मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

रोहित रामचंद्रय्या's picture
रोहित रामचंद्रय्या in जनातलं, मनातलं
11 Nov 2020 - 4:06 pm

नमस्कार मित्रानो.

डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा.

मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट.

हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो.

१. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे.

२. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला.

दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव.

धन्यवाद

चित्रपटअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2020 - 8:09 pm | टवाळ कार्टा

इथे लिहित रहा

विजुभाऊ's picture

11 Nov 2020 - 8:18 pm | विजुभाऊ

अतिनैज नटन

म्हणजे काय?

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 8:20 pm | रोहित रामचंद्रय्या

सहज - ड्रामाटिक नाही

विजुभाऊ's picture

11 Nov 2020 - 8:25 pm | विजुभाऊ

कोणत्या भाषेत?

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 8:27 pm | रोहित रामचंद्रय्या

संस्कृत पद आहे
अति - जास्त
नैज - सहज

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 8:32 pm | रोहित रामचंद्रय्या

मराठीत काय म्हणायचं?

विजुभाऊ's picture

11 Nov 2020 - 8:39 pm | विजुभाऊ

नैसर्गीक अभिनय
सहज अभिनय

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 8:43 pm | रोहित रामचंद्रय्या

धन्यवाद

संजय क्षीरसागर's picture

11 Nov 2020 - 8:51 pm | संजय क्षीरसागर

आणि मग इथे पोस्ट करा. हा मराठी शिकवणीचा वर्ग नव्हे.

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 9:22 pm | रोहित रामचंद्रय्या

सर, इकडे बेंगळूरु मध्ये मला मराठी बोलणारे मित्र नाही आहे. म्हणून इकडे लिहून, मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2020 - 10:20 pm | टवाळ कार्टा

वरच्या टाईपच्या प्रतिसादांकडे लक्ष नका देउ...हवे ते आणि हवे तितके लिहा

घरकामाला, त्यानं तुम्ही पटकन शिकाल. तुमच्या वयाची असेल तर अनेक विषय (भाषेतले) पण कवर होतील.

भाषा शिकणं तीन स्टेजेसमधे असतं : बोलणं, वाचणं आणि लिहिणं. तुम्ही नेमकी शेवटची पायरी सुरुवातीला चढायला बघतायं. ते एकदम राँगे.

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2020 - 3:44 am | टवाळ कार्टा

"त्या पेक्षा मराठी बाई ठेवा घरकामाला, त्यानं तुम्ही पटकन शिकाल. तुमच्या वयाची असेल तर अनेक विषय (भाषेतले) पण कवर होतील."

"डॉक्टरला काय कळते...मी सगळी औषधे कंपौंडरकडून घेतो"

- इति संजय

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2020 - 3:46 am | टवाळ कार्टा

=))

अशी स्मायली टाकायची राहिली...ते सासं जरा वरचा प्रतिसाद "उप्दते" करून देतील का :)

वायफळ प्रतिसाद देण्यापेक्षा आता नेमक्या मुद्यावर बोला :

१. मराठी तुम्ही कशी शिकलात ?

भाषा कायम बोलूनच शिकली जाते, वाचनानं ती समृद्घ होते आणि शेवटी लेखनातून प्रकट होते (अर्थात लेखक / कवि आणि प्रतिभा हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे )

त्यामुळे आपण ही मराठी घरात जन्मून, ती भाषा ऐकून, डायरेक्ट बोलायला सुरुवात केली.

का तुम्ही जन्मल्यावर यज्ञ, क्षत्रिय असे शब्द लिहून सुरुवात केलीत ?

२. आपल्याला इंग्रजी सफाईदार येत नाही कारण अत्यंत मूर्खासारखी आपण भाषेच्या व्याकरणापासून सुरुवात केली. त्यामुळे बोलतांना कायम चुकायची भीती. आणि धडा घोकून परिक्षेत लिहायता लागलो. बोलण्याचा सराव नाही त्यामुळे भाषेचा सहवास नाही आणि आता चारचौघात इंग्रजी बोलायचं तर लाज वाटते !

३. भाषा हा सहवास आणि बोलणं यातून शिकायचा विषय आहे हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला गुजराथी शिकायची असेल तर गुजराथी मित्र -मैत्रिणी करुन पाहा, केवळ एक / दोन महिन्यात तुम्ही गुजराथी बोलायला लागाल . मग इंटरेस्ट डिवेलप होऊन वाचायला लागाल आणि शेवटी लिहू शकाल (वाचल्यामुळे)

माझ्या प्रतिसादातला विनोदाचा भाग सोडा पण मेथड इक्झॅक्टली तीच आहे.

आता बोला.

आंबट चिंच's picture

12 Nov 2020 - 9:04 am | आंबट चिंच

१६ आणे बरोबर संक्षी साहेब आपले.
आपल्याला कितीही शिकवले तरी हिंदी वा इतर देशी भाषेच्या काय किंवा इंग्रजी वा इतर कोणतीही परदेशी भाषा काय या जिथपर्यंत बोलता येत नाहीत तिथ पर्यंत समजत नाहीत. त्या दाक्षिणात्य भाषातर लिखित स्वरुपात आंडुगुंडु सगळ्या एकच वाटतात मग काय कप्पाळ लिहणार?

तेच लहान बाळाची ती मातृभाषा असल्याने त्याला चटकन बोलता येते आणि व्याकरणा सहित तो ती बरोबर बोलतो आणि मग ६ वर्षाचा झाल्यावर पाटीवर गमभन शिकायला शाळेत जातो.
जावु द्या तुमची अनुभवाची शिदोरी इतरांना काय आकलन होणार?

फक्त तुम्ही बाई ठेवा असं सांगण्या एवजी घरगडी एव्हढंच कशाला शेजारी पाजारी अथवा मित्र अथवा नेटकरी यांच्याकडुन शिका असं म्हणायला पाहिजे होतं.

म्हणजे टक्याचा गैर समज झाला नसता.

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2020 - 9:27 am | संजय क्षीरसागर

जीवनात हास्य-विनोद नसेल तर काय मजा आहे ? लोक विनोदही सिरियसली घेऊन उच्छाद मांडतात त्याला माझा इलाज नाही !

बाई ठेवणे हा सर्वसमावेशक उद्देश आहे आणि लेखकाला मित्र मंडळी नाहीत त्यामुळे तो पर्याय नुसत्या कल्पनेत सुद्धा किती रंजक वाटतो ते पाहा !

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 10:55 am | उपयोजक

हा तुमचा भ्रम आहे.
आमच्या मराठी शिकायच्या WhatsApp समुहात एक तेलुगू मुलगा आहे.तो WhatsApp रेकॉर्डिंगमधून कधीच शिकत नाही.त्याला फक्त रोजच्या बोलण्यातील वाक्ये बनवता येतील इतपत व्याकरण शिकवलं.आता बर्‍यापैकी संवाद साधतो तो देवनागरीतून लिहून मराठीमधे.

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2020 - 1:36 pm | संजय क्षीरसागर

शिकालात का ? तुम्ही लहान होता तेंव्हा पालकांनी तुमच्या व्याकरणाच्या चुका दुरुस्त केल्या, का जे काही तोडकं, मोडकं बोलत होतात त्याचं कौतुक केलं ?

आता याच न्यायानं तुम्ही तुमच्या पोस्टचा सफाईदार इंग्रजी अनुवाद इथे देऊ शकाल का ?

नाही तर तुमच्या मराठी शिष्याला इथे लिहायला सांगा म्हणजे सगळं स्पष्ट होईल

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 6:58 pm | उपयोजक

माणसे बोलतात ती कोणतीही भाषा आपल्याला दोन प्रकारे अवगत होते.दोन्हीपैकी अमुक एक मार्ग श्रेष्ठ नि दुसरा कनिष्ठ असे काही नाही.तुमच्या सोयीनुसार मार्ग निवडावा.

मार्ग १. ती भाषा बोलणारे लोक सतत तुमच्याभोवती त्या भाषेतून बोलत असणे.आपल्याला आपली मातृभाषा याच मार्गे येते.मराठी लोकांना हिंदी बर्‍यापैकी किंवा चांगल्याप्रकारे सहज बोलता येण्यात हिंदी सिनेमे आणि टिव्हीवरच्या हिंदी मालिका/रिऍलिटी शोज यांचा सिंहाचा वाटा आहे.
पण यामार्गे भाषा येण्यासाठी बराच कालावधी(काही वर्षे) जातो. कारण बोलणारे लोक तुम्हाला दरवेळी शब्दांचे अर्थ नि त्यांची वळणं, त्यांचे उपयोग , व्याकरण उलगडून सांगत बसत नाहीत.या मार्गाने भाषा शिकणे हे शक्य तितक्या लहान वयात होणे चांगले.कारण लहान मुलांकडे रिकामा वेळ भरपूर असतो, कुतूहल भरपूर असते.प्रौढ वयातल्या लोकांचे व्याप जास्त असतात.त्यामुळे शिकलेले झपाट्याने विसरणे सहज शक्य असते.या मार्गाने शिकायला फार वेळ लागत असला तरी स्मरणावर ताण कमी येतो.कारण ती भाषा सहज बोलणारे लोक स्वत:च सतत तुमच्या कानावर ती भाषा अादळवत असतात. आपोआप भडीमार करत असतात.तुम्हाला भाषा निवांतपणे शिकणे चालत असेल आणि स्मरणशक्तीलाही फार ताण द्यायचा नसेल तर हा मार्ग वापरावा.

मार्ग २. त्या भाषेतील सर्व प्रकारची म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक अशी बाराही काळातली वाक्ये बनवता येण्यासाठी आवश्यक इतपत व्याकरण चोखपणे शिकणे.मोठ्या व्यक्तींची आकलनक्षमता जास्त असते.त्यामुळे प्रौढ व्यक्तीला हा मार्ग सोपा जातो.या मार्गाने भाषा शिकण्यास कालावधी कमी लागतो.वाक्ये बनवण्यात यश लवकर मिळत असल्याने शिकणार्‍याचा हुरुप वाढतो.तुमच्याकडे वेळ कमी असेल पण तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर हा मार्ग वापरा.

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2020 - 7:29 pm | संजय क्षीरसागर

मराठीत अशी १र वाक्य देता येतील का ? जी शिकली की कामचलाऊ मराठी बोलता येईल.

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2020 - 7:55 pm | संजय क्षीरसागर

बघतो आणि कळवतो

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2020 - 11:26 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसाद खाली दिला आहे, वाचा.

