पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत.
कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी,
ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा
(आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्याला माफ करणं, किंवा
प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर,
अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं !
शिवाय ही थिअरी मानणार्याला,
पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो,
त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत;
तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो.
त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद,
जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात.
त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही.
यास्तव ही पोस्ट.
_____________________________________
या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत,
त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही.
तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल.
तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim
थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्यांनी तो सिद्ध करायचा आहे.
_______________________________
या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे :
मना त्वांची रे पूर्वसंचित केले ।
तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥
१. हा सिद्धांत मांडणार्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.
२. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही.
३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी.
अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही.
४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही.
५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ !
अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत.
______________________________
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते.
कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत.
--मिपा व्यवस्थापन.
प्रतिक्रिया
8 Jul 2020 - 1:43 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
गैरफायदा म्हणजे काय? एखादं उदाहरण मिळेल काय?
आ.न.,
-गा.पै.
8 Jul 2020 - 2:33 am | कोहंसोहं१०
शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही >>>>>>>>> अरे असे कसे? तुमचा मेमरी स्ट्रिंगचा अभूतपूर्व सिद्धांत (:D) तर सांगतो की अशी चूक होऊ शकते आणि आता तुम्ही म्हणताय शक्यताच उरत नाही.
कमाल आहे :D
तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर:
"नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.
या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.
अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला !
अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे"
8 Jul 2020 - 3:35 pm | संजय क्षीरसागर
धन्यवाद !
हा मुद्दा या लेखाच्याच कंटिन्यूटीमधे येणार्या पुढच्या लेखात क्लिअर होईल किंवा चर्चा त्या दिशेनं गेली तर इथेच सिद्ध होईल.
8 Jul 2020 - 7:52 pm | कोहंसोहं१०
बर्याच वर्षांनी पहिला सुसंबद्ध प्रतिसाद ! धन्यवाद ! >>>>>>>> माझा प्रतिसाद आपलीच दोन परस्परविरोधी विधाने दाखवून देण्यासाठी होता. त्याला सुसंबद्ध म्हणून आपण आपल्या विधानातील विरोधीपणा बऱ्याच वर्षांनी (बहुतेक पहिल्यांदाच) मान्य केल्याबद्दल आपले धन्यवाद आणि अभिनंदन.
8 Jul 2020 - 8:13 pm | अर्धवटराव
पूर्वी 'काळ अस्तित्वात नाहि' असा दावा असायचा... आता 'वर्तमान काळ आहे' इतपत प्रगती झाली आहे ;)
8 Jul 2020 - 6:17 am | सोत्रि
ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. अमेरिकन / ब्रिटीश मानसशास्त्रिय जर्नल्समधल्या लेखांचे आधार दिल्यास उत्तम. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. खासकरून मेमेरी ह्या विषयाला वाहिलेले.
ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.
जिनोम, असो. :)
अशी प्रणाली अस्तित्वात नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.
#३ आणि ४ यांचा पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत ह्याच्याशी काही संबंध नाही, सबब, ते अवांतर होऊ शकते.
- (शास्त्रिय बैठक असलेला साधक) सोकाजी
8 Jul 2020 - 8:03 am | सोत्रि
कृपया # ४ आणि ५ असं वाचा
- (माणूस) सोकाजी
8 Jul 2020 - 8:23 am | शा वि कु
5 एखाद्या वेळेस ठीक. 4 कसे अवांतर ? कोणत्याही कॉज इफेक्ट नात्यामध्ये नियम (अल्गोरीथम) असतातच ना ? कर्मविपाक सिद्धांत पण कॉज इफेकट् आहे असेच सांगतो ना ?(? चुभुद्याघ्या)
8 Jul 2020 - 9:21 am | सोत्रि
#४ हा कर्मविपाक सिद्धांतवर काहीही भाष्य नसून करता नीती - अनीती पाप-पुण्य ह्या संकल्पनांवर साधारण टिप्पणी आहे. त्यामुळे ते अवांतर आहे.
कर्मविपाक सिद्धांत त्या संकल्पनांवर आधारित नाही.
'जे पेराल ते उगवेल' हा साधा निसर्गनियम आहे जे कर्मविपाकाचं सार आहे. (साधकांसाठी, शब्दजंजाळात अडकलेल्यांसाठी नाही! :) )
- (मुमुक्षू) सोकाजी
8 Jul 2020 - 3:30 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही लेख न वाचताच, भारंभार प्रतिसाद देतायं !
शेवट वाचा :
8 Jul 2020 - 3:26 pm | संजय क्षीरसागर
१.
माझी विधानं ही उघड आणि निर्विवाद वस्तुस्थिती असतात त्यामुळे त्यांना कोणत्याही एक्सटर्नल लिंकची गरज नाही. उलट, मानसशास्त्राज्ञांनी अभ्यास केला तर ही विधानं रिसर्च पेपर्समधे येतील अशी परिस्थिती आहे.
मी इथल्या सर्व सदस्यांना आवाहन करतो की `स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही' याचा प्रतिवाद करु शकणारा जगातल्या कोणत्याही संशोधनाचा दाखला त्यांनी दाखवावा. ते असंभव आहे.
२.
मृत्यूनंतर देहासमेत मेंदूही पुन्हा पंचतत्वात मिसळतो ही उघड गोष्ट आहे. तस्मात, वर १ मधलं उत्तर इथे ही लागू आहे.
३.
इतकी उघड गोष्ट लक्षात यायला संगणकाचं प्राथमिक ज्ञान पुरेसं आहे. जिपीएसवर साधं उजवीकडे का डावीकडे वळायचं या निर्णयासाठी लोकेशन आणि डेस्टीनेशन रिअल टाईम बेसिसवर मॉनिटर करायला लागतं. कर्मसिद्धांत ही त्याचीच कित्येक पटीनं पुढची पायरी आहे.
३.
फंडाच लक्षात न आल्यानं हे वाक्य आलं आहे.
पाप-पुण्य हाच कर्मविपाक आहे आणि गतकालातल्या कर्माचं पुढे फलित याला कर्मसिद्धांत म्हणतात.
8 Jul 2020 - 6:30 am | अर्धवटराव
असो.
8 Jul 2020 - 10:07 am | Rajesh188
नेहमी सारखं च तत्ज्ञान त्यांच्या पुरतेच सत्य असलेले .
आणि वरवर विचारावर आधारित.
विचाराची खोली वाढवावी अशी सूचना.
