माझा अनुभव

सुमेरिअन's picture
सुमेरिअन in जनातलं, मनातलं
27 Aug 2020 - 2:39 am

मंडळी, गेली ८ वर्षे मी मिपावर वाचनमात्र आहे. पहिल्यांदाच लिहितो आहे.

साधारण ३ वर्षांपूर्वी मी पुण्याहून ह्यूस्टन (टेक्सास, USA) ला शिफ्ट झालो. माझे इकडे आल्यानंतरचे अनुभव इथे मांडतो आहे. हा लेख तुम्हाला थोडा तुटक वाटण्याची शक्यता आहे. यातल्या काही गोष्टी तुम्ही अगोदर ऐकल्या असतील, पण काही निश्चितच नवीन असतील. हि नवीन माहिती थोडीशी वेगळी आहे(इथे राहणाऱ्या लोकांसाठी पण). ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल असं मला वाटतं, म्हणून हा पहिला वाहिला लेखप्रपंच.
मिपावर एकाहून एक जबरदस्त लेखक आहेत. मी त्या league मध्ये दूरदूरपर्यंत कुठेही नाही हे जाणूनही हा लेख लिहिण्याचं धाडस करतो आहे.

ह्युस्टन आणि सबअर्ब्स मध्ये जवळपास २ लाख भारतीय राहतात. :)
इथे भरपूर इंडियन ग्रोसरी स्टोअर्स(कमीत कमी ५० - ७५), इंडियन हॉटेल्स (कमीत कमी १५०, त्यातले डेडिकेटेड महाराष्ट्रीयन २-3 च असतील) आणि मोठ्ठाले असे खूप मंदिरं आहेत (५० - ७५ तरी नक्कीच).
पाणीपुरी, मिसळपाव, झुणका भाकर पासून ते उकडीचे मोदक, पुरणपोळी पर्यंत सगळं अगदी चविष्ट मिळत. ४-५ ठिकाणी तर जेवण झाल्यावर पान खायची पण सोय आहे. Sarvana भवन आहे, महाराजा भोग थाळी आहे, इंडियन चायनीस रेस्टॉरंट्स आहेत, चाट सेंटर्स आहेत, इंडियन फूड ट्रक्स आहेत, प्युर व्हेज हॉटेल्स आहेत, अगदी स्वस्त ($६ मध्ये अख्खी थाळी), ते महाग आणि पॉश असे पण आहेत..
माझ्या घरापासून ३ मैलांवर एका रोडवरच ६ मोठ्ठाली मंदिरं आहेत. १ एकर पासून ५/६ एकरांपर्यंत क्षेत्रफळ असेल.
----
आता इथल्या लोकांबद्दल -
इथल्या देसी सरकल्स मध्ये मी थोडा इन्व्हॉल्व्हड आहे. मी भेटलेल्यांपैकी काही लोकं अगदी ५० वर्षांपेक्षा हि जास्त काळापासून इकडे आहेत. पण इथे येऊन कितीही वर्षं झाले तरीही हि सगळी लोकं मनानी तेवढीच भारतीय आहेत आणि अजूनही तितकीच भारतात गुंतली आहेत.
इथे आल्यानंतर इथल्या लोकांमधली देशभक्ती आणि देवभक्ती पाहून मी खरंच खूप आश्चर्यचकित झालो होतो. सणासुदीला इथली मंदिरं लोकांनी तुडुंब भरली असतात (दर गुरुवारी माझ्या घराजवळच्या साई मंदिरात ३००-४०० लोकं असतात आरतीला, उभं राहायला जागा मिळत नाही कधी कधी..). पूजा पाठ अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनी करण्यात येतो. इतर पण सगळी कर्मकांडं पण अगदी नियमानुसार पार पाडली जातात. होमहवन, यज्ञ, सत्यनारायण व इतर पूजा नियमित केल्या जातात.
माझं एक ऑबसेर्व्हशन - इथे BAPS , ISKCON सारखी चेन असलेली काही मंदिरं आहेत. पण बहुतांशी मंदिरं हि लोकल लोकांनी पुढाकार घेऊन बांधलेली आहेत. म्हणजे गेल्या अनेक दशकांमध्ये इकडे शिफ्ट झालेल्या लोकांचे ग्रुप्स झालेत, मग या छोट्या छोट्या ग्रुप्सनी त्यांचे त्यांचे मोठे मोठे मंदिरं बांधले. पुजारी लोकांसाठी असलेल्या special व्हिसावर भारतातून पुजारी recruit केले. हे मंदिरं म्हणजे या लोकांचं दुसरं घर आहे. घर आणि काम सोडून सगळ्यात जास्त वेळ या लोकांचा अजूनही या मंदिरांमध्येच जातो, सणासुदीला, वीकेंडला, सुटीच्या दिवशी वगैरे. भारतापासून दूर आल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरण्याचा हा एक प्रयत्न असू शकेल (मिपा चे अनेक वाचक अमेरिकेतले आहेत आणि इकडे बऱ्याच काळापासून स्थायिक आहेत हे मला माहित आहे. त्यांचा अनुभव आणि ज्ञान माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. मी लिहितोय तो पूर्णपणे माझा दृष्टिकोन आहे)
----
इथल्या लोकांची मनं देशभक्तीने ओतप्रोत भरलेली आहेत. G D बक्षी सर मागच्या वर्षी इथे आले होते. त्यांच्या शब्दात सांगायचं तर एवढी देशभक्ती त्यांना भारतात पण दिसली नाही (मला पण तसच वाटतं). काही उदाहरणं मी पाहिलेली -
१. सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर यांच्या दुःखद निधनानंतर multiple ठिकाणी श्रद्धांजली सभा आणि भाषणं आयोजित करण्यात आली
२. Ram जन्मभूमी च्या निकालानंतर इथे जागोजागी सेलेब्रेशन्स करण्यात आले. सगळ्या मंदिरांमध्ये श्री रामाची पूजा आणि तत्सम कार्यक्रम organise करण्यात आले (कोरोना च्या पहिले पर्यंत हे चालू होतं. आता online होतात). अयोध्येला जाणार आहेत लोकं इथून एकदा situation बेटर झालीकी
३. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ह्युस्टन हुन भारतात मतदारांना जवळपास २०,००० ते २५,००० कॉल्स करण्यात आले. त्यामध्ये मतदारांना वोटिंग करण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं.