महासंग्राम's picture

13 Nov 2020 - 9:50 am | महासंग्राम

वाक्य क्रमांक १ : जेवण झालं का ? :)

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 10:48 am | उपयोजक

नेम धरुन ----->
;)))

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 10:46 am | उपयोजक

रांगण्याशी संबंधित आहे का?

कानडाऊ योगेशु's picture

12 Nov 2020 - 11:55 pm | कानडाऊ योगेशु

भाषा शिकणं तीन स्टेजेसमधे असतं : बोलणं, वाचणं आणि लिहिणं. तुम्ही नेमकी शेवटची पायरी सुरुवातीला चढायला बघतायं. ते एकदम राँगे.

हे नेहेमीच शक्य होते असे नाही.मी बेंगलोरमध्ये असताना सर्वप्रथम कानडी वाचायला शिकलो.(दुकानाच्या पाट्या वाचायचो) आणि आता बर्यापैकी वाचता येते.

ಕನ್ನಡ ಅಕ್ಷರಮಾಲೆ काय घंटा वाचणार हे ?

मी स्वतः इंग्रजी वाचून शिकलो कारण स्क्रीप्ट माहिती होती आणि अनेकांच्या बाबतीत अशीच शक्यता आहे.

रोहित रामचंद्रय्या's picture

14 Nov 2020 - 12:14 pm | रोहित रामचंद्रय्या

Marathi

संजयजी माझ्याकडे हे दोन पुस्तक आहेत

रोहित रामचंद्रय्या's picture

14 Nov 2020 - 12:23 pm | रोहित रामचंद्रय्या

संजयजी माझ्याकडे, दोन इंग्रेजी पुस्तक 'Marathi Pravesh ( An easy book to learn Marathi) Part 1 and 2 by B V Keluskar' आहेत.

धन्यवाद

रोहित रामचंद्रय्या's picture

14 Nov 2020 - 12:30 pm | रोहित रामचंद्रय्या

देवनागरी स्क्रिप्ट वापर केले आहेत.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2020 - 1:31 pm | संजय क्षीरसागर

त्या पुस्तकाचं वाचन करुन शिकलेलं कुणाशी तरी बोलायचा सराव करा. शिकलेलं बोलत गेलं तरच भाषेचा आत्मविश्वास वाढतो.

एकदा बोलता यायला लागल्यावर लिहिणं फारसं अवघड नाही. थोडंफार शुद्ध लेखन इकडे-तिकडे होईल पण वाचतांना तुम्ही लक्षपूर्वक वाचलं असेल तर लिहितांना ते शब्द डोळ्यासमोर येतात. शिवाय शुद्धलेखनामुळे उच्चारण योग्य होतं.

आता मी तुम्हाला शेवटच्या पायरीपासून सुरुवात करु नका असं का म्हणालो ते कळलं असेल, आणि इथे काही सदस्यांनी किती छपरी प्रतिसाद दिलेत आणि कुणाला नेमकं किती कळतंय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेलच.

शुभेच्छा !

रोहित रामचंद्रय्या's picture

14 Nov 2020 - 2:20 pm | रोहित रामचंद्रय्या

धन्यवाद केदारजी. 'उपयोजक'जी के वाट्साप ग्रूप जाइन हुआ हू. वहा शुद्धलेखन सीख रहा हू. I hope to find some Marathi friends here as well.

रोहित रामचंद्रय्या's picture

14 Nov 2020 - 2:22 pm | रोहित रामचंद्रय्या

*धन्यवाद संजयजी

बोलण्याच्या सरावातून ते आपोआप येईल आणि तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.

रोहित रामचंद्रय्या's picture

15 Nov 2020 - 12:02 pm | रोहित रामचंद्रय्या

👍

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2020 - 5:29 pm | टवाळ कार्टा

तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.

असा कॉन्फिडन्स हवा....बाकी वरचा प्रतिसादच बेस्ट नाहीये (कदाचित पहिलाच "नॉन-बेस्ट प्रतिसाद पडला असेल)
वरच्या वाक्यात "प्रतिसाद" ऐवजी "लेख आणि प्रतिसाद" असा बदल सुचवतो नाहीतर तुमचे लेख बेस्ट नसतात असाही अर्थ निघू शकतो (मराठी भाषा वळवावी तशी वळते हो)

त्यामुळे मुद्दा कसा पकडतात, तर्कसंगत कसं लिहावं याचं प्रॅक्टीकल ट्रेनींग लेखकाला मिळेल. शिवाय प्रतिसादात सर्वस्वी नवा अप्रोच असतो त्यामुळे मराठीत विचार करायची सवय लागेल. एकदा इंटरेस्ट निर्माण झाला की लेख/ कथा/ कविता ते आपसूक वाचतील.

संगणकनंद's picture

15 Nov 2020 - 9:41 pm | संगणकनंद

तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.

"आणि एक दिवस हाकलपट्टी करुन घ्या" हे लिहायचं राहीलं सर्वज्ञजी.

अर्धवटराव's picture

13 Nov 2020 - 12:42 am | अर्धवटराव

=)) =))

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 10:50 am | उपयोजक

आमचा मराठी लिहायला वाचायला बोलायला शिकण्याचा मोफत WhatsApp समूह आहे.तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमचा WhatsApp नं व्यनि करा.

