आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !
१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.
इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.
२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.
मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.
दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !
३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
प्रतिक्रिया
16 Nov 2020 - 11:52 pm | प्रसाद गोडबोले
मग तुम्ही मिपावर "माझेच खरे , अन माझ्या एकट्याचाच अनुभव सत्य अन बाकीच्यांची भ्रांती " असे पटवुन द्यायला वादविवाद का बरें करत असता ?
17 Nov 2020 - 12:01 am | संजय क्षीरसागर
आणि अनुभव घ्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळेल.
17 Nov 2020 - 12:17 am | प्रसाद गोडबोले
समजा लेखातील साधना न करताच मला किंव्वा अन्य कोणालाही अन्य काही साधना करुन अनुभव आला असेल तर त्याला तुमची हरकत का ? मी म्हणतो तीच एक खरी साधना अन बाकीचे सर्व साधनामार्ग म्हणजे वैचारिक मैथुन असा तुमचा अट्टहास का ?
17 Nov 2020 - 12:23 am | प्रसाद गोडबोले
महत्वाचे म्हणजे धागा अन त्यावरील प्रतिसाद कडेकडेला जाऊन कडेलोट होण्या आधीच डिस्क्लेमर देतो : मला तुम्हाला किंव्वा अन्य कोणाला काहीच पटवुन द्यायचे नाहीये , माझी साधना अन माझा अनुभव मला लखलाभ अन तुमचा अनुभव तुम्हाला लखलाभ !
पण तुम्ही बोलता लिहिता त्यात " मी म्हणतो तेवढेच सत्य अन बाकीचे सगळे भ्रांती , जहीयत , अबॉमिनेशन " असा जो काही अॅट्टिट्युड दिसतो त्याचे मुळ शोधुन काढण्यात मजा येते , तुमच्यावर इस्लामचा अन ख्रिचॅनिटीचा काही प्रभाव आहे का हे मला शोधुन काढायचे आहे म्हणुनच आमचे हे आपले वैचारिक मैथुन प्रतिसाद =))))
17 Nov 2020 - 10:11 pm | उपयोजक
म्हणे शास्त्रज्ञांनी जपून ठेवलाय शास्त्रज्ञांनी.आइनस्टाईनच्या बुद्धीचे रहस्य उलगडण्यासाठी.आजपासून काही वर्षांनी आइनस्टाईनचा मेंदू किरकोळ वाटेल असा मेंदू शास्त्रज्ञांना मिळणार! ;))))
17 Nov 2020 - 2:01 am | Rajesh188
मेंदू सोडून शरीरातील सर्व अवयव बदलेले तरी स्व ओळख बदलत नाही.
मेंदू च्य सर्व स्मृती साठवणे शक्य झाले आणि प्रयोग शाळेत स्मृती विरहित विविध वयाचे देह उत्पादन सुरू केले की मृत्यू वर विजय मिळवला च म्हणून समजा .
फक्त त्या स्मुर्ती विरहित मेंदूत साठवलेल्या स्मूर्ती ट्रान्स्फर केले की चिरंजीव होण्यास वेळ लागणार नाही.
17 Nov 2020 - 2:46 am | टवाळ कार्टा
तुम्ही योग्य मार्गावर हाहात....पण अजूनही तुम्हाला ठरावीक प्रकारे साधना करावी लागते पण होईल त्यातही प्रगती...त्या बुद्धालाही समजले नव्हते मी सांगितलेले. आता माझेच उदाहरण देतो....मी साधनेत नसतानाही साधनेचा आनंद घेतो आणि त्याचवेळी लॅपटॉपवर GoT पण बघत असतो पण म्हणून मिपाचा प्रतिसाद कधीच चुकत नाही कारण लिहिणाराही मीच असतो. सकाळी उठल्यावर झोपले की दिवसभर अंगात उत्साह फसफसून रहातो आणि मस्त डुलकी काढता काढता पांढरा रस्सा ओरपता येतो. :)
17 Nov 2020 - 3:09 am | Rajesh188
बुद्ध पेक्षा हिंदू धर्मात मृत्यू विषयी अतिशय सखोल व्याख्या आणि माहिती आहे.
बुद्ध हे हिंदू तत्व ची च एक लहान शाखा असावी असे वाटते.
मृत्यू विषयी जेवढे सखोल वर्णन हिंदू च्या पुरातन साहित्यात आहे तेवढे बाकी कोणत्या च धर्माच्या साहित्यात नाही.
17 Nov 2020 - 7:47 am | शा वि कु
लेख फारसा नाही पटला. अनुभव नाही आला.
17 Nov 2020 - 9:49 am | संजय क्षीरसागर
लेखात न पटण्यासारखं काही नाही कारण ते वस्तुस्थितीचं वर्णन आहे.
पण तुमचा प्रतिसाद अशासाठी इंटरेस्टींग वाटला की वर्णन केलेल्या ध्यानस्थितीत बसल्यावर एका क्षणात निर्विचारता येते. याचा अर्थ विचार करता येत नाही असा नाही, तसं झालं तर आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य हरवेल. आपण ठरवलं तर त्या स्थितीत बसून कोणत्याही विषयावर एकसंध आणि सुसंगत विचार करता येतो पण मनात चाललेला विचारांचा स्वैर संचार थांबतो. सर्वस्वी बेलगाम झालेली मेंटल अॅक्टीविटी आपल्या काह्यात येते.
ध्यानमुद्रेत दोन गोलक एकमेकांपासून विलग असतांना तुमच्या मनात नक्की काय विचार यायला लागले ते क्रमवार सांगाल का ? म्हणजे प्रतिसादाला उत्तर देता येईल.
17 Nov 2020 - 11:20 am | शा वि कु
हे मात्र खरं आहे. विचार थांबले, कारण (माझ्या समजण्यानुसार) गोलक स्पर्श न होऊ देण्यावर लक्ष केंद्रित होतं. हे एकाग्र होण्यासाठी फायदेशीर आहे.
इथे खरा प्रॉब्लेम आहे. देह म्हणजे मी नाही असं काही वाटलं नाही. अर्थात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा साधनेचा भाग आहे, त्यामुळे लगेच अपेक्षा करणे फोलच.
ओके. देहाबाहेरचे अस्तित्व हि मला वस्तुस्थिती वाटत नाही.
असो. शेवटी अनुभवाचा प्रश्न असल्याने आत्तातरी फरक बुजवता येणार नाही.
17 Nov 2020 - 2:41 pm | संजय क्षीरसागर
.१.
काहीही परिचय नसतांना, ओपन सोशल फोरमवर प्रकाशित झालेली एक सोपी साधना करुन, एका तिर्हाईत व्यक्तीचे विचार थांबले हे या लेखनाचं सर्वोच्च यश आहे ! आजपर्यंत एकाही व्यक्तीचे विचार थांबले नाहीत असं झालेलं नाही पण ते सर्व एकतर माझ्यासमोर होते किंवा परिचयाचे तरी होते. आणि गोलक एकमेकात गुंतवता क्षणी विचार थांबतात ही खरी कमाल आहे !
अध्यात्मिक जगतात आजतागायत कोणताही सिद्ध मनाची प्रक्रिया थांबवायला इतकी सोपी आणि तत्क्षणी प्रचिती येणारी देऊ शकलेला नाही.
नाही तर गुरु करा, दिक्षा घ्या, इतकी वर्ष रगडा असा प्रकार केल्यावर, झक मारत काही तरी फायदा झाला म्हणावं लागतं नाही तर आपणच आपल्याला बावळट वाटायला लागतो !
