करोनाच्या संधीचं ‘सोनं’

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
16 Aug 2020 - 9:17 am

- डॉ. सुधीर रा. देवरे
एकीकडे आक्‍खं जग करोनाशी लढत बरबाद होत आहे. असंख्य लोक आपल्या जिवाला मुकत आहेत. आपल्या नातलगांना, मित्रांना गमावत आहेत. कधी नव्हे इतक्या मानवी अस्तित्वाच्या आणीबाणीच्या वेळी चीन सारख्या हुकुमशाही देशाला भारतात अतिक्रमण करण्याची दुर्बुद्‍धी होते.(आपल्यामुळे जगभर करोना फैलावला या मानसिकतेने चीनने खरं तर जगापुढे खजील असायला हवं होतं.) त्यासाठी करोना काळात भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा करार करावा लागतो. हाच मुहुर्त साधून फ्रांसकडून राफेल येतात. नेपाळ आणि पाकिस्तान त्यांच्या नव्या नकाशात भारताचा भाग दाखवतात. (नेपाळ भारताच्या विरुध्द जाऊ शकेल, याची कधी कोणी कल्पना तरी केली होती का?) बांगलादेश, भूतान, ब्रम्हदेश, श्रीलंका या शेजारी देशांशी सुध्दा आपले खूप चांगले संबंध आहेत असं म्हणता येणार नाही. अशी सर्वदूर परराष्ट्र धोरणाची युध्दजन्य परिस्थिती पाहून- ऐकून आपण भांबावून जातो. करोनाला विसरता येत नाही की युध्दाला.
एकीकडे करोनाचा लॉकडाउन लागू होताच देशातले लाखो मजूर बेरोजगार झाले.(देशात लाकडाऊन आधी आणि नंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, अशी आपली सुरुवात.)आधीच बेकार असलेल्या युवकांचं भवितव्य अंधारात टांगणीला आहे. मध्यमवर्गीय माणूस, शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकही संकटात सापडला. दीड वर्षांसाठी वेतन- निवृत्ती वेतनांवरील महागाई भत्ता थांबवला गेला. शेअर मार्केट प्रचंड कोसळलं. देशाची आर्थिक स्थिती नाजूक झाली. दुसरीकडे मात्र सोन्या- चांदीचा भाव अभूतपूर्व आकाशाला भिडला. कोणत्या लोकांकडे हा नेमका कोणता पैसा आहे? विकसनशील देशातलं हे कोणतं गौडबंगाल आहे, समजायला मार्ग नाही.
आज आत्मनिर्भर होण्यासाठी देशात मेक इन इंडियाचे कारखाने सुरु व्हायला हवे होते. करोनामुळे देशात नवीन आरोग्यक्रांती व्हायला हवी होती. (भारत करोनारुग्ण संख्येत जगात तिसर्‍या स्थानावर आहे. कोणत्याही क्षणी आपण पहिला नंबर मिळवू शकतो.) म्हणून केवळ बेडची संख्या वाढवून चालणार नाही. केवळ रुग्णालयांची संख्या वाढवून चालणार नाही. नव्या आजारांना तोंड देऊ शकणारे डॉक्टर संख्येने लगेच निर्माण करता येणार नसले तरी; जे उपलब्ध आहेत त्यांना कमी दिवसांचं प्रशिक्षण देता येऊ शकतं. देशात करोनाने आजारी असलेल्या प्रत्येक नागरिकावर खाजगी रुग्णालयांतही मोफत आणि योग्य इलाज व्हायला हवा.
आधीच सरकारी कंपन्या डबघाईला येऊन खाजगीकरणाच्या दिशेने नामशेष होण्याच्या काठावर उभ्या आहेत. आता सरकारी बँकांचं तेच होतंय. बँकांचं महत्व हळूहळू नष्ट होत बँका बरखास्त होतील की काय? बँकांचं खच्चीकरण होतंय का? बँकांचे पैसे अनाधिकृतपणे वापरले जाताहेत का? नको त्या ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांवर दबाव येऊ लागला का? आणि वेळ येताच कर्जबुडींताचं कर्ज आपोआप माफ होऊ लागलं. कोणताही विमा आपण भरलेल्या पैशांपेक्षा काही पट असतो. पण बँकेत ठेवलेल्या पैशांना बँक गेल्या वर्षापर्यंत फक्‍त एक लाखाला जबाबदार होती. आता तो नियम पाच लाखापर्यंत आला.(म्हणजे बँकेत कोणाचे दहा लाख असले तरी बँक दिवाळखोरीत गेल्यास परत फक्‍त पाच लाख मिळतील.)
एकीकडे देशातले मंदिरं बंद आहेत. हॉटेली, हलवाई दुकानं, मॉल पाच ऑगष्टपर्यंत बंद होती. रेल्वे, बसेस बंद आहेत. सलून सारखा आवश्यक आणि गरीब लोकांचा व्यवसाय सुध्दा आतापर्यंत बंद होता. दुसरीकडे देशाची आर्थिक परिस्थिती- आजार संसर्ग दुर्लक्षून आपण देवालयांचं मात्र उदारीकरण करत आहोत. विनाकारण दिवसेंदिवस आपण धार्मिक(अध्यात्मिक नव्हे) होत आहोत. खरं तर देशातल्या सगळ्याच प्रार्थनागृहांचं राष्ट्रीयकरण करून तिथला प्रचंड उलाढालीचा पैसा देशाच्या प्रगतीसाठी खर्च करायला हवा.
करोना विसरुन उत्तर प्रदेश प्रशासन शिलान्यास कार्यक्रम यशस्वीतेसाठी रात्रंदिवस झटत होतं. अयोध्येत हॉटेलीत आणि हलवाईंच्या दुकानातच नव्हे, तर भर रस्त्यांवर उघड्यावर गाड्या लावून बुंदीचे लाडू, पेढे तीन- चार ऑगष्टपासूनच विकले जात होते.(नंतर देशभर या सवलती नाईलाजाने देण्यात आल्या की काय?) एका राज्य सरकारकडे म्हणे कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी पैसे नाहीत आणि याच करोना काळात राज्यातला तोच पक्ष मंदिराला एक कोटी रुपयांची मदत पाठवतो.
देशात नेमकं काय चाललंय कळायला मार्ग नाही. नागरिक फक्‍त मतदान करुन गप्प बसतो- टिका करु शकतो- काही शंका विचारु शकतो- काही सुचवू शकतो. त्याचा काही उपयोग होणार आहे की नाही. देशात जे व्हायला हवं ते होत नाही आणि भलतंच काहीतरी होतंय. हे सगळं आकलनापलीकडे आहे. तथाकथित बहुचर्चित ‘विकास’ सात वर्षांपासून गुडघ्यात डोकं घालून का बसलाय? जे भाषणांतून ऐकू येतं, ते प्रत्यक्षात का घडत नाही?
कोणी प्रामाणिक नागरिक करोनाला घाबरून आणि लॉकडाउनला अनुसरत घरी बसून आपलं उत्पन्न हरवून बसतो, तर त्याच वेळी कोणी करोनाचाच फायदा उठवत संधीचं ‘सोनं’ करुन घेतो.
(अप्रकाशित. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता:
sudhirdeore29.blogspot.in