रोहित रामचंद्रय्या's picture

12 Nov 2020 - 2:08 pm | रोहित रामचंद्रय्या

सर, माजा नंबर 8971168096 आहे. कृपया ग्रूप मध्ये Add करा.

चित्रगुप्त's picture

11 Nov 2020 - 9:02 pm | चित्रगुप्त

मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.

अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अवश्य शिका आणि लिहीत रहा. मुख्य म्हणजे तुम्ही कानडी असल्यामुळे पुणेरी, खानदेशी, विदर्भी वगैरे मराठीपेक्षा एका वेगळ्या प्रकारच्या मराठीशी वाचकांचा परिचय होईल. कर्नाटकातील मराठी मंडळे, तिथली संस्कृती, निसर्ग, कानडी लेखकांचा परिचय वगैरेवर अवश्य लिहावे.

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 9:05 pm | रोहित रामचंद्रय्या

धन्यवाद

शा वि कु's picture

11 Nov 2020 - 9:05 pm | शा वि कु

तुमचे मिशन भारी आहे. लिहीत राहा.
मराठी पुस्तके वाचा, उपयोग होईल.

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 9:10 pm | रोहित रामचंद्रय्या

मी जि ए कुलकर्णि, गो नि दा, तेंडुलकर यांचे पुस्तक वाचलो. महिन्यात एक मराठी चित्रपट नक्कीच पाहतो.

शा वि कु's picture

11 Nov 2020 - 9:17 pm | शा वि कु

पुस्तके तुम्हाला कशी वाटली हे ऐकणे फार रोचक वाटेल.
त्यावर वाटले तर नक्की लिहा.

कपिलमुनी's picture

12 Nov 2020 - 2:59 pm | कपिलमुनी

दु आय दी हाय का काय ?

रोहित रामचंद्रय्या's picture

12 Nov 2020 - 4:08 pm | रोहित रामचंद्रय्या

G A Kulkarni

जव्हेरगंज's picture

11 Nov 2020 - 9:11 pm | जव्हेरगंज

लिहीत राहा!!

सतिश गावडे's picture

11 Nov 2020 - 9:13 pm | सतिश गावडे

रोहीतभाऊ, तुम्ही कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे.
आपल्या देशात अधिकृत अशा २२ भाषा आहेत. आणि त्यांच्या बोली भाषांसहीत इतरही असंख्य भाषा आहेत. त्यांच्याबद्दल आदर, आपुलकी असणे ही मोठी गोष्ट आहे; जसे तुम्ही कन्नड भाषिक असूनही तुम्हाला मराठी लिहायला शिकायची आहे.

काही अडलं तर विचारा, लोक आत्मीयतेने सांगतील. तुम्ही काही कन्नडप्रचूर शब्द लिहीलात तर त्याचा अर्थ विचारतील; जसा विजूभाऊंनी "अतिनैज नटन" या शब्दाचा अर्थ विचारला.

मना लय भारी वाटला येक कन्नड मानुस मराटीत लिवायला शिकताय हा बगुन. लिवा तुमि. आमि वाचु*

* हे वाक्य संगमेश्वरी/बाणकोटी या बोलीभाषेतील आहे, जी भाषा रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग यातल्या ग्रामिण भागात बोलली जाते.

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 9:23 pm | रोहित रामचंद्रय्या

खूप धन्यवाद

सतिश गावडे's picture

11 Nov 2020 - 9:29 pm | सतिश गावडे

तुमच्या लेखनात (खरे तर टंकनात) सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याही लेखनात काही शुद्धलेखनाच्या आणि इतरही काही चूका असू शकतात. पण एक मराठी भाषीक व्यक्ती म्हणून मी तरी असेच लिहीन. जे माझ्याकडूनही चूकीचं लिहीलं आहे ते कदाचित मिपाकर सुधारतील.
=======================================================================================

नमस्कार मित्रानो.
>> नमस्कार मित्रांनो

डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा.
>> डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाली तर क्रुपया सुधारणा करा.

मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट.
>> मी जेव्हा ठाण्यात होतो (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेतील एक ऐतिहासिक चित्रपट पाहीला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट.

हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो.
>> या चित्रपटात मला आवडलेल्या गोष्टी खाली लिहीतो.

१. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे.
>> हा चित्रपट ऐतिहासीक असूनही अतिशय साधा आहे

२. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला.
>> या चित्रपटात मला मराठी संस्कृतीची झलक दिसली.

दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. (आमचा एक मित्र हे असं इंग्रजी वाक्य देवनागरी लिपीत लिहीतो 😂)

धन्यवाद

रोहित रामचंद्रय्या's picture

11 Nov 2020 - 9:37 pm | रोहित रामचंद्रय्या

Dear Sir,

Thanks a lot for your kind words and help with Marathi language. I had not noticed the English keyboard option. Could you please translate this into Marathi. I hope to sharpen my Marathi writing skills and write longer articles in the language.

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2020 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलं, तुम्हाला आवडलेल्या कोणत्या मराठी चित्रपटावर लिहिलंय की काय.
असो, येत राहा, लिहिते राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

11 Nov 2020 - 9:50 pm | वामन देशमुख

तुमचा मराठी लेखन करण्याचा प्रयत्न पाहून मौज आणि कौतुक वाटलं.
लिहीत रहा, प्रत्येक वेळी अधिकाधिक सुधारणा करत रहा.

गृहपाठ: पु ले शु म्हणजे काय हे ओळखा!