______________________________
गोलकांचं अवधान मनाला एकाग्र करत नाही, ते अत्यंत विस्मयकारक पद्धतीनं ब्रेन रिलॅक्स करतं त्यामुळे मेंटल अॅक्टीविटी थांबते.
२.
येस ! तुम्ही शांत झालेल्या मेंटल अॅक्टीविटीची मजा घ्या.
संपूर्ण देहाची जाणीव आणि सरते शेवटी स्केलेटन अँड फ्लेश हे अनुभव अत्यंत सघन झालेल्या शांततेत हमखास येणारच कारण तीच वस्तुस्थिती आहे !
व्यक्तीमत्व हा आपण निर्माण केलेला, इतरांनी सपोर्ट केलेला आणि समाजिक सोयीसाठी उपयुक्त असलेला प्रकार आहे. वास्तविकात तसं काहीही नाही.
३.
काही हरकत नाही. शून्यता हा तुमचा अनुभव झाल्यावर तो फरक आपोआप नाहीसा होईल.
17 Nov 2020 - 3:13 pm | शा वि कु
टेक्निक तर सोपी आणि उपयोगी आहे.
17 Nov 2020 - 2:43 pm | गवि
काहीशा स्केप्टीकल मनाने हे करुन पाहिलं. मनातले जनरल विचार एकदम गायब झाल्याची अनपेक्षित आणि त्यामुळे आश्चर्यकारक जाणीव झाली खरी. पण लगेचच हे संक्षींच्या धाग्यावर जाऊन प्रतिसादात लिहूया असा विचार आला. मग हे असं का झालं याबद्दल तार्किक संगती लावणारे विचार आले. लक्ष हे दोन वर्तुळे टच न होऊ देण्यात लागल्याने हे झालं असं दिसतं. हीच स्थिती सुईत दोरा ओवणे किंवा अन्य काही मार्गाने साध्य होईल असा अंदाज केला. हे सर्व "विचार"च आहेत. (कपाळ बडवणारी स्माईली)
17 Nov 2020 - 4:44 pm | संजय क्षीरसागर
१.
एका विज्ञाननिष्ठ, निष्पक्ष आणि मान्यवर व्यक्तीनं स्केप्टीकली करुन मेथडनी रिझल्ट दिला यातच सगळं आलं !
२.
तुम्ही निर्विचार स्थितीचा आनंद घ्या. आयुष्यात घडणारी ही अत्यंत अपूर्व घटना आहे. वर्षनुवर्ष साधना करुनही साधकांना अमन अवस्था साध्य होत नाही. ही अवस्था तुम्हाला वस्तुस्थितीप्रत आणते, जो या लेखाचा कोअर पार्ट आहे : आपल्याला देह नाही तर देहाची जाणीव आहे .
गोलक जोपर्यंत टेकत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुसंगत विचार सुद्धा करु शकता याला युनिडायरेक्शनल थिंकींग म्हणतात. शास्त्रज्ञांचं मन याप्रकारे काम करतं, ते एकाच डिरेक्शननी दीर्घकाल विचार करत नेमक्या कन्क्लूजनपर्यंत पोहोचू शकतात.
त्यामुळे धाग्यावर जाऊन प्रतिसाद देण्याचा विचार हा वस्तुस्थितीशी सुसंगत विचार आहे पण त्याची घाई काय आहे ? जस्ट एंजॉय द सायलेंस, द स्टॉस्पेज ऑफ मेंटल अॅक्टीविटी. इट इज अ गोल्डन इवेंट !
३.
प्रश्न मन फोकस करण्याचा नाही, मेंटल अॅक्टीविटीचा ठहराव हा मुद्दा आहे. सुईत दोरा ओवणे, सखीची मिठी, समोर अचानक आलेलं वाहन.... कोणतीही गोष्ट मन थांबवते पण ती घटना क्षणिक असते; ते ध्यान नाही.
ध्यानात तुम्ही स्वतःला हवा तितका वेळ निर्विचार अवस्थेत राहू शकता. पाठ टेकलेली, डोळे मिटलेले, मन थांबलेलं.... ही स्थिती तुम्हाला विदेहत्वाची जाणीव करुन देते आणि तो या पोस्टचा उद्देश आहे.
17 Nov 2020 - 5:23 pm | गवि
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
निर्विचार नाही तरी जे काही विचार होते ते एकाच विषयावरचे सुसंगत होते हे खरंय. हेही नसे थोडके. एक चांगला अनुभव मिळाला.
याबद्दल साशंक आहे. वर्तुळे विलग ठेवणे ही एक शारिरीक मानसिक कसरत आहे. ती फार काळ अथकपणे किंवा न कंटाळता टिकवता येईल किंवा कसे ते पाहावे लागेल.
17 Nov 2020 - 8:13 pm | संजय क्षीरसागर
जर तुम्ही घरी बसला असाल (बेड किंवा दिवाणावर) तर मांडीवरच्या कुशनवर हात रेस्टेड असल्यानं खांदे आणि कोपरापासूनचे हात एकदम रिलॅक्स्ड असतात. ऑफिसमधे किंवा इतरत्र कुठे असला तर तेच हात खुर्चीच्या आर्मसवर रेस्ट केले की झालं ! यात कोणतीही शारिरिक किंवा मानसिक कसरत नाही, ते फक्त भान आहे; आपल्याला ड्रायविंग करतांना कार कंट्रोल्सचं असतं त्याहीपेक्षा किती तरी सोपं !
या ध्यानाचा कंटाळा येणं असंभव आहे कारण कंटाळा ही मानसिक अवस्था आहे. निर्विचारतेत तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता आणि तो जगातला सर्वोच्च आनंद आहे. इन फॅक्ट, स्वतःशी झालेला डिसकनेक्टच सर्व दु:खाचं एकमेव कारण आहे.
17 Nov 2020 - 6:17 pm | अर्धवटराव
विशिष्ट प्रकारचा व्यायाम आणि प्राणायाम करुन अशी स्थिती दिवसभराकरता प्राप्त करण्याचे उपाय अनुभवले आहेत. त्याच्या अभ्यासाने तर आश्चर्यकारक रित्या इंट्युशन व्हावं तसं अनेक आयडिया, प्रश्नांची उत्तरं, कार्य-कारण भावाची सुसंगती, असं वेळच्यावेळी आपोआप डोक्यात हजर होतं. पण हे सर्व शारीरीक-मानसीक लेव्हललाच होतं हे देखील सत्य आहे.
राईट. हे सर्व मनाच्याच पातळीवर होतं. आपण निर्विचार झालोय हे देखील मनालाच कळतं. सांध्यांचे अॅक्चुअल कनेक्ट पॉईण्ट, पोटातले स्त्राव, शरीराच्या वेगवेगळ्या भागात नाड्यांचे ठोके.. हे सर्व 'जाणवतं'... पण शेवटी हे सर्व शारीरीक-मानसीक पातळीचीच अॅक्टीव्हिटी असते.
17 Nov 2020 - 9:55 am | सोत्रि
हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या परिच्छेदाबद्दल आहे. गैरसमज आणि चुकीची माहिती पसरु नये म्हणून.
सिद्धार्थ गौतमाने २९ व्यावर्षी साधारण जीवनशैलीचा त्याग केला आणि त्याला ३५ व्या वर्षी बुद्धावस्था प्राप्त झाली. साधना ६ वर्षांची ती ८ समाधीअवस्थांपर्यंत जाण्याची. ८ समाधीअवस्था प्राप्त करूनही मनाचे विकार जात नाहीत असे का? ह्याचे उत्तर मिळविण्यासाठी ४९ दिवस सलग ध्यानात राहून सर्व प्रश्नांची मुळापासून उत्तरे मिळवली आणि बुद्ध झाला.
