मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला .....
Disclaimer : आमचा चहावाला आणि मोदी पूर्वी चहा विकायचे याचा काहीही नाही...
---------------------------------------------------------------------------------
मोदी सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली त्याचा सर्वात जास्त परिणाम आमच्यावर झाला .... (नोटा बदलायचा प्रॉब्लेम नव्हताच .. कारण आम्ही कायमच कॅशलेस असतो ... ) पण या निर्णयामुळे जणू चक्रीवादळच आले. थोबाडपुस्तक आणि कायअप्पा यांच्यावर मेसेजचा खच पडला. कितीही डिलिट केले तरी थांबायलाच तयार नाहीत. त्यातून हे सर्व मेसेज परस्पर विरोधी ... त्यामुळे आमच्या मनात गोंधळ मजला.
मोदींची ही कृती म्हणजे काळ्यापैशाविरुद्ध घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे की सामान्य लोकांची गैरसोय करणारा आणि प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट ? नक्की सत्य काय आहे?
रागा - केजरींनी जोरात गळा लढला होता तर भक्तमंडळींची थोपुवर जोरदार बॅटिंग चालू होती..
यातून मार्ग काढण्यासाठी न्युज चॅनेल लावला तर तेथे रणदीपसिंग सुरजेवाला नावाचा माणुस ५००, १००० ची नोट आणि P-नोट एकाच वाक्यात गुंफत होता ... त्यामुळे माहिती मिळवाचा हाही मार्ग बंद झाला ....
त्यामळे सामान्य लोकांना त्रास होतोय का ? हा प्रश्न आम्हाला सतावत होता. आमच्या गाण्याला विचारले तर त्याने मलाच प्रतिप्रश्न केला
आपण सामान्य लोक नाही?.. गण्या
हो.... तसे आपण सामान्य ... मी
आपल्याला त्रास झाला? ... गण्या
नाही ... मी
मग झालेतर ... उगाच टाइमपास करू नकोस...
पण माझे समाधान होत नव्हते...
कुठल्याही समस्येचा मुळापासुन विचार करा असे आम्हाला ऑफिस च्या एका वर्कशॉप मध्ये शिकवले होते...
पण आफिसच्या वातारवरणात मला कधीच असा विचार करणे जमत नाही ... त्यामुळे बाहेर पडलो ..
समोरच आमचा चहावाला.. मनाशी ठरवलं .. मस्त चहा घेऊ आणि याचा मुळापासुन विचार करू...
चहा घेता घेताच विचार आला .... हा चहावाला पण सामान्य माणूसच.. यालाच विसरू त्याला काही त्रास झाला का ?
मग काय ... पुढे झालो...
नमस्कार माउली ... आमचा चहावाला हा माळकरी .. त्यामुळे आम्ही त्याला माऊलीचा म्हणतो ...
नमस्कार माउली ...
आज निवांत दिसताय ..माझ्यापुढे चहाचा दुसरा ग्लास धरत माउलींचा प्रश्न...
मोदींनी लय गोची केली हो ... मी सरळ मुद्द्याला हात घेतला ....
का काय झाल ? .. माउली
५००-१००० च्या नोटा बंद केल्या की ... मी
जाऊद्या हो.. पैसे काय नंतर द्या .. माउली
नाही तस नाही.. धंद्यावर काही परिणाम ?
काही नाही ... रोजचा गल्ला घरीच ठेवायचो .. आठ पंधरा दिवसांनी बँकेत भरायचो.. आता काही दिवस पोराला सांगितलं रोज बँकेत भरायला..
दुधाचे पैसे महिन्याला देतो .. बाकीचं सामान आणतो लागलं की ...
हे सांगत असताना माउलींनी एका कडून ५०० ची नोट घेतले व सुट्टे परत केले...
मी चाटच पडलो ... माऊलींची काहीच तक्रार नव्हती..
मग खरा प्रॉब्लेम कोणाला आहे? मलाही नाही, आमच्या गण्यालाही नाही आणि माउलींनाही नाही..
कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही..
समाधानाने मान हलवली ... परत येताना माउलींच्या गाडीकडे नजर टाकली ... नेहमी प्रमाणेच गर्दी होती.. सर्व छान चालू होते.. कुणाचीच काही तक्रार नव्हती ..