४. इंडिया vs पाकिस्तान - इथे भारतीय ओरिजिनचे आहेत तेवढेच पाकिस्तानी ओरिजिनचे लोकं पण आहेत. आणि या दोन community मध्ये शीतयुद्ध नेहमीच चालू असते. आता बघा - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लोकांनी पाकिस्तानी consulate समोर घोषणा दिल्या. पाकिस्तानी लोकांना याची खबर पहिलेच लागल्यामुळे ते मोठ्या संख्येने पहिलेच आले होते आणि काउंटर घोषणा देत होते (मोस्टली मोदी विरोधी). पुलवामा नंतर बऱ्याच भारतीयांनी पाकिस्तानी ग्रोसरी स्टोअर्स, रेस्टॉरंट्स मध्ये जाणे बंद केलं (मी पण नाही गेलो नंतर कधीच). पाकिस्तान्यांचे भारत विरोधी प्रोटेस्टस चालूच असतात. इथून बरंच funding पाकिस्तानमध्ये पण जातं असं ऐकलं आहे. त्यामुळे पाकिस्तान्यांच्या businesses आणि कारवायांना ला आपला हातभार नको म्हणून हे बॉयकॉट.
पुढे ३७० कॅन्सल केलं तेव्हा पाकिस्तानी लोकांनी आपल्या consulate वर येऊन निदर्शनं दिलेत. तेव्हा आम्ही तिथे जाऊन काउंटर घोषणा देत होतो (पाकिस्तानी लोकांची संख्या हि नेहमी आपल्यापेक्षा जास्तच राहिली आहे हि दुःखाची बाब). तर असे प्रोटेस्टस, काउंटर प्रोटेस्टस चालूच असतात ('Howdy मोदी' बद्दल पुढे लिहिलं आहे). तर लोकं अजिबात भारताविरुद्ध काही खपवून घेत नाहीत. मग पाकिस्तानी असो कि चिनी.

