https://www.misalpav.com/node/47149#new
शाम भागवत सरांचा हा धागा वाचून मनात काही विचार आले ते शब्दबध्द केले आहेत. त्या धाग्यावर हे टाकले तर कदाचित विषयांतर होईल असे वाटल्याने वेगळा धागा काढत आहे.
जसे सुचले तसे लिहिल्याने कदाचित हे वाचताना विस्कळीत वाटेल, तसे वाटले तर तो माझ्या आकलनाचा दोष समजून वाचकांनी मला क्षमा करावी व भावार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.
क्षमा प्रार्थना
क्षमेसारखा दुसरा स्वार्थ नाही | जनी सर्व सूखी क्षमाशिल राही ||
अभोगी पणे भोगणे भोग सारे | अहंपणाची जराही बाधा नकोरे ||
विकारे विचलीत होऊ नये रे | विकार किती एक आले न गेले ||
क्षमावंत उपेक्षा करी विकारांची | समता सदा राखूनिया मनाची ||
भूत भविष्यात मन धावित राही | तयाची प्रतिक्रिया उमटे तव देही ||
प्रतिक्रिया उमटता श्वास गतिमान होई | उसळे रक्त सु़क्ष्म कंप सर्वांगी येई ||
अवस्थेस ऐशा जाणून घ्यावे | प्रयत्ने मना वर्तमानी अणावे ||
प्रिय-अप्रिय या अवस्था मनाच्या | अपेक्षा उगा वाढविती उद्याच्या ||
अपेक्षांचे गाठोडे फेकून द्यावे | मना समभावे सदा रमवावे ||
मार्ग हा जरी वाटला खूप साधा | मन आणेल त्यात हजार बाधा ||
मर्कटलीला मनाच्या दुर्लक्षून टाकी | आपोआप स्थित होईल ते एक जागी ||
अडथळ्यास उगा घाबरून जाऊ नको रे | मदतनीस तुझे पावलो पावली उभे रे||
पाउल पहिले पुढे टाकून पहा रे | तक्षणी मार्ग उजळेल बघ तुझा रे ||
ईश्वरा प्रति मागणे एक आहे | सर्व प्राणीमात्र या मार्गी निघावे ||
जागी प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे | आनंदाचे डोही सर्व आनंदी व्हावे ||
पैजाराबुवा,
प्रतिक्रिया
6 Jul 2020 - 12:13 pm | सोत्रि
- (नतमस्तक) सोकाजी
6 Jul 2020 - 12:15 pm | सोत्रि
सुंदर!
- (साधक) सोकाजी
6 Jul 2020 - 12:33 pm | शाम भागवत
अप्रतीम.
दंडवत घ्यावा.
अहो,
हे अवांतर नाहीये. त्या धाग्याला दागिन्यांचा साज चढवल्यासारखे झाले असते.
_/\_
6 Jul 2020 - 1:08 pm | मूकवाचक
_/\_
7 Jul 2020 - 12:37 pm | महासंग्राम
सुंदर __/\__
7 Jul 2020 - 2:20 pm | अत्रुप्त आत्मा
___/\___
7 Jul 2020 - 6:30 pm | अर्धवटराव
अप्रतीम पसायदान _/\_
7 Jul 2020 - 6:33 pm | प्रचेतस
अतिशय सुरेख
7 Jul 2020 - 6:59 pm | सतिश गावडे
अतिशय सुंदर लिहीलंय पैजार बुवा.
7 Jul 2020 - 7:44 pm | राघव
छान लिहिलंय बुवा! भावना पोचल्यात. आवडले.
7 Jul 2020 - 8:23 pm | झेन
नेमक्या शब्दात कीती सहज आणि सुंदर लिहिले आहे __/\__
7 Jul 2020 - 8:33 pm | सतीश विष्णू जाधव
एकदम झकास......
आनंदाचे डोही आनंद तरंग......
7 Jul 2020 - 11:32 pm | मदनबाण
शिर्षक वाचुन मला मी लहानपणा पासुन अनेक वेळा नृसिंह वाडीला ऐकलेली प्रार्थना आठवली !
अपराध क्षमा आता केला पाहीजे।।
गुरु हां केला पाहीजे।।
अबद्ध सुबध्दु गुण वर्णीयले तुझे ।।धृ | |
न कळेची टाळ वीणा वाजला कैसा।।
गुरु हा वाजला कैसा।
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतैसा ।। १ | |
नाही ताल ज्ञान नहीं कंठ सुस्वर।
गुरु हा कंठ सुस्वर।
झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। २ ||
निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे ।
गुरु हे वेडे वाकुडे |
गुणदोष न लावावा सेवकाकडे।। ३ | |
अपराध क्षमा आता केला पाहीजे।।
गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु गुण वर्णीयले तुझे ।।
ही प्रार्थना वेगळ्या चालीत अजित कडकड्यांनी गायली आहे :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal
8 Jul 2020 - 4:06 am | कोहंसोहं१०
सुंदरच_/\_
8 Jul 2020 - 10:40 am | प्राची अश्विनी
सुंदर!
8 Jul 2020 - 8:46 pm | प्रमोद देर्देकर
खूप छान.
17 Jul 2020 - 2:01 am | खिलजि
मनाचा मुजरा आणि त्यासोबत दंडवत फ्री फ्री फ्री
17 Jul 2020 - 6:02 pm | मन्या ऽ
दंडवत!!! _/\_
17 Jul 2020 - 9:22 pm | गोंधळी
भारी श्लोक.__/\__