परत ऑफिस आलो.. थोपु / कायप्पा वर मेसेजाचा ओघ तसाच होता.. रागा / केजरीचे रडे अजूनही थांबले नव्हते ....
आणि या सगळ्यापासून दूर .. तिकडे ते मोदी आणि इकडे आमचे माउली .. दोघेही निवांत होते...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाता जाता :
तुम्हारे महेल चौबारे , यही राहे जायेंगे प्यारे
अकड किस बात कि प्यारे
यहीं सब कुछ चुकांना है..
साजन रे झूठ मत बोलो .....
प्रतिक्रिया
11 Nov 2016 - 8:47 pm | अनिरुद्ध.वैद्य
बर्याच ठिकाणी उधारीवर चालुयेत.
3 Feb 2021 - 10:13 am | मुक्त विहारि
माझ्या आसपासच्या एकाही माणसाला त्रास झाला नाही ....
सध्या तर, आमच्या खेडेगावात देखील, गूगल पे, हे अॅप वापरून, व्यवहार होतात....
3 Feb 2021 - 5:32 pm | Rajesh188
मोठ्या किंमती च्या चलनी नोटा काळाबाजार आणि भ्रष्टाचार वाढवतात ह्या वर जागतिक एकमत आहे .
मग मोदी सरकार नी 2000 ची नोट का बाजारात आणली काळाबाजार करणाऱ्या लोकांच्या मदती साठी आणली का?
कॅशलेस व्यवहार वाढले पाहिजे असे घसा फाटे पर्यंत bjp सरकार बोंबलत होते मग 2000 रुपयाच्या नोटेची गरज ह्यांना का पडली.
नोट बंदी होणार हे मोठ्या ब्लॅक मनी असणाऱ्या आणि मोठ्या टॅक्स चोर मंडळी ना अगोदर च माहीत होते ते कुठे बँकाच्या लाईन मध्ये उभे नव्हते.
सरळ बँका मधून नवीन नोटा ह्यांच्या घरपोच झाल्या कमिशन वर हे bjp samarthak लोकांना कधीच दिसत नाही किंवा उडत उडत अशा बातम्या ह्यांच्या पर्यंत कधी पोचत पण नाहीत.
नोट बंदी काळात किती लोकांनी विदेश वारी केली किती Switzerland गेले ह्याची पण आकडेवारी सरकार नी जाहीर करावी.
3 Feb 2021 - 6:51 pm | मुक्त विहारि
चोराच्या मनांत चांदणे .....
नोटा बंदीला विरोध, फक्त त्यांनीच केला, ज्यांना ह्या गोष्टीचा त्रास झाला ...
3 Feb 2021 - 7:25 pm | Rajesh188
धनदांडग्या नी विरोध केलाच नाही विरोध सर्वसामान्य लोकांनीच केला.
त्यांनाच त्रास झाला .
ज्या व्यवसायात रोखी ने व्यवहार व्हायचे त्यांना त्रास झाला
सर्व पैसा बँकेत ठेवावा तर बँका तरी कुठे सुरक्षित आहेत त्यांच्या वर दिवसा ढवळ्या कर्ज बुडवे दरोडा टाकात आहेत.
3 Feb 2021 - 7:46 pm | सुबोध खरे
काय विचारांची झेप? काय तो आवाका?
दैदिप्यमानच जणू प्रति सूर्य
पण सामान्यांना इतका त्रास झाला तर २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात किंवा २०१९ मध्ये केंद्रात लोकांनी भाजप आणि श्री मोदी याना निर्विवाद बहुमताने कसे काय निवडून दिले हो?
( स्वगत -- इ व्ही एम घोटाळा आहेच कि दोष द्यायला)
3 Feb 2021 - 8:12 pm | मुक्त विहारि
जिंकलो तर, आम्ही चांगले काम केले आणि हरलो तर EVM
लोकांना काय, घराणेशाही जिंदाबाद...
3 Feb 2021 - 8:36 pm | सुनील
ज्ये बात!!
