अथ श्री पुरुषलीळा।

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
25 Jun 2020 - 10:46 pm

प्रत्येक माणूस वेगळा असतो तसा प्रत्येक पुरुषही वेगळा असतो. पण तरीही सर्व पुरुषांच्यात मिळून काही गोष्टी सारख्या,समान असतात. मग तो नवरा, मुलगा, भाऊ, काका, मामा कुणीही असो. याला काही सन्माननीय अपवाद असतातही. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो.

ट्रेन किंवा बस सुटायची वेळ झाली तरी वेळेवर न येणे हा कॉमन पॉईंट. ट्रेनची शिटी होते. सिग्नल मिळतो. ती हलते. चालू लागते तरीही खाली उतरलेल्या पुरुषाचा डब्यामधे पत्ता नसतो. बायको कावरीबावरी होते. मुलं रडू लागतात, तेव्हा कुठे हे पुरुषमहाशय कंपार्टमेंटमधे येतात. एवढं उशीरा येऊन मनस्ताप दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं सोडाच, उलट वरुन बोलतात,"एवढं काय घाबरायचं? मी येत होतोच ना?" बसमधेही असंच, बस सुटायची वेळ येते. कंडक्टर 'सगळे आले का'विचारतो. बस सुरु होते. मग आपण बसल्या जागेवरुन तोल सावरत उभं राहायचं आणि ओरडायचं,"अहो थांबा,आमची एक सीट यायचीय". बसमधले सगळे लोक आपल्याकडे रागानं बघतात. कपाळाला आठ्या घालतात.उशीर होतोय असं पुटपुटतात. मोबाईलही उचलत नाही. आपल्याला अगदी गिल्टी वाटतं. मग ती 'सीट' एकदाची अवतरते. 'अग, चहाला उतरलो होतो आणि 'जाऊनही आलो.' हे उशीराचं स्पष्टीकरण. सारखा चहा पिणे आणि जाऊन येणे ह्या आणखी दोन वाईट सवयी. इतर काही पिण्यापेक्षा चहा पिणं ठीक म्हणते मी. पण 'जाऊन येणे'हा काय प्रकार आहे? सारखी कशी शू ला लागते? घरातून निघण्यापूर्वी जायचं ते एकदम घरी परत आल्यावर जायचं(ऑफीस असेल तर गोष्ट वेगळी.) असं बायकांसारखं हे का वागू शकत नाहीत? स्वयंपाकघरात लुडबूड करणे ही आणखी एक वाईट सवय. स्वयंपाकातलं काही कळत नसतानाही. त्यातून त्याला स्वयंपाकातलं काही कळत असेल तर उच्छाद वाढतो.' तेल जरा जास्त टाक. कांदा बारीक चिर. टोमॅटो मी चिरुन देऊ का? कोथिंबीर बारीक चीर, दाताखाली येते जाड चिरली तर! कणीक सैल भिजव. कणकेत थोडा मैदा आणि डाळीचं पीठ टाक' सारख्या सूचना. काव आणतात. यापायी अनेक मदतनीस बायका काम सोडून पळून जातात.

माझ्या मैत्रीणीकडे एकदा अचानक पाहुणे जेवायला आले. तेही माहेरचे. सासरचे असते तर चिडता तरी आलं असतं. नवं लग्न झालेलं. घरात भाजी नव्हती. तिनं दिराला भाजी आणायला पिटाळलं. तर तो बाजारातून उशीरा तर आलाच आणि एक किलो गवार घेऊन आला. आता ही ऐनवेळी गवार कुठे निवडणार? शेवटी शेजारून बटाटे उसने आणले. शेजारणीचे कुजके टोमणे ऐकावे लागले.