५. इथे ६ देसी रेडिओ चॅनेल्स आहेत. त्यातले ४ जुने आणि सगळ्यात जास्त चालणारे चॅनेल्स हे पाकिस्तानी ओरिजिनच्या लोकांचे आहेत (रेडिओ चॅनेल्स च्या बाबतीत आपण खूप मागे होतो म्हणून हे २ चॅनेल्स चालू करण्यात आले). त्यातल्या काही चॅनेल्स वरून भारताविरोधात कधी कधी गरळ ओकली जाते. पाकिस्तानचे गोडवे नेहमीच गायले जातात. जे टॉप च चॅनेल आहे, त्याचा मालक पाकिस्तानी ओरिजिनचा आहे. त्याच्या मते, त्याचं चॅनेल हे इंडिया - पाकिस्तान असा भेदभाव करत नाही. (हा खरं तर मोठा वादाचा मुद्दा आहे, बराच वाद पण झाला आहे. पण सध्या मी त्याबद्दल इथे लिहिणं टाळतो). तर हा पाकिस्तानी चॅनेल owner इथला मीडिया किंग म्हणून ओळखला जातो. तो भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांचे खूप shows वर्षभर organise करत असतो. नेहा कक्कर, मिका सिंग, श्रेया घोषाल आणि भारतातील अनेक नामवंत कलाकार आणि ऍक्टर actresses त्याच्या कार्यक्रमासाठी इकडे येऊन गेले आहेत. पुलवामा नंतर परिस्थिती बदलली. भारतीयांनी त्याचे shows बॉयकॉट करायला सुरुवात केली आणि भारतीय कलाकारांनी त्याला साथ देऊ नये यासाठी प्रयत्न चालू केले. पण भारतीय कलाकारांच्या ते पचनी पडत नव्हतं. मिका सिंग तर याला 'brother from another mother' म्हणायचा. नंतर याच्या एका इव्हेंट साठी बेशरम मिका पाकिस्तानला गेला आणि इंडस्ट्री नी मिका ला बॅन केलं. तेव्हा पासून मिका गप्प आहे. सलमानखानचा आयोजित शो रद्द व्हावा म्हणून इथल्या लोकांनी प्रयत्न केले, पण सलमान खान ऐकत नव्हतं. इंडियन गव्हर्नमेंट नी शेवटी सर्कलर काढून सगळ्या इंडियन आर्टिस्ट्स याच्या सोबत काम करण्यास बॅन केलं तेव्हा कुठे सलमान चा शो कॅन्सल झाला. मनसेचे राहुल शेवाळे आणि भरतीत मीडिया नी हा मुद्दा उचलून ठेवला म्हणून हे यश मिळू शकलं.

बरेचसे देशप्रेमी लोकं हे खूप अग्ग्रेसिव्ह पण आहेत (कुठे कुठे अतिरेक होतो). सारख्या मिटींग्स चालू असतात. ब्लॉग्स, ग्रुप्स, बुक्स, वेबिनार.. भारतातून अनेक नामवंत लोकं इकडे भाषणासाठी, संबोधन करण्यासाठी येत असतात. इथल्या भारतीय घरांमध्ये सकाळी अमेरिकेच्या पहिले भारताची news बघितल्या जाते. रात्रभर जागून election चे results बघितल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर साजरे पण केले जातात. भारतातल्या social वर्क साठी आणि गरजूंसाठी बरीच मदत पण पाठवली जाते. दिवाळी सारखे सण मोठ्या प्रमाणावर आणि दणक्यात साजरे करण्यात येतात.
----
प्रो-BJP - इथले बहुतांश भारतीय हे प्रो BJP आहे. मोदींचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. म्हणूनच 'Howdy मोदी' सारखा महाकाय इव्हेंट होऊ शकला आणि ५०,००० लोकंही गोळा झाले होते. इथल्या अनेक लोकांचे भारतातील टॉप पोलिटिकल लीडर्स आणि इतरही क्षेत्रातल्या नामांकित लोकांसोबत close connection आहेत.
----
HOWDY मोदी - या महाकाय इव्हेंटच्या आयोजनामध्ये जवळपास १५०० volunteers इन्व्हॉल्व्हड होते. hierarchy होतीच. २ महिने खूप तयारी चालू होती. रोजच्या मिटींग्स आणि शेवटी शेवटी रात्रंदिवस काम चालू होतो. पाकीस्तानी लोकं त्यांचं काम करत होते. अँटी मोदी bill boards लावणं, ट्रक्स वर मोदीविरोधी फ्लेक्स लावून ते ह्युस्टन मध्ये फिरवणं असं सगळं चालू होतं.. ऐन इव्हेंट च्या दिवशी प्रोटेस्टस साठी म्हणून ह्युस्टन च्या बाहेरूनही खूप लोकं जमले होते. इव्हेंट च्या तयारी बरोबरच, या लोकांनी कार्यक्रमाला गालबोट लावू नये म्हणूनच्या तयारी मध्ये पण वेळ जात होता. ३७० नंतर लगेचच HOWDY मोदी असल्याने वातावरण अजूनच तापलं होतं. पण volunteers च्या प्रयात्नांमुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. प्रोटेस्ट साठी पाकिस्तानी लोकांना बरीच दूरची जागा दिली गेली, त्यामुळे कार्यक्रमाला प्रोटेस्टस चा काही फरक पडला नाही. ट्रम्प येणार असल्यामुळे organisers ला अजूनच मदत झाली.
----
ABCD - इथे जन्म होऊन मोठ्या झालेल्या भारतीय पोरांना ABCD (American Born Confused Desi) म्हणतात असं समजलं. मी वरती लिहिलेलं सगळं यांना अँप्लिकेबल नाही.
----

