविता मी चाटू लोकांवर आधारित आहे .. जे सर्वदूर पसरलेले हैत .. हे कॉर्पोरेट चाटू , आधीच्या राघूवर पाठीवर वार करतात आणि चाटूगिरी चालू करतात . पण खरी मज्जा तेव्हा येते , जेव्हा त्यांना कळते कि आपण ज्याची चाटतोय तोपण आपल्यासारखाच चात्या आहे .

पाषाणभेद's picture

26 Jun 2021 - 12:14 am | पाषाणभेद

आसं है का?!
आमाला वाटलं की चांगलं खातं मिळाया हातपाय हालवणार्‍या एखांद्या मंत्र्याबद्दल हाय का.
बराबरच हाय बाकी.