समाजलेख

प्रतिक्रिया

विनम्र's picture

16 Aug 2020 - 10:13 am | विनम्र

काही मुद्दे पटले

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Aug 2020 - 11:29 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

आगाऊ म्हादया......'s picture

19 Aug 2020 - 4:52 pm | आगाऊ म्हादया......

काही मुद्दे पटले .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2020 - 12:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांनी बहुमताने सरकार निवडून दिलंय, आता त्यावर काहीही तक्रार करता येणार नाही. सहन करणे त्याशिवाय पर्याय नाही. सक्षम विरोधी पक्ष नाही, तो राहुच नये म्हणून सतत व्यक्तीगत पातळीवर टीका केली जाऊन त्याचं अस्तित्व राहुच नये अशी व्यवस्था उभी राहीली आहे. आपल्याला बोलण्याचं साधन आहे, माध्यम आहे, नसता तेही काही दिवसांनी जाणार आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुम्हाला वेड्यात काढलं जातं. एका प्रश्नाची हजारो उत्तरं तयार तुमच्या तोंडावर फेकली जातात, जी निव्वळ वाफ असते हे माहिती असून मुळात ग्राउंड लेवलवर काहीच नसतं. समजतं पण बोलायचं नाही.

देशात घंट्या, थाळ्या मिरवणूका आणि दिवाबत्तीचा आधार घेऊन बुद्धी भ्रमीत केल्या जाते. तोच आधार, आणि तेच सत्य जिथे मानल्या जाते. त्याचंही एक शास्त्र कसं आहे, हे समजून सांगणारे गल्लोगल्ली उभे आहेत तेव्हा संधीचं सोनं न झालं तर नवल नाही. काळ उत्तरं देतो. वेळ लागतो इतकेच.

-दिलीप बिरुटे

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Aug 2020 - 11:30 am | डॉ. सुधीर राजार...

सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

चौकस२१२'s picture

4 Sep 2020 - 9:48 am | चौकस२१२

आपल्याला बोलण्याचं साधन आहे, माध्यम आहे, नसता तेही काही दिवसांनी जाणार आहे.
-धादांत अप्रचार.. आज ६ वर्षे झाली भाजप सत्तेत , अजूनही बरखा, राजदीप, निखिल, शेखर गुप्ता, वैगरे पाहिजे तसे बोलायला मोकळे आहे ..
जरा आणीबाणीआठवा आणि मग असले आरोप करा राव ...
-देशात घंट्या, थाळ्या मिरवणूका आणि दिवाबत्तीचा आधार घेऊन बुद्धी भ्रमीत केल्या जाते.
" हे फक्त प्रतीक होते हे हि तुमच्या सारख्याला समजू नये... ?... आणि आपला हा तर्क जर बरोबर धरला तर मग " अतिसहिष्णू जेवहा मेणबत्या घेऊन मूक मोर्चा काढतात " त्याला काय म्हणायचं?
- तुम्हाला भाजप सत्तेत आली हेच मुळात पचत नाहीये..

