महिलादिन

nanaba's picture
nanaba in जनातलं, मनातलं
8 Mar 2021 - 3:24 pm

ती आपली भाकरी स्वतः कमवेल.
(ते करत नसतानाही ती त्या भाकरीच्या किमतीहून अधिक कष्ट घरात घेत असते ह्याची जाणीव तिला असेल.)
ती साडी नेसेल वा मिनी स्कर्ट घालेल.
ती लग्न करेल वा करणारही नाही.
तीला मुलं नको असतील किंवा कदाचित तिला लग्न नको असेल - पण मुले हवी असतील - तो तिचा निसर्गदत्त अधिकार आहे असेही तिला वाटत असेल.
ती डे सेलिब्रेट करेल वा न करेल.
ती दागिने घालेल वा तिला त्यांचा तिटकारा वाटेल.
ती सणांसाठी पाळी पुढे ढकलणे नाकारेल..
तिला देवाधर्माची खूप आवड असेल आणि त्यापुढे संसार तुच्छ वाटत असेल किंवा कदाचित तिचा देवावर विश्वास नसेलही...
तिला कदाचित घरकामाची तितकीच आवड असेल जितकी तुम्हाला.. किंवा नसेलही!
तुम्हा सर्वांकरता रोज सकाळ दुपार संध्याकाळ रांधणे, त्याकरताची सर्व उस्तवार करणे हे तिचेच काम आहे - असे तिला वाटेलच असे नाही.. कदाचित ज्यांना पोटाला लागते त्या सर्वांचा ह्यात सहभाग असावा असे तिचे प्रामाणिक मत असेल.
ह्यामागचे सत्य जाणून तिची चेष्टा उडवू नका..
कदाचित तिला ड्रायविंग येत नसेल किंवा ती कदाचित तुमच्यापेक्षा अधिक सफाईने गाडी चालवत असेल.
कदाचित योग्य वेळी स्टॉपलॉसचे गणित तिला अधिक उत्तम समजले असेल.
तिला आपला नवरा आपला गुलाम नाही हे जसे कळते, तसेच आपणही त्याचा गुलाम नाही हे देखील कळले असेल.

ह्याचा अर्थ ती बेजवाबदार आहे असा घेऊ नका. तिचे प्रेम नाही, ती तुसडी आहे असेही नाही , शर्ट पँट घातल्याने, नोकरी करण्याने पुरुषांची बरोबरी होते का? नाही ना? मग तिला पुरुषांची बरोबरी करायची नाहिये, तिला समाजात गोंधळ माजवायचा नाहिये.
बाई म्हणून असलेली गृहीतके नाकारणे ह्याला कृपया गुन्हा समजू नका.

लक्षात घ्या तिला फक्त मोकळा श्वास घ्यायचाय!
तीही एक माणूस आहे.
तिला तुम्ही हवे आहात... साथीदार म्हणून हवे आहात.. ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल.
प्रेमाच्या आणि आदराच्या लायक असतील तर तुमच्या नातेवाईकांना ती आपले नातेवाईक मानेल.
तुम्हीही तसेच केलेत तर किती उत्तम होईल!

हे देखील समजून घ्या, की तिचीही काही स्वप्न आहेत, स्वतः च्या आवडी निवडी आहेत.
स्वतःहून घेतलेली जवाबदारी ती उत्तम पार पाडेलच. पण तुम्ही लादलेली जवाबदारी तिला आपली वाटेलच अशी अपेक्षा ठेवू नका.
ती चुकणारच नाही असे मी म्हणत नाही. कुठल्याही "माणसाकडून" घडू शकतात अशा चुका तीच्याकडूनही होऊ शकतातच.
कदाचित एखादी "ती" खरेच वाईट, खरेच क्रूर असेलही, काही विघातक करत असेलही - त्याकरता स्त्री म्हणून सूट देऊ नका.
पण स्त्री म्हणून तुम्ही लादलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून तीला चेटकीणही ठरवून नका.
केवळ शारिरीक फरकामुळे - तुमच्या कल्पनेतल्या साच्यात तिला बसवू नका.. तिचा घाट तिचा तिला शोधूदेत!
त्याकरता तिच्या हक्काची मोकळीक तिला द्या.