पासष्ट वर्षे लोक काँग्रेसला काय उगाच निवडून देत होते? नै का?
ये रोग भौत पुराना हय!
अगदी अडवानीजी की टैम का!
3 Feb 2021 - 9:07 pm | मुक्त विहारि
कारण, तेंव्हा लोकांना, नेहरू घराणे, नक्की काय करत आहे? हे माहिती न्हवते ...
1977-78 मध्ये, आणीबाणी नंतर, नेहरू घराणे, नक्की काय करत आहे? हे समजायला लागले ...
दुर्दैवाने, भारतात घराणेशाही इतकी रूजली आहे की, केंद्रीय पातळीवर, घराणेशाही मोडायला, बरीच वर्षे जावी लागली...
अजूनही, घराणेशाही पुर्णपणे मोडीत काढायला किमान 40-50 वर्षे तरी लागतीलच ...
अहो, स्वातंत्र्य मिळवायला, 150-175 वर्षे लागली तर घराणेशाही मोडायला, काही वर्षे तरी नक्कीच लागणार ...
3 Feb 2021 - 7:20 pm | सुबोध खरे
Cashless payments are growing faster in India than just about anywhere else
https://qz.com/india/1746910/cashless-payments-growing-faster-in-india-t...
Cashless India could be a model for the world
With fair competition between local players and global tech, a 10-fold growth in digital transactions may not be a pipe dream
https://government.economictimes.indiatimes.com/news/digital-payments/ca...
3 Feb 2021 - 7:12 pm | अमर विश्वास
अरे .. जुना धागा वर आलेला दिसतोय ..
आणि राजेश १८८ साहेब इथेही जोरदार बॅटिंग करत आहेत ...
आधी वाटलं होत कि हे शेतीतज्ञ आहेत ... पण हे तर अर्थतज्ञ पण निघाले
3 Feb 2021 - 7:16 pm | सुबोध खरे
ते स्वयंघोषित सर्वज्ञ आहेत.
अगोदर असेच एक होते ते तर सेक्स पासून अध्यात्म आणि अर्थव्यवस्थेपासून आरोग्य अशा सर्व विषयात "पी एच डी" ला प्रशिक्षण देण्याच्या पातळीचे होते
त्यांच्यावर ( का कुणास ठाऊक) बंदी आली.
त्यांची गादी आता हे चालवत आहेत
3 Feb 2021 - 8:13 pm | मुक्त विहारि
जुनीच दारू, नव्या बाटलीत असावी...
3 Feb 2021 - 8:08 pm | मुक्त विहारि
4 वर्षांपुर्वी, तुम्ही मांडलेले विचार, आज थोडे फार सत्यात येत आहेत ...
4 Apr 2021 - 6:49 pm | मुक्त विहारि
भेंडी, माझ्या ओळखीतल्या एकाही सामान्य माणसाला, नोटाबंदीचा त्रास झाला नाही....
4 Apr 2021 - 7:06 pm | अमर विश्वास
खरं आहे ... माझ्याही ओळखीतल्या कोणालाही त्रास झाला नाही ...
तेंव्हाही नाही ... आणि आता चार वर्षांनीही तेच मत कायम आहे
4 Apr 2021 - 8:34 pm | श्रीगुरुजी
निश्चलनीकरणाचा मला, माझ्या कुटुंबाला आणि ओळखीच्या कोणालाही वैयक्तिक त्रास झाला नाही. हा निर्णय प्रारंभी मला योग्य वाटला होता. परंतु आता जवळपास साडेचार वर्षांनंतर वाटतंय की निश्चलनीकरण फारसे यशस्वी झाले नाही. त्यातून अपेक्षित फळे मिळाल्याचे दिसत नाही.
4 Apr 2021 - 9:02 pm | मुक्त विहारि
आणि त्यांचे पुरावे पण देता येत नाहीत...
नोकरदार माणसांना नगण्य प्रमाणात त्रास झाला, हे माझे निरीक्षण आहे...
