शिक्षक दिन

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
20 Sep 2020 - 8:29 pm

*गुरु महिमा गावत सदा*
*मन राखो अतिमोद |*
*सो भव फ़िर आवै नहीं*
*बैठे प्रभु की गोद ।।*
*...संत क़बीर*

आज शिक्षक दिन..! ज्याच्या कडून आपण काही ना काही शिकतो, तो आपला शिक्षक..! पहिला मान *"आईचा"*.. बोली भाषेपासून ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर, ती बिचारी शिकवतच रहाते.. शाळा कॉलेजच्या दिवसात, *"शिक्षकच"* आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यात मोठा वाटा उचलतात.. आपणही लहानमोठ्या
*"अनुभवातून"* शिकतो.. कधी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो.. म्हणतात ना, पुढच्यास ठेच-मागचा शहाणा..!! कधी एखादी *"वेळ"* अशी येते, की आयुष्यभर पुरेलसा अनुभव देऊन जाते.. आणि *"परिस्थितीनं"* येणारं शहाणपण तर सांगायलाच नको..!!
*"काळ"* पुढे सरकत जातो, आपणही काळाबरोबर बदलायला शिकतो.. *"मित्र"* भेटतात, अन् जगण्याचा अर्थ शिकवतात.. *"निसर्गही"* पदोपदी शिकवतो.. उदाहरण द्यायचं तर.. झाड हे नेहमीच अपकार करणाऱ्यांवर उपकार करतं.. आपण हा गुण शिकत नाही, तो भाग वेगळा..... काही शब्द जोडीने येतात,.. इमानदार कुत्रा, कष्टाळू बैल.. हे प्राण्यांचे गुणही शिकण्यासारखे असतातच की.....
आणि हो.. आपलं *"मनही"* आपल्याला सारख्या सूचना देत असतं.. शिकवत असतं.. पण त्याचं किती ऐकायचं आणि विवेक कुठे करायचा.. हे मात्र *"सद्गुरुच"* शिकवतात.. नराचा नारायण होण्याचा मार्ग, त्यांच्या शिवाय कोणीच शिकवू शकत नाही....!!!
मुळात आपल्याला ज्या वयात, जे योग्य, तेच शिकण्याचा कंटाळा असतो.. शाळेच्या वयात क्रिकेट, कॉलेजच्या वेळी सिनेमा अन् स्वयंपाक शिकण्याच्या वेळी आपण शॉपिंग करत असतो... आणि, हे शिक्षण देणारे शिक्षक, या आपल्या चुकांची शिक्षाही देऊ शकतात, ह्याचा सोयीस्कर विसर पडल्याने, आपली नेहमीच पंचाईत होते...
तेव्हा स्वतःला शिक्षकाच्या भूमिकेत फारसं न घेता, नम्रतेने विद्यार्थी होण्यातच खरा फायदा आहे...!!!

*"माझ्या जीवनातील सर्व शिक्षकांना आज त्रिवार वंदन...!!"*

*जयगंधा...*
५-९-२०२०

मांडणीलेख

प्रतिक्रिया

भीमराव's picture

20 Sep 2020 - 10:26 pm | भीमराव

*What's app*ची जादु चालत नै इथं.

चामुंडराय's picture

25 Sep 2020 - 2:50 am | चामुंडराय

.

Jayagandha Bhatkhande's picture

20 Sep 2020 - 11:14 pm | Jayagandha Bhat...
भीमराव's picture

20 Sep 2020 - 11:54 pm | भीमराव

*दोन स्टार च्या मधलं बोल्ड करतं ना What's app*