बंगळुरूला व्हाईटफिल्डमध्ये देवीचं एक मंदिर आहे -पिलेकाम्मा देवी मंदिर . दरवर्षी नवरात्री मध्ये ह्या मंदिरात पिलेकाम्मा (दुर्गा ) आणि चौडेश्वरी ह्या दोन्ही देवींची नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते. नऊ दिवस ह्या नऊ स्वरुपाची आरास इथे प्रकाशित करण्याची इच्छा आहे. ( हाच धागा रोज एडिट करता येईल का? कि नवीन बनवावा लागेल रोज?) कोरोनाच्या घोळामुळे प्रत्यक्ष सोहळा आणि उत्साह तसा सीमितच आहे , पण ऑनलाईन साजरा करायला तर कुठली मर्यादा/प्रतिबंध नाही :)
मंदिरामधील पिलेकाम्मा म्हणजे दुर्गेची मूर्ती जवळपास पाच फूट उंचीची आहे. तर चौडेश्वरीची मूर्ती एक फूट उंचीची आहे. पिलेकाम्माची मूर्ती मोठी आणि गाभारा तुलनेने छोटा असल्यामुळे आरसाचा जास्त भर रंगसंगती आणि अलंकार ह्यावर राहतो. आणि चौडेश्वरी मूर्तीची थोडी जास्त आरास करता येते.
विजयादशमी
गेले नऊ दिवस विविध रुपे साकारुन आज दोन्ही देवी स्वरुपात परतल्या. दसर्यानिमित्त ह्या परीसरातील इतर मंदिरातील उत्सवमूर्ती देवीच्या स्वागतासाठी पिलेकाम्माच्या मंदिर परिसरात आणल्या गेल्या होत्या आणि एक छोटिसी पूजा सुद्धा पार पडली( त्या विषयी परत कधी तरी लिहिन. )
देवींचे स्वस्वरूप आणि ह्या मंदिरातील इतर मूर्ती आपण आज पाहू.
चौडेश्वरी देवी
ज्या हातांनी देवीची हि सुंदर रुपे साकारली त्यांना आदरांजली वाहली नाही तर ह्या धाग्यासोबात न्याय होनार नाही. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जपत, नऊ दिवस कल्पकतेची उदाहरणे ज्यांनी दाखवले ते मंदिराचे पुजारी.
हा लेख रोज संपादित करण्याची सोय केल्या बद्दल संपादक मंडाळाचे विशेष आभार. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा _/\_
नवमी
आज देवीच्या फोटोकडे वळण्याआधी इकडच्या छान प्रथेबद्द्ल थोडसं-लिंबाचे दिवे. लिंबु अर्धा कापुन त्यातला रस काढुन राहिलेली साल उलटी केली की त्याचा वाटिसाखा आकार बनतो. मग त्यात तुपाची वात घालुन पणती बनते. असे छोटे छोटे दिवे बनवून ते एका थाळीमध्ये ठेवून मग स्त्रिया देवीला ओवाळतात.नंतर ते मंदिराच्या परिसरात ठेवले जातात.
आता आजच्या आरासाबद्द्ल. आपण परमेश्वराचं दर्शन घेतो ते सहसा अर्धच.
जसं की देवीचं हे स्वरुप
किंवा देवाचं हे स्वरूप.
पण परमेश्वराचं पूर्णे स्वरुप बनतं पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाने आणि तेच स्वरुप पिलेकाम्मने धारण केले होते- अर्धनारीश्वर. स्री-पुरूष एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसुन ते एकमेकांना पुर्णेता देणारे नैसार्गाचे घटक आहेत. मिलनातही ते स्वत:चं अस्तित्व टिकवुन ठेवु शकतात - हा संदेश देणारं हे स्वरुप.
अर्धनारीश्वरसाठी गाभार्याला आज हिमालयाचं स्वरुप देण्यात आलं होत.
चौडेश्वरी देवींची आज दश्भुजा दुर्गा-परमेश्वरी स्वरुपात आरास झाली.
अष्टमी
अष्टमी निमित्त चौडेश्वरीने महिशासूरमर्दिनी रुप साकरले तर ते पिलेकम्माने महाकाली रुप धारण केले.