"बायकांत बहु बडबडला" ही अवस्था तर खूप जणांची असते. ज्या गोष्टीत बायकांना स्वारस्य नाही अशा विषयांवर सतत बोलत राहतात. माझ्या ऑफीसातला एकजण तर लंचच्यावेळी डबा खाताना स्वतःचं विविध विषयांवरचं ज्ञान पाजळायचा. सिनेमा बघत असताना सतत बडबडणे, घरात बायका सिरीयल्स बघत असताना त्या मालिकांना नावे ठेवणे,त्यातल्या चुका दाखवणे. आपण पाहात असलेले इंग्रजी सिनेमे आणि मालिका कशा दर्जेदार असतात हे सांगणे. नातेवाईक आल्यास वैतागणे,(विशेषतः,नोकरी नसलेले,नापास झालेले भाऊ)मित्र आल्यास आनंदित होणे. (आता कोरोनाच्या काळात कोण कुणाकडं जातंय म्हणा! मी कोरोनापूर्व काळाबद्दल BC बद्दल बोलतेय.)

यादी घरी विसरुन सामान आणायला जाणे. घेतलेले सामान दुकानात विसरणे. दाढी करण्याचा कंटाळा करणे. मधेच दाढी मिशा वाढवणे. मधेच लहर फिरली की चेहऱ्याची बोडन्ती करुन तो तुळतुळीत करणे. केस कधी झिरो मशीन मारून सफाचाट करणे किंवा नाकावर केस आले तरी न कापणे.
बूट,चप्पल काढून कसेही ,कुठेही टाकणे. शू रँकमधे न ठेवणे. सर्वत्र 'चला,आटपा,पुरे'अशी घाई करणे. साध्या साध्या गोष्टींवरून रिक्षावाला, टॅक्सीवाला, भाजीवाला, वेटर (मॅनेजरला बोलवा इ.इ.) यांच्याशी हुज्जत घालणे. खोली अस्ताव्यस्त ठेवणे. आवरली तर चिडणे. वस्तू जागेवर न ठेवणे. न सापडल्यास आकांडतांडव करणे. कपडे वेळेवर धुवायला न टाकणे. ऐनवेळी शर्टाला इस्त्री करुन मागणे. एकच पँट खूप दिवस वापरणे. मोजे धुवायला न टाकणे. हातरुमाल विसरणे. पँटच्या खिशात वस्तू विसरणे. मोबाईल वेळच्यावेळी चार्ज तसेच रिचार्ज न करणे. रविवारी सकाळी दहादहापर्यंत झोपणे. बिलं वेळच्यावेळी न भरणे.

अशी खूप मोठी यादी होईल. बायकामंडळींनो! तुमच्याकडेही अशी यादी तयार असेलच. मग करा सबमिट.

समाजविचार

प्रतिक्रिया

एकदम कडक, मस्त, ऍक्युरेट निरीक्षण.
१+

माते, ये कोनसा ब्रम्हास्त्र आपने समस्त पुरुष प्रजातीपे छोड दिया. इसके वारस एक भी ना बच पायेगा.

गणेशा's picture

25 Jun 2020 - 11:50 pm | गणेशा

मज्जा आली वाचताना. :-))

मूकवाचक's picture

26 Jun 2020 - 8:38 am | मूकवाचक

थोडी भरः 'अपेयपानाच्या' स्टॅमिनाबद्दल बढाया मारणे. अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणातल्या दर्दीपणाची कौतुके सांगणे. खास करून एखाद्या सुबक ठेंगणीने 'ई ...' करून चित्कार काढले की चेकाळून आपण चालणारे, उडणारे, पोहणारे सगळेच जीव कसे मिटक्या मारत खातो याचे आख्यान लावणे.

शाम भागवत's picture

26 Jun 2020 - 6:57 am | शाम भागवत

बापरे! केवढी भली मोठी लिस्ट टाकलीय.
पण पटतीय.
हे समस्त पुरूषांबद्दल आहे? की फक्त भारतातल्या पुरूषांबद्दल?

शा वि कु's picture

26 Jun 2020 - 7:50 am | शा वि कु

सिनेमा बघत असताना सतत बडबडणे, घरात बायका सिरीयल्स बघत असताना त्या मालिकांना नावे ठेवणे,त्यातल्या चुका दाखवणे. आपण पाहात असलेले इंग्रजी सिनेमे आणि मालिका कशा दर्जेदार असतात हे सांगणे.

बाप्रे. आज्जी गमतीच्या गोष्टी इतक्या रियलिस्टिक करू नयेत :(

पहाटवारा's picture

26 Jun 2020 - 9:16 am | पहाटवारा

खुसखुशीत ...कुर-कुरीत.. भलताच भारी कच्चा माल आहे !

अभ्या..'s picture

26 Jun 2020 - 10:48 am | अभ्या..

जरा जाऊन येतो इश्शू, सिरियलाची मापे काढणे आणि चला आवरा प्रकार सोडून मी सन्माननीय अपवाद बरे का आजी.

गवि's picture

26 Jun 2020 - 10:59 am | गवि

जरा जाऊन येतो इश्शू, सिरियलाची मापे काढणे आणि चला आवरा

ठ्ठो .. :-))

हा बहुधा आपणा समस्त पुरुषजातीचा लसावि असावा.

रातराणी's picture

26 Jun 2020 - 12:46 pm | रातराणी

भन्नाट! भारी लिहलंय :) कपडे धुवायला टाकताना पतलूनीचे खिसे न तपासताच टाकणे ही आणखी एक वैतागवाणी सवय. त्यात कधी मग चिरीमिरी सापड्ते छान धुवुन निघालेली किंवा नेम्की एखादी "जपून" ठेवलेली पावती असते. स्वत:च्या माहेरी गेल्यावर तिन्ही त्रिकाळ आइच्या हातचं ओरपून बायकोला इन्फिरियोरिटी कोम्प्लेकस देणं ही पण एक गोश्ट. पोरं पण आई किती बाबापुता करीत असली तरी पपाच लाड्का असतो त्यांचा. :)

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा

व्वा, सॉलिड भारी लेख, नेहमीच्या त्रासाला वाचा फोडलीय !

माझ्या माहितीतला एक पुरुष बाबा:
घरी कुणी आलं आमचा टिव्ही, म्युझिक सिस्टिम, कारपेट, भिंतींचा रंग कसा सगळ्यात भारी आहे, इतरांचे कसे हलके दर्ज्याचे आहेत, मी च किती भारी, माझी चॉईस कसली सॉलिड, इतरांना अजिबातच चोखंदळपणा नाहीय इत्यादि इत्यादि टेपा वाजवायच्या, त्याची बायको याला इतकी कंटाळली की बास ! सांगुन सांगुन थकली, फक्त डायव्होर्स घेता येत नाही म्हणून बिचारी आगतिक झालीय ....
त्या त्याचू पुरूषाला कळत कसं नसावं !!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2020 - 1:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

कामासाठी बाहेर पडल्यावर मित्र भेटल्यास चकाट्या पिटत बसणे आणि काम विसरणे
समोरच्या व्यक्तीच्या (पक्षी बायको) मनातले न ओळखता येणे
चारचौघात गप्पा मारत असताना बायकोने केलेल्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष आणि नको ते विषय आल्याने घोटाळे होणे
बाजारातुन सगळ्या निवडायच्या भाज्याच आणणे (चिरायच्या आणि निवडायच्या अशी विभागणी असते)
चहा, जेवण हातात आणुन द्यायला लागणे
जेवायला बसल्यावर ऐनवेळी भलत्याच पदार्थाची फर्माईश करणे

यादी वाढतच जाईल

सुचिता१'s picture

26 Jun 2020 - 1:33 pm | सुचिता१

एकदम भारी!!! +१००
आजी चं निरीक्षण इतकं अफलातून आहे की एक ही पुरुषोत्तम यातून सुटणार नाही.

सिरुसेरि's picture

26 Jun 2020 - 5:00 pm | सिरुसेरि

मजेशीर निरिक्षण .

सस्नेह's picture

26 Jun 2020 - 7:15 pm | सस्नेह

=)) =))
भलताच वास्तववादी !!

फार म्हणजे फारच स्फोटक विषय. माझे पण दोन (कसले दोनशे) पैसे :
१. जेवायला ये म्हटलं कि १५० गोष्टी सुचून अन्न पार गार आणि बायको च डोकं एकदम गरम झाल्याशिवाय उगवायचं नाही.
२. आधीच कुठेतरी निघायला उशीर झालाय, गाडीत बसायला तो छोटू ला शी झाली डायपर बदलला, अजून उशीर झालाय, तेवढ्यात साहेबाना एक कोळिष्टकं लटकताना दिसलं. आता घरी आल्यावर साफ केलं तर ते पळून जाणार आहे का, पण नाही, आत्ताच झाडू घेऊन यायचं, मग लक्षात येतं कि हात पोचत नाहीये, मग शिडी आणून साफ करून गाडीत बसायचं. तिथपर्यंत पोरं कंटाळलेली, बायको वैतागलेली...
३. स्वतःच्याच घरात स्वयंपाकघरात मध्यात उभं राहून "अगं चमचा कुठे आहे, वाटी कुठे आहे " विचारायचं. एकदा सांगितलं कि परत विचारलास तर ३० मिनिटाची टुर देईन किचनची.
४. घरी जे पदार्थ आवडत नाहीत म्हणून खात नाही (अगदी स्वतःच्या आई च्या हातचे पण) ते बाहेर मित्रांमध्ये मिटक्या मारत खाणे. सुरवातीला अगदी आत्मविश्वासाने सांगायची कि ह्याला नाही आवडत, आणि तो नेमका खायचा, आता सांगते त्यालाच विचारा.
५. बायको ग्रुप मध्ये सगळ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून काही हळू आवाजात सांगत असेल तर अजून चौपट आवाज काढून "काययय " म्हणून विचारणे.
६. जेवायला घरी कोणी आलं तर नेमका जो पदार्थ कमी पडत असेल तोच मागणे.
७. दुकानात खरेदी करताना घासाघीस करत असेन आणि दुकानदार कमी करायच्या तयारीत पण असेल तरी हा मध्येच बोलतो "हि किंमत ठीक आहे कि".... देवा !!!!
जाऊदे आजसाठी एवढंच पुरे :D

एस's picture

26 Jun 2020 - 10:47 pm | एस

कैच्याकै. हे समस्त पुरुषजातीचं अतिसामान्यिकरण (Over-generalization) आहे. पूर्वीचं मिपा असतं आणि कुणी हेच जर उलट केलं असतं तर तथाकथित पाशवी शक्तींनी त्याला धू-धू धुतला असता. भलाई का जमानाच नय रहा। #पुमिराना. =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2020 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजीनं इतकं तंतोतंत वर्णन करुन, आम्हा पुरुषांच्या लिळा अशा चव्हाट्यावर मांडल्याबद्दल आजीचा समस्त पुरुषांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. :)

महिलांच्याही लिळांच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

अती-स्फोटक दारुगोळा मटेरियल!

अनुभवसिद्ध लेखन!!
माझ्या बाबतीत निम्म्याहून अधिक मुद्दे लागू होतील, हे नक्की!
बस-ट्रेन मध्ये मी हृदयविकाराचे सौम्य झटके देण्याचा प्रयत्न करत नाही.

(अवांतर -
पण 'जाऊन येणे'हा काय प्रकार आहे? सारखी कशी शू ला लागते? घरातून निघण्यापूर्वी जायचं ते एकदम घरी परत आल्यावर जायचं(ऑफीस असेल तर गोष्ट वेगळी.) असं बायकांसारखं हे का वागू शकत नाहीत?
या बाबतीत मला स्त्रियांविषयी एकाचवेळी आदर आणि वाईट वाटतं!)

