कोवळी आंब्याची पानं विणली तोरणात,
पिवळी, केशरी झेंडूची फुलं ओवली दो-यात!
तयार केले भरगच्च तोरण, बांधले घराच्या दारात ,
आज दसरा ! विजयाची जाणीव जागते मनामनात !!
आपट्याचं पानं सुवर्ण म्हणून वाटून परंपरा जपतो,
अन् मैत्रीचा भाव एकमेकांच्या मनांत जागवतो !!
सर्वांना आठवणीने शुभेच्छा देऊन आनंदीत करतो,
छोट्या छोट्या अनेक गोष्टींनी नाती बांधून ठेवतो !!
दसरा आहे सत्याचा असत्यावर विजय
श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय
वाईटावर होणारा चांगल्याचा विजय
दुष्ट प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा विजय !
तसाच ,
आपणही मिळवूया या कोरोनारूपी राक्षसावर विजय !
घराबाहेर पडूया, पण मास्क घालूनच
सण साजरे करू, पण अंतर राखूनच
अंतर असलं तरी, मना मनांतली दरी मात्र बुजवून टाकू,
यंदा आनंदाने, वेगळीच अशी विजयादशमी साजरी करू !!
*सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!*
- सौ वृंदा मोघे
25/10/2020
प्रतिक्रिया
25 Oct 2020 - 11:54 pm | पॉइंट ब्लँक
छान, शेवटचं कडवं अत्यंत मार्मिक आणि सद्य परिस्थितीला अनुरुप आहे .
29 Oct 2020 - 10:18 am | पाषाणभेद
29 Oct 2020 - 10:18 am | पाषाणभेद
29 Oct 2020 - 10:20 am | पाषाणभेद
परक्यांनाही आपलसं करतील
असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी
गोड माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा
ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व
आहातच सदैव असेच राहा
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसर्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
-------------------------------------
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक स्वामी मय शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो… हिच
ईश्वर चरणी प्रार्थना.
शुभ सकाळ...
30 Oct 2020 - 1:35 pm | Jayagandha Bhat...
मस्त..
या काळाला अनुरूप..!!