चौडेश्वरी आज सिंहारुढ आहे आणि तिच्या हातामध्ये त्रिशुल आहे. खाली एक कोहळा महिषासुर स्वरुपात ठेवला आहे.
महाकाली स्वरुपात असलेल्या पिलेकाम्माच्या गळ्यात कवट्यांची माळ आहे ( म्हणुन ह्या स्वरुपाला बहुदा कपालिनी सुद्धा म्हणतात. ) तिच्या एका हातामध्ये रक्तबीजाचं कापलेलं धड आहे. तसचं तिच्या हातामध्ये त्रिशुल सुद्धा आहे.
सप्तमी
सप्तमीनिमित्त पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी दोघींची सरस्वती स्वरुपात पूजा झाली.
पिलेकाम्माचा पोषाख आज भस्मापासुन बनला होता आणि तिने हातात वीणा धारण केली आहे.
चौडेश्वरी आज शुभ्रवस्त्र, श्वेत पद्मावर , हातामध्ये वीणा अशा स्वरुपात आहे. शेजारी वह्या-पुस्तकांची आरास करण्यात आली आहे. हंसाची प्रतिमासुद्धा त्यात आहे.
कमळाच्या पाकळीवर विसावलेले देवीचे चरण
हस्तमुद्रांचे काहि फोटो
षष्ठी
आज पिलेकाम्माची स्वरुपात तर चौडेश्वरीची हुआ करगा((द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली.
पिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होता
हुआ करगा म्हणजे फुलांचा मुकट परिधान केलेली द्रौपदी असं आज चौडेश्वरी देवीचं साकारण्यात आलं होत.
पंचमी
आज पंचमीनिम्मित्त पिलेकाम्माची पंचवर्णा स्वरुपात तर चौडेश्वरीची हसी करगा(द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली.
पिलेकाम्माचा पोषाखामध्ये आज पाच रंगछटांचा समावेश होता
दक्षिण भारतामध्ये द्रौपदी ही एक प्रमुख देवी आहे. बंगलोरचा तिच्या नावाने केला जाणारे करगा उत्सव खुप प्रसिद्ध आहे. आज चौडेश्वरीची हसी करगा स्वरुपात पूजा झाली. (हसी हा शब्द कोवळी, नाजुक, कच्ची, हिरवी अशा अर्थाने वापरला जातो तर करगा म्हणजे मुकुट. कदाचित कळ्यांच्या मुकुट असा अर्थ असेल . जो शंकु सारख्या आकाराचा तिच्या हातामध्ये दिसतो तो, ऊद्या तोच मुकुट तिच्या डोक्यावार ठेवला जाईल) . तिच्या एक हातामध्ये खंजीर सुद्धा आहे आहे.
चतुर्थि
चौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघीही आज अन्नपुर्णा स्वरूपात होत्या. पंरंपरेनुसार भिक्षुक स्वरुपात आलेल्या महादेवाला अन्नदान देनारी देवी असे तिचे स्वरुप दाखवन्यात येते. अन्नपुर्णा ही सर्व जिवांच पोषण करनारी देवता आहे.
चौडेश्वरीच्याआरासाची सुरुवात आज मंदिराच्या बाहेरुनच झाली. बाहेर छोटिशी भातशेती तयार केली होती आणि गाभार्याबाहेर भातकुटांची रास सुद्धा रचली होती .
देवीने आज लाल काठाचा पोपटी शालु परिधान केला आहे. तिच्या उजव्या हातमध्ये पळी आहे, डाव्या काखेमध्ये अक्षय पात्र आहे ज्यातुन सतत तांदळाचा प्रवाह वाहतो आहे. आणि डाव्या हातामध्ये अन्न आहे जे ती शेजारी स्थापित महादेवाला दान देनार आहे
पिलेकाम्माचा संपुर्ण पोषाख आज लाल आणि पिवळ्या गुलाबांच्या फुलांनी बनवण्यात आला आहे.
तृतिया
चौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघींनी आज सम्रुद्धि आणि ऐश्वर्याची देवता असनार्या महालक्ष्मीचं स्वरुप धारण केलं.