धर्मराजमुटके's picture

18 Aug 2020 - 6:39 pm | धर्मराजमुटके

राम मंदिर म्हणजे आजपर्यंत चिऊताईची गोष्ट झाली होती.

थांब माझ्या बाळाला उठवते.
थांब माझ्या बाळा न्हाऊ घालते.
अमुक, तमुक आणि ढमुक....
ज्यांना मंदिर मुळातच नको आहे त्यांना जगाच्या अंतापर्यंत काही ना काही कारणे सापडत राहणारच आहेत.
त्यामुळे करोना असो की अजून काही, राम मंदिराचे उद्घाटन ठरलेल्या वेळेवर झाले ही अतिशय समाधानाची बाब आहे.

देशातल्या सगळ्याच प्रार्थनागृहांचं राष्ट्रीयकरण करून तिथला प्रचंड उलाढालीचा पैसा देशाच्या प्रगतीसाठी खर्च करायला हवा.

अशा इच्छा देखील जगाच्या अंतापर्यंत कधीच पुर्ण होणार नाही. मात्र तुम्हाला निदान इच्छास्वातंत्र्य तरी असावे यात वावगे काही नाही.

करोना विसरुन उत्तर प्रदेश प्रशासन शिलान्यास कार्यक्रम यशस्वीतेसाठी रात्रंदिवस झटत होतं.

यासाठी उत्तर प्रदेश सरकार नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.

राम मंदिर आणि ३७० कलम 'कलम' केल्याबद्दल माझे लोकसभेचे मत भाजपालाच. मग पंतप्रधान पदाचा चेहरा कोणीही असो.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Aug 2020 - 10:22 am | डॉ. सुधीर राजार...

आपण मनमोकळी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद.

"खरं तर देशातल्या सगळ्याच प्रार्थनागृहांचं राष्ट्रीयकरण करून तिथला प्रचंड उलाढालीचा पैसा देशाच्या प्रगतीसाठी खर्च करायला हवा."

हे काही पटले नाही. लोक आपल्या मर्जीने आपल्याला जमेल तेवढी रक्कम देवाच्या चरणी अर्पण करता. त्या पैशांवर सरकर कसाकाय हक्क दाखउ शकते? लोक अगोदरच सरकारला टॅक्सच्या माध्यमातुन पैसा देत आहेत. तोच पैसा सरकारला लोक कल्याणासाठी नीट वापरता येत नसेल तर देवस्थानाच्या पैशांवर हक्क सांगायचा नैतीक अधीकार सरकारला नाही. आणी तसेही जर सरकारने मंदीर बांधु नये असे वाटत असेल तर सरकारने मंदीरातला पैसा सुद्धा घ्यायला नको.

जर मंदीरातला पैसा हवा असेल तर सरकारने सर्व शहरात सरकारी मंदीरे, गुरुद्वारे, चर्च आणी मशीदी बांधाव्यात, व त्या मधे जमा होणारा पैसा खुशाल देशाच्या प्रगतीसाठी वापरावा. कसें?

शा वि कु's picture

19 Aug 2020 - 7:38 am | शा वि कु

बरोबर.

मंदिरातला पैसा विश्वस्थानीच घ्यावा असे आपले मत आहे. अनेक लोक कर भरत नाही पण देवालयात सोन्याचे मुकुट देतात. अशा पैशांचे काही चांगले करता येईल. विश्वस्त एक टक्का पैसाही चांगल्या कामासाठी खर्च करत नाही.

बाप्पू's picture

19 Aug 2020 - 11:20 am | बाप्पू

विश्वस्त एक टक्का पैसाही चांगल्या कामासाठी खर्च करत नाही.

आपण हे निरीक्षण कोणत्या अनुभवावरून नोंदवले? आणि BTW त्यांनी तो पैसा कसाही खर्च करावा. मंदिरात जामा झालेला पैसा xyz कामासाठीच वापरता येईल असा काही नियम किंवा कायदा आहे का? तो पैसा कुठे खर्च करावा हे सांगणारे सरकार किंवा तुम्ही कोण? मान्य आहे पैसा सामान्य लोकं देतात पण ते स्वखुशीने ने देतात. त्यानंतर त्या पैश्याचा उपयोग कसा करायचा ते त्याचा नवीन मालक ठरवेल. देवाला दिलेले पैसे देव घेत नसतो तर मंदिर व्यवस्थापन कमिटी घेत असते हे देणार्याला आणि घेणाऱ्याला दोघानां माहिती आहे. तुम्ही का मध्ये पडताय?
आणि तुमच्या माहितीसाठी - हिंदू मंदिर आणि देवस्थान कमिट्या यांना त्यांच्या उत्पन्नाचा आकडा आणि खर्च हे सर्व सरकारला सांगावे लागते. मग हाच न्याय इतर धार्मिक स्थळांना का नाही? कि नियम फक्त हिंदूंनाच आहेत?