आता थोडा ट्रॅक चेन्ज करतोय..

culture change चा अनुभव आहेच.
- इथे सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ट्रॅफिकचे नियम आणि शिस्त! सगळे लेनची शिस्तं पाळतात, वाहतुकीचे नियम पाळतात. त्यामुळे तासन तास गाडी चालवली तरी थकवा येत नाही.. शारीरिक आणि मानसिकही.. खूप ट्रॅफिक असली/लं तरी.. सगळ्या गोष्टी सोप्या होतात याने.
लोकांना कायद्याची भीती आहे. fines खूप हेवी आहेत. तुम्हाला तुमच्या चुकीची जबाबदारी घेऊन सगळे खर्च उचलावे लागतात. त्यात कंबरडं मोडतं. म्हणून सगळे गपचूप नियम पाळतात.
- धूळ नसल्यामुळे पण बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. गाडी, घर, कपडे स्वच्छ ठेवणं खूपच सोपं होऊ जातं.
- वॉशर, ड्रायर, रोबोक्लीनर्स आणि इतर ऑटोमेशनचा पण खूप फायदा होतो.
- license, टॅक्सेस, अँप्रोव्हल्स वगैरे सरकारी कामं सगळं मोस्टली online होऊन जातात, कार्यालयात जावं लागलं तरी किचकट काही नसतं. (आपल्याकडची पासपोर्ट प्रोसेस जशी आता सोपी आणि सुरळीत झाली आहे तसं)
- वर्क life बॅलन्स बेस्ट आहे. सकाळी खूप लवकर ऑफिस चालू होतं (माझे मित्र सकाळी ७ ला ऑफिसला पोहोचतात आणि ३.३० ला घरी जाण्यास निघतात), आणि ५ नंतर सगळी तुमची पर्सनल life. भारतात माझे कॉल्स रात्री ८ च्या पहिले कधीच संपत नसत.
- पोरांना शिक्षणाचं खूप ओझं नाही. स्पोर्ट्स/ music / art शिकण्यासाठी खूप स्कोप असतो त्यांना..
- Govt खूप सोयी सुविधा देते. खूप सुंदर, संख्येने खूप जास्त आणि मोठे पार्क्स आणि रेक्रीशनल ऍक्टिव्हिटीएस. खेळण्यासाठीच्या सुविधा. कॅम्पिंग आणि बऱ्याच इतर आऊटडोअर ऍक्टिव्हिटीएस. पब्लिक साठी वीकली इव्हेंट्स. अमेझिंग पब्लिक लायब्ररीयस. आणि इतर बरंच काही. आणि सगळं निःशुल्क.
(हे सगळं खूप छान असलं तरी मला परत जायचंय, आणि मी कधी एकदा पुण्याला परत शिफ्ट होईन याची वाट बघतोय..)

अजूनही बरेचसे अनुभव आहेत. पण या लेखाद्वारे मी कितपत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन ते कळत नाहीये. तेव्हा इथेच थांबतो.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

27 Aug 2020 - 3:25 am | अनन्त अवधुत

त्यांना समर्थन असावे. मूळ समर्थन भारताला असायला हवे. पण ते जाऊ देत, त्यांना काही भारतात मतदान करता येत नाही. अमेरिकेत त्यांचे मत कुणाला जाणार आहे? तात्या कि बायडेन?

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:07 am | सुमेरिअन

भारताला समर्थन आहेच. पण मोदी PM असल्याने जोश आणि acitivities खूप वाढल्या आहेत.
बाकी तात्या की बायडेन म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानी community चा विचार केला तर बायडेन नेहमीच त्यांच्या जवळचे राहिले आहेत. ट्रम्प च्या तुलनेत. कमलाबाईंची आई जरी भारतीय असली तरी कमला बाईंचं भारतावर खूप प्रेम आहे असं अजिबात नाही. काश्मीरच्या मुद्द्याला तर त्यांनी जाहीर विरोध केला होता.

चौकस२१२'s picture

28 Aug 2020 - 6:50 am | चौकस२१२

ट्रम्प तात्यांचा " एकमेवद्वितीय ! " पणा जरी बाजूला ठेवला तरी अमेरिकेतील ९ बहुतेक पाश्चिमात्य देशातील ) भारतीयांचा कोणता झेंडा हाती धरू ( दावे डेमोक्रॅट कि उजवे रिपब्लिकन ) याबद्दल संभ्रम होत असतो...खास करून भारतात असताना जे उजव्या विचारसरणीचे होते त्यांना पाश्चिमात्य देशातील डाव्या विचारसरणीला मत देताना हे डावे भारताशी बहुतेकदा नीट वागत नाहीत हे दिसत असते आणि भारताला उपयोगी पडणारे रिपब्लिकन ना मत द्व्यावे तर एक स्थलांतरित म्हणून हे उजवे किती आपली विरोधात आहेत ( वर्णद्वेष वैगरे) हे हि दिसत असते...अडचणच

कंजूस's picture

27 Aug 2020 - 8:36 am | कंजूस

धन्यवाद.
नातेवाईक जेव्हा भारतात येतात तेव्हा हा विषय गप्पांमध्ये घेत नाही कारण तुलना करण्यात कधी " तिकडे जाऊ शकलो नाही म्हणून मत्सराने विचारतात" असा गैरसमज होऊ शकतो. कधी कधी मागे टिंगलही होते.

भुजंग पाटील's picture

27 Aug 2020 - 8:55 am | भुजंग पाटील

ह्युस्टन मध्ये संघाच्या शाखा आणि इतर संघकार्य सुद्धा बर्‍याच उत्साहात सुरू असते.

पॅन्डेमीक काळात ते करत असलेले मदत कार्य खरेच वाखाणण्याजोगे आहे.
https://www.facebook.com/Hindu-Swayamsevak-Sangh-Houston-2152002398420924

आणि हे त्यांचे गेल्या दसर्याचे संचलनः
https://www.youtube.com/watch?v=f1L_DQirKis

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:09 am | सुमेरिअन

खरंय पाटील साहेब. हे लिहायचं राहूनच गेलं. खूप छान काम करतेय HSS.
बाकी त्या दसऱ्याच्या संचालनाच्या विडिओ मध्ये मी पण आहे :)

vikramaditya's picture

27 Aug 2020 - 9:18 am | vikramaditya

हे सगळं खूप छान असलं तरी मला परत जायचंय, आणि मी कधी एकदा पुण्याला परत शिफ्ट होईन याची वाट बघतोय..)

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:26 am | सुमेरिअन

आई, बाबा, आजी, आजोबा पुण्याला आहेत.
नातेवाईक, मित्रमंडळीं, खादाडी, इव्हेंट्स, ट्रेकिंग.. ३६० डिग्री life असते पुण्यात..

मनोगत आवडले... असेच लिहीत रहा.

नंतर याच्या एका इव्हेंट साठी बेशरम मिका पाकिस्तानला गेला आणि इंडस्ट्री नी मिका ला बॅन केलं. तेव्हा पासून मिका गप्प आहे. सलमानखानचा आयोजित शो रद्द व्हावा म्हणून इथल्या लोकांनी प्रयत्न केले, पण सलमान खान ऐकत नव्हतं. इंडियन गव्हर्नमेंट नी शेवटी सर्कलर काढून सगळ्या इंडियन आर्टिस्ट्स याच्या सोबत काम करण्यास बॅन केलं तेव्हा कुठे सलमान चा शो कॅन्सल झाला.
कभी कभी मेरे दिल मैं खयाल आता है, भगवान व्यक्ती को उसके कर्म का फल उसी जन्म में क्यों नही देता !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tuch Sukhkarta Banjo Cover

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:32 am | सुमेरिअन

धन्यवाद!
टंकनात काही चुका झाल्या आहेत. पुढच्या वेळेला काळजी घेईन.