8 Jul 2020 - 11:56 am | प्रसाद गोडबोले
मला संक्षी आणि यनावाला ह्यांच्यातील जुगलबंदी पहायची आहे , कोणी तरी यनावालांना बोलवा रे मिपावर परत =))))
8 Jul 2020 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले
तुमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणे व्यर्थ आहे हे कळुन चुकलं आहे पण तरीही फार मजा येतेय म्हणुन चला प्रतिसाद प्रतिसाद खेळु
आता खालील चित्र नीट पहा : ह्या चित्रात आपल्याला कोणता प्राणी दिसत आहे ते सांगा
दिसले का काही ? का नाही दिसलं ?
दिसले असेल तर हार्दिक अभिनंदन ! नसेल दिसले तर ह्यात कोणत्याही प्राण्याची आकृती नाहीच असा हेका धरणार काय ?
तात्पर्य इतकेच आहे आपल्याला जे काही ज्ञान होत असते ते ज्ञानेंदियांच्या मार्फत मिळणार्या अनुभावांवरुन होत असते आणि आपला मेंदु ती माहीती प्रोसेस करत असतो. पण ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत, त्यामार्फत मिळणार्या माहीतीला मर्यादा आहेत आणि ती प्रोसेस करणार्या ब्रेनलाही मर्यादा आहेत. त्यामुळे जे तुम्हाला कळत नाही , जे तुमच्या आकलनक्षमतेच्या परे आहे, ते सारेच फंडामेंटल घोळ आहे असे मानणे हे अत्यंत बालीषपणाचे लक्षण आहे किंव्वा वाळवंटी धर्मांच्या मानसिकतेचे !
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥
पण असो. चित्रात कोणत्याही प्राण्याची आकृती दिसल्यास जरुर कळवा =))))
8 Jul 2020 - 12:40 pm | अभ्या..
मला हरण दिसले
8 Jul 2020 - 1:53 pm | प्रसाद गोडबोले
अभ्याशेठ,
काय म्हणता ! कसे आहात ?
आणि हरीण नाहीये बे , जिराफ आहे =))))
8 Jul 2020 - 2:16 pm | अभ्या..
जिराफ म्हणजे उंच मानेचे जरा मोठे हरण च असते.
8 Jul 2020 - 6:25 pm | अर्धवटराव
च्यायला... मला कौठलाच प्राणी दिसला नाहि :(
पानं खाऊन पळाला कि काय ?? :)
8 Jul 2020 - 11:25 pm | प्रसाद गोडबोले
तुम्हाला निराकार संप्रदायाच्या गुरुमंत्राचा जप करण्याची नितांत आवश्यकता आहे .
हा घ्या तो मंत्र :
|| जितं मया जितं मया सर्वज्ञोsहम जितं मया ||
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचालीत नामस्मरण करा , तुम्हाला निर्विकाराची " अंतिम" नशा चढल्याशिवाय रहाणार नाही. एकदा का ती साधना सिध्दीस गेली की तुम्ही मला कुठलाच प्राणी दिसला नाही असे न म्हणता ह्यात कुठला प्राणी नाहीयेच असे ठाम पणे बोलु शकाल .
=))))
9 Jul 2020 - 12:38 am | अर्धवटराव
माझ्या मेमरी स्ट्रींग्स निराकारत विलीन झाल्या तर केव्हढ्याला पडेल ति साधना :D
9 Jul 2020 - 12:15 am | कानडाऊ योगेशु
गांजा हाणा.पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल. (ह.घ्या)
9 Jul 2020 - 12:47 am | उन्मेष दिक्षीत
9 Jul 2020 - 7:20 am | अभ्या..
पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल.
म्हणूनच तशा अवस्थेला झू मे असे म्हणतात.
9 Jul 2020 - 8:01 am | अर्धवटराव
याला म्हणतात कलाकारी :)
9 Jul 2020 - 8:48 am | संजय क्षीरसागर
जबरदस्त !
एका प्रतिसादात सगळ्या जालीय कारकिर्दीला `जालसमाधी' प्राप्त झाली.
9 Jul 2020 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले
तुम्हाला काही दिसलं की नाही हा जास्त महत्वाचा प्रश्न आहे.
"आपण एकटेच सर्वज्ञ नाही , आपल्या आकलन क्षमतेच्या पलीकडेही खुप मोठ्ठे जग आहे , त्यामुळे आपण आपली मते मांडावीत ,पण विनाकारण इतरांचे श्रध्दाभंजन करु नये"
इतकी समज तुम्हाला येईल तेव्हा आमच्या कारकर्दीला जालसमाधी प्राप्त होईल !!
9 Jul 2020 - 8:52 am | अर्धवटराव
'निराकारीय' नशेपेक्षा गांजा निश्चितच चांगला असेल ;)
9 Jul 2020 - 9:11 am | संजय क्षीरसागर
मग मारा आणि लिहा इथे अनुभव.
9 Jul 2020 - 9:37 am | अर्धवटराव
पहिले इथे आणि बर्याच इतर धाग्यांवर बर्याच लोकांच्या चुकीच्या धारणांच्या निराकारी नशा उतरायची वाट बघतोय. अन्यथा माझी नशा कशी कळेल?
9 Jul 2020 - 9:45 am | संजय क्षीरसागर
म्हणजे निराकारची नशा तुमच्या कोणत्याही नशेपेक्षा वरचढ आहे !
9 Jul 2020 - 10:03 am | अर्धवटराव
त्याशिवाय का इतकं ज्ञानामृत अवतरेल ?
पण कसं आहे ना.. एखादी नशा चढली कि दुसर्या नशेशी कंपेअर करायचं भान तरे कुथे असणार?
9 Jul 2020 - 10:03 am | अर्धवटराव
त्याशिवाय का इतकं 'ज्ञानामृत' अवतरेल ?
पण कसं आहे ना.. एखादी नशा चढली कि दुसर्या नशेशी कंपेअर करायचं भान तरे कुथे असणार?
8 Jul 2020 - 7:08 pm | शा वि कु
:प
8 Jul 2020 - 9:20 pm | रानरेडा
रिंग घातलेले काहीतरी भलतेच दिसत आहे ......
8 Jul 2020 - 9:39 pm | कोहंसोहं१०
मला तर यात मासा/मधमाशी (जसे पाहाल त्यावर अवलंबून), जिराफ, लग्नाच्या वरातीतला सजवलेला घोडा, बदकाचे पिल्लू एवढे प्राणी दिसले
8 Jul 2020 - 1:38 pm | ज्ञानोबाचे पैजार
ही अपूर्ण माहीती आहे.
