ओसाड राजमार्ग

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
30 Mar 2009 - 11:56 am

सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन
उत्तरं कशीबशी जुळवता येतात.

उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला
सापडतोच कुठला तरी वशिला

चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात

तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत

मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन
खरी वाट सोयिस्करपणे विसरुन

सवयी त्याच अंगवळणी पडतात
आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात.

जयश्री अंबासकर

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

30 Mar 2009 - 12:18 pm | अमोल केळकर

खुप छान कविता

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

जागु's picture

30 Mar 2009 - 12:19 pm | जागु

जयवी अगदी खर आहे हे. कविता खुप आवडली.

सँडी's picture

30 Mar 2009 - 12:23 pm | सँडी

चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात

मस्तच!

आवडली कविता.

अरुण मनोहर's picture

30 Mar 2009 - 4:49 pm | अरुण मनोहर

कविता आवडली.
मात्र ह्यावर थोडा प्रकाश कविच्या नजरेतून टाकाल काय?

सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

हे, आणि
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत
हे,
परस्पर विरोधी वाटते कां?

लिखाळ's picture

1 Apr 2009 - 7:06 pm | लिखाळ

कविता छान आहे.

राजमार्ग = श्रेयस्कर मार्ग
आडवळण = भ्रष्ट मार्ग
त्यानंतर आडवळणाचा झालेला राजमार्ग = रुळलेला भ्रष्ट मार्ग ..येथे राजमार्ग अवतरणांत !
असे मी समजलो.
-- लिखाळ.

जयवी's picture

2 Apr 2009 - 1:06 pm | जयवी

लिखाळ.... तुम्ही जे समजलात तसंच :)
बाकी तुमची प्रतिक्रिया मिळाली की छान वाटतं हो :)

प्राजु's picture

30 Mar 2009 - 7:33 pm | प्राजु

मस्त!!
आडवळणांची कविता आवडली.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

30 Mar 2009 - 7:40 pm | मदनबाण

सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

हम्म्म्,,सत्य...

मदनबाण.....

जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीला अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...

शितल's picture

30 Mar 2009 - 10:00 pm | शितल

जयवी ताई,
ही कविता देखिल मस्तच.:)

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 7:02 pm | क्रान्ति

चढ उतार नकोच असतात
आडवळण मग शोधली जातात
अगदी खर आहे. खास कविता जयुताई.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

बेसनलाडू's picture

2 Apr 2009 - 2:51 am | बेसनलाडू

आवडली.
(सरळमार्गी)बेसनलाडू

नंदन's picture

2 Apr 2009 - 6:16 am | नंदन

अतिशय आवडली. Following the path of the least resistance is what makes rivers and men crooked, हे वाक्य आठवलं यासंदर्भात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

जयवी's picture

2 Apr 2009 - 1:04 pm | जयवी

सगळ्या अभिप्रायांसाठी मनापासून धन्यवाद :)