अनेक लोक कर भरत नाही पण देवालयात सोन्याचे मुकुट देतात.

तुमच्या पोटात का दुखतंय? लोकं कर देत नाहीत त्याचा जाब सरकार आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंट ला विचारा ना.
लोकं टॅक्स देत नाहीत म्हणून मंदिरातला पैसा सरकार परस्पर वापरू शकते का? हा कोणता न्याय झाला? आणि मग फक्त मंदिरातलाच का?? मशिदीतला का नको. कि तो पैसा फक्त दाढ्या वाढवण्यासाठी आणि आपला टक्का वाढवण्यासाठी आहे?

आणि सगळ्यात महत्वाचा आणि तो प्रश्न ज्यावर तुमच्या सारखे डावे, उच्च प्रतीचे फुरोगामी आणि खांग्रेसी मूग गिळून गप्प बसतात तो प्रश्न

मंदिर च का?? मस्जिद, गुरुद्वारा, चर्च इ इ ठिकाणांबद्दल हाच लेख लिहून दाखवा कि..
सगळा ठेका मंदिरांनी आणि हिंदूंनी घेतलाय का? मध्यंतरी राम मंदिर च्या ऐवजी हॉस्पिटल उभारा असा सल्ला देणारे तुमच्यासारखे फुरोगामी आधी एखादी मशिद पाडून तिथे हॉस्पिटल उभारून का दाखवत नाहीत?
सगळा समाजसेवेचा ठेका जर मंदिरांनी आणि हिंदूंनी च घेतलाय तर इतर धर्मीय फक्त अल्पसंख्यांक या गोंडस नावाखाली सुविधा लाटायला आणि धर्मप्रसार करून हिंदूंना त्यांच्याच देशात अल्पसंख्यांक बनवायला जगत आहेत का?

सामान्यनागरिक's picture

2 Sep 2020 - 4:47 pm | सामान्यनागरिक

लेखकाला खुलं आव्हान आहे. असाच लेख त्यांनी गैर-हिंदु प्रार्थनास्थळांच्या बाबतीत लिहुन दाखवावा.

हिंदु आपले सोशिक म्हणून कुणीही - अगदी सरकार सुद्धा त्यांना मारतं आणि त्यात भर म्हणून हिन्दु धर्मीय सुद्धा विरोधात बोलतात.
हिंदु प्रार्थनास्थळांना आपले होशिब सरकारला दाखवावे लागतात. सगळ्या मंदिरांचे ट्रस्ट झालेत. मशिदी, चर्च यांचे असे झालेय का ते दाखवा. त्यांना हिशोब विचारायची कुणांत हिम्मत नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Aug 2020 - 2:08 pm | डॉ. सुधीर राजार...

तुम्ही काही मंदिरांचा कळप चालवतात का? दुकानं चालवतात तसे. मी हिंदू आहे. म्हणून हिंदूंवर टिका करायचा मला अधिकार आहे. मंदिरं म्हटलं म्हणजे त्यात सर्व प्रार्थनागृह येतात. भारतात किती मंदिरं आहेत हे जरा शोधा. आणि लोकांना मुर्खात काढून कसे दान धर्म करायला सांगितलं जातं ते जरा अभ्यासा. मग तुम्हाला कळेल की यात काय गौडबंगाल आहे. लोक घरात अर्धपोटी राहून धार्मिक कार्य करतात, ते अज्ञानामुळे. काहीतरी चांगलं होईल या अपेक्षेने. आणि धर्म चालवणारे दुकानदार गब्बर होतात. ते कोणत्याही धर्माचे असोत. बाबरी मशीद पाडून मंदिर बांधले जात नाही का? अजून कोणत्या मशिदी पाडायला सां‍गतात. झापडं लावलेल्या संक‍ुचित भावनेतून जरा बाहेर या. म्हणजे तुम्हाला धर्माचा आणि प्रार्थना गृहांचा व्यापार दिसेल. मानवतावादी धर्म बाळगा आधी मग आपला धर्म शिकवा लोकांना. धर्म घरात पाळायचा. बाहेर सामाजिक व्हा. जात धर्मापलिकडे बघायला शिका. खरं नाव लपवून काहीही बोलता येतं. खर्‍या नावाने समाजात वावरा. मुखवटा नको.

माझा कोणत्याही मंदिराशी किंवा मंदिर व्यवस्थापनाशी काडीचाही संबंध नाहीये. मंदिरात लोकांनी दानधर्म करणे, अर्धपोटी राहून मंदिरात पैसे देणे, लोकांना भुलवून त्यांच्याकडून देवाधर्माच्या नावावर पैसे उकळणे अश्या गोष्टींना एक हिंदू म्हणून माझा विरोध च आहे आणि मरेपर्यंत राहील.