वय वर्ष ३५ ते ८० असे एकूण ४५ वर्षांचे उरलेले बुद्धावस्थेतले आयुष्य त्याने त्याला प्राप्त झालेले ज्ञान सामान्य जनतेला शिकवण्यात व्यतीत केले.
सिद्ध झालेल्यांची आकडेवारी प्रसिद्ध होणारी ईन्डेक्स अजुनतरी अस्तित्वात नाही, ती तशी अस्तित्वात आल्यावर ह्या विधानाला काहीतरी अर्थ असू शकेल; सद्यपरिस्थितीत नाही. कारण गेल्या अडीच हजार वर्षात बुद्धाची शिकवण अजूनही टिकून आहे आणि आजही तितकीच मूलभुत आणि परिणामकारक आहे!
'यालाच बुद्ध शून्यता म्हणतो' असं एकीकडे म्हणताना बुद्धाने शिकवलेल्या विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे असं लिहीणं हा प्रचंड विरोधाभास आहे. असं होण्याचं कारण, कदाचित पायर्या-पायर्यांची भलतीच साधना विपश्यना म्हणून केली असावी कारण विपश्यनेत कसल्याही पायर्या नाहीत.
अर्धवट माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतांनी गैरसमज आणि चुकीची माहिती पसरु नये म्हणून हा प्रतिसाद.
- (विनयशील अभ्यासू) सोकाजी
17 Nov 2020 - 10:27 am | संजय क्षीरसागर
मजेशीर आहे तो नेमका कशामुळे झाला याची तुम्हाला कल्पना आहे का ? असेल तर इथे लिहा. विपश्यनेचा आणि बुद्धाला झालेल्या साक्षात्काराचा कणमात्र संबंध नाही.
२.
सत्य स्वयंउद्घोषक आहे त्यामुळे सिद्ध त्याच्या आकलनाची अभिव्यक्ती करतोच करतो. अशा व्यक्ती अध्यात्मिक क्षितीजावर तारा बनून चमकू लागतात, त्यांचा इंडेक्स ठेवावा लागत नाही. विपश्यना मार्गातलं बुद्धनंतर असं कुणीही दिसत नाही.
३.
बुद्धाबद्दल मला नितांत आदर आहे पण त्याची प्रणाली (विपश्यना) सत्याप्रत आणू शकत नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे.
काय बोल्ता ? मग हे कुणी लिहिलं आहे ?
विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!
17 Nov 2020 - 10:50 am | कानडाऊ योगेशु
सोत्रि, कुठेही वैयक्तिक न होता तुम्ही दिलेला हा प्रतिसाद वाचुन तुमच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला.
17 Nov 2020 - 10:04 am | अर्धवटराव
पण ज्याला इच्छा असेल त्याने प्रोसेसचा उपयोग करुन स्वतः स्तःचा निश्कर्ष काढणे उत्तम.
17 Nov 2020 - 10:57 am | कानडाऊ योगेशु
बाप्रे,काहीही म्हणा पण हे वाक्य भयंकर रोचक आहे.
17 Nov 2020 - 10:58 am | कानडाऊ योगेशु
पण अडचण ही आहे कि ही उत्कटता केवळ एकदाच अनुभवता येत असावी.
17 Nov 2020 - 11:09 am | शा वि कु
एका डॉक्टर साठी एक टेलिपॅथी हेल्मेट बनवले असते. ते पेशंटवर चढवले की पेशंटला नक्की काय त्रास होतो आहे त्याला समजत असते. पण एकदा चुकून मारणाऱ्या पेशंटवर हे हेल्मेट चढवून डॉक्टर मृत्यचा अनुभव घेतो. मृत्यूनंतर शरीरातले सगळे स्त्राव एकदमच शेवटचे वाहतात म्हणून त्याला खरोखरीच "हजार संभोगाची उत्कटता" अनुभवता येते, आणि पुढे ह्याचे व्यसन लागते, अशी गोष्ट आहे.
17 Nov 2020 - 11:20 am | शा वि कु
*मरणाऱ्या
18 Nov 2020 - 3:53 pm | संजय क्षीरसागर
त्या सिरिअलमधली फँटसी ही वस्तुस्थिती आहे !
पण सिरिअल आणि रियालिटीमधे दोन मूलभूत फरक आहेत :
१. ते नोडल हेल्मेट दुसर्याला घालून डिटेक्टर आपल्या कानामागे जोडायला लागतो, एकदा विदेहत्वाचा उलगडा झाला की अशा गॅजेटरीची गरज नाही.
२. आपल्या देहातल्या आणि मनातल्या सर्व संवेदना आपल्याला प्रखरपणे कळतात पण खुद्द आपल्याला काहीही होत नाही !
आणि तो उलगडा होणं हाच या लेखाचा उद्देश आहे. म्हणून मी लेखातच म्हटलंय की आपल्याला देह नाही, फक्त देहाची जाणीव आहे !
मग एका मृत्यूत हजार संभोगांची मजा येते कारण त्या सिरिअलमधे दर्शवल्याप्रमाणे शरीरातले सगळे स्त्राव एकदमच शेवटचे वाहतात .
लेखातल्या क्न्क्लूजनला इतका नाट्यमय दुजोरा मिळालाय की सर्व पोस्टच धन्य झाली आहे !
पुन्हा एकदा सॉलीड आभार्स !
19 Nov 2020 - 4:54 pm | शा वि कु
आपल्या आवडत्या शिरियलचा प्रचार करणे हे आमचे कर्तव्य आहे.
बाकी बऱ्याच एपिसोड्स मध्ये अध्यात्माशी आणि तत्वज्ञानातल्या प्रश्नांशी जोडता येतील असे मुद्दे असतात. त्यामुळे वेळ मिळाला तर पाहाच.
17 Nov 2020 - 11:40 am | अमर विश्वास
सोत्रींचा दिवाळी अंकातला (जवळजवळ निरुपयोगी) ही पहिली ओळ वाचली आणि या लेखाची उपयुक्तता लक्षात आली ...
बाकी मृत्यू वर जिवंत लोक लिहीत आहेत हे पाहून कायमच मजा वाटत आली आहे
17 Nov 2020 - 11:45 am | कांदा लिंबू
संपादक मंडळ / व्यवस्थापन -
संजय क्षीरसागर या आइडीवर तात्काळ कायमची बंदी घालण्यात यावी अशी नम्र विनंती.
17 Nov 2020 - 2:41 pm | उन्मेष दिक्षीत
या फेक नावामागे लपलेल्या आणि आत्तापर्यंत फक्त एक, ते ही मदतीचा धागा काढलेल्या निरुपयोगी आयडींना संपादक मंडळाने तत्काळ एक्झिट दाखवली तर जास्त उपयोगी होइल (असल्या आयडींपेक्षा वाचनमात्र राहिलेले बरे). अर्थात परत असाच कसलातरी आयडी घेऊन तुम्ही मिपाला तुमचे अमूल्य योगदान द्यायला तयार असालच.
17 Nov 2020 - 11:58 am | मराठी_माणूस
हे असेच का करायचे ? नुसतेच बसले तर का चालणार नाही.
दुसरे , बुध्दाला जो काही उलगडा झाला त्याला आधार काय ?
17 Nov 2020 - 1:54 pm | संजय क्षीरसागर
१.