टंकनात काही चुका झाल्या आहेत. पुढच्या वेळेला काळजी घेईन.
मला टंकनातील चूक दर्शवायची नसुन ऐकत कोण नव्हता ते दर्शवायचे होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek Dantaya Vakratundaya Cover by Dhruvit Shah

माझिया मना's picture

27 Aug 2020 - 9:57 pm | माझिया मना

लेख तुटक नाही वाटला. सगळ्या विषयांना हात घातला गेलाय त्यामुळे विषय आवरते घेतलेत असे वाटले. पण तरीही वाचायला छान वाटला.

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:33 am | सुमेरिअन

अनेक धन्यवाद! :)

कपिलमुनी's picture

28 Aug 2020 - 1:10 am | कपिलमुनी

छान ! खूप दिवस मुक्तपीठ मिस करत होतो.
आज वाचून आनंद झाला

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:34 am | सुमेरिअन

धन्यवाद! मिपावरील मातब्बर मंडळींचा प्रतिसाद पाहून भारी वाटतंय! :D

सुमेरिअन's picture

28 Aug 2020 - 1:47 am | सुमेरिअन

अजून एक लिहायचं राहिलं.
इथले पॉप्युलर काँग्रेसमन आहेत त्यांचं नाव आहे 'श्री(Sri) कुलकर्णी'!! :D मागच्या वर्षीच्या निवडणुकीत थोडे अजून votes मिळाले असते तर ते निवडून पण आले असते. त्यांचे वडील वेंकटेश कुलकर्णी पुण्याहून इकडे आले होते.
मी इथे आलो तेव्हा कुलकर्णी नावाचे पोस्टर्स, campaign आणि कुलकर्णी नावाच्या माणसामागे एवढे अमेरिकन लोकं बघून पाहून फार भारी वाटलं होतं मला.. :)

चौकस२१२'s picture

28 Aug 2020 - 4:15 am | चौकस२१२

.."माझं एक ऑबसेर्व्हशन - इथे BAPS , ISKCON सारखी चेन असलेली काही मंदिरं आहेत. पण बहुतांशी मंदिरं हि लोकल लोकांनी पुढाकार घेऊन बांधलेली आहेत.
हे
आपले निरीक्षण अगदी चपखल आहे , अनेक देशात असेच आहे
BAPS , ISKCON हे पंथ (सेक्ट ) आहेत स्वतःला हिंदू तरी समजतात कि नाही कोण जाणे . एक जण "कृष्ण सुप्रीम गॉड हेड" म्हणून बाकी सब झूट म्हणणार तर दुसरे " प्रमुख स्वामीमहाराजांचे पूजन ( देव राहील बाजूला) आणि श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन
यांच्या लोकांनी पुढाकार घेऊन पेक्षा निर्माण केलेल्या देवळात मला तरी जास्त भावते तिथे कोण एक पंथ, बाबा बुवा , ताई महाराज यांचे अवडंबर नसते ,, राधा कृष्ण पासून शंकर महादेव सगले एका ठिकाणी मेनू तुन आपण पाहिजे ते घ्या... अर्थात यात पण पुढे तुकडे पडायला लागतात.. पुरेसे संख्याबळ झाले कि मग "जय माता दि वाले ' वेगले होतात, राधा कृष्ण वाल्यांनान पासून रामल्ला वेगळे.... इत्यादी
हे सगळं बघून " विविधता" हे हिंदू धर्माला मिळालेले वरदान आहे कि शाप असे वाटू लागते ..

शा वि कु's picture

28 Aug 2020 - 9:11 am | शा वि कु

ABCD वर हसन मिन्हाजचा एक रंजक व्हिडीओ तुनळीवर पाहिलेला.
https://youtu.be/CFfNIsnScdc

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2020 - 10:40 pm | चौथा कोनाडा

वेगळ्या पद्धतीने छोट्या बाबी मांडणारा लेख !
चर्चा देखिल छान सुरु आहे, वाचत आहे
लेखन आवडले... असेच लिहीत रहा.