पिलेक्कामाचा गाभारा नोटांनी सजवला होता, तर तिचा पोषाख चमकीने बनवला होता.
चौडेश्वरीने आज निळा शालु परिधान केली असुन ती कमळाच्या फुलवार स्थानापन्न आहे . तिने अभय मुद्रा धारण केली असुन हातामधुन नाण्यांचा प्रवाह वाहतो आहे असा आभास निर्माण केला गेला आहे
द्वितिया:
चौडेश्वरीची राजराजेश्वरी स्वरुपात तर पिलेकाम्माची ब्रह्मचारीणी स्वरुपात पूजा झाली. राजराजेश्वरी हि संपुर्ण विश्वावर सत्ता चालवणारी देवी आहे तर ब्रह्मचारीणी सर्व ऐश्वर्याचा त्याग करुन महादेवाला वर स्वरुपात प्राप्त करुन घेण्यासाठी खडतर तप करणारे सती स्वरुप आहे. दोन्हि पार्वतीचीच रुप. पण हा विरोधाभास आयुष्याचा अविभाज्य अंग असनार्या सम्रुद्धी आणि कष्ट किंवा अडचणी ह्या सत्याची जाणीव करुन देतो. कठिण आणि हलाकिच्या परिस्थिती मध्ये प्रामाणिकपणे हिंमत न हारता कष्ट करत रहाणे तर सम्रुद्धीच्या काळात विनम्र, न्यायप्रिय आणि क्षमाशील रहाणे हे शक्तीचा परिचय देणारे गुण्धर्म आहेत, कदाचित हेच देवीची ही दोन्हि रुपं आपल्याला सांगत असतील.
ब्र्हमचारीणि स्वरुप खाऊच्या पानांच्या पोषाखाने साकरला गेलं आहे.
राजराजेश्वरी स्वरुप , लालसर रंगाचा शालु आणि दागिन्यांनी साकारण्यात आले आहे. डोक्यवार महादेवाप्रमाणे चंद्रकोर तर मागिल दोन हातांमध्ये विष्णुप्रमाणे शंख व चक्र आहे. त्रिदवांच्या सर्व शक्ती तिच्याकडे आहेत हे दाखवून देतात.
प्रतिपदा :
काल दोन्ही देवींची कामाक्षी स्वरूपात पूजा झाली. महादेवाची तपश्चर्या खंडित केल्यामुळे , क्रोधीत महादेव कामदेवाला भस्म करून टाकतात. पण त्यानंतर पर्वतीवर मोहित होऊन ते वैराग्य त्यागतात. देवीचे ते सवरूप म्हणजे कामाक्षी. हि इच्छाशक्ती, सृजन आणि प्रीती ह्याची देवी मानली जाते. आणि कामदेवाची सारी चिन्हे देवीकडे आहेत. जसेकी त्याचे वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण . तिच्याबद्दल अजून एक गोष्ट वाचनात आली- भस्म झालेल्या कामदेवाच्या राखेपासून भांड नावाचा एक राक्षस बनतो. त्याच्या मृत्यूसाठी इंद्रदेव यज्ञ करतात आणि त्या यज्ञातून कामाक्षी प्रकट होते. हि घटना कांची इथे झाली असे मानली जाते. कांचिच्या कामाक्षी मंदिराशी जोडलेल्या अशा अनेक गोष्टी प्रचलित आहेत .
आधी पाहूया पिलेकम्माची आरास. देविचा पोशाख हळद आणि कुंकू ह्या दोन्हीच्या लेपाने बनवला आहे . अलंकारामध्ये पक्ष्याच्या आकाराचे दागिने आहेत
तर चौडेश्वरीला हिरवा शालू नेसवाला आहे , हातावर तसेच खांदयावर पोपट ठेवले आहेत.
सर्वाना नवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
प्रतिक्रिया
18 Oct 2020 - 4:22 pm | प्रसाद_१९८२
देवीचे फोटो अगदी अप्रतिम आहेत.
जय दुर्गा ! __/|\__
--
हाच धागा एडीट करण्याऐवजी नऊ दिवसाचे, नऊ धागे केलेत तर छान होईल.