नुसतं बसायची ध्यान पद्धती झेन मार्गात आहे पण त्या प्रक्रियेत साधक वर्षानुवर्ष भींतीसमोर बसून राहतो आणि मग एक दिवस अचानक त्याची मेंटल अॅक्टीविटी थांबते. म्हणजे
. माझ्या मेथडमधे हेच काम एका क्षणात होतं !
२.
शून्यता हा बुद्धाचा अद्वितीय अनुभव आहे. लेखात सांगितलेली साधना तुम्हाला त्याची प्रचिती देईल आणि तोच पुरावा आहे.
17 Nov 2020 - 1:08 pm | आनन्दा
संक्षी तुम्ही लिहिते रहा.
तुमचा एक लेख वाचला की एकाच वेळेस हजारो वैचारिक संभोगांचे सुख प्राप्त होते..
27 Nov 2020 - 12:57 pm | विटेकर
१००० वैचारिक संभोग-सुख कि १००० वैचरिक बलात्कार असे तुम्हाला म्हणायचे आहे ?
कारण त्यांच्या लेखात बलात्कार करणारा मीच कायम सुखावत असतो ....
17 Nov 2020 - 3:32 pm | Jayant Naik
कोणतीही मुद्रा जर तुमच्या मनात जर शांतातेशी जोडली गेली तरी सुद्धा ती समाधी प्रक्रियेत उपयोगी पडते. मुद्रा हि तुमच्या मनाला शिकवण्याची एक पायरी आहे ..नन्तर तुम्ही ती काढून टाकून बसल्याजागी किवा चालता चालता सुद्धा समाधी ला उपलब्ध होऊ शकता. बाकीचा भाग अती रोचक . बाकी वाद विवादात मला शून्य इंटरेस्ट असल्याने ..लगे रहो.
18 Nov 2020 - 2:04 am | गामा पैलवान
गवि,
चाफेकळी ( = तर्जनी ) चे अंगुलगोल विलग धरायला प्रयास पडतात. मधल्या बोटांचे गोल करून पाहिले तर त्यामानाने माझा बराच सायास कमी झाला.
अशाच प्रकारे भान जागतं राहावं म्हणून जिभेचा शेंडा तोंडाच्या पोकळीत तरंगत ठेवायची क्लृप्ती सांगितली आहे.
आ.न.,
-गा.पै.
18 Nov 2020 - 7:41 am | गवि
धन्यवाद..
18 Nov 2020 - 8:44 am | आनन्दा
गांपै,
संक्षी जी मुद्रा इथे सांगत आहेत तिला ज्ञानमुद्रा असेच म्हणतात.. म्हणजेच मुळात ही मुद्रा केली असता मन एकाग्र होण्यास मदत होत असावी. त्यामुळे त्यात तथ्य आहे.
दिसणारे जेबते सांगत आहेत की ते अस्पर्शित राहणे, त्याला शास्त्रे अनुसंधान असे म्हणतात. अनुसंधान कशावरही करता येते.
चौरंगीनाथ जेव्हा तपश्चर्येला बसले तेव्हा मच्छिंद्रनाथ गुहेच्या दारावर शिळा ठेऊबी गेले होते, ह्या शिलेवरचे लक्ष हटले की शिळा अंगावर पडणार असे सांगून.. मग त्या तापाच्या काळात चौरंगीनाथानी अन्न पाणी देखील घेतले नाही, कारण अनुसंधान.. त्यांना सगळ्याचा विसर पडला.
आता एकदा अनुसंधानच करायचे ठरले की मग लक्ष्य शारीरिक कशाला? तो हठयोग झाला.
तुम्ही नामनुसंधान करा, नादानुसंधान करा, सोहम साधना करा.. अनेक श्रेष्ठ मार्ग आहेत.
असो, बरेच बोललो अधिकार नसताना.
18 Nov 2020 - 9:16 am | गवि
यावरुन बालपणीची एक कथा धूसर आठवली. नारदमुनि किंवा कोणीतरी, यांना तेलाने काठोकाठ भरलेले भांडे घेऊन प्रदक्षिणा किंवा मार्गक्रमण करायला सांगितले असता (एकही थेंब सांडता कामा नये ), ते नेहमीचे (सततचे) नामोच्चारणही विसरतात, किंवा त्या वेळेपुरता त्यांना सगळ्याचा विसर पडतो, अशी काहीतरी कथा होती. आता अगदीच धूसर आठवतोय आशय. चुभूदेघे.
18 Nov 2020 - 2:09 pm | आनन्दा
हो, शाळेत असताना हिंदी च्या पुस्तकात वाचलेली आठवतेय..
18 Nov 2020 - 4:56 pm | संजय क्षीरसागर
पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी अशीच अनंत लफडी करुन ठेवली आहेत. त्यामुळे इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स निर्माण होण्याशिवाय काहीही साध्य होत नाही, शिवाय साधक अध्यात्माकडे कायमची पाठ फिरवतो ते वेगळंच.
मी वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दोन गोलक एकमेकांना स्पर्शू न देणं (आणि उरलेली तीनही बोटं सहजपणे सरळ राहणं) हे एक भान आहे, तो त्राटकासारखा एकाग्र होण्याचा प्रयास नाही. हे भान जागृती आणतं आणि ती जागृती निर्विचारता आणते. कार चालवतांना आपल्याला कारची संपूर्ण आऊटर साईड आणि आतल्या क्लच-ब्रेक-अॅक्सीलरेटरचं भान असतं अगदी तसं, एकदम सहज, निष्प्रयास !
18 Nov 2020 - 5:26 pm | सोत्रि
संक्षी, एक जेन्युइन प्रश्न -
तुम्ही जी ध्यानाची जी कृत्ती सांगितली आहे तिचं अंतिम साध्य फक्त निर्वीचार होणं हेच आहे का?
- (अभ्यासू) सोकाजी
18 Nov 2020 - 6:32 pm | संजय क्षीरसागर
१. वैचारिक कोलाहलामुळे आपण शरीराच्या आत आहोत असा भास होतो
हा भास हीच साऱ्या मानवतेची बंदीशाळा आहे.
२. मनाची अॅक्टीविटी थांबल्यावर तुम्हाला कळेल की देह आहे पण देहात कुणीही नाही
३. तुमच्या देहात कुणीही नाही म्हणजेच कुणाच्याही देहात कुणीही नाही
यालाच बुद्ध शून्यता म्हणतो !
४. आपल्याला देहाच्या आत आहोत असा भास होत होता पण वास्तविकात आपल्याला देह नाही, फक्त त्याची जाणीव आहे
५. आपलं असणं हे अनंत आकाश आहे आणि जाणणं ही जगण्यासाठी उपत्नब्ध असलेली सोय आहे
६. देहात कुणीही नाही त्यामुळे मरण्याचा प्रश्नच नाही !
७. या आकलनासरशी तुम्ही मुक्त आकाश होता, निर्भय होता, आनंदी होता आणि मग जीवनाचा उत्सव सुरु होतो
कमालीच्या बुद्धिमत्तेनं मी अध्यात्म इतकं सोपं केलं आहे !
एंजॉय !
18 Nov 2020 - 6:37 pm | सोत्रि
प्रश्न पुन्हा विचारतो, नेमकं उत्तर द्या:
तुम्ही जी ध्यानाची जी कृत्ती सांगितली आहे तिचं अंतिम साध्य फक्त निर्वीचार होणं हेच आहे का?
- (अभ्यासू) सोकाजी
18 Nov 2020 - 6:54 pm | संजय क्षीरसागर
तुमच्या धारणा थोडया बाजूला ठेवून, स्टेप-बाय-स्टेप वाचा .