स्मृती ह्या फक्त मनुष्या पुरत्या किंवा सजिवांपुरत्या मर्यादीत नसून त्या सार्वत्रिक आहेत. मी तर त्या पुढे जाउन असे म्हणेन की हे सारे विश्व हा केवळ स्मृतींचाच खेळ आहे. ज्या क्षणी या विश्र्वात अस्तित्वात असलेला पदार्थ आपल्या सर्व स्मृती विसरुन जाईल किंवा इतर स्मॄती अस्तित्वात ठेवत मूळ स्मृती पर्यंत पोचू शकेल, त्या क्षणी तो त्याच्या मूळ स्वरुपात परत जाईल किंवा मूळ स्वरुप जाणायला लागेल. (इश्र्वर, ब्रम्ह, किंवा बीग बँग च्या आधिची आवस्था इत्यादी इत्यादी)
उदा सुर्यमाला ही सुर्यापासून बनली आहे हे आपण मानतो. पण तरी सुध्दा या पृथ्वी वरची एकही वस्तु सुर्यासारखी तप्त व स्वयंप्रकाशी नाही. जी झाडे पृथ्वीवर उगवतात तीच झाडे सुर्यावर किंवा चंद्रावर उगवू शकत नाहित. कारण सुर्याच्या पासून अलग झाल्यावर पृथ्वीने आपल्या स्मृतींमधे ही काही बदल केले व या नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र स्मृती कोशातून इथे वातावरण तयार झाले पाणी आले झाडे आली. म्हणूनच मंगळावर किंवा गुरुवर आपल्याला पॄथ्वीसारखी जीवससृष्टी सापडत नाही. म्हणजे तिथे काहीच अस्तित्वात नाही असे आपण ठाम पणे म्हणू शकत नाही.
हाच सिध्दांत जरासा पुढे नेला तर असे म्हणता येईल की या जगात सजिव आणि निर्जिव हा भेदभाव करता येणार नाही. फक्त इतकेच म्हणता येईल की जो पदार्थ या जगात अस्तित्वात आला आहे तो त्याचे स्वरुप बदलणारच. काही लवकर बदलतील तर काही थोडेसे उशीरा इतकेच. माणसाचे शरीर ७०-८० वर्षांनी त्याचे मुळ रुप बदलते तर दगड काही कोटी वर्षांनी बदलतील. हेच दगड काही कोटी वर्षांपूर्वी लाव्हा रसाच्या रुपाने अस्तित्वात होते ना?
जरा वेगळ्या शब्दात असेही म्हणता येईल की कार्बनडाय ऑक्साईड मधे पण कार्बन आणि ऑक्सिजन असतो आणि कार्बन मोनॉक्साईड मधे पण. तरीही या दोन्ही मुलद्रव्यांच्या स्मृती वेगवेगळ्या असल्याने ती मुलद्रव्ये आपल्याला भिन्न भासतात. असे नसते तर कोळशा पासून सहज हिरा बनवता आला असता.
याचाच अर्थ प्रत्येक पदार्थ आपल्या आपल्या स्मृती मधे रममाण झालेला असतो. पण एक ना एक दिवस त्याच्या स्मृतींमधे बदल होतोच. कोळसाही त्याचे रुप बदलतो आणि हिराही. पण मग त्यांचे होते काय?
त्या आधि आपण अजून एक वेगळा सिध्दांत पाहू "कोणतीही उर्जा कधीही उत्पंन्न होत नाही आणि कधीही नष्ट होत नाही. फक्त त्या उर्जेचे स्थित्यंतर होत असते." उदा उष्णता मिळाली की पाण्याची वाफ बनते, त्या वाफेच्या बलाचा उपयोग करुन रेल्वेचे इन्जीन धावू लागते. गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करुन वहात्या पाण्यापासुन वीज बनवता येते इत्यादी.
या जगात अस्तित्वात असलेला प्रत्येक पदार्थ कोणत्याना कोणत्या उर्जेचे प्रतिक आहे. त्यामुळे हाच सिध्दांत जर थोडासा पुढे नेला तर असे म्हणता येईल की या जगात कोणताही पदार्थ उत्पन्न होत नाही आणि नष्ट होत नाही. फक्त त्याचे स्थित्यंतर होत जाते.
उदा मनुष्य मेला की त्याच्या शरीराची (मेंदु सकट) माती होते. म्हणजे काय तर शरीर एका रुपातुन दुसर्या रुपात जाते. (मी इथे आत्मा हा शब्द वापरलेला नाही. त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू) मग त्या मेंदुत असलेल्या स्मृती सुध्दा मातीतच मिसळल्या जातात. पण नष्ट होत नाहित असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात हा सगळा तर्काधारीत खेळ आहे हे मला मान्य आहे. पण मुळ विधानही तर्कावरच आधारीत असल्याने ते खोडून काढायला तर्काचाच आधार घ्यावा लागेल.
पैजारबुवा,
8 Jul 2020 - 2:08 pm | शा वि कु
दगड, पृथ्वी यांच्या स्मृती म्हणजे काय नीट समजले नाही. कारण स्मृती केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्या आणि मुख्यम्हणजे आजूबाजूच्या गोष्टी संवेदनांमार्फत गोळा करणाऱ्या गोष्टींनाच असू शकते,असे वाटते. पृथ्वी किंवा दगड यांमध्ये असे असेल असे वाटत नाही.
हा भेदभाव करता येणार नाही ? हा फरक कसा वाटतो बघा- सजीव हा स्वतःच्या कोणत्यानकोणत्या स्थितीमध्ये स्वतःहून बदल करू शकतो, जो निर्जीव करू शकत नाही.
आणि आपण नाही म्हणले तरी काही फायदा नायच. हा फरक आपल्याला करावाच लागतो.
दगड फोडणे आणि डोके फोडणे यात फरक का आहे मग ? जर दगडाला आणि जिवंत/सजीव गोष्टीला स्मृती असतात, तर ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या का मानू नयेत ?
स्मृती ह्या केवळ एखाद्या पदार्थावर अवलंबून नसतात. अनेक पदार्थांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यामुळे स्मृती ही संकल्पना आहे. जिवंत असताना देखील ह्या पदार्थांच्या जाळ्याला धक्का लागला तरी स्मृती गमाव्या लागतात. त्या पदार्थांची माती झाल्यावर यात स्मृती राहील म्हणजे हार्ड डिस्क जाळून त्याची राख अजून सुद्धा स्टार वॉर्स:एम्पायर स्ट्राईक्स बॅक 1080p ची प्रिंट धरून आहे असे म्हणल्यासारखे होईल :)
8 Jul 2020 - 2:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
स्मृती म्हणजे काय तर माहिती. उदा सजिवांच्या डीएन ए मधे काही महिती साठवलेली असते जी पिढ्यान पिढ्या जपायचा प्रयत्न केला जातो.
