हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन(ऐसी अक्षरे....मेळवीन -२)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
8 Apr 2021 - 11:21 pm

einstine
हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन
मूळ लेखक : डनिअल स्मिथ
अनुवाद :मुक्ता देशपांडे

आईनस्टाइन म्हणजेच जगाला पडलेलं कोडं आहे. त्याच्या भौतिकशास्त्रातील अफाट कार्याने अजूनही तो विश्वाची रहस्ये उलगडायला मदत करतो.तर हे अस न सुटणार कोडं थोडेफार का होईना या पुस्तकामुळे सुटते.आईनस्टाईन म्हणजे E=mc2 एवढेच माहित असणाऱ्या माझ्यासारख्या वाचकांना त्याच्या भौतिकशास्त्रातील प्रयोगांची जुजबी माहिती तर मिळतेच पण त्याच्या विचारांचा प्रवासही अनुभवायला मिळतो.पुस्तकाच नाव जरी आपल्याला आईनस्टाईनसारख कसा विचार करायचा?हे सुचवायचा प्रयत्न करत असला तरी आईनस्टाईन कसा विचार करायचा हे आधी समजून घ्यायला मदत करतो.आईनस्टाईन कोणत्याही काळात जन्माला आला असता,तरी त्याचे विचार त्या त्या काळात चपखल बसले असते.
व्यक्तिस्वातंत्र्य,राष्ट्रवादाचा विरोध,हुकुमशाही आणि युद्धाचे दुष्परिणाम आणि शांततेचा पुरस्कार हे त्याच्या जगण्याचे स्तंभ सतत या पुस्तकातून अधोरेखित होत राहतात.
एकूण ३० प्रकरण आणि १२ आयष्यातील मुख्य घटनांचा उलगडा करणारे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत.
“मी भविष्याचा विचार कधीच करत नाही ते लवकरच येते.” अल्बर्ट आईनस्टाईन(१९३०) या सकारात्मक वाक्यापासून जो त्याचा आणि त्याच्या अवती भोवती असणाऱ्या लोकांमुळे ,परिस्थितीमुळे त्याच्या विचारांची खोली कशाप्रकारे अद्भुत आहे याची जाणीव यायला सुरुवात होती.
पुढील काही भागात अंत:प्रेरणा,कल्पनाशक्ती,कार्यासक्ती या विषयी महान शास्त्रज्ञाचे विचार समाजात.त्याचं आयुष्यातील सुरुवातीच्या काळातील थोडासा संघर्ष उजागर झाल्यावर त्याची प्रबंधाची घोडदौड थक्क करणारी आहे.
आईनस्टाईन आणि ईश्वर या प्रकरणात “मी अशा देवाची कल्पना करू शकत नाही जो माणसांच्या कर्मावर थेट प्रभाव पाडू शकेल किंवा त्यान स्वत:च निर्माण केलेल्या प्राणीमात्रांचा निवाडा करायला बसेल”म्हणजे हे विचार कधीही कोठेही लागू पडू शकतील असेच आहेत ना!
आईन्स्टाईनचा जन्म जर्मनीतला व तो वंशाने ज्यू होता पण हिटलरच्या ज्यूवंश द्वेषाने त्याचा जर्मनीचा संबंध कायमचा तोडला.पण त्या पूर्वीच त्याने युरोप,अमेरिका देशाचे नागरिकत्व तसेच इस्त्रायल देशाचा राष्ट्रप्रमुख म्हणून व्हायची संधी नाकारताना त्याचे जागतिक देशांमध्ये शांती नांदावी म्हणून “एक सर्वराष्ट्रीय संघटना असावी जिच्याकडे खरे अधिकार असतील जी जगाला युद्धापासून दूर ठेवील” अशी विचारधारा युद्धाने त्याला थोड्याफार जखमा दिल्या हे दिसते.
पण सर्वात मोठी काळी जखम म्हणजे अणूबांम्ब आणि आईन्स्टाईन हे विचित्र समीकरणाने त्याला दिलेले दु:ख..आपल्या शोधाचा खरे पाहता विज्ञानाचा दुरुपयोग कोणत्याही आयुष्य नैतिकपणाने जगणाऱ्या संशोधकाला पिडा देणारच आहे.त्यावरील प्रकरण विशेष आहे.
तसेच नोबेल पुरस्कार त्याला ह्या सुत्रासाठी न मिळता सापेक्षता या सिंद्धांतासाठी मिळाला हि त्यातील जमेची बाजू वाटते.
वैयक्तिक आयुष्यात तो जसा अलिप्त होता ,नात्यांमध्ये भावनिक जास्त काळ त्याला गुंतून राहणे जमत नसत.पण तरीही तो सर्वांना हवाहवासा होता ,म्हणून तर त्याची मिस्कील जीभ बाहेर काढून दिलेली प्रचि सहज मिळाली ना!साधी राहणीमान असली तरी घरातील भव्यता आणि नौकायनाचा छंद हे त्याचे आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा दृष्टीकोन दाखवितो.
आयुष्याच्या शेवटपर्यंत तो स्वत:च्याच संशोधनात नवनवीन गोष्टी शोधत राहिला,असे हे गारुड कधीच न संपणार!
मराठी आवृत्तीबाबत खूपच समाधानकारक पोचपावती मला द्यावी वाटते.
-भक्ती