इतकं सोपं उत्तर जगात कुणीही देऊ शकणार नाही !
आणि तरीही समजलं नाही तर ध्यान करुन पाहा. इतक्या जणांना इथे प्रचिती आली आहे, तुम्हालाही येईल.
ऑनलाईन अध्यात्माचा हा अपूर्व अविष्कार आहे.
18 Nov 2020 - 7:07 pm | सोत्रि
ध्यान केल्यावरच हा प्रश्न विचारतो आहे. प्रश्न कळला नसेल तर आणखि सोपं करूया...
होय किंवा नाही इतकंच उत्तर अपेक्षित आहे. नेमकं तेवढं सांगा.
- (अभ्यासू) सोकाजी
18 Nov 2020 - 7:27 pm | अर्धवटराव
ती म्हणजे
शरीरांची संपूर्ण जाणीव होणं अशक्य आहे... काहि स्पर्षजन्य जाणिवा सोडुन उर्वरीत शरिराची जाणिव होत नाहि.
लेखात वर्णन केलेल्या ध्यानसाधनेत रमणाण झालेया व्यक्तीचे केस/नखं कापा... त्याला काहिच जाणिव होणार नाहि.. कारण शरीराच्या त्या भागाची जाणिव तशीही होत नाहि.
असं कितीही म्हटलं तरी साधा प्रश उरतो कि कुठल्या मेकॅनीझमने हि जाणिव होते? शरीराची अवयव सिस्टीम / नर्व्हस सिस्टीम सर्व प्रकारच्या जाणिवांचे आदान-प्रदान करत असते. आता त्या पलिकडे हि जाणिव 'आपल्या' पर्यंत न्यायची म्हणजे 'आपल्यात' शरीराव्यतिरिक्त काहि अन्य सिस्टीम असायला हवी.
म्हणुन वेळ मारुन नेता येते. पण ते खरं उत्तर नाहि.
शरीराच्या 'आत' कुणीच नाहि म्हटल्यावर
हि संकल्पनाच बाद होते.
थोडक्यात काय, तर शारीरीक/मानसीक व्यायाम आणि त्याचे फायदे उपभोगताना ते
आहेत हे प्रामाणीकपणे कबुल करुन पुढे जावं. त्या व्यायामाच्या परिणामकारतेला त्यामुळे काहि बाधा येत नाहि.
18 Nov 2020 - 7:50 pm | संजय क्षीरसागर
ते आधी सांगा कारण तीच तर खरी मेख आहे.
एकदा निर्विचार झालात की सगळे प्रश्नच संपले !
18 Nov 2020 - 7:59 pm | सोत्रि
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईनच, प्रतिप्रश्न न करता. आधि मी विचारलेल्या प्रश्नाचं फक्त साधं हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या.
उत्तर देता येत नसेल तर तसं सांगा, कशाला उगाच बीटींग-अराउंड-द-बुश.
- (अभ्यासू) सोकाजी
- (अभ्यासू) सोकाजी
18 Nov 2020 - 8:33 pm | संजय क्षीरसागर
माझ्या ध्यानपद्धतीची प्रचिती आल्याची ग्वाही इथे किमान चौघांनी दिलीये, ज्यांची माझ्याशी काहीही व्यक्तिगत ओळख नाही. सो आय एम डन !
तुम्हाला तुमचा मार्ग योग्य वाटत असेल तर चालू ठेवा.
मला प्रश्न विचारतायं याचे दोनच अर्थ आहेत :
१. तुम्हाला स्वतःच्या मार्गावर विश्वास नाही, किंवा
२. तुम्ही निर्विचार होऊनही तुम्हाला ती इतकी सोपी गोष्ट होती हे मंजूर होत नाही !
18 Nov 2020 - 8:56 pm | सोत्रि
प्रश्न कोणाला प्रचिती आली किंवा नाही ह्याबद्दल अजिबात नव्हता. प्रश्न साधा सरळ आणि सोपा होता ज्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही होते ते दिलेलेच नाहीयेय.
असो, मला माझे उत्तर मिळाले कारण उत्तर येणार नाहीच ह्याची १००% खात्री होती, त्याती प्रचिती मात्र आली.
- (अभ्यासू) सोकाजी
18 Nov 2020 - 12:25 pm | प्रसाद गोडबोले
छ्यॅ , काही तरीच तुमचं =))))
संक्षींना इतर मार्ग मान्यच नाहीत हो, इतर सगळे मार्ग म्हणजे भ्रांती आहेत . इतर सगळे साधु संत सज्जन अन त्यांन्नी सांगितलेले साधना मार्ग हे सर्व व्यर्थ वायफळ आहे असे संक्षींचे मत आहे. इव्हन ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव नाही त्याही गोष्टी निरर्थक आहेत असे त्यांचे मत आहे.
तुम्ही त्यांचे इतर लेखन काढुन वाचा म्हणजे तुम्हाला अजुन मजा येईल . =)))))
19 Nov 2020 - 10:49 pm | गामा पैलवान
आनन्दा,
माहितीबद्दल आभार. तुम्ही नाथांचे भक्त दिसता. चौरंगीनाथांची कथा माहीत होती. पण डोक्यावरच्या टांगत्या शिळेस तोलून धरण्यास अनुसंधान म्हणतात हे नव्यानं लक्षांत आलं.
असो.
अधिकार नसतांना दावा करणे चूक आहे. पण वर्णनात्मक भाष्य करावयास अधिकार नसला तरी चालतो. तुमचं कथन दुसऱ्या प्रकारातलं आहे. तरीही तुम्ही क्षमा मागताहात हा तुमचा विनय आहे.
विद्या विनयेन शोभते.
आ.न.,
-गा.पै.
20 Nov 2020 - 9:12 am | संजय क्षीरसागर
याप्रकारच्या साधना सांगणारे आणि करायला लावणारे नाहक जीव धोक्यात घालतात, त्याचा शून्य उपयोग आहे. जैन धर्मातही असले भंपक प्रयोग चालतात आणि साधक देहाची वाट लावून घेतात. डोक्यावरची टांगती शिळा पडली तर कोण जवाबदार ? म्हणजे सत्याचा उलगडा राहिला बाजूल आणि ज्या बुद्धीनं विषय समजावून घ्यायचा तिच्यावर शिळा कोसळणार !
देहात कुणीही नाही हा अल्टीमेट उलगडा आहे तो तुम्हाला मृत्यूच्या भयापासून आणि व्यक्तिमत्त्वातून एकाचवेळी मुक्त करतो. म्हणजे तुम्ही मुक्त होताच पण आपण देहात आहोत आणि व्यक्ती आहोत या भ्रमांमुळे तो होत नव्हता.
असल्या भंपक साधनांनी आध्यात्माची वाट लागली आहे, त्यामुळे लोक एकतर आध्यात्माकडे पाठ फिरवतात किंवा मग त्यांना प्रचंड इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स येतो. इक्झॅक्टली हाच मुद्दा माझ्या दुसर्या लेखात मांडला आहे, बघा!
18 Nov 2020 - 2:39 pm | संजय क्षीरसागर
मुख्य उद्देश आपल्याला देह नसून, देहाची जाणीव आहे हा उलगडा होणं आहे. त्यासाठी संपूर्ण देहाची एकसंध जाणीव होणं गरजेचं आहे. त्याला हॉवरींग द बॉडी असं म्हटलंय. इतर मुद्रांनी तो उद्देश साध्य होत नाही.