पण वर तुम्ही कदाचित मानवी भावनांवर बोलताय आणि माझे म्हणणे असे आहे की स्मृती ह्या मानवी भावनांएवढ्या संकुचित नाहीत. तर त्यांचा थेट संबध त्या पदार्थाच्या अस्तित्वाशी आहे. म्हणुनच कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड चे उदाहरण घेतले होते.
थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक पदार्थ अशी माहिती साठवून त्या माहितीत रममाण झालेला असतो. ती माहिती काही काळ जपुन ठेवतो व त्यात नव्या माहितीची भर घालायचा प्रयत्न करत असतो. काही पदार्थांच्या बाबतीत ही प्रक्रीया तुलनात्मक दृष्ट्या वेगाने होते तर काहिंच्या बाबतीत ती सवकाश होते इतकेच.
तुम्ही ज्याला संवेदना म्हणताय त्या बद्द्ल बोलायचे झाले तर आपले शरीर पंच महाभुतांपासून बनलेले असते मग त्यात संवेदना येतात कुठून? त्या कुठेतरी अस्तित्वात असल्या शिवाय का प्रगट होतात?
वनस्पतींना सुध्दा संवेदना नसतात असे काही वर्षांपूर्वी मानले जायचे आता मात्र हे गृहितक बदलले आहे.
ज्या पंचमहाभुतांपासून माझे शरीर बनलेले आहे त्याच पंचमहाभुतांपासून दगड, पृथ्वी इत्यादी बनले असतील तर मला स्मृती आहेत / संवेदना आहेत आणि त्यांना मात्र नाहीत असे म्हणणे जरा धाडसाचेच किंवा स्वार्थीपणाचे ठरेल.
पैजारबुवा,
8 Jul 2020 - 3:47 pm | शा वि कु
मलाही स्मृती माहिती या आंगानेच अभिप्रेत होतं. पदार्थावर वा वस्तूवर साठवलेली माहिती, या अर्थाने तुमचं म्हणणं पटतंय. डीएनए सुद्धा स्वतःच्या स्ट्रक्चर पलीकडे माहिती साठवू शकतच नाही. तो तो पदार्थ आपापल्या स्ट्रक्चरमधून माहिती साठवतो हीच जर केवळ स्मृती आहे, तर सजीवांची स्मृती यापेक्षा वेगळी खासच आहे.
खूप छान आणि मोठा प्रश्न आहे. मला उत्तर माहित नाही हेवेसांनल.
हम्म. नाही वाटत. पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ रचनेमुळे मला "मीपण" प्राप्त झाले आहे. हि रचना मोडकळीस आल्यावर मला ही काही संवेदना/स्मृती उरणार नाहीत. आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या संवेदना या विशिष्ठ रचनेमुळेच. या रचनेच्या आधी संवेदना मला आठवत नाहीत. ही रचना मोडल्यावर संवेदना सम्पतात, असे निरीक्षण आहे. त्यामुळे ह्या रचनेच्या पुढे/मागे काही आहे असे वाटत नाही.
_ _/\_ _
8 Jul 2020 - 6:53 pm | सोत्रि
हे जे मीपण म्हणता आहात हे स्थूल शरीर / देह असं गृहीत धरतो. त्यानुसार पुढे जाऊयात...
मनुष्यदेहाचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन भेद असतात.
अन्नमय कोश हा स्थूल देह. प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश ह्यांचा मिळून होतो सूक्ष्मदेह.
क्वांटम (अतीसूक्ष्म) पातळीवर हे दोन्ही देह भेद उर्जाच (एनर्जी) असतात. त्याहीपुढे सूक्ष्मदेहात असणार्या संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यादेखील तरंगरूपात विहरणारी उर्जाच असते. मृत्युच्या वेळी स्थूल देहाचा क्षय होतो आणि सूक्ष्मदेह वातावरणात विलीन होतो. म्हणजे तरंगरूपात विहरणारी उर्जा वातावरणात मुक्त होते.
संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यांच्या प्रभावामुळे (bondage) जी उर्जा मुक्त झाली होती ती उर्जेचा स्त्रोत बनून नविन जन्मणार्या अर्भकामधे प्रवाहित होते आणि उर्जाप्रवाह सुरु राहतो. पण त्याबरोबर संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म हेही प्रवाही होते.
त्यामुळे जन्म, मृत्यु, पुनर्जन्म असं काही नसून उर्जा जीवनप्रवाही होऊन अक्षय्य असते.
- (जीवनप्रवाही उर्जा असलेला ) सोकाजी
8 Jul 2020 - 7:00 pm | संजय क्षीरसागर
तुमच्या नित्यकर्माची स्मृती ही जीवनप्रवाही उर्जा वगैरे नसून, निव्वळ डेटाबेस असतो. अन्यथा काहीही आठवणं असंभव आहे.
8 Jul 2020 - 7:49 pm | अर्धवटराव
पण तुम्ही म्हणताय तसं, मानवी कर्मांची 'स्मृती हि डिजीटल डोमेन सारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते... व तो प्रभावच कॅरी फॉर्वर्ड होतो.
बर्याच लोकांचा असा गैरसमज असतो कि मेंदु एखाद्या मेमरी चीप प्रमाणे स्मृती साठवतो. संगणकीय मेमरी रीड-राईट आणि मेंदुची मेमरी रीड-राईट पूर्णपणे भिन्न असते.
जाऊ द्या. आपण आपलं कर्म करावं हे उत्त्तम :)
9 Jul 2020 - 12:49 pm | संजय क्षीरसागर
वाचा :
It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing). For example, the simple act of riding a bike is actively and seamlessly reconstructed by the brain from many different areas: the memory of how to operate the bike comes from one area, the memory of how to get from here to the end of the block comes from another, the memory of biking safety rules from another, and that nervous feeling when a car veers dangerously close comes from still another. Each element of a memory (sights, sounds, words, emotions) is encoded in the same part of the brain that originally created that fragment (visual cortex, motor cortex, language area, etc), and recall of a memory effectively reactivates the neural patterns generated during the original encoding. Thus, a better image might be that of a complex web, in which the threads symbolize the various elements of a memory, that join at nodes or intersection points to form a whole rounded memory of a person, object or event. This kind of distributed memory ensures that even if part of the brain is damaged, some parts of an experience may still remain
9 Jul 2020 - 5:34 pm | अर्धवटराव
स्मृती हि डिजीटल डोमेन सारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते...
It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain...
म्हणजे काय, तर संगणकीय मेमरी ज्याप्रमाणे बिट बाय बिट इका ऑर्डर मधे वाचता येते त्याप्रमाणे मेंदुचहं काम नसतं.