तुम्ही जर सिमा भागातील असाल तर अथवा कोण मित्र जर असतील तर खुप लवकर मराठी लिहायला शिकाल.

एक प्रश्न होता, मि माझ्या किती तरी कन्नड मित्रांना विचारले होते, ते सांगत नाहीत. आरीयेरू म्हणजे नक्की काय?

गामा पैलवान's picture

12 Nov 2020 - 12:38 am | गामा पैलवान

माझा अंदाज सांगतो.

येरू म्हणजे बावळट. येरागबाळा या अर्थी.

आरी म्हणजे 'हा तर'.

आरीयेरू = हा तर बावळटे !

-गा.पै.

रोहित रामचंद्रय्या's picture

12 Nov 2020 - 2:11 pm | रोहित रामचंद्रय्या

Ariyeru, i suppose, is a north Karnataka usage. It is used to refer to northerners (Aryas), most likely Marathi speakers since they are closest northern neighbours to them.

भीमराव's picture

12 Nov 2020 - 2:35 pm | भीमराव

Thanks,

Please translate your translate famous Kannada stories and poems in Marathi for us.

रोहित रामचंद्रय्या's picture

12 Nov 2020 - 4:02 pm | रोहित रामचंद्रय्या

मी नक्कीच प्रयत्न करीन.

शेखरमोघे's picture

13 Nov 2020 - 9:01 am | शेखरमोघे

जरी तुमचा प्रश्न "आरीयेरू म्हणजे नक्की काय?" असला तरी कदाचित ऐकताना नक्की शब्द न कळल्याने प्रश्न विचारताना काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.
जर तो शब्द "आवरु यारु" असा असेल तर अर्थः आवरु = ते (तो चे अनेक वचन); यारू= कोण.
म्हणजे ते (लोक) कोण (आहेत)

रोहित रामचंद्रय्या's picture

13 Nov 2020 - 11:40 am | रोहित रामचंद्रय्या

Sir,

What you said is true. But, it is 'अवरु यारु' not 'आवरु यारु'. I am from South Karnataka. I do understand the North Karnataka slang. I had read in a Kannada novel, 'Theru' (तेरु) म्हण्जे रथ, which was written by Raghavendra Patil, who hails from Belagaum region and the story is also set there. This novel has also won the Kendra Sahithya Academy Award. In that story, one of the characters goes to 'Arera Nadu', 'नाडु' म्ह्ण्जे राष्ट्र, and that Arera Nadu is Maharashtra. The author as specifically mentioned that in that region Maharashtrians are know as 'Areru', grammatically in Kannada, 'Areru' (आरेरु) is a spoken form of the word 'Ariyeru' (आरियेरु).

धन्यवाद

रोहित रामचंद्रय्या's picture

13 Nov 2020 - 11:41 am | रोहित रामचंद्रय्या

The author has specifically mentioned that in that region Maharashtrians are know as 'Areru', grammatically in Kannada, 'Areru' (आरेरु) is a spoken form of the word 'Ariyeru' (आरियेरु).

शेखरमोघे's picture

13 Nov 2020 - 9:01 am | शेखरमोघे

जरी तुमचा प्रश्न "आरीयेरू म्हणजे नक्की काय?" असला तरी कदाचित ऐकताना नक्की शब्द न कळल्याने प्रश्न विचारताना काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.
जर तो शब्द "आवरु यारु" असा असेल तर अर्थः आवरु = ते (तो चे अनेक वचन); यारू= कोण.
म्हणजे ते (लोक) कोण (आहेत)

गामा पैलवान's picture

12 Nov 2020 - 12:46 am | गामा पैलवान

रोहित रामचंद्रय्या,

तुमच्या प्रयत्नांचं कौतुक आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

हल्ली मुंबई वगैरे मोठ्या नगरांत मराठी असणे केवळ नावापुरतं राहिलं आहे. बरेचसे 'मराठी' लोकं इंग्रजी भाषेतनं शिकलेले असल्याने मराठीच्या खुब्या त्यांना अवगत नसतात. किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षा तरी नसते. अर्थात, यांसही सन्माननीय अपवाद आहेत. पण इथे मिसळपाव वर तुम्हाला प्रत्यक्ष मराठीतून शाळा शिकलेले लोकं भेटतील. त्यामुळे मराठीतून व्यक्त कसं व्हावं यावर थेट उदाहरणं उपलब्ध होतील.

सुस्वागतम. :-)

आ.न.,
-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

12 Nov 2020 - 4:46 am | श्रीरंग_जोशी

रोहित - तुमचे मिसळपाववर स्वागत आहे. एक नवी भाषा शिकताना मिसळपावसारख्या व्यासपीठावर लिहिण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या मार्गावरच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा!!

एक सूचना: मनोगत.कॉममनोगत.कॉमवर सदस्यत्व घेतल्यास त्यांचा शुद्धिचिकित्सक वापरता येतो.

मराठी_माणूस's picture

12 Nov 2020 - 10:55 am | मराठी_माणूस

अतिशय उपयुक्त सोय आहे ती

मराठी_माणूस's picture

12 Nov 2020 - 10:54 am | मराठी_माणूस

संत तुकाराम चित्रपट तुम्ही कुठे पाहीलात ? चित्रपटगृहात ?

रोहित रामचंद्रय्या's picture

12 Nov 2020 - 2:15 pm | रोहित रामचंद्रय्या

सिडि घेऊन

कांदा लिंबू's picture

12 Nov 2020 - 11:07 am | कांदा लिंबू

रोहित रामचंद्रय्या साहेब,

शुद्धलेखन शिकून घ्या आणि लिहीत जा.
मराठी लिखाणासाठी मनःपूर्वक अभिनंदन.

काही समाजकंटक सदस्य धाग्यावर येऊन दंगा घालतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

उपयोजक's picture

12 Nov 2020 - 11:54 am | उपयोजक

शुद्धलेखन ठेवा खिशात अँड्रॉईड अॅप

पूर्वी ही अॅप paid होती.आता सर्व शब्द मोफत उपलब्ध आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.mitpl.shuddhalekhan.basic

रोहित रामचंद्रय्या's picture

12 Nov 2020 - 2:16 pm | रोहित रामचंद्रय्या

धन्यवाद उपयोजक जी

मानवी मनाच्या कार्यप्रणालीचा, तरीही काय वाट्टेल ती फेकाफेक चालवली आहे

मार्ग २. त्या भाषेतील सर्व प्रकारची म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक अशी बाराही काळातली वाक्ये बनवता येण्यासाठी आवश्यक इतपत व्याकरण चोखपणे शिकणे

ही बारा काळातली वाक्य शिकूनच आपल्या इंग्रजीचा बोर्‍या वाजला आहे.

प्रेझंट, प्रेझंट परफेक्ट, प्रेझंट कंटीन्यूअस आणि प्रेझंट पर्फेक्ट कंटीन्यूअस इतक्या भानगडी शिकल्यावर वाक्य नेमकं कसं बोलायचं हेच लक्षात येत नाही.

अशा प्रकारे तुम्ही भूत आणि भविष्याकाळाचा ही लसूण केला की मग काय चिवडा होईल ते विचारायलाच नको !

त्यात तिथे भविष्यकाळातली वाक्य साफ चुकीची केली आहेत :

मी सिनेमाला जाईल ?
मी शिक्षक बनेल ?
मी आंबा खात असेल ?
मी रोज व्यायाम करत जाईल ?

आणि अशी भाषा तुम्ही दुसर्‍यांना शिकवता ? याचा अर्थ तुमचंही मराठी धड नाही. कुठे फेडणार हे पाप ?

उपयोजक's picture

13 Nov 2020 - 12:04 am | उपयोजक

१) तुमचा जगातल्या सर्वच विषयांचा इतका पुरेपुर असल्याची दर्पोक्ती अजून किती काळ चालणार आहे? कोण देतं ही सर्टीफिकेटस तुम्हाला? की स्वत:च स्वत:ला प्रमाणपत्र देता?
२) मी दिलेल्या लिंकवर भविष्यकाळातली करेल , जाईल , असेल हे चुकीचे लिहिले आहे हे मलाही माहित आहे.ते संकेतस्थळ माझे नाही. त्यावरचा मजकूर मी लिहिलेला नाही. मी तुम्हाला फक्त बारा काळ माहित व्हावेत या उद्देशाने लिंक दिली होती.कारण तुम्हाला स्वत:लाच व्याकरणात १२ काळ आहेत हे माहित नाहीये.हा तुमचा भाषाशास्त्राचा अभ्यास(???) तुम्ही कुठं फेडणार हे अज्ञान??
३) आणि धागालेखकाला मराठी मोलकरीण ठेवायला सांगताय.साधारणपणे एखाद्याला भाषा शिकण्याबद्दल सल्ला देताना तो प्रमाणभाषा शिकता येईल असा द्यावा.कुठची मोलकरीण इतकी शिकलेली असते हो? जी शुद्ध , पुणेरी , प्रमाण मराठी बोलते? धागालेखकाला व्हय न्हाईवाली अशुद्ध मराठी शिकवायला बघताय का काय? कुठं फेडणार हे पाप?

.१.

मी तुम्हाला फक्त बारा काळ माहित व्हावेत या उद्देशाने लिंक दिली होती.कारण तुम्हाला स्वत:लाच व्याकरणात १२ काळ आहेत हे माहित नाहीये.

हे तुम्हाला कुणी सांगितलं ? मी सुरुवातीच्याच प्रतिसादात म्हटलंय की आधी व्याकरण शिकल्यामुळे आपल्या इंग्रजीचा बोर्‍या वाजला आहे. मी १२ काळ ही काय भानगडे ? असा प्रश्न केला कारण तुमच्याकडे काही वेगळा पर्याय असावा असा गैरसमज समज झाला. आणि तो तुम्ही लगेचच दूर केलात.

