तोरण मरणाचे

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 7:55 pm

नोट :मूर्ख या कर्नलतपस्वी यांच्या कवितेला रिप्लाय देताना हि कविता लिहिली गेली.. या कवितेचे श्रेय त्यांना आणि त्या मुळ कवितेलाच..
---
.

आयुष्याच्या क्षितिजापाशी
भावनांचा उडतो कल्लोळ..
मागे जीवनाचे सैल धागेदोरे
अन पुढे असते तोरण मरणाचे

पक्षी उडून जातात घरट्यात
अन स्तब्धता उरते मागे...
हसत दिवस जातो खोटाच अन
मग रात्र सावरण्यास येते..

प्रकाश शोधण्या जीवन संपते
अन क्षितिजावरती कळते शेवटी
अंधार असतो खरा सोबती
तोच सुरुवात..अन तोच शेवट..

- शब्दमेघ, मुक्त..स्वैर..स्वछंदी..जीवन
२१-०२-२०२१

आयुष्यकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Feb 2021 - 9:20 am | प्रचेतस

लिहित रहा, वाचत आहेच.

सरीवर सरी's picture

22 Feb 2021 - 9:51 am | सरीवर सरी

हसत दिवस जातो खोटाच अन
मग रात्र सावरण्यास येते..

लिहीत रहा...वाचत आहे.

काय चाललंय काय आज.. दिवस भारी दिसतोय. :-)

नुकतीच दुसर्‍या धाग्यावर दिलेला प्रतिसाद इथेही लागू पडतोय म्हणून वाटलं, इतकंच.
http://www.misalpav.com/comment/1095950#comment-1095950

कविता आवडली.. .
छान लिहिलीये.

कडक!
(गणेशा, तुमची लेखणी लिहिती राहावी, अशी विनंती)

सर्वांचे मनपूर्वक आभार..

तुमच्या अश्या प्रेमामुळेच कधी तरी लिहिण्याचा मोह आवरता येत नाही हे नक्की...

मनिष's picture

23 Feb 2021 - 3:56 pm | मनिष

व्वा, व्वा....

प्रकाश शोधण्या जीवन संपते
अन क्षितिजावरती कळते शेवटी
अंधार असतो खरा सोबती
तोच सुरुवात..अन तोच शेवट..

Vichar Manus's picture

23 Feb 2021 - 5:02 pm | Vichar Manus

खूपच छान कविता

कर्नलतपस्वी's picture

1 Mar 2021 - 10:03 pm | कर्नलतपस्वी

आपल्या प्रतीसादा बद्दल धन्यवाद. जवळपास पंचेचाळीस वर्षे हिन्दी भाषेची जवळीक त्यामुळे मराठी दुरावली नाही पण शब्द समृध्दी अल्प. सेवानिवृत्त नंतर मराठी साहित्य भरपूर प्रमाणात उपल्ब्ध, मिसळपाव चे सदस्यत्व घेतल्यानंतर लिहिण्यासाठी हुरूप आला. सर्व मीपाकरांचे धन्यवाद. काही हिन्दी लेखन पण शेअर करत आहे, कृपया अभिप्राय द्यावा.