18 Oct 2020 - 6:24 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद. नऊ धागे खुप जास्त होतील बहुतेक. परत एखद्याला पुन्हा वाचयचा किंवा शेअर करयचा असेल तर त्यानाहि त्रास होइल. बघु कसं जमतय ते :)
18 Oct 2020 - 4:55 pm | नूतन
फुलांनी सजवलेली देवी फारंच सुंदर!
18 Oct 2020 - 6:28 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद , पुजारी मेकअप आर्टिस्ट सुद्धा असतात का असा प्रश्न बर्याच वेळा मनात येतो. सगळं कसं एकदम क्रियेटिव्ह आणि परफेक्ट असतं.
18 Oct 2020 - 6:05 pm | चौथा कोनाडा
व्वा, खुप सुंदर ! देवीचे फोटो अप्रतिम !
जय पिलेकम्मा, जय चौडेश्वरीची माता !
अशी सजावट म्हणजे फळे, फुले, पाने, भाज्या रोपटी, हळद, कुंकू इ. विविध नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट म्हणजे बंगळुरूची खासीयत आहे.
ही सुंदरता खुप भारी वाटते बघायला !
मस्त हो पॉइंट ब्लँकजी !
रोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील !
|| नवरात्र हार्दिक शुभेच्छा ||
18 Oct 2020 - 6:30 pm | पॉइंट ब्लँक
हो नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट बघायला खुप छान वाटते.
>>रोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील !
धागा एडिट करयचा पर्याय कुठे दिसला नाहि. कसा करतात ते सांगु शकाल का?
18 Oct 2020 - 6:23 pm | अनिंद्य
दक्षिणेत फार कमी देवळात देवमूर्तीचे फोटो काढण्याची परवानगी असते.
तुम्ही फार सुंदर फोटो काढले आहेत.
18 Oct 2020 - 6:34 pm | पॉइंट ब्लँक
एकदोन अपवाद वगळ्ता मला असा अनुभव नाहि आला. कधी कधी मंदिर ASI च्या ताब्यात असेल तर ते उगाच अड्काठि करतात. पण इतरत्र कुणि इतका त्रास नाहि दिला :)
18 Oct 2020 - 6:24 pm | कंजूस
बऱ्याच ठिकाणी काढू देत नाहीत.
खरं म्हणजे देऊळ जुने असेल तर आतली शिल्पकला टिपणे हा हेतू असतो पण क्याम्राच नेऊ देत नाहीत.
बाकी फोटो मस्तच.
18 Oct 2020 - 6:36 pm | पॉइंट ब्लँक
मला सहसा असा अनुभव नाहि आला. फक्त ASI वाले कधी कधी अड्काठि करतात. पुजारी लोक नाहि करत. त्याना एकद विचारला कि झाल. :)
18 Oct 2020 - 6:36 pm | पॉइंट ब्लँक
मला सहसा असा अनुभव नाहि आला. फक्त ASI वाले कधी कधी अड्काठि करतात. पुजारी लोक नाहि करत. त्याना एकद विचारला कि झाल. :)
18 Oct 2020 - 9:58 pm | रोहित रामचंद्रय्या
बंगळूरु नाही ते 'बेंगळूरु' आहे
19 Oct 2020 - 7:49 am | पॉइंट ब्लँक
खरच कि राव. चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद :)
18 Oct 2020 - 10:07 pm | गोरगावलेकर
माझा अनुभव : दक्षिणेतील कन्याकुमारी मंदिर, सुचिंद्रम मंदिर, पद्मनाभस्वामी मंदिर यामध्ये कुठेही कॅमेरा वापरायला परवानगी मिळाली नाही.
19 Oct 2020 - 7:52 am | पॉइंट ब्लँक
तुम्हि फारच मोठ्या लिग मधील मंदिराबद्दल बोलताय. काहि ठिकाणी कॅमेराच काय मोबाईल फोन सुद्धा मंदिरात नेता येत नाहि. असो, ह्या तीन्ही मंदिरांना भेट देन्याचा योग आला नाहि अजुन. :(
18 Oct 2020 - 10:15 pm | तुषार काळभोर
अतिशय सुरेख फोटो.