स्वयंपाकघर - सुचना करायची सवय आहे. पण अगदी चमचा कुठे आहे इतका काही मी 'हा' नाही! :प
सिरीयला - आधी टिपण्णी करायचो. आता दुर्लक्ष करतो.
यादी घरी विसरुन सामान आणायला जाणे. रेअरली.
घेतलेले सामान दुकानात विसरणे. नाही.
दाढी करण्याचा कंटाळा करणे. प्रचंड
मधेच दाढी मिशा वाढवणे. बर्‍याचदा
मधेच लहर फिरली की चेहऱ्याची बोडन्ती करुन तो तुळतुळीत करणे. कधीतरी
केस कधी झिरो मशीन मारून सफाचाट करणे किंवा नाकावर केस आले तरी न कापणे. नाही. मला मिशी आवडते :)
बूट,चप्पल काढून कसेही ,कुठेही टाकणे. शू रँकमधे न ठेवणे. कधीच नाही. अजिबात आवडत नाही.
सर्वत्र 'चला,आटपा,पुरे'अशी घाई करणे. प्रत्येक वेळी :)
साध्या साध्या गोष्टींवरून रिक्षावाला, टॅक्सीवाला, भाजीवाला, वेटर (मॅनेजरला बोलवा इ.इ.) यांच्याशी हुज्जत घालणे. कधीच नाही. हुज्जत घालून जो फायदा होईल, इट्स जस्ट नॉट वर्थ इट!
खोली अस्ताव्यस्त ठेवणे. नाही. मी स्वतः नीटनीटकी ठेवतो.
आवरली तर चिडणे. वस्तू जागेवर न ठेवणे. न सापडल्यास आकांडतांडव करणे. हे उलटं. म्हणजे नाही आवरली तर चिडतो, वस्तू जागेवर ठेवतो, न सापडल्यास संयम ठेवतो. उलट काही जर नाही सापडलं (म्हणजे केसांच्या क्लिप पासून ते गळ्यातल्या नेकलेस पर्यंत) तर बायको वैतागते ते अगदी रडकुंडीला येते. मी स्थितप्रज्ञ असतो.
कपडे वेळेवर धुवायला न टाकणे. नेहमीच (कोरोनापूर्व काळात. आता रोज धुवायला असतात)
ऐनवेळी शर्टाला इस्त्री करुन मागणे. कधीच नाही. एकतर दोघांपैकी एकजण आधीच करून ठेवतो. ऐनवेळी लागली तर मी स्वतः करतो.
एकच पँट खूप दिवस वापरणे. `तसं नसतं ते, पुरुषांच्या पँट्स्/जीन्स मध्ये व्हरायटी नसते. म्हणजे बबलगम पिंक पासून ते मोरपंखी अन चिंतामणीपासून ते राणी कलर अशी रेंज नसते. त्यामुळे पँट बदलल्याचं लक्षात येत नसेल :)
मोजे धुवायला न टाकणे. कधीच नाही. म्हणजे शाळेत असल्यापासूण मोजे रोज धुवायला टाकतो.
हातरुमाल विसरणे. मी फक्त घरी विसरतो. बाहेर कुठे नाही. कारण मी खिशातून बाहेर काढतच नाही.
पँटच्या खिशात वस्तू विसरणे. कधीकधी
मोबाईल वेळच्यावेळी चार्ज तसेच रिचार्ज न करणे. चार्ज न केल्याने मला फरक नाही पडत. दहा टक्के शिल्लक असताना मी चार ते सहा तास घालवू शकतो. रिचार्ज- कधीच नाही. जसा मोबाईल वापरतोय तसं ऑनलाईन बँकींग , त्यातलं निम्म्यावेळा मोबाईल वर करत असल्याने, रिचार्ज (मोबाईल - डिश) करायची वेळ येते तेव्हा लगेच करतो.
रविवारी सकाळी दहादहापर्यंत झोपणे. कधीच नाही. रविवारी उशीरा म्हणजे साडेसह-सात वाजता उठतो. शरीराला सवय लागलीये पाच-साडेपाचला उठायची.
बिलं वेळच्यावेळी न भरणे. कधीच नाही. लाईट बिल - विसरलो या कारणाने (ऑनलाईन बँकींग वापरणं सुरू केल्यावर) कधीच भरायचे चुकले नाही. पैसे नाहीत म्हणुन भरले नाही, असं क्रेडिट कार्ड घेतल्या पासून नाही घडलं.