4 Apr 2021 - 9:07 pm | प्रसाद_१९८२
करण्यामागचा जो हेतू सरकारने सांगितला होता तो काही साध्य झाला नाही. जसे आंतकवादी कारवाया थांबतील, भ्रष्टाचाराला आळा बसेल वगैरे वगैर. सर्वसामन्य लोकांना "काहीच" त्रास नाही असे म्हणणे बरोबर होणार नाही. लोकांना त्रास झाला मात्र तो त्यांनी सहन केला.
4 Apr 2021 - 9:14 pm | मुक्त विहारि
इतकेच कशाला?
मी प्रवास करतांना, जाणूनबुजून हा विषय सहप्रवाशांच्या बरोबर चर्चेला आणतो ....
त्यांनाही काही त्रास झाला नाही ....
मग नक्की त्रास कुणाला झाला?
4 Apr 2021 - 9:58 pm | बबन ताम्बे
नोटबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला हे म्हणता येत नाही. आजही प्रॉपर्टी (फ्लॅट/प्लॉट) रजिस्टर करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात सर्रास वरचे पैसे घेतात. 2016 ते 2021 या काळात उपनिबंधक कार्यालयांत एव्हढे व्यवहार झाले, तो काळा पैसा या लोकांनी जिरवला कुठे?
4 Apr 2021 - 11:04 pm | श्रीगुरुजी
घरबांधणी त्यासाठी लागणारी असंख्य कागदपत्रे, वेगवेगळ्या कामासाठी लागणारी सरकारी परवानगी व पूर्णत्वाचा दाखला मिळविणे याचा मागील ३ वर्षे अनुभव घेतोय. पावलापावलावर पैसे द्यावे लागतात. अन्यथा अनंत काळ तुमचे काम अडून राहते. कॉंग्रेस काळात जितकी वाईट परिस्थिती होती, त्याहून जास्त वाईट परिस्थिती मागील ५-६ वर्षात झाली आहे. सरकारी कार्यालये, सरकारी कर्मचारी, सरकारी कामाची अत्यंत अकार्यक्षम पद्धत, अडवणूक, लाचखोरी आणि मग्रुरी यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही.
4 Apr 2021 - 10:49 pm | कानडाऊ योगेशु
हेच म्हणतो. ज्या आवेशात नोटबंदी लागु केली होती आणि नंतर माननीय पंतप्रधानांनी जे जे अचाट दावे केले होते त्या प्रमाणे काहीही झाले नाही.
4 Apr 2021 - 8:43 pm | प्रसाद_१९८२
आता दोन हजाराची नोट देखील कुठे दिसत नाही. एटिएम, बॅंक कुठेही ही नोट देत/मिळत नाही.
सरकारने बंद केली का २००० रु.ची नोट ?
4 Apr 2021 - 9:04 pm | मुक्त विहारि
पण, तयार करणे थांबवले आहे, असे वाचनांत आले होते....
6 Apr 2021 - 12:16 am | गणेशा
मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो, आणि काही बिल्डर आणि सिंधी दुकानदार ओळखीचे आहेत.. त्यांचे उदा. देतो त्यांनी काय केले.
हे मी प्रत्यक्ष पाहिलेय...
--------
एक सिंधी च्या दुकाणात २० जण कामाला होते.
त्याने काय केले
१. प्रत्येकाला सहा महिन्याचा पगार नोटबंदी झाल्या झाल्या देऊन टाकला.
[(२० जण * १०००० (अंदाजे salary )= २ लाख रुपये )* ६ महिने]
= १२ लाख
हे १२ लाख रुपये त्याने आधीच कामगारांना देऊन टाकले.
प्रत्येक कामागाराला त्यांचे पगार advance मध्ये ६० हजार रुपये मिळाले.
२.
त्याने प्रत्येक कामागाराला बँकेत बदलून आणायला ४००० रुपये रोज दिले -( ८ दिवस )
शिवाय त्यांच्या बायका किंवा मित्रांना ६० रुपये प्रती तास या नुसार बँकेच्या लाईन मध्ये ४००० रुपये बदलायला उभे केले.
आपण येथे २० कामगार रोज ४००० रुपये बदलत होते हे धरू आणि ते फक्त एकाच बँकेत बदलत होते हे हि मान्य करू.