मुद्दा एवढाच आहे कि हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टींना विरोध करता करता आपण मूळ धर्मावरच कुऱ्हाड घालताय. बाबरी मशिदिच्या जागी मंदिर होऊ देऊन तुम्ही फुरोगामी आणि मुस्लिम धर्मीय कोणावर उपकार करत नाही आहात. राम मंदिर होणे ही काळाची गरज होती. मूळ भारतीय संस्कृती वर काळाच्या ओघात जे जे आघात झाले ते दुरुस्त करण्यासाठी राम मंदिर व्हायलाच हवे आणि फक्त राम मंदिर च नाही ज्या ठिकाणी हिंदू मंदिरे उध्वस्त केलीयेत तिथे तिथे मंदिरे व्हायला हवीत.
देशाचा विकास आणि संस्कृती जतन या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दोन्हीचें रक्षण आणि पालनपोषण होने आवश्यक आहे. दोन्ही गोष्टीवर तेवढेच लक्ष देणे आवश्यक आहे.

मानवतावादी धर्म बाळगा आधी मग आपला धर्म शिकवा लोकांना. धर्म घरात पाळायचा. बाहेर सामाजिक व्हा. जात धर्मापलिकडे बघायला शिका.

हो हे आम्ही बघतो आणि त्याचमुळे राम मंदिर हे शेकडो वर्षे संघर्ष करून मग बांधले इतरांसारखे तलवारीच्या बळावर आणि इतर धर्मियांचें खच्चीकरण करून नाही. आजही इतर धर्मीय सुरक्षित आहेत आणि हव ते करू शकतात ते फक्त हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे हे लक्षात घ्या. नव्हे डोक्यात फिट्ट बसवा.
हे मानवतावादी धर्माचे ज्ञान पाजण्यापूर्वी तुम्ही स्वतः किती देश फिरला आहात? किती देशांच्या जुन्या संस्कृती चा आणि आत्ताच्या परिस्थितीचा अभ्यास केलात? इतर किती धर्माबद्दल रिसर्च केलात? किती लोकांशी बोलून धार्मिक बाबतीतील त्यांची मते जाणून घेतलीत.? आंतरजालावर खरे नाव लिहिले म्हणून तुमचे विचार बरोबर आणि आम्ही निकनेम वापरले म्हणून मुखवटेधारी का??

आणि माझा मुद्दा हाच होता कि नेहमी हिंदूच का? या देशात इतर सर्व धर्मीय राहतात मग इतरांना अल्पसंख्यांक म्हणून हवे ते करण्याची मुभा आणि हिंदूंनी मात्र मंदिरात जमा होणारा पैसा सरकारला विकासकामासाठी द्यायचा ( ज्याचा फायदा पुन्हा सर्व धर्मीय घेणार ) हा अट्टहास का लावलाय ?

मंदिरामध्ये पैसा आणि दागिने देणे, किंवा पुजारी आणि मधल्या दलालांच्या तिजोऱ्या भरणे हे चूकच आहे पण मग ते टाळण्यासाठी मंदिरे होऊच द्यायची नाहीत, मंदिरांचा पैसा सरकारने घावा आणि विकासासाठी वापरावा किंवा मंदिरांच्या जागी हॉस्पिटल बांधा असले सल्ले देणारे तुम्ही कोण?

प्रमोद देर्देकर's picture

19 Aug 2020 - 6:23 pm | प्रमोद देर्देकर

हो हे आम्ही बघतो आणि त्याचमुळे राम मंदिर हे शेकडो वर्षे संघर्ष करून मग बांधले इतरांसारखे तलवारीच्या बळावर आणि इतर धर्मियांचें खच्चीकरण करून नाही. आजही इतर धर्मीय सुरक्षित आहेत आणि हव ते करू शकतात ते फक्त हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे हे लक्षात घ्या.>>>>

बाप्पु आपण हजरो वर्षे सहिष्णु होतो , अजुनही आहोत आणि पुढे ही राहणारच आहोत.

आत्ताच्या घडिला माझाकडे एक चित्रफित आहे, स्थळ कुठले आहे काही माहित नाही पण काळ बहुतेक यंदाच्या गणापती उत्स्वातील बनवेलेल्या बाप्पाच्या मुर्तींचा कारखाना असावा. बहुतेक पाकचा असावा.

तर ती त्या व्हिडिओ मध्ये दोन मुस्लीम महिला गणपती कारखान्यात जावुन त्या मालका समोर ५/६ मुर्ती खाली फेकुन देत आहेत. असे आपण करु शकत नाही कारण सहिष्णुता. माहिती आहे ना फ्रान्स च्या साप्ताहिकात नुसते काही छापुन आले होते तेव्हा काय झाले होते. मग आणि इथे तर त्या दोन बायका एव्हढे धाड्स करतात.

फक्त ती चित्रफीत मी कोणाला पुढे पाठवु शकत नाही नको ते लचांड मागे लागायचे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

20 Aug 2020 - 2:34 pm | डॉ. सुधीर राजार...

चांगली प्रतिक्रिया. धन्यवाद.

