काही वेळा घरी दुध उरते अशावेळी तुम्ही काय करता?
१.मी कस्टर्ड करते आणि फ्रिज मध्ये ठेवते आणि जी फळे असतील त्यांच्या फोडी करून ऐनवेळी त्यात घालून देते. त्यावर जेली/जॅम घालून डेकोरेशन करून सर्व्ह करते.
२.कोल्ड कॉफी (खरे तर कॉफी न घालता बोर्नव्हीटा/बुस्ट घालते)
३.मिल्क शेक (बदाम्/खजुर)
४ हलवा (गाजर्/दुधी /बीटरूट)
५.फालुदा
६.कस्टर्ड कॅरॅमल
छोटा डॉन यांच्या विनंती वरून एक रेसिपी...गव्हाची खीर
जर एकटेच असाल तर एक वेळचे पोटभरून जेवण सुद्धा.
२ वाट्या गव्हाचा रवा /दलिया
१/२ वाटी तांदुळ
२/३ लवंगा
२ वाट्या ओले खोबरे(ऐच्छिक)
२ वाट्या चिरलेला गुळ
१/२ वाटी साखर आवडीप्रमाणे
१ टी.स्पून वेलदोडे पावडर
१ टी.स्पून जायफळ पावडर
काजु, बेदाणे
१ टे.स्पून तूप
२ टी.स्पून खसखस भाजून पावडर (ऐच्छिक)
१/२ लिटर दुध
१. रवा व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
२.१टे.स्पून तूप गरम करून त्यामध्ये लवंगा घालून रवा आणि तांदूळ परतावा व ४ वाट्या पाणी घालून कुकर मध्ये ३ शिट्या देऊन शिजवावा.
३.जाड बुडाच्या पातेल्यात वरील शिजलेला रवा घोटून, त्यात गुळ ,साखर, खसखस, वेलदोडे पावडर , खोबरे ,दूध घालून शिजवावा.
४.सर्व्ह करताना किंवा खाताना काजु, बेदाणे घालून खावे.
खोबरे आणि खसखस नसले तरी चालते पण त्यामुळे खीर खमंग लागते.
दुध न घालता शिजवले तरी चालते, फ्रिज मध्ये ठेवावे व हवे तेव्हा दुध घालून खावे.
*****************************************************************************
सर्वात सोपी म्हणजे........... कोल्ड कॉफी
१/२ दुध (पिशवीत असेल तर अर्धा तास फ्रिजर मध्ये ठेवावे म्हणजे त्यात थोडा बर्फ साचेल कि जो हाताने फोडता येतो)
४ चमचे बोर्नव्हीटा किंवा बुस्ट किंवा कॉफी चवीनुसार्
८ चमचे साखर
वरील तिन्ही पदार्थ मिक्सर मध्ये ( लिक्विडायजर्)घालून मॅक्झिमम स्पीडवर १/२ मि. नंतर परत१/२ मि असे फिरवणे
शेवटी बबल्स येतात मग थांबणे ५ मिनिटांनी एका ग्लास मधून सर्व्ह करणे.
*****************************************************************************
वरील पैकी कोणती हवी असल्यास जरूर कळवा. मी त्याची रेसिपी देईन.
प्रतिक्रिया
18 Feb 2008 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर
झकास रेसिपीज्.
कोल्ड कॉफीवर कोको पावडर भुरभुरून सर्व्ह करावे. मस्त दिसते.
18 Feb 2008 - 9:26 pm | वरदा
मिल्क शेक (बदाम्/खजुर)
हे कसं करतेस? प्लीज सांग ना मला...
कस्टर्ड कसं करतेस तेही सांग तुला वेळ मिळाला तर...
18 Feb 2008 - 9:28 pm | वरदा
सांगायचं राहीलं..गव्हाची खीर छान आहे..मी नुसत्या गव्हाची केलेय पण त्यात तांदुळ घालुन नाही पाहिलेत आता करुन पाहेन...
18 Feb 2008 - 11:43 pm | छोटा डॉन
स्वातीताई अतिशय आभारी आहे......
मला वाटते की मला " खीर " नक्कीच जमेल ....
बघतो आता ट्राय करून .....
अवांतर : फालूदा कसा करतात ?
19 Feb 2008 - 9:45 am | विसोबा खेचर
गव्हाची खीर मस्तच झाल्ये, आवडली...:)
अरे कुणीतरी बालूशाहीची पा कृ द्या रे!
आपला,
(बालूशाहीवाचून सुकलेला) तात्या.
20 Feb 2008 - 6:47 pm | राजमुद्रा
साहित्य:
मैदा ३ कप
तूप किंवा लोणी १ कप
दही ३/४ कप
वेलदोडे पूड १/२ चहाचा चमचा
खाण्याचा सोडा १/२ चहाचा चमचा
साखर ८ कप
पाणी ३ कप
तेल तळण्यासाठी
क्रूती:
प्रथम पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर साखर घालावी.साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा.
प्रथम मैदा, वेलदोडे पूड , खाण्याचा सोडा एकत्र मिसळून घ्यावा.नंतर त्यात लोणी किंवा तूप घालून मळून घ्यावे. नंतर एक एक चमचा दही घालून चांगले (खूप)घट्ट पीठ भिजवावे. नंतर तेल तापण्यास ठेवावे. पीठाचा छोटा गोळा घेवून गोल करावा. नंतर किंचित तळहातावर दाबून चपटा करावा. मग त्या गोळ्याच्या मधोमध अंगठ्याने थोडासा खड्डा (बीळ नाही) करावा. मग हे गोळे तेलात लालसर खरपूस तळून कढावेत.हे गोळे पाकातून काढावेत, वरून पिस्त्याचे तुकडे घालून सजवावे.
बालूशाही तय्यार :)
राजमुद्रा :)
20 Feb 2008 - 6:53 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या प्रयोगशाळेत माझे प्रयोग चालू होतेच. पण मनासारखी बालूशाही बनत नव्हती (त्याचा 'बाळूशाही'बनत होता).
आता तुमच्या पद्धतीने करून पाहिन बालूशाही.
पाककृती स्वतंत्र दिली असती तर भविष्यात कधी गरज भासल्यास शोधायला बरे पडले असते. असो.
अभिनंदन.