पूर्ण नवरात्रीचे फोटो याच मूळ धाग्यात राहिल्यास हा धागा सदा संस्मरणीय होईल यात शंका नाही!
19 Oct 2020 - 7:54 am | पॉइंट ब्लँक
धन्यवाद. तत्पर संपादक मंडळाने तशी सोय केली आहे. खुप आभारी आहे _/\_
18 Oct 2020 - 10:15 pm | चौथा कोनाडा
जुनी मंदिरे, गर्दीची देवस्थाने इथं कॅमेराला मनाई असतेच.
हे पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी मंदिर नवे आणि कमी गर्दीचे असणार. बेंगळूरुत कॉलन्यात, नविन उपनगरात अशी मंदिरे असतात.
एका वर्षी नृसिंह जयंती दरम्यान टिचर्स कॉलनी (बनशंकरी रोड) इथल्या छोटेखानी नृसिंह मंदिरात गेलो होतो, तेथे ही मुर्तीची सजावट अशी सुंदर असल्याचे आठवतेय.
19 Oct 2020 - 8:29 am | पॉइंट ब्लँक
हो. पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी मंदिर लहान आणि तुलनेने कमी गर्दिची आहेत. ग्रामदेवता आहेत दोन्हि तुब्रहल्लीच्या. पण कहि प्राचीन मंदिरांमध्ये पण खुप सुखद अनुभव आले आहेत फोटोग्राफी संदर्भात. त्यातील दोन तीन नमुद करेन इथे.
१. एकदा सांगलीहुन बेंगलोरला येताना , डयव्हर्जन घेवून कुरुवट्टीला भेट दिली होती. जवळपास ७००-८०० वर्ष जुने मल्लिकार्जुन मंदिर आहे . जवळ्पास दोन अडिच तास फोटोग्राफी केली त्या मंदिरात. तिथे एक भला मोठा नंदि सुद्धा आहे. मी जेव्हा त्या नंदिचे फोटो काढले तेव्हा त्या पुजार्याने ते बघायला मागितले. फोटो बघितल्यावर त्याने मला सांगितले -"तु आज इथेच रहा. उदया सकाळी जेव्हा पुजा उतरवली जाईल तेव्हा नुसत्या नंदिचा एक फोटो काढुन दे. तुझ्या जेवणाची आणि राहण्याची सोय आमच्या घरी करु " पण मला दुसर्या दिवशी जॉब जॉईन करायच असल्यामुळे ते शक्य झालं नाही. तरीही त्याने त्याचा फोन नंबर दिला आणि रहायचा प्लॅन करुन परत ये असं सांगितल.
२. दुसरा अनुभव अवनी शारादा पिठाचा आहे. हे खुप प्राचीन पीठ आहे. आणि त्यांच्या बरर्याच शाखा सुद्धा आहेत कर्नाटकामध्ये. तिथे आधि मुल देवतेची फोटो काढायला पुजार्याने परवानगी नव्हती दिली. पण बाकि फोटो काढु दिले. मी फोटो काढत असताना त्याने मंदिराची माहिती दिली बरेच. मग आम्हि दोघांनी बसुन कॅमेरामधल्या फोटोची एक उजळनी केली. त्यानंतर काय मनात आले त्याच्या माहिती नाहि. मला स्वत:हुन देवीचे फोटो काढायला सांगितले. त्यांनंतर स्वतःच कार्ड दिल. आणि दसर्याला उत्सव असतो तेव्हा ये परत फोटो काढायला अस आमंत्रण सुद्धा दिल.
३. बेंगलोर मध्ये व्हाईट्फिल्ड मध्ये बर्याच मंदिरात मी नियमित जातो तिथे एक-दोनदा फोटो काढल्यावर, ते पुजारी जर विशेष पूजा असेल तर स्वतःहुन आधी सांगतात की ह्या दिवशी खास कार्यक्रम आहे आणि कॅमेरा घेवून ये तु :) दहा वर्षांपूर्वी जेव्हा डिएसलारचा सुळ्सुळाट नव्हता तेव्हा तर अजुन मज्जा होती. बर्याच मंदिरात मला - "तु कुठल्या वर्तमान पत्राचा रिपोर्टर आहेस आणि आमच्या मंंदिर कुठल्या चॅनेल वर झळ्कनार" असं विचारला जायच. पण मी रिपोर्टर नाही हे ऐकुन हिरमुसायचे बिचारे.