महिलादिनाचा पोळा होऊ नये इतकीच अपेक्षा!
------------------------------------------

अनेक गृहीतकांना झुगारून स्वतःच्या स्वप्नांकरता झटणार्‍या , घुंगट झुगारून शेतकरी आंदोलनात सहभागी होणार्‍या, रायफली चालवणार्‍या, कुस्ती खेळणार्‍या, इतर खेळ, साहित्य, शिक्षण, गुंतवणूक ,कला, गणित,भाषा, इतिहास, शास्त्र, युद्ध - आणि इतर अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्‍या सगळ्या महिलांना, रोजच्या आयुष्यात झगडावं लागलं तर ते झगडून आपलं स्वातंत्र्य मिळवणार्‍या - घरातल्या घरातच मिनि क्रांती घडवणार्या सगळ्या बायकांना , स्वतःची मत असणार्‍या बायकांना, कदाचित ह्यातलं काहीही न करताही आपलं स्वत्व शोधणा र्‍या वा ते गवसलेल्या बायकांना आणि बाई म्हणजे आपल्या इतकीच माणूसच आहे , तिला स्वतः च्या आवडी आहेत, स्वतःचे प्रेफरन्सेस आहेत आणि त्याही जन्माने आपल्या इतक्याच स्वतंत्र आहेत हे कळलेल्या पुरुषांनाही स्त्रीदिनाच्या शुभेच्छा!

~ शिरीष

समाजविचार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

8 Mar 2021 - 4:41 pm | गामा पैलवान

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा फेमिनिस्ट म्हणजेच कम्युनिस्ट म्हणजेच मार्क्सिस्ट म्हणजेच स्त्रीद्वेष्ट्यांचा वार्षिक सण आहे :
https://radicalnotes.wordpress.com/2010/03/08/alexandra-kollontai-on-int...

८ मार्च रोजी रशियात झारविरुद्ध फेब्रुवारीची क्रांती झाली होती. 'जगातील कामगारांनो एक व्हा', या धर्तीवर 'जगातील महिलांनो पुरुषांना फाट्यावर मारायला शिका' असा संदेश देणं हा हेतू आहे.

भाडखाऊ बोल्शेविक तिथे जमलेल्या महिला, बालके व सामान्य नागरिकांना पुढे करून त्यांच्यामागे दडले होते. त्यांनी लपूनछपून दंगली सुरू केल्या. परिणामी झारच्या पोलिसांनी गोळीबार केला व त्यात महिला व बालकांसह सुमारे १३०० लोकं ठार झाले. बोल्शेविकांच्या या रक्तरंजित पराक्रमाची आठवण म्हणून कम्युनिस्ट लोकं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. याचा बायकांच्या हिताशी दुरान्वयेही संबंध नाही.

विकीवरील माहितीनुसार २३ फेब्रुवारीस ( नव्या गणनेत ८ मार्च रोजी) पीटर्सबर्ग येथे पुतीलोव्ह कारखान्याचे कामगार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवासाठी व निदर्शनासाठी जमले होते (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/February_Revolution#Protests ). मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिन त्या काळी अस्तित्वात नव्हता. तो नंतर साजरा केला जाऊ लागला. यासंबंधी विकिवर येथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/International_Women%27s_Day

असो. कुठला माल विकत घ्यायचा व कुठला नाही, याचं स्वातंत्र्य ग्राहकाला आहे. माल पारखून घेणे. बस, इतकंच.

-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2021 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आभार.

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

8 Mar 2021 - 8:31 pm | गामा पैलवान

धन्यवाद प्राडॉ.
आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 4:46 pm | मुक्त विहारि

सकल मिपा करणींना, हार्दिक शुभेच्छा...

मराठी_माणूस's picture

8 Mar 2021 - 4:54 pm | मराठी_माणूस

प्रत्येक पुरुषांनी आजच्या दिवशी खालील लेख वाचावा
https://www.loksatta.com/chaturang-news/male-heart-and-mind-purush-hruda...

चौकटराजा's picture

8 Mar 2021 - 5:47 pm | चौकटराजा

असा महिला दिन वगैरे साजरा करणे वा पाळणे म्हणजे महिला ही कोणी वेगळी आहे हे मान्य करण्यासारखे आहे ! आपल्याला डॉक्टर डे ,नर्स डे, टीचर डे हे सगळे मान्य आहेत महिला दिन नाही !! महिला पुरुषासारखीच एक एन्टिटी आहे इतकेच मी मानतो. दोघातला कोणीही एक जगातून नाहीसा करा ,जगाचा अर्थ शून्य होईल.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 6:08 pm | मुक्त विहारि

अर्धनारीनटेश्र्वर, हे त्याच विचारसरणीचे प्रतिक आहे ...

बापूसाहेब's picture

8 Mar 2021 - 8:40 pm | बापूसाहेब

सहमत.. महिला दिन साजरा करणे म्हणजे तिला तू काहीतरी वेगळी आहेस हे दाखवून देणे..
डॉक्टर्स डे, इंजिनिअर्स डे, टीचर्स डे.. अश्याच धर्तीवर वूमेन्स डे सेलिब्रेट करणे म्हणजे जरा खटकते.

अवांतर.. - मेन्स डे असं देखील काहीतरी आहे.. पण ना कोणी सेलिब्रेट करतो.. ना गुगल त्यादिवशी डूडल बनवते. ना आपले मिपा आपल्या साईटवर कोणतेही हेडर लावते..

म्हणजे ऐजे पुरुष म्हणून आमच्या भावनांना काही किंमत नाही काय???

पुरुष अन्यायी आहेत हे दाखवल्याशिवाय महिलादिन साजरा होऊच शकत नाही.

उपयोजक's picture

8 Mar 2021 - 10:30 pm | उपयोजक

स्त्रियांवर होणारे सगळे अन्याय फक्त आणि फक्त पुरुषच करतो.
त्यामुळे या जगातून फक्त पुरुषांना नाहीसे करा. मगच महिलांना न्याय मिळेल. :)

लेखातील हे वाचायचे राहिले का?

तिला तुम्ही हवे आहात... साथीदार म्हणून हवे आहात.. ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल.

हाच तर्क बहुतेक डे ना लागू पडतो. माझ्या मते विविध डे साजरे करण्याचे कारण फक्त त्या दिवशी त्या विषयाची आठवण काढणे नसून, एक समाज म्हणून सिंहावलोकन करण्याची संधी आहे.

महिला आणि पुरुष समान आहेत हि धारणा चुकीची आहे. उत्क्रांतीच्या नादांत पुरुष आणि स्त्री ह्यांच्यांत अनेक मूलभूत फरक आहेत. अर्थानं फरक आहे म्हणून कुणी कमी जास्त आहे असा होत नाही आणि कायद्याने दोघांनाही सामान अधिकार आणि वागणूक असणे गरजेचे आहे. पण जुन्या काळी (आणि आज सुद्धा) महिलांना त्यांच्या लिंगासाठी दुय्यम वागणूक मिळत आली आहे, अनेक लोकांच्या मेहनतीने आज महिला शाळेंत जाऊ शकतात, काम करू शकतात विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने भाग घेऊ शकतात. माझ्या मते ह्या दिवसांत आम्ही ह्या प्रगतीचे सिंहावलोकन करू शकतो.

महिला पुरुषासारखीच एक एन्टिटी आहे इतकेच मी मानतो. >> अगदी अगदी..
जेव्हा सगळेच असा विचार करायला लागतील तेव्हा किती छान होईल!
महिला दिनाची गरज नाहिशी व्हावी ही सदिच्छा!