कोहंसोहं१०'s picture

9 Sep 2020 - 4:13 am | कोहंसोहं१०

आत्ताच्या घडिला माझाकडे एक चित्रफित आहे, स्थळ कुठले आहे काही माहित नाही पण काळ बहुतेक यंदाच्या गणापती उत्स्वातील बनवेलेल्या बाप्पाच्या मुर्तींचा कारखाना असावा. बहुतेक पाकचा असावा. तर ती त्या व्हिडिओ मध्ये दोन मुस्लीम महिला गणपती कारखान्यात जावुन त्या मालका समोर ५/६ मुर्ती खाली फेकुन देत आहेत --------> तो विडिओ बहारीनचा आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

20 Aug 2020 - 2:31 pm | डॉ. सुधीर राजार...

आधीच्या प्रतिक्रियेपेक्षा या प्रतिक्रियेत थोडं लॉजिक आहे. म्हणनू धन्यवाद.
असं सांगणारा मी या देशाचा एक नागरिक आहे.

चौकस२१२'s picture

4 Sep 2020 - 9:54 am | चौकस२१२

बाप्पू १००% सहमत .. "नेहमी हिंदूच का?" य प्रश्नाला स्वयंघोषित "पुरोगामी" कधीच सरळ उत्तर देणार नाहीत... कारण तोंडघशी पडतील

चौकटराजा's picture

19 Aug 2020 - 4:06 pm | चौकटराजा

जगी जीवनाचे सार जाणुने घे तू सत्वर
जिसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर
मी पूर्ण नास्तिक आहे तरीही वर च्या दोन ओळीत इश्वर मी आणला आहे ते केवळ एक त्रयस्थ न्यायमूर्ती या अर्थाने .
मी येत्या नोव्हे मधे ६७ पूर्ण करीन. या इतक्या वर्षात मी काही भाकिते केली होती ती खरी ठरली आहेत. आजच मी माझे या देशाविषयीचे भाकित इथे सांगत आहे ते असे
" भारत देशाने व्यर्थ आशावादात बुडून राहू नये. भारतात जरी अन्न धान्य ई मधे वाढ होत असली तरी एकूणात नैसर्गिक स्रोत या लोकसंख्येच्या मानाने कमी कमी होत जाणार हे नक्की. सोन्याची आयात व इन्धनाची आयात भारताचे कम्बरडे येत्या काही काळात मोडू शकते. यात देशान्तर्गत औध्योगिक क्रान्ती झाली तर निर्यात वाढेल पण यान्त्रिकीकरणाने रोजगार कमी कमी होऊन बेकारी वाढेल. त्यात देशात इतकी घातक प्रमाणात विविधता लोकामधे आहे की सरकारला लोकशाही साम्भाळत जलद निर्णय ही तारेवरची कसरत करताच येणार नाही. त्यात कूर्मगतीने पुढे जाणारी न्यायव्यवस्था यामुळे गुन्हेगारी वाढत जाणार आहे ! " थोडक्यात भारत देशाची लोकशाही व लोकसन्ख्या हेच भारत देशाचे किमान ऐहिक प्रगतीतील मुख्य शत्रू असतील .

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

20 Aug 2020 - 2:24 pm | डॉ. सुधीर राजार...

योग्य आणि नेमके प्रत्यु्त्तर. धन्यवाद.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

20 Aug 2020 - 2:26 pm | डॉ. सुधीर राजार...

योग्य आणि नेमके प्रत्यु्त्तर. धन्यवाद.

सुबोध खरे's picture

3 Sep 2020 - 9:33 pm | सुबोध खरे

मी सामान्य माणूस आहे, मला खालील प्रश्न आहे त्याचे उत्तरे दयावी व माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती.

1. 20 मार्च ते 30 ऑगस्ट आपण किती लिटर पेट्रोल ,डिझेल विकत घेतले?
2.20 मार्च ते 30 ऑगस्ट मध्ये आपण किती वेळा हॉटेलमध्ये गेलो व आपला हॉटेल्लिंग वरचा खर्च सांगा?

3. 20 मार्च ते 30 ऑगस्ट मध्ये , आपल्या शहरात,भारतात किंवा परदेशात किती वेळा व कुठे प्रवास केला व त्यावरील खर्च सांगा?

4. 20 मार्च ते 30 ऑगस्टमध्ये आपण कोणती मोठी व महत्वाची खरेदी केली उदाहरण म्हणजे जमीन, फ्लॅट, कार, फर्निचर, कपडे, मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी, लग्न समारंभ,?

5. 20 मार्च ते 30 ऑगस्ट मध्ये कोणता बिग बजेट picture , मोठे नाटक, मोठा संगीत महोत्सव, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला?

6. सगळ्यात महत्त्वाचे, तुमच्या मित्र परिवारात, कंपनीत, नातेवाईकांमध्ये, सोसायटीमध्ये कोणा कोणाला त्याचा नोकरीत बढती मिळाली, टक्केवारीने दोन आकड्यात वेतनवाढ झाली?

वरील प्रश्नांची उत्तरात जेव्हा वाढ होईल
तेव्हा GDP नक्की वाढेल.

तोवर रोज काढा, वाफ घ्या,
मुखवटा घालूनच बाहेर पडा आणि सामाजिक अंतर पाळा

बाकी मोदी विरोध, पप्पू स्तोत्र, युगपुरुष आरती इ. दळण चालु द्या.