9 Jul 2020 - 8:39 pm | संजय क्षीरसागर
> It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing).
मेमरी मेंदूच्या वेगवेगळ्या भागात स्टोअर केली जाते आणि हे वेगवेगळे भाग समन्वयानी काम करतात, (याला डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग म्हणता येईल) असा याचा मराठीत अर्थ आहे.
पुढे सायकल चालवण्याचं उदाहरण आहे ते वाचा.
9 Jul 2020 - 9:16 pm | अर्धवटराव
सुदैवाने मला कॉम्प्युटर मेमरी read-write कसं काम करते याचं उत्तम ज्ञान आहे. आणि ति शारेरीक मेमरी मॅनेजमेण्टपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे हे मला व्यवस्थीत कळतं.
संगणकीय डिस्ट्रिब्युटेड प्रोएसेसींग बाबतीत देखील तेच.
इथे केवळ उदाहरण द्यायचं झालं म्हणुन मेंदुच्या क्रियेला संगणकीय शब्द वापरले आहेत. याचा अर्थ मेंदु संगणकाप्रमाणे मेमरी मेनेज करतो असा कोणि घेत असेल तर तो फार बालीशपणा झाला.
तसं बघितलं तर शरीराची प्रत्येक पेशी एखाद्या कारखान्याप्रमाणे काम करते. मटेरियल आत घेतलं जातं, प्रोसेस केलं जातं, बाहेर फेकलं जातं. याचा अर्थ जर जमशेदजी टाटा म्हणजे पेशीशास्त्र तज्ञ झाला असा घेतला तर ते मूर्खपणाचं ठरेल.
अतिसुलभिकरण वापरुन विषयाची / संभाषणाची केवळ सुरुवात करता येते. त्यालाच अंतीम सत्य मानुन अभ्यास थांबवला तर बुद्धीची/ज्ञानाची वाढ थांबते. संगणकीय मेमरी मॅनेजमेण्ट आणि मेंदुच्या स्मृती प्रक्रिया पूर्णतया भिन्न आहेत. रासायनीक कारखाने आणि पेशी शास्त्राचा काहिही संबंध नाहि. एखादा फोटो हार्डडिस्कवर साठवणे, लॅपटोपवर बघणे आणि एखाद्या कविने काव्य रचना करणे आणि स्टेजवर सादर करणे यात जमीन अस्मानचं अंतर आहे.
असो.
9 Jul 2020 - 11:14 pm | संजय क्षीरसागर
हा तुमचा दावा फोल ठरला आहे.
मेंदू संगणकापेक्षा अॅडवान्स्ड प्रणाली आहे हे सर्वज्ञात आहे. त्यात तुम्ही काही विशेष सांगितलेलं नाही.
10 Jul 2020 - 12:52 am | अर्धवटराव
तसंही तुम्हाला नवीन काहि समजुन घ्यायची शक्यता नाहि.
स्मृती हि न्युरोन कनेक्शन्स च्या एका विशिष्ट रितीने तयार झालेल्या प्रभावाच्या रुपाने मॅनेज होते.. पण हे कळायला सर्वप्रथम अतिसुलभतेचा मोह टाळता यायला हवा, रूपक आणि सत्यातला फरक कळायला हवा, मेंदु हि संगणकापेक्शा केवळ अॅडव्हान्स नसुन अत्यंत भिन्न प्रणाली आहे, हे कळायला हवं... अर्थात, त्यासाठी सर्वप्रथम संगणकशास्त्र आणि मेंदुशास्त्र यापैकी किमान एकाची विकिपिडीयापलिकडे काहि माहिती असायला हवी...
असो.
10 Jul 2020 - 1:41 am | संजय क्षीरसागर
स्मृती मेंदूशिवाय कुठेही स्टोअर होत नाही !
ती रेकॉर्ड कशी होते > रिट्रीव कशी होते याचा काहीही प्रश्न नाही
10 Jul 2020 - 2:15 am | अर्धवटराव
"तुमच्या नित्यकर्माची स्मृती ही जीवनप्रवाही उर्जा वगैरे नसून, निव्वळ डेटाबेस असतो. अन्यथा काहीही आठवणं असंभव आहे."
हा तुमचाच मुद्दा आहे ना? हे असलं संगणकीय संज्ञांचं सुलभिकरण आपलच कर्तुत्व ना? मेंदुची स्मृती मॅनेजमेण्ट हि 'स्टोअर-रिट्रीव्हल' पद्धतीने होत नसुन न्युरोन्सच्या एका विशिष्ट जोडणी-विभागणी पद्धतीने होते, त्यामुळे 'स्मृती मेंदूशिवाय कुठेही स्टोअर होत नाही' हा मुद्दा फोल ठरतो, हे कळायला फार काहि अवघड आहे का ? सजीवांच्या बाबतीत स्मृती म्हणजे केवळ संगणकीय डेटाबेस प्रमाणे साठवण नसुन संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते, हे फार जगावेगळे कन्सेप्ट आहेत का? जेनेटीके मेमरी वगैरे टर्मीनॉलॉजी कधिच ऐकली नाहि का?
10 Jul 2020 - 9:02 am | शाम भागवत
व्वा! पूर्णराव!! व्वा!!!
10 Jul 2020 - 11:36 am | संजय क्षीरसागर
डेटा स्टोअर्ड असल्याशिवाय प्रोसेस काय होणार ?
अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ?
ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ?
क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ?
उगीच काहीही टर्मिनॉलॉजी वापरुन वाट्टेल ती फेकाफेकी चललीये !
__________________________________________
आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा :
The Highest Intelligence Is To Simplify.
Complications Indicate Either a Failure of Understanding or a Stupid Mind.
10 Jul 2020 - 1:01 pm | आनन्दा
जर स्मृती केवळ मेंदूमध्ये असते तर नुकत्याच जन्माला आलेल्या वासराला ओरडण्याचे आणि दूध पिण्याचे ज्ञान कधी प्राप्त होते त्याबद्दलचे ज्ञानामृत पण आम्हाला पाजून आम्हाला उपकृत करावे ही विनंती.
10 Jul 2020 - 2:32 pm | संजय क्षीरसागर
पण तुम्हाला स्मृती आणि शरीर यंत्रणा (ओएस) यातला फरक कळलेला दिसत नाही.
भूक लागणं, त्यासाठी अन्नाचा शोध किंवा मागणी या शरीर यंत्रणेचा भाग आहेत, त्या जम्मतःच उपलब्ध होतात. थोडक्यात, कंप्युटरसमेत येणारी ती ओएस आहे. स्मृती ही वेगळी गोष्ट आहे, तो डेटा आहे.