असो सांगायला खुप आठवणी आहेत , पण धागा भरकटेल उगाच. मंदिरामध्ये गेल्यावर पुजर्याना विनम्रपने विचारल आणि त्यांच्या प्रश्नांची "फोटो का काढतोय ?" ह्याची समाधानकारक उत्तर त्याना दिल की ते सहसा मनाई नाहि करत. मोडकी तोड्की का होईना पन कन्नडा बोलता येते ही जमेची बाजु आहे. बर्याच पूजार्याना हिंदी -ईंग्रजी नीट बोलता नाही येत इथे. चार गप्पा मारता आल्या पाहिजेत त्यंच्याशी. आमच्या मित्र मात्र "तुझ्याकडे डिएसलार आहे म्हणुन तुला उगाच भाव मिळतो" असा टोमणा आवर्जुन मारतात.
23 Oct 2020 - 5:35 pm | चौथा कोनाडा
+१
व्वा, छानच अनुभव !
19 Oct 2020 - 5:00 am | कंजूस
मूर्तीची पुजा होत असणाऱ्या मंदिरात फोटो काढण्याला मनाई असते.
हे पिल्लेकाम्मा पिल्ले नावाच्या ( बिल्डरचे ?) किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीचे खासगी मंदिर हौसेने बांधलेले असेल.
ASI कडे ताबा असणाऱ्या मूर्तींची पुजा स्थानीक करत नसतात.
किंवा कुणी जेमतेव दिवा लावतो हार घालतो पण ग्रामदेवता नसते.
19 Oct 2020 - 8:45 am | पॉइंट ब्लँक
>> ASI कडे ताबा असणाऱ्या मूर्तींची पुजा स्थानीक करत नसतात.
किंवा कुणी जेमतेव दिवा लावतो हार घालतो पण ग्रामदेवता नसते.
हे तितकस बरोबर नाही आहे. बेंगलोर जवळ नंदि हिल्स च्या पायथ्याशी भोगानंदिश्वरा नावचं मोठ मंदिर आहे. नंदिग्रामची ग्रामदेवता आहे ती. हजार वर्षे जुनं हे मंदिर ASI च्या ताब्यात आहे. पन तिथे रोज पूजा होते , इतकच नव्हे तर अन्नछत्र सुद्धा चालत. तशी परिस्थिती हेमावाती सुद्धा आहे. बाकि बेंगलोरजवळ असनारी तळ्कडू, नुंजनगड , होसुर चंद्रचौडेश्वर मंदिर, सोमपल्ले अशी अनेक मंदिर ASI च्या देखरेखि खाली आहेत. तिथे रोज पूजा चालते आणि खुप सारे लोक दर्शनाला येतात. तुम्ही ज्या मंदिराबद्दल बोलताय तिथे पूजा न होण्याची वेगळी कारण आहे. उदा- सोमनाथपुरा, कदंबलुर, कोरांग्नाथर ह्या मंदिरांमध्ये पूजा नाहि होत, कारण तिथल्या मुळ देवता खंडित झाल्या आहेत किंवा मंदिरांचा विटाळ झाला आहे.
>>हे पिल्लेकाम्मा पिल्ले नावाच्या ( बिल्डरचे ?) किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीचे खासगी मंदिर हौसेने बांधलेले असेल.
शक्यता कमी वाटतिये कारण इथले स्थानिक लोक दरवर्षी जत्रा भरवतात इथे. ग्रामदेवता आहे ही तुब्रहल्ली ची.
19 Oct 2020 - 5:23 am | जुइ
देवीचे फोटो अतिशय सुंदर आहेत!
19 Oct 2020 - 8:47 am | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
19 Oct 2020 - 7:26 am | Gk
छान
19 Oct 2020 - 4:36 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
19 Oct 2020 - 8:18 am | शा वि कु
भारी आहेत फोटो !
