स्मरणरंजन

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
23 Oct 2020 - 10:21 am

    
                    

स्मरण रंजन.
रेडिओ (३)
     'पगला कहीं का !'
लंका.
लंकेची ओळख अगदी लहानपणापासून.
रामाच्या गोष्टीतून.
रावणाची लंका.
त्याने सीतेला पळवल्यावर जिथे ठेवले ती लंका.
हनुमंताने जाळली ती लंका.
रामाने समुद्रावर सेतू बांधला ती लंका.
रावणवधानंतर बिभिषणाकडे सोपविली ती लंका. 
  पूढे पं.भीमसेनजींच्या गाण्यात तिचे भारी कौतुक ऐकले.
रम्य ही स्वर्गाहूनि लंका..
गदिमांच्या प्रतिभेला बहर आलेला..
'या लंकेचे दासीपद तरी 'कमला'(लक्ष्मी ) घेईल का?..'

कालांतराने भुगोलातून लंका हा आपला शेजारी देश असल्याचे ज्ञान.
नकाशात भारताच्या पायथ्याशी दिसणारा
नारळाचे आकाराचा छोटा देश.

तेव्हा
तिथल्या पंतप्रधान सिरीमाओ बंदर नायके.
राम रावण युद्धानंतर रामाचे सैन्यातील काही
वानर( बंदर)व त्यांचे नायक,तिकडे स्थायिक झाले असावेत.  त्यांचेच हे  'बंदर नायके' वंशज तर नसतील?
एक शंका.

आकाशवाणी पूणे व मुंबई ब केंद्र,
विविधभारती,ऑल इंडिया रेडिओ की उर्दू प्रसारणसेवा इ.
ऐकता, ऐकता ,श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही
लंकेची नभोवाणी सेवा सर्वांत प्रिय झाली.

जिगरी दोस्त.
पुराने फिल्मों के गीत, हापी के (आप ही के )गीत,
जाने पहचाने गीत,
सायकल ब्रॅड संगीत सितारे(?)
अनोखे बोल,
हास्य संगीत ,हे जास्त आवडते,
(एक चतुर नार ऐकायला मिळते म्हणून)
दो रंग दो पैलू एक गीत,सरगम आणि काय काय...
आणि अमीन सयानीजींची बिनाका गीतमाला.
(काही वात्रटमुले त्याला
बीन(ना)का (ची)गीतमाला म्हणायचे.)
कान तृप्त करणारी.
बुधवारच्या  रात्रीचे आठ वाजण्याची
आतुरतेनं वाट पाहायला लावणारी.
सरताज.

अनेक वर्षानंतर मी मुंबई ला जॉईंट चॅरिटी कमिशनर असताना,.मखुद्द अमीन सयानीजींचे मला
भेटायला येणे आणि मी त्यांच्या थोडा उपयोगी पडणे ,
हा विलक्षण योग माझ्या जीवनात .

बहुतेक कार्यक्रम श्रोता भाई बहनोंको शामिल करनेवाले.
ही भाई बहेन मंडळी व सगळे श्रोता संघ,
बहुधा मध्य भारताचे पट्टयातलीच.
मध्यप्रदेश ,राजस्थान , महाराष्ट्रातील विदर्भ
( गोंदिया ते बुलढाणा).
मराठवाड्यातील फार तर बीड ,जालना.
पश्चिम महाराष्ट्रातील गाव चुकूनही नसे.
आमच्या 'बीडा'च्या काही श्रोता भाईयोंकी नावे
निवेदकाने उच्चारली  की कोण कौतुक.
रस्त्याने  ही मंडळी (बहुतेक  टपोरीच)  दिसली की
आम्ही शाळकरी पोरं माना वळवून पाहात.
तेही उगीच कॉलर टाइट करून जात. असो.
एकाकार्यक्रमात.
(नाव आठवत नाही)
श्रोता भाई बहेन सिनेमातील गाण्यास जोडून असलेला
प्रसंग लिहून पाठवायचे .
तो वाचून   गाणे ऐकवले जायचे
निवेदनाचा शेवट साधारण पणे..
'फिर उसके होठों परा आया ये गीत .'/
'और वो गुणगुणा उठा/उठी ये गीत."

गाणी, रेडिओ ,आणि  सिनेमा चे एवढे वेड
की घरातले म्हणायचे..
'पगला कहीं का! '
                         ( क्रमशः )
                  नीलकंठ देशमुख   .
                   ८७९३८३८०८०.
        nilkanthvd1@gmail.com

    

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

नूतन's picture

23 Oct 2020 - 12:59 pm | नूतन

जुन्या आणवणी जागल्या.
पुरानी फिल्मोंके गीत मध्ये दर महिन्याच्या एक तारखेला लागणारं...खुश है जमाना आज पहिली तारीख है.. हे न चुकता ऐकायचं.
आणि अखेरचं गीत बहुदा कुंदनलाल सैगलचं असायचं.

नीलकंठ देशमुख's picture

24 Oct 2020 - 9:38 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

मराठी_माणूस's picture

23 Oct 2020 - 2:56 pm | मराठी_माणूस

एक आवडता कार्यक्रम. साज और आवाज.
एखाद्या वाद्यावर वाजवलेले गाणे आणि मग ते गाणे असे स्वरुप असे. खुप चांगल्या वादकांची आणि वाद्यांची ओळख त्यामुळे झाली. मला वाटते हा कार्यक्रम विविध भारती वर असे.

नीलकंठ देशमुख's picture

24 Oct 2020 - 9:38 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद