हटवादी पोर
हुंदके दाबत,
जिन्याच्या पायरीवर बसावं
असा पाऊस.
पोळलेल्या हातानी
घ्यावा कसा कडेवर.?
------------------------------------------------------------------------------------------------------
पाऊस
भरतुकडा नादान
साजण .
कळत कसं नाही ?
एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी
कधी वाफ जिरते का?
प्रतिक्रिया
11 Jun 2009 - 12:01 pm | अवलिया
दुसरी जबरदस्त !!
खास रामदास स्टाईल !!
वा ! मजा आली !!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
12 Jun 2009 - 3:59 pm | राघव
क्लास! भारी लिहिलेत.. नेहमीप्रमाणेच.
अवलियांशी सहमत! :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
11 Jun 2009 - 1:42 pm | दत्ता काळे
चौदा-पंधरा शब्दात सामावलेल्या अप्रतिम काव्यओळी. ग्रेट.
11 Jun 2009 - 3:09 pm | सहज
तहान भागणार नाही. वाढली आहे.
अजुन येउ दे.
11 Jun 2009 - 6:08 pm | विनायक प्रभू
अर्ध्या मुर्ध्या सरीनी वाफ कशी जिरेल?
11 Jun 2009 - 6:10 pm | श्रावण मोडक
अजून थोड्या सरी कोसळाव्यात...
11 Jun 2009 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
बिपिन कार्यकर्ते
12 Jun 2009 - 3:06 pm | मराठमोळा
सुंदर प्रकटन!!
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
12 Jun 2009 - 3:09 pm | सर्वसाक्षी
जोरदर हो!
12 Jun 2009 - 4:16 pm | प्रशु
पोळलेल्या हातानी
घ्यावा कसा कडेवर.?
मस्तच..........
12 Jun 2009 - 5:03 pm | मुक्तसुनीत
कविता आवडली.
"भरतुकडा" म्हणजे काय ?
12 Jun 2009 - 5:34 pm | वेताळ
मस्त
कळत कसं नाही ?
एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी
कधी वाफ जिरते का?
म्हणुनच सरकार म्हणतय की पाणी अडवा पाणी जिरवा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
12 Jun 2009 - 7:41 pm | धनंजय
पहिली कविता समजायला वेळ लागला, (माझ्या मतीने - मला कळलेला अर्थ तो कवीचा होता की नाही कोणास ठाऊक), पण समजल्यावर आवडली.
दुसरीसुद्धा सहजसुंदर.
12 Jun 2009 - 7:43 pm | संदीप चित्रे
>> एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी
कधी वाफ जिरते का?
क्या बात है ... आवडल्या ओळी खूपच :)
12 Jun 2009 - 7:52 pm | चतुरंग
पहिली कविता त्यानंतर समजली.
दुसरी समजली ती छानच आहे. एकदम जिवाला उकलून जाते!
(भरतुकडा = लक्ष भरकटलेला, असे रामदासांनी सांगितले).
चतुरंग
13 Jun 2009 - 1:32 pm | चन्द्रशेखर गोखले
मोजक्या शब्दातलं उत्तम प्रगटन !
14 Jun 2009 - 1:57 pm | जयवी
क्या बात है.......जबरदस्त आहेत दोन्ही कविता !!
15 Jun 2009 - 9:16 am | विसोबा खेचर
कळत कसं नाही ?
एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी
कधी वाफ जिरते का?
वा! क्या बात है..
आपला,
(चाळीशीत असल्यामुळे आस्ते आस्ते वाफ जिरत चाललेला) तात्या.
23 Feb 2013 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असं कधी लिहीता येईल हो आम्हा करट्यांना??
मुद्दाम वर आणतोय ह्या रचना...
__/\__
23 Feb 2013 - 3:56 pm | क्रान्ति
अप्रतिम!!!!
27 Jan 2021 - 6:06 pm | NAKSHATRA
कळत कसं नाही ?
एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी
कधी वाफ जिरते का?
वा! क्या बात है..