आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
8 Jan 2021 - 10:28 am

आज काय घडले....
मार्गशीर्ष व|| १०
जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!jayadratha vadh
शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व. १० रोजी कौरवांकडील सेनानी जयद्रथ यास अर्जुनाने श्रीकृष्णाच्या साह्याने ठार केले.
आदल्याच दिवशी अर्जुनाचा पोडश वर्षांचा मुलगा अभिमन्यु द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहांत शिरला आणि त्याने अद्वितीय पराक्रम केला. पण या सोळा वर्षीच्या बालकावर द्रोण, अश्वत्थामा, कर्ण, कृप, कृतवर्मा आणि बृहद्बल या सहा जणांनी एकदम प्रहार करण्यास सुरुवात केली. अभिमन्यु विरथ झाला, हातांत गदा घेऊन तो पायींच लढू लागला. दुःशासनाचा पुत्र गदा घेऊन त्यास सामोरा आला ; दोघे गदेच्या प्रहारांनी मूर्छित झाले, आणि दुःशासनाचा पुत्र सावध झाल्यावर त्याने अभिमन्यु मूच्छित असतांनाच त्याला गदेचा प्रहार करून ठार मारले! आणि जयद्रथाने त्या मृत बालकाला लाथ मारली.
संशप्तकाच्या युद्धात गुंतलेला अर्जुन विजयी होऊन परत आल्यावर त्याला हा भीषण प्रकार कळला. तेव्हां संतप्त होऊन अन्यायाचा पुरता सूड उगवण्यासाठी त्याने प्रतिज्ञा केली, “सूर्यास्ताच्या अगोदर भी जयद्रथाला ठार करीन, नाही तर स्वतः अग्निप्रवेश करीन" आणि त्याच्या गांडीव धनुष्याच्या टणत्काराने दशदिशा भरून गेल्या. कौरवांचे वीर भीतीने ग्रस्त झाले. जयद्रथाच्या रक्षणासाठी सौमदत्ति, कर्ण, अश्वत्थामा, शल्य, वृष व कृप' असे वीर ठेवून शुभ्र कवच व उष्णाव घातलेले द्रोणाचार्य युद्धास तयार झाले. दुर्योधनाने द्रोणाकडून घेतलेले दिव्य कवच घातले असल्यामुळे अर्जुनाचे बाण निष्फळ झाले. तरी देखील या दिवशी दोनहि पक्षांत भयंकर रणकंदन झाले. संध्याकाळच्या सुमारास अर्जुनाचा रथ जयद्रथापाशी आला. येथील सहा वीरांशी त्याने युद्ध केले, परंतु युद्धाचा रंग ठीक दिसेना तेव्हां श्रीकृष्णांनी मायाजालाने सूर्यावर अभ्रे आणून सर्वत्र काळोख पसरविला. 'अर्जुनाची प्रतिज्ञा खोटी झाली' असे म्हणत जयद्रथ विजयानंदाने बाहेर आला. इतक्यांत सूर्य एकदम ढगाबाहेर येऊन रणांगणावर किरणे पडली. त्याच्या प्रकाशांत अर्जुनाने जयद्रथाचे शिर उडविले.
-३१ ऑक्टोबर इ. स. पू. १९३१

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व. १०

ह्या तारखेची सिद्धता काय?

मला असे वाटते की तुम्ही एकाच धागा काढावा... आणि त्यावरच रोज पोस्ट टाकावी.
इतके धागे कशाला?

कृष्णाने सुदर्शन चक्र पाठवून सुर्याला झाकोळले होते. असेही म्हणतात की त्यावेळी सुर्यग्रहण झाले होते.
सुर्यग्रहण फक्त अमावास्येला होते. जर जयद्रथ वधाच्या वेळी सुर्यग्रहण झाले असेल तर ती तिथी दशमी नसणार.

त्या दिवशी सूर्यग्रहण नव्हतेच. कारण जयद्रथाच्या मृत्युनंतरही रात्रीयुद्ध चालूच राहिले होते, घटोत्कचवधानंतर काही काळाने चंद्रोदय झाल्याचे वर्णन आहे.

बाकी महिना मार्गशीर्ष होता हे जवळपास सर्वमान्य आहे. तिथी बहुधा द्वादशी असावी.

मलादेखील हीच गोष्ट माहित आहे..ग्रहण नाही तर सूर्य झाकोळला कसा ?केवळ ढगांनी?

गामा पैलवान's picture

9 Jan 2021 - 4:34 pm | गामा पैलवान

Bhakti,

सूर्यास्त झाल्याचं समजून जयद्रथ बाहेर आला हे मूळ संहितेत नाही. संदर्भ : http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_31.html

तसेच जयद्रथाने मृत वा बेशुद्ध अभिमन्यूच्या डोक्यात लाथ घातली या समजुतीसही आधार नाही. संदर्भ : http://mymahabharat.blogspot.com/2008/08/blog-post_17.html

आ.न.,
-गा.पै.

महाभारत यावर चांगल विवेचन आहे.

सतिश गावडे's picture

10 Jan 2021 - 10:26 am | सतिश गावडे

३१ ऑक्टोबर इ. स. पू. १९३१

या तारखेबद्दल Rajesh188 यांचे अभ्यासू मत वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2021 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीकृष्णांनी मायाजालाने सूर्यावर अभ्रे आणून सर्वत्र काळोख पसरविला.

वरील ष्टोरीत श्रीकृष्णाने सरळ सरळ रडीचा डाव खेळला आहे असे स्पष्ट दिसते.

-दिलीप बिरुटे

प्रसाद_१९८२'s picture

10 Jan 2021 - 8:19 pm | प्रसाद_१९८२

वरील ष्टोरीत श्रीकृष्णाने सरळ सरळ रडीचा डाव खेळला आहे असे स्पष्ट दिसते.
--

अगदी !

संपूर्ण युद्धच पांडव रडीचा डाव खेळून जिंकलेत अशी शंका कधी कधी येते.