बाय द वे, स्वतःच्या लेखनाचा आवाका आणि कंटेंट बघता, इतकं घनघोर अज्ञान प्रकट करण्यापूर्वी, माझ्या इथे प्रकाशित झालेल्या लेखांची नुसती अनुक्रमाणिका बघितली तरी तुम्हाला फेफरं येईल :

जनातलं, मनातलं रोमान्स विथ मुझिक 68
जे न देखे रवी... चारीमुंड्या चित 18
जनातलं, मनातलं पुलंचा एक सुरेख लेख ! 57
जनातलं, मनातलं पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ ! 167
जनातलं, मनातलं ग्राहकमंच : सामान्यांचा हक्क ! 54
जनातलं, मनातलं देवाचं नांव कुणी ठेवलं ? 379
जनातलं, मनातलं बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट ! 83
जनातलं, मनातलं नक्की प्रॉब्लम काये ? 222
स्पर्धा [शशक' २०२०] - एफ यू : लॉकडाऊन ! 20
जनातलं, मनातलं अनफेअर चेस ! 23
जनातलं, मनातलं लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी ! 51
जनातलं, मनातलं हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग ! 151
जनातलं, मनातलं कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३| 1
जनातलं, मनातलं कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |२| 7
जनातलं, मनातलं कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही | 0
जनातलं, मनातलं मोह ! 11
जनातलं, मनातलं मनाच्या बाहेर ! 7
तंत्रजगत वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये 167
जनातलं, मनातलं अँबी वॅली - बियाँड दि हेवन ! 124
जनातलं, मनातलं मी (चुकून) संपादक झालो तर ! 96
जनातलं, मनातलं द क्लिफ ! 22
जनातलं, मनातलं शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ कांचनमृग 3
जनातलं, मनातलं शब्दप्रधान गायकी : यशवंत देव 24
जनातलं, मनातलं नसतेस घरी तू जेव्हा 24
जनातलं, मनातलं हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया 3
जनातलं, मनातलं मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो ! 103
जनातलं, मनातलं आताशा.. असे हे.. मला काय होते 20
जे न देखे रवी... नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने ! 13
जनातलं, मनातलं मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए 4
जनातलं, मनातलं ती सध्या काय करते ? 27
जनातलं, मनातलं नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन ! 21
जनातलं, मनातलं नग्नता आणि मुक्ती 16
जनातलं, मनातलं तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई 21
जनातलं, मनातलं जग घूमेया थारे जैसा ना कोई | 16
जनातलं, मनातलं सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ 252
जनातलं, मनातलं बार-बे-क्यू नेशन, द हेवन! 255
जनातलं, मनातलं बोगदा 91
जनातलं, मनातलं आज जानेकी ज़िद ना करो (दोन) 2
जनातलं, मनातलं आज जाने की ज़िद न करो (एक) 10
जनातलं, मनातलं ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता 67
जनातलं, मनातलं भय इथले संपत नाही (दोन) 33
जनातलं, मनातलं भय इथले संपत नाही (एक) 44
जनातलं, मनातलं कुणी जाल का सांगाल का 76
जे न देखे रवी... गाढव ऐकेना, गाढव समजेना 87
जनातलं, मनातलं बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी 9
जनातलं, मनातलं दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही 21
जनातलं, मनातलं बायकांचे संसारींग-माझा अनुभव 22
जनातलं, मनातलं मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना 30
जनातलं, मनातलं अरविंद बरोबर दीड तास! 214
जनातलं, मनातलं तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड 21
जनातलं, मनातलं रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार) 153
जनातलं, मनातलं रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन) 225
जनातलं, मनातलं रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन) 80
जनातलं, मनातलं `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक) 211
जनातलं, मनातलं महाराज 107
जनातलं, मनातलं देहाला चाळुन घेता 24
जनातलं, मनातलं निरक्षर 147
जनातलं, मनातलं बुद्ध 70
जनातलं, मनातलं आवडलेली गाणी : ये मौसम रंगीन समा 14
जनातलं, मनातलं कैसे दिन बीते, कैसे बीती रतिया 8
जनातलं, मनातलं एकहार्ट 84
जनातलं, मनातलं गोल्डफिश आणि गेस्टाल्ट 95
जनातलं, मनातलं द मरुन रोब 99
जनातलं, मनातलं परिक्रमा! 46
जनातलं, मनातलं काल 127
जनातलं, मनातलं पैसा 107
जनातलं, मनातलं देह 28
जनातलं, मनातलं नियती ? नाय नाय टेंपोवरती! 2
जनातलं, मनातलं मास्तर -३ 7
जे न देखे रवी... एका क्षणावरी या 37
जनातलं, मनातलं मास्तर - २ 6
जनातलं, मनातलं मास्तर - १ 9
जे न देखे रवी... निःशब्द तळ्याच्या काठी 13
जनातलं, मनातलं मन : एक नितांत रमणीय प्रवास 2
जनातलं, मनातलं मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास 67
जनातलं, मनातलं मला समजलेले चिऊ आणि काऊ 4
जनातलं, मनातलं ग्रेस

बाकी इतका व्यासंग करण्याची तर बातच सोडा कारण तुमच्या जीवनात काही छंद निर्माण होण्याची शक्यता तुम्ही स्वतःच्या अक्कल हुशारीनं बाद करुन टाकली आहे नसत्या उपद्व्यापांतून सुटका

३.

कुठची मोलकरीण इतकी शिकलेली असते हो? जी शुद्ध , पुणेरी , प्रमाण मराठी बोलते?

तुम्ही डोळे मिटून वाचायची कला अवगत केली आहे का ?

हा माझा यापूर्वीचा प्रतिसाद नेमका तुमच्या प्रतिसादाच्या वरच आहे .जीवनात हास्य-विनोद नसेल तर काय मजा आहे ? लोक विनोदही सिरियसली घेऊन उच्छाद मांडतात त्याला माझा इलाज नाही !

