शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील "वेध महामानवाचा" ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता. कवि अज्ञात.
छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।
दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।
निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पंथ याच्या
तोड आता श्रुंखला ।।
नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।
छातीत निर्भय श्वास दे...
.
.
.
.
ह्या कवितेतील
"ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।"
ह्या ओळी तर मला अतिशय आवडतात, तुम्हाला कुठली ओळ आवडली, सर्वांत जास्त मनाला भावली?
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 8:03 am | प्राजु
संपूर्ण कविताच सुंदर आहे .. अतिशय उत्साहवर्धक आहे.
त्यातही हे पहिलं कडवं अतिशय सुंदर आहे.
छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
- (हर हर महादेव)प्राजु
16 Feb 2008 - 9:17 am | विसोबा खेचर
छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
याच ओळी सर्वात जास्त आवडल्या..
असो,
थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा...!
तात्या.
16 Feb 2008 - 6:51 pm | पिवळा डांबिस
याच ओळी जास्त आवडल्या...
-डांबिसकाका
16 Feb 2008 - 7:29 pm | संजय अभ्यंकर
स्फुर्तीदायक कविते बद्दल आभार!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
17 Feb 2008 - 7:06 pm | बुध्दू बैल
संपूर्ण कविताच आवडली. उत्स्फुर्तपणा वाढवते. ही कविता आधी कधीतरी वाचल्यासारखी आठवते.
17 Feb 2008 - 9:17 pm | चतुरंग
संपूर्ण कविताच स्फूर्तिदायी आहे.
काव्यकर्त्या/र्ती चा शोध लागला तर फार छान वाटेल.
चतुरंग