तुम्ही लेख नीट वाचला असेल तर चर्चा कर्मसिद्धांतावर चालू आहे, म्हणजे डेटाबेसवर चालू आहे. कर्मसिद्धांताचा आधार डेटाबेस आहे, ओएस नाही.
10 Jul 2020 - 4:43 pm | सोत्रि
BIOS आणि OS मधला फरक कळला की उलगडा होईल की ओएस संगणकाबरोबर येत नाही ती लोड करावी लागते. ओएस अनेक असतात ज्या एकाच संगणकावर एकाच वेळी चालू शकतात.
- (उथळ पाण्याचा खळखळाट फार असतो हे जाणणारा) सोकाजी
10 Jul 2020 - 8:34 pm | संजय क्षीरसागर
चर्चा डेटाबेसवर चालली आहे OS नसेल तर डेटा अॅक्टीविटीच होणार नाही
इतर सजीवांच्या बाबतीत निव्वळ BIOS वर बहुतांश काम चालतं त्यामुळे तिथे कर्मविपाकाचा प्रश्नच येत नाही.
व्यक्तीमधे BIOS आणि OS असल्याशिवाय कर्म होणं आणि त्याची स्मृती स्टोअर होणं या प्रक्रियाच असंभव आहेत.
लिहितांना मी या दोन्ही गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या पण तुम्हाला संगणकीय ज्ञान असेल तर OS शिवाय कंप्युटर डेटा प्रोसेसच करु शकणार नाही हे लक्षात यायला हरकत नव्हती.
10 Jul 2020 - 4:48 pm | आनन्दा
तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून जाऊन मी माघार घेत आहे.
तुम्ही ओएस म्हणताय म्हणजे असणारच.
10 Jul 2020 - 8:35 pm | संजय क्षीरसागर
ज्ञानात नक्की भर पडेल !
10 Jul 2020 - 4:46 pm | अर्धवटराव
आमचं संगणकीय ज्ञान किती? हे काय विचारणं झालं ? अहो, तुमच्या संगणाकीय ज्ञानापुढे आमचा काहि पाड लागणार आहे का...
अटेन्शन मिपाकर्स.
आता संक्षी साहेब संगणाकीय मेंदु ज्ञान (सिद्ध संक्षींनी उदयाला आणलेली हि एक नवीन ज्ञानशाखा आहे) वापरुन मेंदुच्या मेमरीचे बेस अॅड्रेस, अॅड्रेस आणि डाटा बस फॉर्मेट्स वगैरेचं डेमो देतील.
नाहि तर काय... लोकं उगाच आपले जेनेटीक मेमरी वगैरेचा अभ्यास करतात. साध्या दोन-चार संगणकीय संज्ञा वापरुन जिथे मेंदुच्या मेमरी मेनेजमेण्टवर एक्स्पर्ट होता येतं, तिथे कशाला भारंभार फेकाफेकी करायची... मूर्खच आहे लोक्स.
हो ना. या बोटाची थुंकी त्या बोटावर लावणं म्हणजे गोष्टी Simplify करणं असा एकदाका आपला समज करुन घेतला कि आपण वाट्टेल त्या गोष्टीत ओ का ठो कळत नसताना भारंभार फेकाफेकी करायला मोकळे.
बरोब्बर. रूपक आणि रुप्य यांच्यातला करक न कळणे याला मूर्खपणा म्हणतात. अशा मूर्खपणावर अजुन ज्ञान पाजळणे याला भोंदुगिरी म्हणतात. त्याची नशा होणे याला भोंदुभक्ती म्हणतात... आणि बरच काहि सांगता येईल... पण... कळायचे आणि कळुन वळायचे मार्ग बंद आहेत. हा तुमच्या गोंधळलेल्या मानसीकतेचा परिणाम आहे.
10 Jul 2020 - 8:19 pm | संजय क्षीरसागर
हे आधी सोडवा :
अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ?
ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ?
क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ?
10 Jul 2020 - 9:25 pm | अर्धवटराव
अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ?
१) बालपणी मी जे वॅक्सीन्स घेतली त्याची योग्य स्मृती माझ्या इम्युनीटी सिस्टीममधे साठवली गेली
२) मी ज्या हार्श प्रसंगांच्या संपर्कात आलो त्याची स्मृती माझ्या रिफ्लेक्स सिस्टीममधे साठवली गेली
३) मी ज्या काहि दृक्/श्रवण्/स्पर्श अनुभवांतुन गेलो (पाढे पाठ करणे हे त्यातच आलं) त्याची स्मृती माझ्या न्युरॉन्सच्या विशिष्ट कनेक्शन्स मधे साठवली गेली
४) निसर्गाने माझ्यात जे काहि शारीरीक बदल करायचे ठरवले, ति स्मृती माझ्या जिनोम लेव्हलला साठवली गेली.
५) अजुन बरच काहि आहे
ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ?
-- उपरनिर्दीष्ट जंत्री बघा
क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ?
-- तुमच्या डोक्यात सतत इन्सिक्युरिटीची घंटा वाजत असते हा तुमचा मानसीक लोचा असा सर्वांसमोर मांडत जाऊ नका. आम्हाला त्याची कल्पना आहे.
बाकि अ) चि उत्तरं बघा. माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक
या सर्व स्मृती मी रोज, लाखो पेशी मेल्या आणि नवीन तयार झाल्या तरी, कॅरी फॉर्वर्ड करतो. त्यातला एक फार मोठा हिस्सा मी माझ्या मुलात कॅरी फॉर्वड केला आहे.
आता, तुम्ही खरच थोडे जरी प्रामाणीक असाल तर इतर कुठलिही शाब्दीक हेराफेरी न करता एका सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या.
"पाढा पाठ करणे" म्हणजे नेमकं काय असतं ?
10 Jul 2020 - 9:28 pm | अर्धवटराव
माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक लेव्हललाच होतो..
11 Jul 2020 - 4:09 pm | संजय क्षीरसागर
जबरदस्त ज्ञान !
मग मेंदू काय शो पीस आहे का ?
11 Jul 2020 - 6:16 pm | अर्धवटराव
तुमचा मेंदु शो पीस पुरता आहे हे स्विकारल्याबद्दल धन्यवाद.
मटेरीअल कुठलं वापरलं ? प्लॅस्टीक, दगड, प्लॅस्टर ऑफ पॅरीस?
आम्हा जनरल पब्लीकचा मेंदु जैवीकच आहे... काय करणार.
11 Jul 2020 - 7:10 pm | संजय क्षीरसागर
नॉर्मल मेंदूत स्मृती स्टोअर होते.