वीणा ३ -
१. जेवायला ये म्हटलं कि १५० गोष्टी सुचून अन्न पार गार आणि बायको च डोकं एकदम गरम झाल्याशिवाय उगवायचं नाही. फक्त ऑफिसचा कॉल चालू असेल तरच उशीर होतो, जस्तीत जास्त पंधरा मिनिटं.
२. आधीच कुठेतरी निघायला उशीर झालाय, गाडीत बसायला तो छोटू ला शी झाली डायपर बदलला, अजून उशीर झालाय, तेवढ्यात साहेबाना एक कोळिष्टकं लटकताना दिसलं. आता घरी आल्यावर साफ केलं तर ते पळून जाणार आहे का, पण नाही, आत्ताच झाडू घेऊन यायचं, मग लक्षात येतं कि हात पोचत नाहीये, मग शिडी आणून साफ करून गाडीत बसायचं. तिथपर्यंत पोरं कंटाळलेली, बायको वैतागलेली... विचित्र आहे, पण मी असं नाही करत :)
३. स्वतःच्याच घरात स्वयंपाकघरात मध्यात उभं राहून "अगं चमचा कुठे आहे, वाटी कुठे आहे " विचारायचं. एकदा सांगितलं कि परत विचारलास तर ३० मिनिटाची टुर देईन किचनची. - कधीच नाही. मी अंधारात डोळे बांधून किचन मध्ये हवं ते शोधू शकतो :)
४. घरी जे पदार्थ आवडत नाहीत म्हणून खात नाही (अगदी स्वतःच्या आई च्या हातचे पण) ते बाहेर मित्रांमध्ये मिटक्या मारत खाणे. सुरवातीला अगदी आत्मविश्वासाने सांगायची कि ह्याला नाही आवडत, आणि तो नेमका खायचा, आता सांगते त्यालाच विचारा. कधीच नाही - वांगं, शेपू, भेंडी मला कधीच, कुठेही, कसलीहि चालत नाही, हे पंचक्रोशीत सगळ्यांना माहितीये (आमचे सगळे नातेवाईक पंचक्रोशीतच आहेत :प)
५. बायको ग्रुप मध्ये सगळ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून काही हळू आवाजात सांगत असेल तर अजून चौपट आवाज काढून "काययय " म्हणून विचारणे. :) सही पकडे है!
६. जेवायला घरी कोणी आलं तर नेमका जो पदार्थ कमी पडत असेल तोच मागणे. - उलट. मला माहिती असतं काय कमी पडू शकतं. त्यादिवशी मग तो पदार्थ मला आवडत नाही :)
७. दुकानात खरेदी करताना घासाघीस करत असेन आणि दुकानदार कमी करायच्या तयारीत पण असेल तरी हा मध्येच बोलतो "हि किंमत ठीक आहे कि".... देवा !!!!
- कारण घासाघीस करून जो फायदा होईल, इट्स जस्ट नॉट वर्थ इट!