ऋतुराज चित्रे's picture

3 Sep 2020 - 10:21 pm | ऋतुराज चित्रे

२० मार्चपूर्वी वरील ६ गोष्टी लोकं करत होते ना ? मग दरवर्षी जिडीपी दर का घसरत आहेत ?

सुबोध खरे's picture

3 Sep 2020 - 11:37 pm | सुबोध खरे

https://www.statista.com/statistics/263771/gross-domestic-product-gdp-in...

जरा चष्मा काढून पाहिलंत तर GDP वाढतच आहे असे दिसेल

सुबोध खरे's picture

3 Sep 2020 - 11:37 pm | सुबोध खरे

https://www.statista.com/statistics/263771/gross-domestic-product-gdp-in...

जरा चष्मा काढून पाहिलंत तर GDP वाढतच आहे असे दिसेल

डॅनी ओशन's picture

4 Sep 2020 - 8:21 am | डॅनी ओशन

"दर" शब्द सोयीस्कररीत्या फिल्टर ?

ऋतुराज चित्रे's picture

4 Sep 2020 - 10:18 am | ऋतुराज चित्रे

अहो जीडीपी वाढीचा दर हा टक्केवारीत मोजला जातो , त्या वाढीत घसरण होते आहे हे तुम्हाला माहीत नाही का ? असो ,

नाक्यावरील पक्याला पडलेले प्रश्न येथे विचारून तुम्ही फत्त सामान्य माणूस नाही तर व्हेनस डे मधील XXX कॉमन मॅन आहात हे सिद्ध केले .

चौकस२१२'s picture

4 Sep 2020 - 10:01 am | चौकस२१२

पण बँकेत ठेवलेल्या पैशांना बँक गेल्या वर्षापर्यंत फक्‍त एक लाखाला जबाबदार होती. आता तो नियम पाच लाखापर्यंत आला.(म्हणजे बँकेत कोणाचे दहा लाख असले तरी बँक दिवाळखोरीत गेल्यास परत फक्‍त पाच लाख मिळतील.)
१)मग हे ग्राहक/ नागरिक याचं दृष्टीने चांगलाच झाले कि? त्यात काय तक्रार?
२) बँक बुडाल्यास बँकेतील ठेवी १००% परत मिळण्याची हमी जगात इतर ठिकाणी पण मिळत नाही? एक ठराविक रकमेपर्यंतच असते ती हमी भारताने का तशी १००% द्यावी हि अपेक्षा ? ( सरकार कोणाचे का असेना )

ऋतुराज चित्रे's picture

4 Sep 2020 - 10:25 am | ऋतुराज चित्रे

अगदी बरोबर, कुठल्याही सरकारी अथवा प्रायव्हेट बँकेतील ठेवींना संरक्षण देण्याचा अधिकार संबंधीत बँकेला असावा.

कोणी प्रामाणिक नागरिक करोनाला घाबरून आणि लॉकडाउनला अनुसरत घरी बसून आपलं उत्पन्न हरवून बसतो, तर त्याच वेळी कोणी करोनाचाच फायदा उठवत संधीचं ‘सोनं’ करुन घेतो.
जर चांगल्या दृष्टीने आणि साठेबाजी ना करता केले असेल तर काय बिघडलं?
उदाहरण, स्वच्छता सेवा पुरवणारे , पॅथॉलॉजी निगडित सुविधा ..

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Sep 2020 - 12:16 pm | डॉ. सुधीर राजार...

सर्व प्रतिक्रिया वाचल्या. धन्यवाद.

धार्मिक स्थळ मग ती मंदिर असू नाही तर दुसरे कोणते ही प्रार्थना स्थळ.
तिथे होणारे दान हा गूढ विषय आहे.
सामान्य लोक जे 5 ते 10 रुपये दान करता त त्या मध्ये भक्ती भाव आहे .
पण करोडो रुपये,दागिने दान करतात ह्या मागे नक्कीच काही तरी गोड बंगाल असणार.
कारण ह्या व्यक्ती दानशूर नक्कीच नाहीत.
समाजातील कमजोर घटकांच्या उद्धारासाठी त्यांनी पैसे खर्च केल्याचा काहीच खुणा सापडणार नाहीत.
मग दान मदिरत करतानाच हे एवढे उदार कसे होतात.
मंदिर च्या आमदनी चे मुळ सोर्स हा दान च दाखवला जातो.
आणि ते पैसे कसे आले,कुठे कमावले ह्याचा शोध घेतला जात नाही.
चुकीच्या मार्गाने आलेला पैसा इथे आल्यावर सभ्य मार्गाने आलेला पैसा होतो.
आणि बदल्यात कोणत्या मार्गे ह्या दान वीर लोकांना परतफेड होते फक्त हाच मार्ग कोणी तरी सांगावा.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Sep 2020 - 2:18 pm | डॉ. सुधीर राजार...