आता तुम्हाला वाचताही येईना !
11 Jul 2020 - 8:06 pm | अर्धवटराव
तुमचा मेंदु शो पीस आहे म्हटल्यावर तुम्ही इतरंच्या मेंदुकडेच बघाल.
हो ना. पण तुमचा तो शो पीस संगणकाची प्रतिकृती आहे ना.. त्यामुळेच कदाचीत तुम्ही संगणक आणि मंदु यात गफलत करता.
11 Jul 2020 - 9:18 pm | संजय क्षीरसागर
तुमची स्मृती गुडघ्यात स्टोअर्ड आहे का ?
12 Jul 2020 - 12:09 am | अर्धवटराव
वरच्या प्रतिसादांत स्मृती प्रकारांबद्दल अगदी थोड्यावेळापूर्वी वाचलं ना तुम्ही ?
अगदी थोड्यावेळापूर्वी वाचलेलं आठवे ना तुम्हाला? मेंदु प्लॅस्टीकचा म्हटल्यावर तसंही होऊ शकतं म्हणा.
11 Jul 2020 - 10:10 am | आनन्दा
संक्षी फंडामेंटल लेवल चे प्रश्न हँडल करू शकत नाहीत..
11 Jul 2020 - 4:05 pm | संजय क्षीरसागर
तुमचा प्रश्न फंडामेंटल लेवलला होता आणि त्याचं वर उत्तर दिलंय.
पुन्हा वाचा !
12 Jul 2020 - 12:39 am | अर्धवटराव
सुलभीकरण करण्याच्या नादात त्यांना विषयाचा आवाक लक्षतच येत नाहि. उथळ पाणि आहे.. नुसताच खळखळाट.
11 Jul 2020 - 3:48 pm | संजय क्षीरसागर
याचा कर्मफलाशी संबंध नाही.
ती मेंदूत असायलाच हवी. अन्यथा तुम्हाला काहीही आठवणार नाही.
हे पण तुमच्या मेंदूत असेल तितकेच आठवेल.
याचा ही कर्मफलाशी काहीएक संबंध नाही.
_______________________________
हा व्यक्तिगत प्रतिसाद असला तरी उत्तर देतो, सर्वांना उपयोगी होईल.
मी स्वतः सत्य असल्यानं मला कोणतीही इन्सिक्युरिटी नाही की चिंता नाही.
माझ्या इतकं बिनधास्त आणि जनसामान्यांच्या खोलवर रुजलेल्या धारणांवर लिहिण्याचं साहस कुणीही केलेलं नाही.
शिवाय मी स्वतःच्या खर्या नावानं लिहितो, मला कोणत्याही लपवाछपवीची गरज नाही.
तस्मात, माझी चिंताच सोडा
___________________________________
याउलट तुमचे प्रतिसाद संपूर्ण मानसिक गोंधळ दर्शवतात.
तुम्हाला विषय काय आणि प्रतिसाद काय याचं भान नाही.
इन्सिक्युरिटी वाटणारा इतरांना हाका मारतो आणि इतरांचा आधार शोधतो
शिवाय तुमचा आयडी तुमच्या मनस्थितीचं यथार्थ वर्णन करतो, ते वेगळंच.
11 Jul 2020 - 6:33 pm | अर्धवटराव
एव्हढ्यात विसरलात? पाढ्यांवरुन प्रश्न तुम्हीच केले होते ना? तुम्हाला मग स्मृतींबद्दल वेगेवेगेळी माहिती दिली... एव्हढ्यात गारद झालात ?
उपर्निदेष्ट वेगवेगळ्या स्मृती कशा मॅनेज होते, त्यात मेंदुचा रोल किती, इतर शरीर यंत्रणांचा रोल किती, याचं संपूर्ण विज्ञान अभ्यासाला अव्हेलेबल आहे. अर्थात, एकदाका दोन चार संगणकीय शब्दांत अक्ख्या जैव-विज्ञानाची वाट लावायची म्हटल्यावर त्या अभ्यासाची काहि गरज नाहि. सुलभीकरण हेच ज्ञान, नाहि का?
स्मृती स्ट्रींगवरुन तुम्ही तोंडावर आपटलात. मिपावर शोभा झाली. ति रिकव्हर व्हायला म्हणुन कसंही करुन दोन चार भक्तांकडुन आपल्या संगणकीय रुपकावर शिक्कामोर्तब करुन घ्यायला म्हणुन तुम्ही हा नवीन धाग्याचा प्रपंच मांडलात. निराकारी बुवाबाजी धोक्यात आल्यावर तुमच्या मनाने दिलेली स्वाभावीक प्रतिक्रीया आहे हि.
तुम्ही पण एक लक्शात ठेवा... जसे तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला उत्तरं त्याच टाईपचे मिळातील.
11 Jul 2020 - 7:11 pm | संजय क्षीरसागर
आता तरी नीट वाचा :
चर्चा कर्मसिद्धांतावर चालू आहे. त्यासाठी केलेल्या कर्माची स्मृती स्टोअर होणं गरजेचं आहे.
तुम्ही बालपणी घेतलेली इंजेक्शनं, तुमची शारीरिक वाढ या गोष्टी कर्मविपाकात येत नाही.
तुम्हाला एकतर विषयही कळत नाही आणि भलत्याच गोष्टीवर भारंभार आणि निरर्थक लिहित सुटता.
11 Jul 2020 - 8:15 pm | अर्धवटराव
हे कष्ट तुम्ही कधि घेणार?
कर्मविपाकाचा स्मृतीशी संबध जोडुन, आणि ति स्मृती संगणकाप्रमाणे काम करते हे सुलभीकरण करुन तुम्ही कर्मविपाकाची हवा काढायचा केवीलवाणा प्रयत्न करत आहात.. कर्म, स्मृती वगैरे बाबतीत तुमचं आकलन इतकं उथळ आहे कि तुम्हाला विषयाचा आवाकाच लक्षात येत नाहि.. मग तुमचा नेहेमीचा ठरलेला फॉर्मुला... सगळ्यांना गोंधळलेले वगैरे लेबलं चिकटवायची, आणि आपलं आत्मस्तुतीचं सुख भोगायचं.
असो. हे आता नित्याचच झालय.
11 Jul 2020 - 9:35 pm | संजय क्षीरसागर
कर्मविपाकाचा संबंध स्मृतीशी नाही तर काय बालपणी घेतलेल्या इंजेक्शनशी आहे ? का शारिरिक वाढीशी आहे ?