आता स्त्री-लीळा जर कोणी लिहिल्या तर लेख ज्वलंत करायला मशाल, रॉकेल, पेट्रोल घेऊन मी येईलच :ड

आजी's picture

7 Jul 2020 - 5:11 pm | आजी

mrcoolguynice-"एकदम कडक,मस्त,अँक्युरेट निरीक्षण"हा अभिप्राय उत्साह देऊन गेला.'मी ब्रह्मास्त्र सोडलंय'असं म्हणालात,त्यावर हसू आलं.

गणेशा-"मजा आली"? धन्यवाद.

मूकनायक-तुम्ही 'लीळा'त घातलेली भर योग्य आहे.

शाम भागवत- हे समस्त पुरुषांबद्दल आहे भागवतजी, फक्त भारतीय पुरुषांबद्दल नाही.मी परदेशात गेलेली आहे. निरीक्षण केलं आहे. शिवाय परदेशस्थ मैत्रीणी आहेतच की सांगायला!

शा वि कु-"गमतीच्या गोष्टी इतक्या रिअँलिस्टिक करु नयेत" हा अभिप्राय आवडला.

पहाटवारा-"खुसखुशीत,कुरकुरीत,भारी कच्चा माल" हा हा, धन्यवाद.

अभ्या-तुम्ही सन्मानीय अपवाद का?अभिनंदन.

गवि-"पुरुषजातीचा लसावि?" शब्दसंपत्ती भारी आहे.

रातराणी-खिसे न तपासता कपडे धुवायला टाकणे ही एक 'लीळा'आहेच बरंका!

चौथा कोनाडा-हा हा हा.तुमचा अभिप्राय गमतीदार.तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घटस्फोटासाठी यांतली एखादी लीळा कारण बनू शकेल.

राजेंद्र मेहेंदळे-"यादी वाढतच जाईल". बरोब्बर बोललात.

सुचिता१-"आजीचं निरीक्षण अफलातून" याबद्दल धन्यवाद.

सिरुसेरी-मजेशीर निरीक्षण. धन्यवाद.

सस्नेह-"भलतंच वास्तववादी" थँक्यू.

वीणा३-तुमचं निरीक्षण आणि तुम्ही सांगितलेल्या अनेक लीळाही गंमतशीर.

एस-तुम्हीही लीळा लिहू शकता एस!उचला पेन.

दिलीप बिरुटे- माझा निषेध करताय?त्यापेक्षा 'स्त्रीलीळा'लिहा ना!

पैलवान-"अतिस्फोटक दारुगोळा मटेरियल".हा हा हा.तुम्हीही काही लीळांची भर घातलीय.समर्थनही केलंयंत.छान अभिप्राय.

वीणा३-"आता कोणी स्त्रीलीळा लिहिल्याच तर लेख ज्वलंत करायला,मशाल, रॉकेल,पेट्रोल घेऊन मी येईनच." हा हा. जरुर या.

श्वेता२४'s picture

11 Jul 2020 - 4:10 pm | श्वेता२४

लेखातील व प्रतिसादातील बरेच मुद्दे पटले. यात पुढील जमा
१) बायकोच्या माहेरच्यांची चेष्टा करणे (अर्थात गमतीत)
२) मी कसा बायकोच्या आज्ञेत असतो असे चारचौघात भासवणे. याबाबतचे जोक्स आपापल्या मित्रमंडळीत आवर्जून फॉरवर्ड करणे.
३) मुलींबाबतीत माहीत नाही पण लहान मुलग्याला सांभाळायला दिलं तर त्याच्याशी खेळताना त्याच्या कलाने न घेता, स्वत:च्या कल्पना त्याच्यावर लादून त्याला चिडवतील व शेवटी रडवतील. थोडक्यात आपलाच व्याप वाढवून ठेवतील

माझिया मना's picture

12 Jul 2020 - 12:28 am | माझिया मना

माझ्या घरात cctv लावला आहे की काय असे वाटावे इतपत वर्णन

मन्या ऽ's picture

13 Jul 2020 - 6:52 pm | मन्या ऽ

अनुभव नाही.. पण जाम मजा आली वाचताना.. :D :D