जालिंदर महिमा

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
10 Apr 2009 - 10:24 pm

आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी सगळीकडे जालिंदर बाबा चमत्कारी यांची माया (स्त्री नव्हे) नाना रुपात प्रकट होत आहे. त्यांची भक्तगण संख्या सुद्धा वाढत आहे. यापासुन मी तरी किती दिवस वंचित राहणार होतो. मला सुद्धा बाबा जालिंदर यांच्या भक्तीचा कानमंत्र मिळाला आणी हे काव्य स्फुरले.

एक महात्मा जन्मला दुर अफगान देशी!
जालिंदर असे थोर नाव मिळाले त्यासी!!
सोडुन सारा व्यापार अन अफुची शेती!
कर्मभुमी देशोदेशी, शिष्य भारतवासी!!

लिहुनी 'केरळी रांगोळी' आणि 'बंगालात बंगला'!
साहित्याच्या वाटेवर महात्मा कधी न थांबला!!
"लिहिते व्हा" संदेशाने तरुणांना जाग येई!
"हायकु कायकु" चे प्रकटन हवाई ऊडीतुन होई!!

ज्ञानदेवांनी जसे वदविले रेड्याचा मुखी वेद!
दक्षिण ध्रुवात पेंग्वीन बोले साहित्याचे भेद!!
बुरुंडी-र्वांडा शिष्यांना मिळे लिखाणाचे धडे!
भाकरीच्या बदल्यात भाषणाचे बाळकडु मिळे!!

सकळ मिपाकर बाबांचे परमशिष्य जाहले!
अर्थशास्त्र ज्ञान घेण्या साधु आतुर निघाले!!
कुणी करी काव्य कुणी गुंफते लेखमाला!
जालिंदर बाबा चमत्कारींची ही अगाध माया!! ही अगाध माया!!

बोला बाबा चमत्कारी जालिंदर जलालाबादी महाराज की जय!!

अवांतर : देवकाका जरा चाल लावता का? ;)

आपला,
(जालिंदर भक्त) मराठमोळा.

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

10 Apr 2009 - 11:28 pm | आंबोळी

महिमा बेष्ट झालाय....
मराठमोळा तुमचे जालिंदर भक्त समुदाय मध्ये स्वागत!
देवकाका किवा प्राजु याला चाल लाउन स्वतःच्या आवाजात रेकॉर्डींग नक्कीच चढवतील असा विश्वास वाटतो.... जालिंदरजींचा महिमा.... दुसरे काय?
चला आता लेख झाले, कविता झाल्या , महिमे झाले... अजुन अग्रलेख , विडंबने,काथ्याकुट, जनातलमनातल, बखरी उरलय... ते झाले कि सत्तावीशी झालिच पुर्ण....
जय जालिंदर बाबाकी.... जय भडकमकर मास्तर की....

प्रो.आंबोळी

प्रमोद देव's picture

11 Apr 2009 - 4:12 pm | प्रमोद देव

जालिंदरबाबाची आरती मस्त झालेय.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

अमोल खरे's picture

11 Apr 2009 - 4:18 pm | अमोल खरे

हि आरती "स्वयंवर झाले सीतेचे......" ह्या चालीवर म्हणता येईल नाही का ? =))

दशानन's picture

11 Apr 2009 - 4:23 pm | दशानन

__/|\__

जय हो !

वेताळ's picture

11 Apr 2009 - 4:31 pm | वेताळ

आवडली :))
वेताळ