सहमत

धार्मिक स्थळ मग ती मंदिर असू नाही तर दुसरे कोणते ही प्रार्थना स्थळ.
तिथे होणारे दान हा गूढ विषय आहे.
सामान्य लोक जे 5 ते 10 रुपये दान करता त त्या मध्ये भक्ती भाव आहे .
पण करोडो रुपये,दागिने दान करतात ह्या मागे नक्कीच काही तरी गोड बंगाल असणार.
कारण ह्या व्यक्ती दानशूर नक्कीच नाहीत.
समाजातील कमजोर घटकांच्या उद्धारासाठी त्यांनी पैसे खर्च केल्याचा काहीच खुणा सापडणार नाहीत.
मग दान मदिरत करतानाच हे एवढे उदार कसे होतात.
मंदिर च्या आमदनी चे मुळ सोर्स हा दान च दाखवला जातो.
आणि ते पैसे कसे आले,कुठे कमावले ह्याचा शोध घेतला जात नाही.
चुकीच्या मार्गाने आलेला पैसा इथे आल्यावर सभ्य मार्गाने आलेला पैसा होतो.
आणि बदल्यात कोणत्या मार्गे ह्या दान वीर लोकांना परतफेड होते फक्त हाच मार्ग कोणी तरी सांगावा.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Sep 2020 - 2:19 pm | डॉ. सुधीर राजार...

काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत ब्लॉगवर टिप्पण्या प्रकाशित होत नव्हत्या. कोणी खूप वेळ देऊन लिहिलेली टिप्पणी नाहीशी होत असे. आता मात्र टिप्पण्या प्रकाशित होऊ लागल्या. वाचकांच्या माहितीसाठी. धन्यवाद.

ब्लॉगची बदललेली लिंक: http://sudhirdeore29.blogspot.com/

सुबोध खरे's picture

4 Sep 2020 - 3:07 pm | सुबोध खरे

Siddhivinayak Temple – which spends millions every year equipping civic hospitals and paying for poor patients’medical bills – is now set to run its own hospital.

Read more at:
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/siddhivinayak-to-...

The trust has been allowed to spend only 30 per cent of its disposable income annually on charity and donation

मंदिरे आपला पैसे सामाजिक कार्यांवर कसा खर्च करतात हे एकदा धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन पाहून या.

इथे जो उठतो तो कोणतीही माहिती न घेता बेजवाबदारपणे टंकायला मोकळा आहे.

Siddhivinayak temple to donate Rs 5 crore for Uddhav Thackeray-led government’s Rs-10 Shiv Bhojan thali

Read more at:
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/siddhivinayak-temple-to...

http://www.lalbaugcharaja.com/

चौकस२१२'s picture

4 Sep 2020 - 4:13 pm | चौकस२१२

मंदिरे आपला पैसे सामाजिक कार्यांवर कसा खर्च करतात हे एकदा धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन पाहून या.

यावरून एक कल्पना डोक्यात आली ( हि कल्पना माझी नाही तर कॅथॉलिक चर्च जगभर हे राबवते )
- धार्मिक संस्थांनी मिळवलेला पैसे हा फक्त सामाजिक कार्यासाठी वापरलं जातो असा नाही तर या पैश्यातून उद्योग/ जमीन/ इमारती वैगरे ( असेट्स ) घेऊन त्यातून अजून पैसे मिळवला जातो आणि त्याचा परत उपयोग सामाजिक कार्यासाठी, धर्म प्रसार आणि धर्मरक्षण यासाठी केला जातो
मिळालेली संपत्तीची फक्त सामाजिक साठी खर्च करीत राहिली तर ती एक दिवस संपू शकते पण त्यापेक्षा ती अश्या पद्धतीने गुंतवली तर वाधेल
+ धार्मिक संस्थेमुळे आयकरात हि सूट मिळते ( या देशात तरी बाकी ठिकाणी माहित नाही )
असं कोणी हिंदू संस्था करते का नाही कोण जाणे ? सामाजिक कार्य खूप हिंदू देवळाचे ट्रस्ट करीत असतील पण असा उद्योग ?
हे एक उदाहरण एका देशातील , असे अनेक उद्योग जगभर असतील
https://www.sanitarium.com.au/about/sanitarium-story/profits-for-charita...

The Sanitarium Health and Wellbeing Company is the trading name of two sister food companies (Australian Health and Nutrition Association Ltd and New Zealand Health Association Ltd). Both are wholly owned by the Seventh-day Adventist Church.

कोहंसोहं१०'s picture

9 Sep 2020 - 4:26 am | कोहंसोहं१०

परदेशात उगम पावलेले जवळपास सर्वच धर्मांचे प्रमुख उद्दिष्ट धर्माचा विस्तार हेच होते आणि अजूनही आहे. मार्ग प्रत्येकाचे वेगळे आहेत.
पण सर्व अपेक्षा मात्र हिंदूंकडून आणि नावे मात्र हिंदू धर्मालाच जास्त ठेवणार. जेवढी जास्त नावे ठेवाल तेवढे तुम्ही आधुनिक. याला हिंदूच जास्त बळी पडत आहेत आणि इतर धर्मियांना तेच हवंय. त्यांच्या धर्मविस्ताराचे कार्य त्यामुळे सोप्पे होते.