देवाघरची नाती संभाळावी
खत पाणी घालुन वाढवावी
तेव्हा कुठं प्रेमाच फळ आणी
विसाव्या पर्यंतची साथ मिळते
पाचा ऊत्तराची (आयुष्याची) कहाणी
साठा ऊत्तरी सुफळ संपूर्ण होते
जो पर्यंत होत नाही जाळ
तो पर्यंत तुटत नाही नाळ
कमळाची फुले सोडुन
उचलत बसतात गाळ
नाईलाजाने आशांची साथ आणी
हातातला हात सोडावा लागतो
कारण बुडत्याचा पाय खोलात आसतो
पण आतला माणुस काही मरत नाही
माणुसकीचा उमाळा काही सुटत नाही
कधितरी कुठेतरी थांबावेच लागते
स्वताःचे अस्तित्व जपावेच लागते
नाही सोडली आशांची साथ
तर मग तो ठरेल आत्मघात
देवाचं काम देवावर सोपवावे
माणसातल्या देवाने
हरी हरी करीत बसावे
पांडुरंग हरी वासुदेव हरी।
प्रतिक्रिया
27 Apr 2021 - 3:33 pm | रंगीला रतन
कधितरी कुठेतरी थांबावेच लागते
स्वताःचे अस्तित्व जपावेच लागते
खरंय!
21 May 2021 - 3:16 pm | कर्नलतपस्वी
21 May 2021 - 3:17 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद