झोका

Primary tabs

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
28 Jul 2020 - 7:43 pm


उंच उंच झोका जाई 
निळ्या आभाळात ।
फिरी येता गोळा होई 
जीव काळजात ॥१॥

शैशवात वाटे येई 
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस 
कळे तो आभास ॥२॥

घेत झेप याैवनात 
जमिनीस सोडी ।
वाऱ्यास जाई कापीत 
गगनास जोडी ॥३॥

कुरकुर ही कड्यांची 
आताशा जराशी ।
संधीकाली विसावली 
लय पश्चिमेशी ॥४॥

त्रिकालातुनी विहार 
हिंदोळा घडवी ।
अन् राधेची कृष्णावर
प्रीतही जडवी ॥५॥

.

कविता

प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

29 Jul 2020 - 11:44 am | मन्या ऽ

वाह...

मी-दिपाली's picture

31 Jul 2020 - 10:36 am | मी-दिपाली

धन्यवाद _/\_

गणेशा's picture

29 Jul 2020 - 3:47 pm | गणेशा

फोटोसहित शब्द छान वाटले

मी-दिपाली's picture

31 Jul 2020 - 10:36 am | मी-दिपाली

धन्यवाद _/\_

Bhakti's picture

29 Jul 2020 - 4:15 pm | Bhakti

खुप सुंदर रचली आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झोक्यावर झुलण... सुंदरच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2020 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप सुंदर रचली आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झोक्यावर झुलण

सेम असेच बोलतो.
लिहिते राहा. कविता आवडली.

-दिलीप बिरुटे

मी तर गुणगणली खुप वेळा.. मस्तच लिहिलंय

मी-दिपाली's picture

31 Jul 2020 - 10:35 am | मी-दिपाली

धन्यवाद _/\_

घाल घाल पिंगा वार्‍या या गाण्याची चाल चपखल बसते.

मी-दिपाली's picture

31 Jul 2020 - 10:35 am | मी-दिपाली

धन्यवाद _/\_

एस's picture

2 Aug 2020 - 2:25 am | एस

शैशवात वाटे येई
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस
कळे तो आभास ॥२॥

ह्या पंक्ती फार आवडल्या.