आणि अजून २० जण त्यांचे मित्र पण ६० रुपये प्रती तास घेऊन तेव्हडेच रुपये बदलत होते हे धरू (शाई लावायचा कार्यक्रम नंतर झाला ८ दिवसांनी )
म्हणजे( २० * ४००० = ८०,०००) * ८ दिवस = ६,४०,००० आणि त्यांचा प्रत्येकि एक मित्र म्हणजे आणखिन २० जण एव्हडेच पैसे बदलून आणत होते.
म्हणजे १२,८०,००० लाख रुपये त्याने आठ दिवसांत बदलून घेतले.
३. त्या नंतर पेट्रोल पंपावर च्या गल्ल्यात याने रोज कमीत कमी २ लाख रुपये रोज बदलले ( आपण १० दिवस धरू )
म्हणजे त्याने पेट्रोल पंपावर २०,००००० लाख रुपये बदलून घेतले
म्हणजे त्याने एकूण काही दिवसांत = ४४ लाख ८० हजार रुपये white केले..
शिवाय पिंपरीत १ लाखाला ८० हजार बदलून मिळत होते त्याने तेथे हि बदले असतील पैसे.. आणि ज्याने घेतले त्याने पेट्रोल पंपावर किंवा इतर मार्गाने ते बँकेत भरले..
आता मला सांगा कोणी किती श्रीमंत असुद्या hard cash मध्ये त्याने जवळ जवळ अर्धा करोड बदलले...
शिवाय कामगार, दुकाने जास्त असतील तर हाच आकडा कोटीत हि जातो.. आणि आजच्या जगात एव्हडे पैसे आमदार खासदार पण hard cash ठेवत नाहीत.
म्हणजे
मोदी सरकारचे शून्य नियोजन आणि गंडलेले execution असल्याने हे सगळे श्रीमंत गप्प बसले.. उलट त्यांनी त्यांचे ब्लॅक रुपये व्हाईट केले
तुम्हाला वाटत नाहीका, कि वरच्या उदा. मध्ये त्या दुकानदाराने त्याचे black रुपये व्हाईट केले ते..
म्हणजे black पैसे संपवण्यासाठी जे नोटबंदी आणली म्हणली गेली तिने असे black पैसे व्हाईट करून दिलेत..
मग तुम्ही किती सामान्य लोकांना काय फरक पडला हे विचारले तरी काय फरक पडतो..
या नोटबंदी नंतर देशाची अर्थव्यवस्था खाली गेली ( कशी, किती मला माहित नाही पण gdp दर फलाना )
महागाई वाढली.. त्यामुळे direct तोटा नाही झाला तरी तोटा झालाच...
मग रोज नविन execution कायदे बदलवणारे निर्णय मुर्खच पणाचे होते.. आणि नोटबंदि हि सपसेल fail आहे हे मोदींना पण माहित आहे..
---
वरती सुबोध खरे बोलतात,
कि मग उगाच लोकांनी त्यांना नंतर निवडून आणि बहुमत दिले का?
तर हाच न्याय घेतला तर मग काँग्रेस दर ५ वर्षांनी निवडून येत होती मग त्यांचे काम आवडत असेल म्हणुन लोकं देत असतील निवडून.. नाही आवडले तेंव्हा घरी बसवले..
उगाच ७० वर्षे काय आहे?
---
आणि evm चे आणि घराणेशाही चा पगडा हे जे मुवि बोलतात त्याबद्दल
-
जर घराणे शाही मुळेच फक्त लोक काँग्रेस ला निवडून देत होते आणि ते मूर्ख होते असे मानले तर मग असे हि का माणू नये कि
evm हॅक नाही करता येत पण माणसांच्या मेंदूनाच हॅक करता येते..
त्यामुळे त्यावेळेस काँग्रेस ला लोकांनी निवडून दिले हे म्हणजे ते घराणेशाही चे गुलाम असे मानत असाल आणि ते लोक मूर्ख म्हणत असाल तर तुम्ही हि मेंदू हॅक झालेले का म्हणू नये?
त्यामुळे respect करा.. त्यावेळेस त्यांनी त्या त्या कामासाठी निवडून दिले असेल.. तुम्ही चांगल्या कामा मुळे मोदींना निवडून दिले असे म्हणा.. पण तुम्हाला मोदींना निवडून चांगल्या कामामुळे म्हणायचे आहे पण दुसरे मात्र गुलाम, मूर्ख असे म्हणायचे असते..