शिवाय हात (म्हणजे कोपरांपासून ते बोटांपर्यंतचा सर्व भाग) समोर मांडीवर असलेल्या कुशनवर टेकवले आहेत आणि पाठ भींतीला टेकलेली आहे त्यामुळे इतकी सुखकर साधना आजमितीला जगात कोणतीही नाही.
18 Nov 2020 - 3:33 pm | संजय क्षीरसागर
संपूर्ण देहाच्या जाणीवेप्रत नेऊ शकत नाही. त्या साधनेत, साधनाकालात एकसंध विचार (युनीडायरेक्शनल थिंकी़ग) ही होऊ शकणार नाही. करुन पाहा.
18 Nov 2020 - 8:36 am | चित्रगुप्त
@संक्षि: आज दुपारी मोकळ्यात फिरताना हा प्रयोग करून बघितला. माझी बोटे जरा जाड असल्याने तर्जनीने कुठेही न टेकता गुंफणे जमत नाही, पण मध्यमेने जमले. डोळे मिटल्यावर शरीर अगदी हलके होऊन वर वर जात असल्याचा भास झाला. नंतर घरी शांतपणे करून बघितल्यावर पुन्हा लिहेन. काहीतरी नवेच करून बघायला मी नेहमीच तयार असतो. आता हे एक नवीन. अनेक आभार.
18 Nov 2020 - 4:24 pm | संजय क्षीरसागर
हे अस्तित्वच एका अथांग पोकळीत तरंगाईत आहे ! ज्या पृथ्वीवर देहाचा वावर आहे ती स्वतःच तरंगते आहे त्यामुळे देहही आपसूकपणे तरंगतो आहे.
देह तरंगाईत आहे हे जाणणं हा खरा नृत्यकलेचा उद्देश आहे ! आपल्याकडे अज्ञानाचा इतका अथांग पसारा आहे की ती कला संपूर्णपणे व्याकरणात जखडून टाकली आहे आणि (सो कॉल्ड दिग्गज आणि) रसिकही इतके बधीर आहेत की नृत्यात ते व्याकरण जमतंय की नाही हेच बघतात. जगात अजून कुणीही नृत्याकडे या अँगलनं पाहिलेलं नाही.
____________________
मध्यमा आणि अंगठ्याच्या गोलकात इतर तीन बोटं एकसंध नसल्यानं फार वेळ सरळ राहू शकत नाहीत, शिवाय ती एकमेकांना टेकायला लागतात त्यामुळे दीर्घकाल निर्विचार स्थितीचा अनुभव येणार नाही.
____________________________________
पोस्ट तुमच्या पेंटींग्जसारखी रंगतदार व्हायला लागली आहे, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार्स !
18 Nov 2020 - 9:34 am | टर्मीनेटर
धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! एका चांगल्या धाग्याला टीकेचे धनी करण्याची क्षमता त्या वाक्यात (आणि एकंदरीत मांडणीत) नक्कीच आहे.
असो, खरंतर सदर धागा विषयात मला गती/रस अजिबात नाही, परंतु तुम्ही सांगितलेली सोपी मुद्रा सहज कुतूहल म्हणून करून बघितली, आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर १००% नसली तरी बऱ्याच अंशी निर्विचार स्थितीची अनुभूती नक्कीच आली 🙏
धाग्यातील काही आक्षेपार्ह वाक्ये वगळता दिवाळी निमित्त तुम्ही सर्वांना दिलेली 'अनमोल भेट' आवडली 👍
शा वि कु आणि गवि साहेबांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत आणि वाद/चर्चेत सहभागी होण्यात Jayant Naik साहेबांनी म्हंटल्या प्रमाणे मलाही शून्य रस असला तरी प्रतिसादातून मिपाकरांनी लिहिलेले त्यांचे अनुभव वाचण्यासाठी हा धागा फॉलो करण्यात येईल.
धन्यवाद.
18 Nov 2020 - 11:25 am | उपयोजक
प्रतिसादाशी १००% सहमत! लेख चांगलाच आहे पण त्या एका वाक्याने डाग लागला!
18 Nov 2020 - 3:18 pm | संजय क्षीरसागर
स्वतःची पोस्ट नेमकी त्याच वेळी टाकत असतांना, ते काम बाजूला ठेवून, तुम्ही अत्यंत आपुलकीनं फोटोचा डायरेक्ट पेस्ट कोड दिलात याचं फार कौतुक आहे. इमेज मनाजोगत्या साइजची झाली नसती तर पोस्टचा इंपॅक्ट हुकत होता !
मृत्यू हा अत्यंत भेदक पण तितकाच मोहक विषय आहे त्यावरचं लेखन तितकंच भिडणारं व्हायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून वाचकांच्या दृष्टीकोनात बदल होऊन त्यांच्या जगण्याला एक दिशा मिळायला हवी. इथे सदस्य, विषयातलं काहीही गम्य नसतांना, केवळ टाईप करता येतं म्हणून पिंका टाकतात आणि त्यांचा रोख व्यक्तिगत असतो, तसा उद्देश सोत्रींच्या लेखाबद्दल नव्हता. रोख पोस्टच्या कंटेंटकडे होता, लेखकाशी त्याचा सुतराम संबंध नाही आणि मी हा लेख लिहून त्या विषयाचा समग्र आवका दाखवून दिला, सदस्यांसाठी आनंदाचं एक नवं दालन खुलं केलं. सोत्री एक व्यक्ती म्हणून रसिक माणूस आहे आणि त्यांच्या रंगीन पोस्टसना मी वेळोवेळी दाद दिली आहे.
तुम्हाला खटकलेल्या काही वाक्यांची मला ही कल्पना आहे. तारीख उलटण्यापूर्वी लेख पोस्ट करायचा होता त्यामुळे इंपॅक्ट हा एकमेव उद्देश ठेवून मी अक्षरशः एका सिटींगमधे लेख लिहिला, त्यात इमेज लेखापेक्षा मोठी होत होती तो एक ताप होताच. शिवाय माझी पोस्ट आली की इथे लगेच रणधुमाळी चालू होते, त्यामुळे पोस्ट प्रोटेक्ट करणं हा सर्वात महत्तम भाग असतो. तो वेळच्यावेळी निस्तरला नाही तर इतर त्याचू तिथे येऊन नृत्यसमारोह करायला अधीर असतातच ! तस्मात, वेळ मिळाला की सासंतर्फे नक्की मॉडरेशन करीन.
१.
२.
या प्रशंसेबद्दल अगदी मनापासून आभार्स !
______________________________________
अध्यात्मात रस नसणारी व्यक्ती या जगात नाही, कारण प्रत्येक जण आहे त्या परिस्थितीत फक्त एकच गोष्ट शोधतोयं, ती म्हणजे आनंद ! अनाहूतपणे प्रत्येक जण स्वतःलाच शोधतोयं कारण तुम्ही स्वयेच आनंद आहात !
चित्र काढतांना आनंद होतो असं सकृद्दर्शनी जरी वाटलं तरी तो स्वतः- स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे झालेला असतो. चित्र ही त्या आनंदाची अभिव्यक्ती असते.
अध्यात्मात रस नसणार्या लोकांच्या बाबतीत दोन गोष्टी असतात, एक म्हणजे आपणच आनंद असू याची त्यांना कल्पना नसते आणि दुसरं म्हणजे आजपर्यंत जगातल्या सिद्धांनी अध्यात्म इतकं क्लिष्ट करुन ठेवलं आहे की त्या भानगडीत न पडलो तर बरं असं वाटतं !