कर्नलतपस्वी's picture

8 Mar 2021 - 8:26 pm | कर्नलतपस्वी

लेख वाचला, सत्यपरीस्थीती नाकारता येत नाही. लेखक आपल्या जागी बरोबर आहे.
हे वेगवेगळे दिन थोतांड वाटतात, पटत नाही, जर प्रकृती पुरुष एकमेकांना पुरक मग एकाचाच उदोउदो का। माणसाने माणसा सारखे वागावे एवढीच अपेक्षा

महिलादिन

दाखवण्याचे दात वेगळे
जगण्याची ऱीत आगळी
जागतीक महिलादिनी
मोजा किती आसवं गळली

किती चढल्या बोहल्यावरी
किती ठरल्या हुंडाबळी
असल्या कसल्या रितीभाती
कधी तुडवे पायतळी
तर कधी घेई डोईवरी

सारे दिवस थोतांड
उद्दमींचे कुभांड
तुबंडी भरण्यासाठी
एक दिवसांचे खोटे पण

नको दिन नको सण
रावा माणसागत सारे
नको उत्सव दिनांचा
मला माझी जागा द्यारे......
८-३-२०२१

nanaba's picture

10 Mar 2021 - 1:05 pm | nanaba

जेव्हा खरेच इक्वॅलिटी येईल तेव्हा किती छान होईल!
घरी दारी छोट्या छोट्या गोष्टीत इतकी गृहितके दिसतात की समोरच्याला कळतही नाही असं काही घडतय.. अनेकदा बायकांनाही नाही..
तुम्ही चांगले कपडे घालून हॉटेल मधे जाऊन सेलिब्रेट करण्याबद्दल बोलत असाल - तर अगदी खरय..
समाजातले स्त्री भ्रूण ह त्या, बलात्कार, वेश्याव्यवसायात ढकलले जाणे, डोमेस्टिक वायोलन्स, हुंडा/लग्नाचा खर्च/मानपान, वेगळे वेतन, शिक्षणाची संधी नाकारली जाणे, कामाच्या ठिकाणचे डिस्क्रिमिनेशन असे ग्लेअरिंग इश्युज तर अजूनही आहेतच..
पण हे नसतील तिथेही प्रत्येक ठिकाणी केवळ बाई म्हणून क्षणाक्षणाचं अप्रेझलही नकोसं होतं.
माझा नवरा माझ्या लेकीला माझ्या इतक्याच प्रेमानं सांभाळतो, ह्यावरून ही टीका ऐकली मी परवा एका शेजारणीकडून..
माझं आणि त्याचंही माणूस म्हणून चॉईसेस असणं नाकारलं तिनं नकळत.. तिला हे कळतही नव्हतं आणि..

महिला दिनाची गरज नाहिशी व्हावी ही सदिच्छा!

गामा पैलवान's picture

9 Mar 2021 - 12:45 am | गामा पैलवान

लोकहो,

विकीवरील माहितीनुसार महिला दिन हा मार्च महिन्यात वेगवेगळ्या तारखांना साजरा होत असे. बोल्शेविक नेती
अलेक्सांद्रा कोलनताई हिने लेनिनच्या मागे लागून तो ८ मार्च असा करवून घेतला ( इंग्रजी दुवा ).

या कोलनताई बाईंची मतं बघितली तर आजच्या बायकांना ( व पुरुषांनाही ) घेरी येईल. तिच्या मते :

Under Communism, both men and women would work for, and be supported by, society, not their families. Similarly, their children would be wards of, and reared basically by society.

याचा अर्थ असा की जेव्हा आजची स्त्री महिला दिन साजरा करते तेव्हा ती आपल्या पोराला आपल्या कुटुंबातनं बाहेर काढून सरकारच्या हवाली करायला प्रोत्साहन देत असते.

पोरं पैदा करायच्या मशीनीचा दिन आवडला? बाईला मैल्यापेक्षा हीनदीन पद्धतीने वागवणाऱ्या या खाष्ट प्रकाराला मी घंटारखाष्ट्रीय मैलादीन म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

काही घेरी बेरी येणार नाही. हिलरी क्लिंटन ने ह्याच आशयाचे (पण अमेरिकन लोकांना पचेल असे) पुस्तक लिहूंन मुले हि समाजाची आणि सरकारची मालकी आहेत असे सांगितले होते.

अवांतर :

खालील लेखन कुणी आणि कधी (अंदाजे) प्रकाशित केले आहे कुणी सांगू शकतो का ?

Who wrote this ?