अवघड आहे..
प्रत्येक ठिकाणी सारखी टेप वाजवून काय उपयोग असतो माहित नाही...
6 Apr 2021 - 2:14 pm | शाम भागवत
अशा रितीने समांतर अर्थव्यवस्था मूळ अर्थव्यवस्थेत विलीन झाली.
(कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाची सिध्दांत मांडण्यापूर्वीची ही पहिली व एकमेव अघोषीत अशी अट असते.)
असो.
अजून १०-२० वर्षांनीच त्यावर खरी चर्चा होईल असे वाटते.
🙏
16 Apr 2024 - 4:45 am | चौकस२१२
यामुळे respect करा.. त्यावेळेस त्यांनी त्या त्या कामासाठी निवडून दिले असेल.
मग २ वेळेला पूर्ण लोकशाही पद्धतीने भाजा निवडून आले ( आणि काही राज्यात हरले हि ) तरी विरोधक / दावे विचारवंत "भारतात हुकूमशहा आला " अशी बोंब का मारतात ? वोटिंग मशीन च्या नावाने का शिमगा करतात ?
त्यांनी पण लोकशाही निर्णयाला respect केले पाहिजे ना?
6 Apr 2021 - 1:07 pm | सुबोध खरे
४४ लाख ८० हजार रुपये white केले..
हे त्याच्या उत्पन्नात ऍड झाले कि नाही मग त्यावर त्याने ३० % आयकरही (साडे तेरा लाख) भरलाच असेल.
हा त्याच्या उत्पन्नाचा भाग जो इतके दिवस तो दाखवत नव्हता तो आता मुख्य प्रवाहात आला.
आता यापुढे दर वर्षी त्याला उत्पन्न असेच ४५-५० लाख दाखवायला लागेल कि नाही अन्यथा आयकर खात्याची "मेहेर नजर" त्याच्या वर वळेलच कि.
अशी अनेक उदाहरणे माझ्या माहितीत आहेत. विशेषतः डॉक्टर वकील यांसारखे व्यावसायिक परत लफड्यात नको म्हणून इमाने इतबारे आपले बरेच उत्पन्न आता दाखवत आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांनी खाल्लेला लाचेचा पैसा त्यांना दाखवता येणारच नाहीये
कारण पगार ७०००० आणि दरमहा लांच ७ लाख खाल्ली तर उत्पन्न दाखवणार कसं आणि कुठून
आपणच उदाहरण देऊन नोटबंदीचा फायदा दाखवत आहात या बद्दल धन्यवाद.
साडे पाच लाख व्यक्तींची आयकर खात्याकडून तपासणी (scrutiny) होणार आहे.
https://cleartax.in/s/second-phase-operation-clean-money-5-56-new-taxpay...
https://learn.quicko.com/operation-clean-money
बाकी आपले चालू द्या
6 Apr 2021 - 1:59 pm | गणेशा
बँकेने पैसे cash मध्ये त्या कामगारांना दिले आणि पेट्रोल पंप वाल्याने हि..
मग ते त्याचे उत्त्पन्न होते हे कधीच सिद्ध झाले नाही कारण ते त्याने बँकेत.. स्वतःच्या खात्यात कधीच भरले नाही...
त्यामुळे ह्यावर tax कोणी आणि कसा घेतला असेल?
6 Apr 2021 - 2:37 pm | Vichar Manus
निश्चलीकरण कल्पना आणि अंमलबजावणी हा पूर्णपणे फसलेला प्रयोग होता, असंघटीत क्षेत्रे आणि छोटे उद्योग धंदे यावर खूप वाईट परिणाम झालाय
6 Apr 2021 - 3:02 pm | अमर विश्वास
असंघटीत क्षेत्रे आणि छोटे उद्योग धंदे यावर खूप वाईट परिणाम झालाय >>>
हे वाक्य मी खुप वेळा ऐकले आहे / वाचले आहे। ...
नक्की काय परिणाम झालाय हे कोण सांगू शकेल ?