माझ्या अध्यात्माचा रंग वेगळा आहे. तुम्ही सांगितलेलं ध्यान करुन पाहा, तुम्हाला नक्की प्रचिती येईल.
18 Nov 2020 - 10:26 pm | संजय क्षीरसागर
सासंनी काढून टाकलं !
दुसरी खटकणारी गोष्ट, त्या पुढे वस्तुस्थिती निदर्शक स्पष्टीकरण लिहून, मान्य होईल असं करायची विनंती केली आहे.
18 Nov 2020 - 10:54 pm | संगणकनंद
स्वतःच्या लेखांची/प्रतिसादांची/मतांची स्वतःच वाहवा करताना इतरांच्या लेखांना/प्रतिसादांना/मतांना हीण लेखण्याची घाण सवय आहे तुम्हाला. तेच तुम्ही या ही लेखाच्या पहील्याच वाक्यात केलेत. हा दुसर्याच्या मोठ्या रेषेबद्दल ईर्षा निर्माण होऊन तिला कमी लेखून छोटी करण्याचा हीन प्रयत्न होता
सासंनी उडवलेला भाग अस्थानी आणि इथल्या एका सन्माननिय सदस्याच्या उत्तम लेखनावर शेरेबाजी करणारा होता. या शेरेबाजीबद्दल माफी मागणार का आता?
18 Nov 2020 - 11:12 pm | कांदा लिंबू
...
ते कसले माफी मागतात!
प्यूबिक रिंगपासून ते मेमरी स्ट्रिंग्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी गाडीला पाय लावून पळ काढला आहे.
वर सोत्री यांनी देखील एक साधा binary प्रश्न विचारला आहे, पण हे सदगृहस्थ झुडपाच्या आजूबाजूला झोडपत आहेत.
21 Nov 2020 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
19 Nov 2020 - 8:15 am | शाम भागवत
@सोत्री,
आपण संकुचित न बनता व्यापक बनण्यासाठी सगळं करायचं असतं हे मुख्य तत्व असलं पाहिजे.
हे येथे चांगले समजावून सांगितले आहे.<\a>
अर्थात तुम्हाला हे सगळं माहितीय. फक्त तुमचे निमित्त करून इतरांसाठी लिंक दिलीय.
😀
19 Nov 2020 - 10:19 am | आनन्दा
भागवत सर, खरे आहे, खरे तर याच मुद्द्यावरती मला ओशो पटायचे बंद झाले..
स्व ची जाणीव वैश्विक पातळीवर गेली की तुम्ही सिद्ध झालात.
गीतेमध्ये तेराव्या अध्यायात एक श्लोक आहे -
समं पश्यन हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम
न हिनस्ति आत्मना आत्मानं ततो याति परा गतिम
20 Nov 2020 - 11:25 am | हणमंतअण्णा शंकर...
तर्जनी आणि अंगठ्याचा गोल करून दोन्ही हात एकमेकांत गुंफायचे म्हणजे नेमके कसे? असे -?

20 Nov 2020 - 4:32 pm | संजय क्षीरसागर
१. मांडी घालून बसले असाल तर हात मांडीवर ठेवलेल्या कुशनवर टेकवा
२. खुर्चीवर बसला असाल तर कोपरं खुर्चीच्या आर्मसवर रेस्ट करा
३. दोन्ही हाताची तीनही बोटं सहज सरळ राहातील असं बघा, आणि
४. गोलक एकमेकांना स्पर्शू देऊ नका.
20 Nov 2020 - 6:08 pm | मराठी_माणूस
म्हणजे तर्जनी आणि अंगठ्यात काही मिलिमिटरचे अंतर ठेवायचे असेच ना ?
20 Nov 2020 - 6:26 pm | संजय क्षीरसागर
दोन्ही हातांच्या अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करायलाच हव्यात (पहिला फोटो पाहा), पण त्यांनी तयार झालेले गोलक एकमेकांपासून अस्पर्शित राहायला हवेत.
या मागची थीम अशी आहे की या मुद्रेतून निर्विचारता आल्यानं सजगता वाढत जाते.
गोलक एकमेकांना टेकले तर पुन्हा विचार सुरु होतील आणि इतर तीनही बोटं सरळ राहिली नाहीत तर झोप यायला लागेल.
21 Nov 2020 - 12:34 pm | मराठी_माणूस
(पहिला फोटो पाहा)
पाहीला , पण त्यात एकच हात दाखवला आहे. दोन्ही हातांचे गोलक कसे असावेत ते डोळ्यासमोर आणता येत नाहीय्ये
21 Nov 2020 - 12:42 pm | संजय क्षीरसागर
21 Nov 2020 - 1:04 pm | मराठी_माणूस
हो , आत्ता तिकडे लक्ष गेले , पण तिथे चित्र दिसत नाही, तुम्ही सांगीतल्या प्रमाणे दुसर्या डीव्हाइस वर म्हणजे मोब. वर पाहीले तिथेही चित्र दिसत नाही.
20 Nov 2020 - 6:19 pm | हणमंतअण्णा शंकर...
३. दोन्ही हाताची तीनही बोटं सहज सरळ राहातील असं बघा, आणि
हे कळालं. पण सरळ राहतील म्हणजे कशी आणि कोणाला सरळ? पोटाला सरळ समांतर, तळवा आकाशाकडे --- की --- पोटाला तिरकी आणि हाताचे तळवे एकमेकांना क्रॉस करून छेदताहेत-तळवे आकाशाकडे असे?
गोलक एकमेकांना दोन पद्धतीने स्पर्ष करू शकतात - एक म्हणजे एकमेकांना ग्रहणासारखे समांतर आणि एक म्हण्जे एकमेकांची टोके एकमेकांना स्पर्श करू शकतात. वरचे स्केच वरून पाहताना काढले आहे आणि हाताची तीनहीबोटे सरळ आहेत व एक तळवा दुसर्या तळव्यावर ठेवलेला आहे.
20 Nov 2020 - 6:30 pm | संजय क्षीरसागर
आणि मराठी माणूस यांना दिलेलं उत्तर वाचा.
20 Nov 2020 - 6:45 pm | हणमंतअण्णा शंकर...
मला फक्त एक टिंब दिसत आहे. कोणतीही इमेज दिसत नाही.
20 Nov 2020 - 6:50 pm | संजय क्षीरसागर
दुसर्या डिवाइसवरुन पोस्ट उघडून पाहा, दिसेल.
27 Nov 2020 - 8:46 am | सुचिता१
फोटो दिसत नाहीत. मोबाईल वर पण दिसत नाहीत.
20 Nov 2020 - 8:39 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला संदेश वाचला. तुम्ही पूर्ण माहिती न घेता भाष्य केलंय. तर ती नसलेली माहिती मी देतो.
पहिली गोष्ट म्हणजे शिळा पडायची आजिबात काळजी नको. ती मच्छिंद्रनाथांनी स्वत:च्या योगसामर्थ्याने तोलून धरलेली होती. त्यांनी चौरंगीस तिच्याखाली बसवलं ते अनुसंधान पक्कं करायला. ही साधना स्वत:हून करता येण्याजोगी नाही.
आपल्या आस्थेबद्दल आभार.
आ.न.,
-गा.पै.
20 Nov 2020 - 10:38 pm | संजय क्षीरसागर
याचे किती उघड अर्थ निघतात ते पाहा :
१. मच्छिंद्रनाथांनी डायरेक्ट न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतालाच धोबीपछाड मारला आहे.