तुम्हाला सकाळी खाल्लेलं संध्याकाळी आठवायला जाणीवेचा रोख मेंदूकडे वळवावा लागत नाही काय ? का आठवण्याची तुमची काही वेगळी प्रोसेस आहे ?
स्मृतीभ्रंश होतो तेंव्हा व्यक्तीच्या मेंदूवर उपचार होतो का गुडघ्यावर ?
पाप-पुण्य, नीती-अनितीचा विचार तुम्ही कोणत्या अवयवानी करता ?
कर्मसिद्धांत तुम्ही मेंदूनी शिकलात का आणखी कोणत्या मार्गानी ?
देव तुम्हाला भाषेतून शिकवला गेला का जन्मतःच ते ज्ञान घेऊन आला होतात ? आणि तसं असेल तर ते नक्की कुठे होतं ?
न तुम्हाला विषयाची कल्पना, न काही वैचारिक सुसंगतता.
यापुढे प्रतिसाद न देणं तुमच्या हिताचं आहे.
11 Jul 2020 - 10:00 pm | अर्धवटराव
स्मृती म्हणजे केवळ काहि दृक्/श्राव्य आठवणी, ज्या संगणकीय टाईप पद्धतीने मेंदुत 'स्टोअर' होतात, त्याच अर्थाने कर्मविपाकात ति कंसीडर केल्या जाते, हेच तुमह्चं चुकीचं आकलन आणि अझप्शन आहे.. हे तुम्हाला खरच कळत नाहि आहे कि मुद्दाम पेडगावला जातात ?
आले आले.. साहेब आपल्या मूळ स्वभावावर परत आहे.. तसे ते नेहेमीच होते म्हणा.
12 Jul 2020 - 12:02 am | संजय क्षीरसागर
तुम्हाला स्मृती अंगभर पसरलीये असं वाटतंय, आणि
त्यामुळे बहुदा स्वतःचा मेंदू नक्की कुठे आहे याचा पत्ता लागत नाहीये !
अहो, कर्माची स्मृती मेंदूत असते !
तुम्ही सकाळी काय काम केलं ? असं विचारल्यावर तुमचे विचार मेंदूत चालू होतात की गुडघ्यात हे बघा,
म्हणजे असा गोंधळ होणार नाही.
12 Jul 2020 - 12:20 am | अर्धवटराव
तुम्हाला मुळात स्मृती म्हणजे काय हेच कळत नाहिए. कर्माच्या स्मृती म्हणजे केवळ दृक्/श्राव्य/स्पर्षाच्या काहि लिमीटेड आठवणी नाहित... एक वाटीभर मिर्च्या खा. किती खाल्ल्या, त्यांचा रग कसा होता, चव कशी होती हे प्लॅस्टीक मेंदुने आठवलं नाहि तरी दुसर्या दिवशी शरीराच्या योग्य ठिकाणी बरोब्बर आठवण करुन दिली जाईल.
12 Jul 2020 - 2:01 am | उन्मेष दिक्षीत
मेमरी आणि संवेदना यामधे घोळ होतोय! कोणत्याही कर्माच्या स्मृती प्रत्यक्ष अनुभवापासून कशा वेगळ्या असतील.
अॅक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॅक्चर तसंच राहील आणि दुखेल, पण अॅक्सिडेंट कसा झाला हे कसं आठवतं ? हा सगळा अनुभव हाताने किंवा पायाने स्टोअर केला कि मेंदू ने ?
आणि फ्रॅक्चर बरे झाल्यानंतरही कसं आठवतं नेमकं कुठं झालं होतं ते ? हा सगळा डेटा जेव्हा पाहीजे तेव्हा कुठे रेडिली अवेलेबल असतो ?
तुमच्या मते मेंदूचा रोल काय आहे ?
आता तुम्ही म्हणाल कि काहीतरी पूर्वसंचीत (ऑलरेडी केलेल्या कर्माच्या स्मृती) त्यामुळं झाला अॅक्सिडेंट ! तर याला पुरावा आणि आधार काय आहे?
12 Jul 2020 - 2:57 am | अर्धवटराव
प्रतिसाद लांबलचक आहे... इथेदेतोय.
12 Jul 2020 - 8:47 am | संजय क्षीरसागर
तुम्ही स्वतःचा मेंदू अशाप्रकारे शोधलेला दिसतो !
म्हणून तुम्हाला तो नक्की कुठे आहे हे समजत नाही !
12 Jul 2020 - 5:29 pm | अर्धवटराव
तुमचा प्लॅस्टीक मेंदु तुम्ही 'त्या' कामासाठी वापरता होय...
ते ही बरोबर आहे म्हणा. जे साठवलं असेल्त तेच बाहेर पडेल.
म्हणुनच तुमचा प्लॅस्टीक मेंदु 'बाईट बाय बाईट' प्रसवतो
आणि तुम्हाला ते संगणकीय वाटत.
8 Jul 2020 - 2:42 pm | मराठी_माणूस
छान. एक वेगळा विचार , विचार करायला लावणारा.
8 Jul 2020 - 4:11 pm | संजय क्षीरसागर
याचा अर्थ तुम्ही चौकटीबाहेर जाऊन, कुठलीही पूर्वधारणा मधे न आणता, नव्याला सामोरे जाऊ शकता !
धन्यवाद !
8 Jul 2020 - 3:54 pm | संजय क्षीरसागर
कर्मसिद्धांत याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचं वर्तमान हे त्याचा भूतकाळ ठरवतो . यात मागचे जन्मही (किती ते कुणालाही माहिती नाहीत) आले. आणि असा डेटा मॅनेज करणारी एक रिअल टाईम यंत्रणा (पापभीरुंसाठी देव) अस्तित्वात आहे !
याचा काऊंटर असायं की प्रत्येकानं काय काशी केली याचा आलेख त्याच्या मेंदूतल्या स्मृतीपलिकडे कुठेही नसतो.
आता या स्मृतीविषयी बोला !
8 Jul 2020 - 2:27 pm | Rajesh188
सजीव असू नाही तर निर्जीव मूळ रूप सर्वांचे एकच.
8 Jul 2020 - 3:41 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला थोडं जरी कंप्युटरमधलं ज्ञान असेल तर सगळं शांतपणे वाचा. नक्की लाईट पडेल.
8 Jul 2020 - 3:51 pm | संगणकनंद
तुम्ही आज लिहीलेलं:
मॄत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही
हे खरं आहे की, याआधी लिहीलेलं:
एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो.
नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.
या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.
अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात
हे खरं आहे.
की ही दोन्ही विधाने जरी परस्पर विरोधी असली तरी ती तुम्ही केलेली असल्याने दोन्ही बरोबर आहेत?