6 Apr 2021 - 8:24 pm | शाम भागवत
हो.
रोखीत व्यवहार करणार्या व्यावसायिकांवर खूपच वाईट परिणाम झाला आहे.
पण हे सगळे परिणाम जाऊन अर्थव्यवस्था परत जोमाने वाढायला २०२० साल उगवेल असे समजले जात होते.
कोविडमुळे आता २०२१ च्या मध्यानंतर ते दिसायला लागेल असे वाटते.
थोडक्यात २०२४ च्या निवडणुकांपूर्वी नोटबंदी, जीएसटी वगैरे मुद्दे संपलेले असतील.
6 Apr 2021 - 9:48 pm | अमर विश्वास
रोखीचे व्यवहार म्हणजे नो टॅक्स?
कॅश चे व्यवहार कमी झाले असतील तर चान्गले का वाईट ?
7 Apr 2021 - 7:00 pm | मुक्त विहारि
तितका देशासाठी उत्तम
देशांत फिरणार्या, प्रत्येक पैशाचा हिशोब, जे राष्ट्र ठेवू शकते, ते राष्ट्र आर्थिक दृष्टीने संपन्न होतेच, इति चाणक्य...
8 Apr 2021 - 2:45 am | Rajesh188
जे खरे काळाबाजार करणारे आहेत त्यांना स्विस बँक आहे,हवाला आहे, बीट कॉइन आहे असंख्य मार्ग आहेतं
अगदी फालतू जुनाट पद्धती नी घरात कोणी पैसे ठेवले नाहीत.
नोट बंदी होणार ह्याची पूर्व कल्पना लक्ष्मी पुत्रांना सरकार नी दिली होती.
त्यांनी अगोदर च सर्व व्यवस्था केली.
ज्यांना नाही जमले त्यांना घरपोच करकरीत २००० च्या नोटा मिळाल्या.
म्हणून रिझर्व बँकनी सुद्धा कबूल केले हीसाब किताब बरोबर आहे..
धूळफेक करण्यात bjp सारखा दुसरा कोणताच पक्ष भारतात अस्तित्वात नाही ..
बाकी राजकीय पक्ष गावगुंड असतील तर bjp अंतर राष्ट्रीय डॉन आहे.
8 Apr 2021 - 9:08 am | अमर विश्वास
नोट बंदी होणार ह्याची पूर्व कल्पना लक्ष्मी पुत्रांना सरकार नी दिली होती.
त्यांनी अगोदर च सर्व व्यवस्था केली.
ज्यांना नाही जमले त्यांना घरपोच करकरीत २००० च्या नोटा मिळाल्या.>>>>>>
फारच दिव्य ज्ञान आहे आपल्याला ...
8 Apr 2021 - 9:11 am | मुक्त विहारि
परमपूज्य राहुल गांधी, हे घराणेशाहीचे अनभिषिक्त सम्राट आहेत, हे लक्षांत येते...
15 Apr 2024 - 10:41 am | अहिरावण
काय ठरलं मग?
15 Apr 2024 - 4:46 pm | अमर विश्वास
राजेश १८८ साहेब अंतर्धान पावल्याने मिपावर मार्गदर्शन करायला नवा अर्थतज्ञ अवतार घेत नाही तोवर आपण सामान्य माणसं काय ठरवणार ..
पण आता नोटबंदी जुनी झाली ...
आम्ही मस्त मजेत आहोत, आमचा चहावालाही जोरात आहे ... Pay-TM चा स्कॅनर वापरायचा ... आता बदलून घेतलाय
आणि तिकडे मोदीही घट्ट पाय रोवून उभे आहेत ...
त्यामुळे जाऊद्या झाले
15 Apr 2024 - 7:10 pm | अहिरावण
हा हा हा
खरे आहे तुमचे म्हणणे.... मोदींनी खुप बदल केलाय आपल्या आयुष्यात !!
पुन्हा तेच निवडून येवो आणि त्यांना शंभर वर्षे दिर्घायुष्य लाभो !!
15 Apr 2024 - 5:29 pm | कर्नलतपस्वी
श्राद्ध घालणे जरूरी आहे.......