आनन्दा's picture

9 Mar 2021 - 1:02 pm | आनन्दा

बाकी चालू द्या.
पण मुले स्त्रिया वाढवतात कारण वंशसातत्याची भावना हे आहे. ती उत्क्रांतीतून आलेली प्रेरणा आहे. बहुतीक पशु प्रजातींमध्ये देखील हेच होते.
त्यामुळे स्त्रिया हे करत होत्या त्यामध्ये दमन वगैरे काही नव्हते, ती निसर्गाने केलेली विभगणी होति.

हैलो आनन्दा,
वंशा सातत्याची भावना शक्यतो प्रत्येक स जीवाला असते हे अगदी सत्य आहे!
पण मग एखादी मध्ये ही भावना नसेल तर तिचा आदर करु या.. नातेवाईक, माज वगै रेकरता तिच्यावर नसलेली भावना लादुया नकोत!

तसच, विधवा, घटस्फोतिता, कुमारिका ह्यांच्यामध्ये ही भावना असेल तर त्या प्रेरणेनुसार वागण्याची मुभा तिला हो ती का, आहे का, असावी का - ह्यावरही विचार व्हावा.
ह्या मध्ये जाणूनबुजून स्विकारलेले मातृत्व अपेक्षित आहे.. अल्प वयात/ क्षणिक मोहापायी आलेले ( मॅच्युरिटी नसताना) अपेक्षित नाहिये.

गामा पैलवान's picture

9 Mar 2021 - 9:30 pm | गामा पैलवान

साहना,

कम्युनिस्ट राजवटीत मुलं सरकारजमा होतात, हे तुम्ही ऐकलं असेल. अलेक्सांद्रा कोलनताईने पुरस्कृत केलेला दिवस महिलादिन म्हणून साजरा करणे हे अपत्यांना सरकारजमा करण्याच्या दिशेने टाकलेलंच पाऊल आहे.

बाकी, बालपण सरकारजमा होणं म्हणजे नेमकं काय ते हा लेख वाचून कळेलशी आशा आहे : https://www.forbes.com/sites/katyasoldak/2017/12/20/this-is-how-propagan...

आ.न.,
-गा.पै.

प्रत्येक माणसाची प्रत्येक मतं पटवून घेत बसलो तर कसं होईल!

तुमचा आ णि माझा देवाव र अतूट विश्वास आहे (तुम्ही मायबोलीवरचे गापै आहात असे गृहीत धरून) - ह्यात आपलं एकदम पटतं.. साधना करण्याबद्दलचे तुमचे विचार, पद्धत ह्याबद्दल ऐकायला मला नक्कीच आवडेल. पण तुमची स्त्रियांबद्द्दलची मतं पटत नाहीत - तर ती नाही पटत म्हणून पुढे जाता येतं मला. तुमच्या आध्यात्मिक आवडी बद्दल आदर ठेवून.

तसच ह्या बाईंचे सगळे विचार, त्यांनी कसा तो एकाच दिवशी आणला हे बाजूला ठेवून, महिला दिना निमित्त समाजात दिसणारे डिस्क्रिमिनेशन, मला बाई म्हणून येणारे /दिसणारे अनुभव आणी ह्या सगळ्याबद्दल समाजात सजगता यावी ह्या साठी ह्या दिवसाचं औचित्य अशा अर्थाने मी हा दिवस घेते. तुम्हीही प्रयत्न करून बघा..

म्हणजे आता एखादे दुखणे झालेलं असेल तर दोषारोप करत बसण्या पेक्षा, बरं कसं करता ये ईल, पुन्हा कसे होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे असे वाटणा र्‍या गटातली मी आहे.. म्हणजे, दुखणं बरं होण्याकरता हे अ‍ॅनॅलिसिस गरजेचं असेल तर ते जरू र करावं. योग्य बोध घ्यावा आ णि पु ढे जावं, कसं!

चिगो's picture

9 Mar 2021 - 2:08 pm | चिगो

लेख आवडला.. लेखात काय म्हटले आहे, त्याबद्दल न बोलता 'महीला दिन' कसा चुकीचा ह्याबद्दल लिहीत बसणार्‍यांना ह्या दिनाचे कारण व महत्त्व कळावे, ही शुभेच्छा..

