लंचटाईम

rushikapse165's picture
rushikapse165 in जनातलं, मनातलं
30 Aug 2020 - 8:05 am

२०१७ साली शिक्षणासाठी मी पुण्यात आलो.शहर अनोळखी नव्हतं पण नवीन होत,त्यात पहिल्या वीस दिवसात मी माझ्या खोलीत एकटाच होतो,त्यामुळे खूप विचित्र वाटायच,रडायला यायचं.त्यात मला कोणाशी मैत्री करायला जरा जास्तच वेळ लागतो,म्हणून घराची आणि मित्रांची सारखी आठवण यायची.
पण हळूहळू मी त्या वातावरणात रुळू लागलो,मित्रही बनत गेले,पण शेवटी हाॅस्टेल आणि घर यांच्यात फरक तर असणारच ना.त्यात मला भूक सहन करणे म्हणजे अशक्य.तसा मी हाॅटेल मॅनेजमेंटच्या काॅलेजात असल्यामुळे दुपारच्या जेवणाची व्यवस्था काॅलेजमधचयेच असायची.१२:५० ला आम्ही डायनिंग हाॅलकडे जायचो,तिथे रांगेतून ताट घेऊन टेबलवर जाऊन बसायच.
पण आमच्यात काही जण होते ते घरुन डब्बा आणायचे,शेवटी मेसच्या जेवण चांगल नसतं हे हाॅस्टेलात राहणार्‍यांच ठरलेलं वाक्य.म्हणून मग घरच्या खाण्याची अोढ असायची.आमच्यात कुंडल आणि निशिगंधा रोज घरुन डब्बाचआणायचे.तशी आमची दहा जणांची गँग,निशिगंधा,ऋतुजा,साईश्वरी,सानिका,प्रतिक्षा,आणि पवन,मी म्हणजे ऋषिकेश,कुंडल,सुदिप आणि परिक्षित आणि मग कधी कधी तर ही गँग वाढायची.सुदिप आणि ऋतुजा सुद्धा कधीतरी डब्बा आणायचे पण कुंडल आणि निशिगंधाचा डब्बा नेहमीचाच.
त्यामुळे डब्बे दोन आणि हात दहा.पण तरी आम्हाला ते पुरायचे,आणि जर नाहीच पुरले तर या दोघांना समोरुन ताट घेऊन यायला सांगायच,कारण एका जणाला दोन वेळा जाता येत नसे.कुंडलला मधुमेह म्हणून त्याच्या डब्ब्यात कोरडी कोशिंबीर असायची,आणि भाज्याही साधारण तश्याच.पण निशिगंधा मात्र नेहमी काहीतरी नवीन आणायची.
एकदा तिने डब्ब्यात थालिपिठं आणली होती,एका छोट्या डब्बीत लोणी देखील होत.आणि थालीपीठ म्हणल की माझ्या आवडीचं,कारण मराठवाड्याचा असल्यामुळे मला धपाटे नेहमी खायला मिळत,धपाटं आणि थालीपीठ यांच्यात तस बरच साम्य.मी नेहमीसारखा माझ्या जागेवरुन उठून तिच्याजवळ गेलो,तो डब्बा घेऊन त्यातला अर्ध थालिपीठ माझ्यात थाळीत घेतल.आमच हे नेहमीचच.आणि मी म्हणजे सगळ्या डायनिंग हाॅलमधल्या अोळखीच्या डब्ब्यात हात घालून ते चाखणारा.
मागचीकित्येकमहिनेघरीचआहे,काॅलेजची,हाॅस्टेलची आठवण येतेय.आणि अजूनसुद्धा तो १२:५० चा लंचटाईम नेहमीप्रमाणे वेळापत्रकात आहे.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

छान आठवणी होस्टेलच्या !!

rushikapse165's picture

30 Aug 2020 - 9:32 pm | rushikapse165

होय.

अनिता ठाकूर's picture

31 Aug 2020 - 10:54 am | अनिता ठाकूर

लिखाण सुरु झालं आणि लगेच संपलं . शेवट ओघाने आला नाही. मात्र लिहिते रहा. आणखी एक सांगायचंय, 'डब्बा' नाही, ' डबा'. 'डब्बी' नाही, 'डबी'. हिंदीत डिब्बा म्हणतात , त्याचं मराठीकरण डब्बा झालं असावं, पण तसं होऊ नये, इतर भाषांचं आक्रमण आपल्या भाषेवर होऊ नये.

rushikapse165's picture

31 Aug 2020 - 2:23 pm | rushikapse165

होय नक्कीच.खरतर मी माझे लेखन नव्यानेच सार्वजनिक करतोय,व्याकरणाच्या आणि लेखनाच्या चुका माझ्या लक्षात येत आहेत,सुधारणा होत आहे.अश्याच प्रतिसादांची आवश्यकता आहे,सुधारणा होण्यासाठी.धन्यवाद!

केदार पाटणकर's picture

1 Sep 2020 - 2:02 pm | केदार पाटणकर

चांगले लेखन. थोडे विस्तृत हवे होते.

rushikapse165's picture

3 Sep 2020 - 7:14 am | rushikapse165

होय,धन्यवाद!