फुलपाखरू
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरू ..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
त्याच कटु
आठवणींने बळ
तयाच्या पंखास दिले
संकटावर मात करुन
त्यास नव्या उमेदीने
जगण्यास शिकवले!..
-दिप्ती भगत
(१३जून, २०१९)
प्रतिक्रिया
9 Jun 2020 - 6:21 pm | गणेशा
खूपच छान कविता..
जैसे सादगी हि सुंदरता...
10 Jun 2020 - 11:45 am | पाषाणभेद
सोने तापवल्यावर शुद्ध होत जाते. मनाच्या फुलपाखराचेही तसेच आहे हे छान समजावून दिले!
11 Jun 2020 - 2:21 am | कौस्तुभ भोसले
मस्त
11 Jun 2020 - 10:27 am | चांदणे संदीप
कविता आवडली.
सं - दी - प
13 Jun 2020 - 6:30 pm | मन्या ऽ
गणेशदा, पाभे, कोस्तुभ, संदीप, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :)
वाचकांचे आभार! :)
27 Jun 2020 - 1:10 am | पाटिल
मनाच्या फुलपाखराची पंखलिपी आवडली..:-)