निनावी नगर

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
7 Apr 2009 - 12:46 pm

एक नगर असावं निनावी
तेथे कुणी न राजा न राणी

मानवतेची जात असावी
समानतेची साथ असावी

रुपया नाणी नसो व्यवहारी
असो माणूसकीची देणी घेणी

अनाथ आश्रमे तेथे नसावी
वृद्धाश्रमेही ओस पडावी

कायद्याची वाट नसावी
मंदीराला हाक असावी

एकात्मतेची असो दिवाळी
स्वार्थाची पेटावी होळी

प्रेमाची बरसात असावी
मायेची पालवी फुटावी

पौर्णिमा येथेच खिळावी
अमावस्येला जाग न यावी.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

सँडी's picture

7 Apr 2009 - 1:05 pm | सँडी

छान जमलीये!
आवडली.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2009 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येऊ दे, अजून !

नरेश_'s picture

7 Apr 2009 - 6:03 pm | नरेश_

मनातील भावना सुरेखपणे शब्दबद्ध केल्यात.

एखादी गोष्ट आठवायला प्रथम ती विसरावी लागते ;)

सूहास's picture

7 Apr 2009 - 6:06 pm | सूहास (not verified)

मानवतेची जात असावी
समानतेची साथ असावी

अवा॑तरः एखाद्या गावात गेल॑ की ह्याची जाणीव होते..

सुहास

प्राजु's picture

7 Apr 2009 - 9:02 pm | प्राजु

मृगजळ म्हणतात ते हेच असावं.
असो.. कविता खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठमोळा's picture

7 Apr 2009 - 9:31 pm | मराठमोळा

रामराज्याची कविता आवडली. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

बेसनलाडू's picture

7 Apr 2009 - 9:41 pm | बेसनलाडू

कविता आदर्शवादी, वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रामराज्यनिदर्शक वाटावी अशी.
(व्यवहारी)बेसनलाडू