गामा पैलवान's picture

9 Mar 2021 - 7:40 pm | गामा पैलवान

चिगो,

लेखात काय म्हटले आहे, त्याबद्दल बोलता न येणं हीच माझी व्यथा आहे.

अलेक्सांद्रा कोलनताईने लादलेल्या दिवसाचं कारण व महत्त्व न कळणाऱ्या लोकांना माझ्याकडनं शुभेच्छा नाहीत. कारण की त्यांनी आपणहून अशुभ मार्ग पत्करला आहे. त्यांना मी शुभेच्छा कशाकाय देऊ? आणि कशासाठी देऊ?

आ.न.,
-गा.पै.

nanaba's picture

10 Mar 2021 - 1:14 pm | nanaba

लेख वाचून, काय म्हणायचय ते समजून घेतल्याबद्दल मनापासून थँक्यू!

रमेश आठवले's picture

10 Mar 2021 - 12:25 am | रमेश आठवले

Dear Rahul Gandhi,

Every year I am telling you!! Please don't send Women's Day wishes to me!!"

Regards,
Mahila Jayawardhane..
Sri Lanka

असे नाव द्या

राहुल गांधी, यांच्या शिष्यांना पण हे मौलिक विचार आवडतील

कपिलमुनी's picture

10 Mar 2021 - 6:37 pm | कपिलमुनी

नवऱ्याने सोडल्यानंतर , कधीही घटस्फोट ना देता अर्धवट नाते ठेवल्यानंतरही, कधीही सार्वजनिक रीत्या पत्नीचा दर्जा ना मिळता स्वबळावर शिक्षण नोकरी करून आयुष्य घडवणाऱ्या स्त्री शक्ती ला प्रणाम

Modi

गामा पैलवान's picture

10 Mar 2021 - 8:07 pm | गामा पैलवान

nanaba,

ह्या बाईंचे सगळे विचार, त्यांनी कसा तो एकाच दिवशी आणला हे बाजूला ठेवून, महिला दिना निमित्त समाजात दिसणारे डिस्क्रिमिनेशन, मला बाई म्हणून येणारे /दिसणारे अनुभव आणी ह्या सगळ्याबद्दल समाजात सजगता यावी ह्या साठी ह्या दिवसाचं औचित्य अशा अर्थाने मी हा दिवस घेते. तुम्हीही प्रयत्न करून बघा..

तुम्ही म्हणता की प्रत्येकाचं चांगलच घ्यावं. तर अलेक्सांद्रा कोलनताई या बाईचा एकतरी विचार चांगला आहे का? तुम्ही स्त्री आहात. गर्दीत नकोसे स्पर्श होण्याचा अनुभव तुम्हांस आला असेलंच. अगदी तसाच वैचारिक अनुभव मलाही येतो अलेक्सांद्रा कोलनताईचं नाव काढल्यावर. हिचे स्त्री व बालकांविषयीचे विचार अतिशय तिरस्करणीय आहेत.

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे प्रत्येक स्त्री जाणून असते. ती वाट्टेल त्या पुरुषाचं बीज रुजवून घेत नाही. मग मी अलेक्सांद्रा कोलनताईच्या हिडीस विचारबीजांतून गोमटी फळं कशी उत्पन्न करू? वरवर स्त्रियांच्या कल्याणाचे ढोल बडवून मागील दराने गुपचूपपणे या बाईचे हिडीस पुढे दामटले, हाच अंतस्थ हेतू दिसतो आहे. धोक्याची जाणीव करवून देणं हे माझं काम आहे. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

समाजास जागृती यावी याविषयी माझी मतं तुमच्यासारखीच आहेत. त्यासाठी दुसरा यथोचित दिवस निवडावा म्हणून सुचवेन. स्त्रियांवर जात्याच अन्याय झालेला असतो, हे माझं मत आहे. मात्र तो पुरुषांनी केलेला नसून निसर्गाने केलेला आहे. त्याकरिता स्त्रीस खास वागणूक द्यायला हवी. पण मग त्यास डिस्क्रिमिनेशन म्हणू नये, इतकंच.

आ.न.,
-गा.पै.