19 Oct 2020 - 8:47 am | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
19 Oct 2020 - 9:09 am | प्रचेतस
वा...! फोटो एकदम सुरेख आलेत.
19 Oct 2020 - 4:37 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
19 Oct 2020 - 11:45 am | चांदणे संदीप
सर्वच फोटो आवडले.
सं - दी - प
19 Oct 2020 - 4:37 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
23 Oct 2020 - 5:33 pm | चौथा कोनाडा
द्वितिया: तृतिया. चतुर्थी, पंचमी सर्वच प्रचि अप्रतिम !
नविन माहिती वाचायला मिळालई !
आणि षष्ठीचे फोटो, अर्थातच सुंदर !
ही लोण्याची कला भारी असते !
खरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते !
23 Oct 2020 - 9:46 pm | पॉइंट ब्लँक
>>खरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते !
ह्या विचाराशी पूर्णतः सहमत. कित्येक लहान सहान मंदिरांकडुन कलेला आश्रय दिला जातो आणि ती लोकांसमोर आणली जाते. देवाची पूजा अर्चना ह्यातुन संस्कृती तर दर्शन तर होतच रहातं. शिवाय सणासुदिला अशा मंदिरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात- उदा. भरतनाट्यम, किंवा गायनाचा कार्यक्रम. एक विशेष गोष्ट म्हणजे, इथल्या एका बालाजी मंदिरात बर्याच वेळा शनिवारी भजन किर्तनाचा कार्यक्रम असतो, त्यात विठोबाची मराठी भक्ती गीते सुध्दा गायली जातात. :)
24 Oct 2020 - 6:05 am | तुषार काळभोर
दिवसेंदिवस सजावट जास्त सुंदर होतेय.
24 Oct 2020 - 10:18 am | पॉइंट ब्लँक
हो, रोज काहि ना काही नवीन बघायला मिळतय.
24 Oct 2020 - 8:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन माहिती आणि भारी फोटो.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2020 - 10:19 am | पॉइंट ब्लँक
धन्यवाद
24 Oct 2020 - 2:49 pm | तुषार काळभोर
एकदम कल्पक आणि सर्जनशील थीम्/विषय आणि अतिशय साजेशी सजावट!
** ही सर्व माहिती तुम्ही कशी मिळवता? म्हणजे आधीच हे सर्व माहिती आहे (पोपट म्हणून कामाक्षी, नोटांची सजावट असताना लक्ष्मी, नंतर अन्नपूर्णा इत्यादी) की कोणी सांगतं तिथं?
24 Oct 2020 - 4:09 pm | पॉइंट ब्लँक
रोज मंदिरात फोटो काढताना पूजार्यांकडुन बरीच माहिती मिळते. ते रोज सांगतात कुठल्या स्वरुपाची पूजा आहे. पूजेमध्ये पैसे ठेवले की ती लक्ष्मी असते आणि वीणा म्हणजे सरस्वती ह्या गोष्टी आपल्याला लहानपनापसुन माहिती असतात कारण आपण त्या आपल्याकडे दिवाळीच्या पूजेमध्ये किंवा दसरर्याला मंदिरामध्ये नेहमी पहान्यात असतात. द्रौपदी, कामाक्षी किंवा अन्नपूर्णा ह्या देवतांचं आपल्याकडे प्रस्थ नाहीये. त्यामुळे आपल्याला जास्त माहिती नसतात त्यांच्या पूजेचे स्वरुप. पण जवळपास पंधरा वर्ष बेंगलोर मध्ये काढल्यावर आणि दक्षिण भारता बरीच भटकंती ( विशेषतः मंदिर) केल्यामुळे ह्या देवता थोड्या परिचयाच्या झाल्या आहेत. तसचं फेसबुकवर बरेच हेरिटे़ज किंवा कल्चर स्वरुपाचे ग्रुप आहेत जिथे बरीच माहिती वाचायला मिळते. थोडक्यात सांगायचं तर माझं ह्या विषयातलं क्नोलेज सेकंड हँड आहे. स्वतःहुन काही अभ्यास केला नाहिये.