मुक्तकप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

त्यांना नोबेल सापेक्षता सिंद्धांतासाठी मिळाले नाही.

आईन्स्टाईन प्रभावी संशोधक असले तरी उत्कृष्ट शिक्षक, संगीततज्ञ् आणि प्रभावी राजकारणी सुद्धा होते.

त्यांच्याकाळांत तुनळी नसल्याने आम्हाला जास्त माहिती मिळत नाही पण त्यांच्या काळांतील एक व्यक्ती फ्रीमन डायसन २०२० पर्यंत जिवंत होती आणि त्यांचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. माझ्या मते फ्रीमन डायसन खूप मोठे संशोधक तर होतेच पण त्याच वेळी त्यांच्याकडे वक्तृत्व सुद्धा होते. माझ्या विचारांवर त्यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे.

आत्ता पर्यंत, शास्त्र ह्या विषयावरची फारच कमी पुस्तके, वैयक्तिक वाचनालयात आहेत...

बाराला दहा कमी, एक होता कार्व्हर, ही लगेच आठवलेली ...

हे पण घ्यावे म्हणतो ...

कुमार१'s picture

9 Apr 2021 - 7:43 am | कुमार१

छान परिचय.

Bhakti's picture

9 Apr 2021 - 12:02 pm | Bhakti

@नेत्रेश
ओह !यस.पुस्तकात सापेक्षता खूप वेळा उल्लेख आहे तेव्हा त्यावर मी जालावर बऱ्यापैकी वाचल,त्यामुळे गैरसमज झाला.आता पुन्हा वाचल, त्याला सापेक्षतासाठी पहिल्यांदा नामांकन मिळाले होते पण तत्कालीन सापेक्षकतावर टीका करणाऱ्याचा भरणा होता.तेव्हा नोबेल तर द्यायचय मग१९०५ सालच्या पहिल्या प्रबंधासाठी “प्रकाशाची उत्पत्ती आणि स्थानांतारण यांच्याशी निगडीत अनुमानी दृष्टिकोन’ यासाठी नोबेल दिला गेला.
दुरुस्तीसाठी धन्यवाद!

@साहनाजी
छान उदाहरण !मला वाटत न्यूटन-आईनस्टाईन-स्टीफन हॉकिंग हे अनेक न उलगडणारे रहस्य शोधणारे महान व्यक्ती आहेत.

@मुविजी जमल्यास नक्की पुस्तक घ्या!मी वाचनालयातून मिळवलेलं आहे.

@कुमारजी धन्यवाद !हाऊ टू थिंक लाइक या मालिकेत हाऊ टू थिंक लाइक मंडेला, हाऊ टू थिंक लाइक स्टीव्ह जॉब्स इतर अशी अनेक पुस्तक आहेत.पण मला वाटतंय या सर्वांची मुळ इंग्लीश आवृत्तीदेखील वाचायला हवी.

Bhakti's picture

18 Apr 2021 - 2:59 pm | Bhakti
कुमार१'s picture

18 Apr 2021 - 8:53 pm | कुमार१

चित्रफित आणि अभिवाचन असा संयुक्त कार्यक्रम छान आहे. आवडला !

वेगळ्या संदर्भातील आइन्स्टाइन यांचे खालील वाक्य अगदी मार्मिक :
मानवी शरीर आणि सोपेपणा हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत.

गेली दोन वर्ष आपण या विधानाचा चांगलाच अनुभव घेत आहोत.....