२. सत्य चराचर व्यापून असून देखिल सिद्धत्त्वासाठी तुम्हाला असा अफाट मॅन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही सत्य नाही. परिणामी या जन्मी तरी तुमचा चान्स हुकला आहे आता पुढच्या जन्मांची वाट पाहात राहा !
३. कुठल्याही जन्मात असा सुपरमॅन तुम्हाला भेटला, तरी चौरंगीनाथांसारखं डेरींग करुन तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही तोपर्यंत तुम्ही या जन्म-मृत्यूच्या चक्रातच फिरत राहणार. तस्मात, आजपासूनच डेरींग वाढवायला सुरुवात करा. थोडक्यात, सध्याचं तुमचं डेरींग पाहता या जन्मी तरी तुम्ही एकदम छपरी आहात.
४. या अद्भूत चमत्काराची तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही अज्ञानी आहात. तुमचं ज्ञान चरचौघात प्रकट करायचं असेल तर अत्यंत विनयानं ही स्टोरी पुढच्यांना सांगा कारण विद्या विनयेन शोभते !
_________________________________________
गामाश्री, या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! श्रद्धेचा बागुलबुवा दाखवून सुशिक्षितांना सुद्धा किती हातोहात फसवता येतं याचं उत्तम प्रदर्शन तुम्ही यानिमित्तानं घडवून आणलंत.
या आणि अशा अनेक उदाहरणंनी, ज्यांना पूर्वापार ग्रेट मानलं गेलंय त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, त्यांच्या पश्चात आध्यात्माची कशी वाट लावून ठेवली आहे आणि जनसामान्यांत नाहक, किती पराकोटीचा इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण केलाय हे सांगणारा, या लेखमालेतला दुसरा भाग सादर करतांना मला झालेला आनंद किती रास्त होता याची कल्पना करा !
21 Nov 2020 - 11:01 am | आनन्दा
गापै,
अतींद्रिय शक्तींचा गंध देखील ज्या माणसाला नाही त्याला अध्यात्म शिकवण्याचा व्यर्थ खटाटोप करू नका.
या माणसाला अध्यात्म कशाशी खातात याची सुतराम कल्पना नाही, अतींद्रिय शक्तींचा काडीमात्र अनुभव नाही, अश्या माणसाशी बोलणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे लक्ष्यात ठेवा.
फक्त संक्षीना जाता जाता एक अनाहूत सल्ला देऊन जातो.
जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर, आत्म परीक्षण करा, तुम्हाला जे गवसलय हे नक्कीच अध्यात्मातली विशेषतः हठयोगातली एक पायरी आहे, पण जे गवसलं आहे ते अंतिम सत्य नाहीये, कारण अंतिम सत्य मिळालेल्या लोकांच्या ठिकाणी दिसणारे एकही लक्षण तुमच्या ठिकाणी दिसून येत नाही. पण तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, तेव्हा प्रयत्न सुरू ठेवा, केव्हाना केव्हा तरी तुम्हाला सत्य गवसेल अशी शुभेच्छा देतो.
यापुढे मी तुमच्या धाग्यावर प्रबोधन करायला म्हणून देखील येणार नाही.
21 Nov 2020 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, आपले अतिद्रिंय शक्तीचे अनुभव असतील तर वाचक म्हणून वाचायला आवडतील. नक्की लिहा.
-दिलीप बिरुटे
21 Nov 2020 - 2:21 pm | आनन्दा
बिरुटे सर, मी यापूर्वी देखील काही अनुभव इथे लिहिले आहेत, त्यावर मला इतके छान प्रोत्साहन मिळाले आहे की आता मी या बाबतीत विरक्त झालो आहे.
मला कोणालाही काही पटवून देण्यात रस नाही. कोणाला काही सांगावेसे वाटले तर सांगतो, पटणे न पटणे त्याच्या हातात.
आता उपरोक्त सदस्याबद्दल बघा, ते स्वतःला लॉजिक चा बादशहा म्हणवतात, पण त्यांच्या लॉजिक मधल्या चुका काढून उघडे पडले की धागा वाचनमात्र होतो..
माणसाने आपल्या लॉगिकमध्ये चूक झाली तर ती खुल्या दिलाने मान्य करावी इतकीच अपेक्षा असते. ती स्वतःला पूर्ण करता येत नाही, इतरांची अक्कल काढायला मात्र हे सर्वत्र मोकळे.. इतके प्रोत्साहन असल्यावर आम्हाला काय कमी पडणार?
तरी नशिबाने मी आडून आडून बोलत नाही, जे असेल ते थेट आणि संसदीय भाषेत मांडतो, तरीही इथल्या कोणाच्या चुका दळवल्या की दोष आमच्यावरच येतो, त्यामुळे आता इथे लिहायचे नाही असे ठरवलेले आहे.
21 Nov 2020 - 9:11 pm | nanaba
Tumache anubhav vachayala awadatil sir.
22 Nov 2020 - 11:02 am | आनन्दा
या बाबतीतले माझे अनुभव आणि मते इथे मांडलेली आहेत.
आणि मला याबाबत चर्चा करण्यात रस का नाही हे देखील मी तिथेच स्पष्ट केले आहे.
कोठेतरी अतिच गैरसमज आले तर मगच मी लिहितो
https://misalpav.com/comment/770627#comment-770627
22 Nov 2020 - 10:12 pm | nanaba
Thanks for sharing!
22 Nov 2020 - 12:37 pm | संजय क्षीरसागर
हा बघा तुमचाच अत्यंत मार्मिक प्रतिसाद ! (तो वाचून सकाळची सुरुवात प्रसन्न झाली आणि इतरांनाही मजा यावी म्हणून इथे देतो) :
मंत्र म्हटल्याने एटीएममधील पैसे कार्ड न टाकता पीन कोड न टाकता काढून दाखवता येतील का ? दोन हजार सोळा उजाडले तरी अशा गोष्टी वाचल्या की वाईट वाटते हो बाकी काही नाही
21 Nov 2020 - 12:34 pm | संजय क्षीरसागर
त्यांनी पूर्वी माझ्याबाबतीत, नाहक इतका हैदोस घातला आहे की त्यांच्यासाठी माझी दारं कायमची बंद झाली आहेत.
थोडा फार का होईना तार्किक विचार असणारे इथे जे सदस्य आहेत त्यात तुम्ही एक आहात असं (तुमच्याशी आजपर्यंत झालेल्या संवादामुळे) मी मानतो.
डोक्यावर शिळा तरंगवता येणं या भंपक मान्यतेला अतींद्रिय शक्ती की आणखी काय वाट्टेल ते म्हणा, तो फक्त मानणार्याचा त्याचूपणा आहे. शिळा तरंगवता येते तर बोईंग उडवता यायला काय हरकत आहे ? कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ? ऑइल क्रायसिसचा जागतिक प्रश्न एका झटक्यात संपेल !
अडाणी पण कावेबाज भक्तांनी स्वतःची दुकानं सुरु रहावीत म्हणून लावलेल्या या स्टोर्या आहेत इतकी साधी गोष्ट सुशिक्षितांना समजत नसेल तर अशिक्षितांचे हाल तर विचारायलाच नको.
त्यामुळे दुसर्या लेखावरच्या प्रतिसादात मी म्हटलंय की इतक्या निर्बुद्ध मानसिकतेच्या खोलवर रुजलेल्या धारणांना माझ्या लेखनाचा शून्य उपयोग आहे. त्यांनी शिळा तरंगवणार्याची वाट पहावी आणि तरंगती शिळा डोक्यावर घेऊन अनुसंधान साधावं !