तुझी आठवण
भुइचाफा जो
आत लपवता
कंद मृण्मयी
पहिली सर अन्
रुजून येई.
तुझी आठवण
हिरवा चाफा
मोहवणारा
खुणावणारा
दृष्टीला परि
नच दिसणारा.
तुझी आठवण
पिवळा चाफा
मधुगंधाने
दरवळणारा
सुकला तरिही
जाणवणारा.
तुझी आठवण
कवठी चाफा
तिन्हिसांजेला
हळू उमलतो
रात्रि सुगंधी
सोबत करतो.
तुझी आठवण
खुरचाफ्यासम
अपर्ण होउन
मूक फुलांनी
भरून अंगण
तुलाच अर्पण.
प्रतिक्रिया
3 Jun 2021 - 8:03 am | ज्ञानोबाचे पैजार
एकाही चाफ्याला सोडले नाहीये..म्हणून चाफा बोलेनासा झाला होय?
रच्याकने :- कविता आवडली,
पैजारबुवा,
3 Jun 2021 - 8:06 am | श्रीगुरुजी
छान कविता!
3 Jun 2021 - 3:51 pm | अनन्त्_यात्री
दरवळत राहील अशी कविता!
नागचाफा अन् तांबडा चाफा का वगळलात?
6 Jun 2021 - 6:50 am | प्रचेतस
सुरेख
6 Jun 2021 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहीते राहावे.
-दिलीप बिरुटे
6 Jun 2021 - 8:57 pm | तुषार काळभोर
आठवणीत राहील अशी सुरेख कविता.
21 Aug 2021 - 1:32 pm | प्राची अश्विनी
सर्वांना धन्यवाद. ब-याच दिवसांनी मिपावर आले. म्हणून कळवायला उशीर झाला. _/\_