उपयोजक's picture

13 Nov 2020 - 7:05 pm | उपयोजक

हायजॅक केलेले धागे या यादीत अॅड करायचे राहिलेत याची आठवण करुन देऊन खाली बसतो. ;)

हायजॅक केलेले धागे ?

वाचन वाढवा. जिथे धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी असेल तिथे ते प्रतिसादच धाग्याचं वाचन मूल्य वाढवतात.

काही निर्बुद्ध त्याला धागा हायजॅक केला असं म्हणतात पण केवळ प्रतिसादांमुळे असे फालतू धागे वाचकांना अनपेक्षितपणे काही नवं देऊन जातात.

म्हणून चिडलात.
रच्याकने अध्यात्मात रागावर नियंत्रण कसे ठेवावे? हा भाग येत नाही का? कशात येतो? ;)

संजय क्षीरसागर's picture

13 Nov 2020 - 9:40 pm | संजय क्षीरसागर

नाही म्हणजे कमाल आहे !

कसला आलाय घाव ? इथे तुमच्या आकलनाचे बारा वाजले तर आता मुद्दा सोडून पुन्हा सुरुवात केलीत.

परत असं साहस करु नका इतपत समज आली तरी पुरे.

उपयोजक's picture

13 Nov 2020 - 10:28 pm | उपयोजक

😂

बाकी इतका व्यासंग करण्याची तर बातच सोडा कारण तुमच्या जीवनात काही छंद निर्माण होण्याची शक्यता तुम्ही स्वतःच्या अक्कल हुशारीनं बाद करुन टाकली आहे.

"महाजनो येन गतः सः पन्थाः"
बहुतांश लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जाण्यातच शहाणपणा आहे.
छंदबिंद सांभाळत बसण्यापेक्षा ट्रेंडींग असेल ते करावं.
भरपूर पैसे कमवणं,लग्झरियस फ्लॅट घेणं, महागडी चारचाकी घेणं, किमान दीड लाखाचा लॅपटॉप वापरणं,भल्या मोठ्या टिव्हीवर वेबसेरिज बघणं याच मार्गाने बहुतांश लोक जाण्याचा प्रयत्न करतात.हेच खरं जीवन आहे हेच खरं जगणं आहे.हे मिळवताना त्यात यश कितपत येईल ही गोष्ट वेगळी पण त्यादृदष्टीने प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्याचीच पहिली पायरी म्हणजे बिनउपयोगाचे छंदबिंद सोडून देणे.

शा वि कु's picture

14 Nov 2020 - 8:46 am | शा वि कु

ऑ ?
दिवाळीच्या दिवशी असं बोलता !
I am very offended.

शा वि कु's picture

14 Nov 2020 - 8:46 am | शा वि कु

=))

मिपा व्यवस्थापनाने आता फतवा काढावा की मिपावर फक्त सर्वच विषयातील सर्वच कळणारे आयडीच* फक्त लिहीतील. इतरांनी काही लिहील्यास त्यांच्यावर तुटून पडण्याचे अधिकार सर्वच विषयातील सर्वच कळणार्‍या आयडींना दिले आहेत.

बुरा ना मानो दिवाली है ;)

*सुज्ञांस हे सांगण्याची आवश्यकता नाही की जगात सर्वच विषयातील सर्वच कळणारे कुणीच नाही. मात्र स्वतःबद्दल असा भ्रम असणारे लोक मात्र अस्तित्वात आहेत.

उपयोजक's picture

13 Nov 2020 - 11:08 pm | उपयोजक

मिपा व्यवस्थापनाने आता फतवा काढावा की मिपावर फक्त सर्वच विषयातील सर्वच कळणारे आयडीच* फक्त लिहीतील. इतरांनी काही लिहील्यास त्यांच्यावर तुटून पडण्याचे अधिकार सर्वच विषयातील सर्वच कळणार्‍या आयडींना दिले आहेत.

😂

कपिलमुनी's picture

26 Nov 2020 - 8:10 pm | कपिलमुनी

पण बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात !

तुमचा मराठीत लेख लिहिण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. लिहीते रहा. मी मिपावर ७ वर्षापासून वाचनमात्र आहे, पण अजुन लेख लिहिलेला नाही.
तुम्ही सरळ लेख लिहिण्यापेक्षा, लेख वाचा, लेखांवर प्रतिक्रिया लिहा. एक वाक्याची प्रतिक्रिया द्या, दोन वाक्याची, लेखा पेक्षा मोठी प्रतिक्रिया(ह. घ्या)....मग लेख लिहा.

लेख थोडा मोठा लिहा, प्रकाशित करण्यापूर्वी वाचून बघा, जमल्यास कोणाला तरी वाचायला द्या. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ( किंवा जुने मिपा आणि मिपाकर आता राहिले नाही) तुम्ही सुटलात, दुसरा कोणी असता तर मिपाकरांनी बाजार उठवला असता ( कृ. पहावे: मोकलया दाही दिशा, आणि इतर लेख) आणि धागा कर्त्याने इथे किंवा इतर कुठेही लिहिण्याचा नाद सोडला असता.

उपयोजक's picture

14 Nov 2020 - 2:23 pm | उपयोजक

जुने मिपा आणि मिपाकर आता राहिले नाही) तुम्ही सुटलात, दुसरा कोणी असता तर मिपाकरांनी बाजार उठवला असता

हा जुने मिपाकर नसण्याचा फायदा म्हणावा की काय? :)