24 Oct 2020 - 9:08 pm | गोरगावलेकर
सर्व फोटोही खूपच आकर्षक आहेत. तसेच नवीन माहितीही मिळते आहे.
25 Oct 2020 - 2:03 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद -_/\_
25 Oct 2020 - 8:48 pm | चौथा कोनाडा
व्वा, अष्टमी निमित्त देवीचे महिषासुर रमर्दिनी रुप अप्रतिम !
मालिका पाहायला मजा आली.
अभिनव कल्पना होती ! देवींची माहिती आणि वेगवेगळी सुंदर रूपे व अप्रतिम सजावट बघायला मिळाली.
पुढेचमागे अशीच मालिका वाचायला पाहायला आवडेल.
पॉइंट ब्लँक साहेब,
🙏
25 Oct 2020 - 9:32 pm | पॉइंट ब्लँक
इकडे दसरा उद्या आहे. अजुन दोन surprise शिल्लक आहेत :)
28 Oct 2020 - 10:12 am | चौथा कोनाडा
👌
नवमी आणि विजयादशमीचे फोटो देखील अप्रतिम !
🙏
पॉइंट ब्लँक
28 Oct 2020 - 7:37 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
26 Oct 2020 - 7:44 pm | तुषार काळभोर
ज्यांनी आरास केली त्यांची आणि तुमची पण. खूप कल्पकतेने फोटो दिलेत.
म्हणजे केवळ आधी अर्धी देवी, नंतर अर्धा महादेव, हेच नाही.
हिमालयाची आरास दाखवताना हळू हळू बाहेर येणं हे सुद्धा..
तुमच्याकडून अजून खूप काही पाहायला आवडेल.
27 Oct 2020 - 12:19 am | पॉइंट ब्लँक
सतत प्रोस्ताहान दिल्याबद्दल आभारी. पूजारी मंडळींचे कष्ट खुप जास्त आहेत आणि त्यांची कल्पकता सुद्धा. ऱोज जवळपास सहा तास लागतात त्यांना पूजेच्या तयारीसाठि. त्यांच कौतुक करावं तितक कमीच आहे :)
26 Oct 2020 - 7:44 pm | तुषार काळभोर
सर्व फोटो एकाच लेखात घेतल्याचे सार्थक झाले.
27 Oct 2020 - 12:21 am | पॉइंट ब्लँक
संपादक मंडळाचे विशेष आभार रोज धागा संपादित करण्याची तदतुद करुन दिल्याबद्दल _/\_
27 Oct 2020 - 8:13 am | शेखरमोघे
फोटोसकट वर्णन लाजवाब !!
27 Oct 2020 - 12:36 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
7 Oct 2021 - 10:17 pm | पॉइंट ब्लँक
ह्या वर्षीचे नवरात्रीचा आस्वाद मन्दिराच्या फेसबूक पेजवर घेता येइल - https://www.facebook.com/Sri-Pilekamma-Devi-Temple-111911040366476/
8 Oct 2021 - 5:26 pm | चौथा कोनाडा
पुन्हा वाचावा असा सुंदर लेख !
11 Oct 2021 - 10:20 am | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
11 Oct 2021 - 10:58 pm | मदनबाण
सुंदर फोटो ! धागा उघडल्याचे सार्थक झाले ! शिवशक्तीचे रुप पाहुन मला कोल्हापूरच्या महालक्ष्मी [ अंबाबाईची आठवण आली. ] तीचे देखील असेच रुप केलेला फोटो माझ्या पाहण्यात आलेला आहे.

तीची अन्य रुपात मांडलेली पुजा देखील पहावी अशीच असते...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mahalakshmi Ashtakam I Uthara Unnikrishnan
12 Oct 2021 - 12:22 pm | चौथा कोनाडा
व्वा, किती सुंदर फोटो !
जय कोल्हापूर महालक्ष्मी _/\_
18 Oct 2021 - 9:55 pm | पॉइंट ब्लँक
18 Oct 2021 - 9:56 pm | पॉइंट ब्लँक
खुपच सुंदर फोटो आहे महालक्ष्मीचा. धन्यवाद _/\_