उंच उंच झोका जाई
निळ्या आभाळात ।
फिरी येता गोळा होई
जीव काळजात ॥१॥
शैशवात वाटे येई
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस
कळे तो आभास ॥२॥
घेत झेप याैवनात
जमिनीस सोडी ।
वाऱ्यास जाई कापीत
गगनास जोडी ॥३॥
कुरकुर ही कड्यांची
आताशा जराशी ।
संधीकाली विसावली
लय पश्चिमेशी ॥४॥
त्रिकालातुनी विहार
हिंदोळा घडवी ।
अन् राधेची कृष्णावर
प्रीतही जडवी ॥५॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6992
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह...
धन्यवाद _/\_
In reply to वाह... by मन्या ऽ
फोटोसहित शब्द छान वाटले
धन्यवाद _/\_
In reply to फोटोसहित शब्द छान वाटले by गणेशा
सुंदर
असेच म्हणतो.
In reply to सुंदर by Bhakti
मी तर गुणगणली खुप वेळा..
In reply to असेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद _/\_
In reply to मी तर गुणगणली खुप वेळा.. by Bhakti
धन्यवाद _/\_
In reply to असेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शैशवात वाटे येई
फारच सुंदर!
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Avrodh – The Siege Within | SonyLIV Originals |छान
तुझ्या कवितमुळे काव्य