सुमेरिअन's picture

15 Sep 2020 - 12:10 am | सुमेरिअन

धन्यवाद!
इतकी वर्षे मी मिपावरील लेख, कंमेंट्स वाचण्यापुरता मर्यादित होतो. एकाहून एक लेख आणि कंमेंट्स असतात. आज माझ्या लेखावरील दिग्गज मंडळींच्या कंमेंट्स बघून एकदम celebrities ना भेटल्याचा फील येतोय.. :D :D

अनन्त अवधुत's picture

29 Aug 2020 - 5:43 am | अनन्त अवधुत

पाकिस्तानी लोकांची संख्या हि नेहमी आपल्यापेक्षा जास्तच राहिली आहे हि दुःखाची बाब

ह्यात एक बाब अशी आहे की निदर्शनं करणारी सगळी जनता पाकी नसते. त्यात इराणी, बांग्लादेशी, लंकन ह्यांचा पण भरणा असतो.

सुबोध खरे's picture

30 Aug 2020 - 12:00 am | सुबोध खरे

सुंदर लिहिलं आहे.
पाकिस्तानी असो किंवा इराणी भारतात मुसलमानांवर अत्याचार होतात हे त्यांना शाळेपासून शिकवले जाते यामुळे ते सर्व लोक भारताबद्दल पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन बाळगतात. माझ्या अमेरिकेतच डॉक्टर असलेल्या वर्गमैत्रिणीने पाकिस्तानी डॉक्टरशी लग्न केले आहे त्यामुळे त्याच्या संपर्कातील एकंदर मंडळींचा दृष्टिकोन तिच्याकडून सतत समजत असतो.

आणि या एकंदर मित्रवर्गाच्या विचारसरणी मुळे तिच्यात आणि नवऱ्यात एक तर्हेची दरी निर्माण झाली आहे. नवरा वेगळा सुटीवर जातो(पाकिस्तानात)आणि ही भारतात.

एकंदर दोन विचार प्रवाह सहज मिसळू शकत नाहीत हे तिच्या बोलण्यावर जाणवते.

सुमेरिअन's picture

15 Sep 2020 - 12:05 am | सुमेरिअन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब!
तुमच्या लेखनाचा चाहता आहे मी. तुमचा नवीन लेख दिसला कि अधाश्यासारखा वाचून काढतो नेहमी :D

सुमेरिअन's picture

10 Nov 2020 - 12:22 am | सुमेरिअन

२ वर्षांपूर्वी कुळकर्णी यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. या वेळेला पुन्हा पराभव झालाय, ५-६% मतं अजून कमी झाली आहे.

याची कारणं माझ्या मते -
१. १८ वर्षी त्यांना ड्रुग्स च्या प्रकरणात शिक्षा झाली होती. ते प्रकरण उकरून काढून त्याचं भांडवल बनवल्या गेलं.
२. श्री कुळकर्णी हे स्वतःचं नाव 'श्री प्रेस्टन कुळकर्णी' असं लावतात. या वेळेला त्यांनी प्रेस्टन या नावाने जास्त प्रचार केला. तर विरोधकांनी त्यांना सगळीकडे 'श्रीनिवास कुळकर्णी' असं संबोधित केलं. (टेक्सास हे रिपब्लिक लोकांचं राज्य आहे. इथे बाहेरच्या लोकांना राजकारणात सहज खपवून घेतल्या जात नाही. म्हणून हा सगळा प्रपंच)
३. कुळकर्णी हे NY च्या 'बर्निंग मॅन' या ग्रुप सोबत संलग्नित आहेत. या ग्रुपचं रेप्युटेशन काही चांगलं नाही. त्याचा उपयोग त्यांच्या विरोधात करण्यात आला.
४. HSS (RSS) च्या लीडर्स सोबत कुळकर्णी दिसल्याने मुस्लिम संघटनांनी मागच्या वेळी दिलेला सपोर्ट काढून घेतला.

वरील मुद्दे १,२ आणि ३ - याच्या प्रिंटाऊट्स मतदार संघातील सगळ्या घरांमध्ये पाठविण्यात आल्या होत्या (मला पण आली एक कॉपी). या कॉन्टेन्टस च्या ads डिझायच्या continuous फीड मध्ये. कुळकर्णी जिंकले असते तर आनंद झाला असता.

https://www.businessinsider.com/texas-22nd-district-house-election-troy-...
https://theintercept.com/2020/10/29/sri-kulkarni-congress-indian-politics/
https://www.sacurrent.com/the-daily/archives/2018/08/21/republicans-slam...