कोरोनासोबत जगायचे आहे...!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
लॉकडाउन म्हणायलाच तेवढा राहिलाय. दैनंदिन रूटीन हळूहळू वळणावर येतंय. टीव्ही चॅनल्स चा धोशा आता कुणी फारसा मनावर घेत नाहीयेत. रेल्वे एष्ट्या सुरु झाल्या आणि आतापर्यंत लॉकडाऊन असलेल्या कोरोनाला पाय फुटू लागलेत. आतापर्यंत बंद डब्यात असलेल्या लहानलहान गावांतून कोरोना रूग्ण वाढू लागलेत.
आमच्या गावातही ४-५ निघाले.
आता तर सगळेच व्यवहार सुरु झालेत. सगळे म्हणतात, खबरदारी घ्या.
लहानपणी एकदा एकांच्या घरी गेले होते. तिथे घराच्या चार भिंतींच्या आत, मध- घरात एक मोठे च्या मोठे नागाचे वारूळ होते. होय, घरात !! आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून असे घरातच आहे असे समजले .त्यातून क्वचित कधीतरी नाग सापांची ये जा ही होत असे पण त्या घरातल्या लोकांना त्याचे काहीच वाटत नसेल ते काय करतात आपल्या वाटेने निघून जातात. त्यांचं घर आहे, आमचं पण आहे असं म्हणाले.
आज आपण आणि कोरोना यांचं असंच झाला आहे. घरात रस्त्यात ऑफिसात दुकानात तो शेजारी आहेच. त्याला घेऊनच वावरायचं आहे. फार जवळ येऊ द्यायचं नाही सांभाळून राहायचं आहे. हे कसं करायचं हे आता शिकायला पाहिजे.
मास्क लावून बाहेर पडावं लागतं च. सॅनिटायझरची बाटली पर्समध्ये असतेच. ऑफिसमध्ये टचलेस सॅनिटायझर बाटल्या बसवल्या आहेत. बेसिन जवळ कधी नव्हे तो एक साबण दिसतो आहे एक माणूस रजिस्टर घेऊन टेबल टाकून दारात बसला आहे आल्यागेल्याची नाव व पत्ते कामाचे स्वरूप इत्यादी लिहून घेत आहे कागदपत्र गरज असेल तरच स्वीकारली जात आहेत.
माझ्या केबिन मध्ये रोज 100 माणसांची ये-जा. कागदपत्र घ्यावे लागतात. यामध्ये कपात कशी काय करता येईल विचार करते आहे. साइटवर गेल्यावर कामाच्या स्वरूपामुळे पर्सनल डिस्टसिंग पाळता येईलच असे नाही. ऑफिसकडून आर्सेनिक अल्बम नावाच्या गोळ्या फ्री मध्ये मिळाल्या आहेत. त्याचा काही फायदा होतो की नाही माहिती नाही.
याशिवाय अजून काय काय करता येईल ज्यामुळे या कोविड नावाच्या बलेपासून संरक्षण करता येईल ?
सुचवा तुमचे उपाय आणि शेअर करा अनुभव इथे.
प्रतिक्रिया
झकास सुरूवात.. सवडीने
लॉकडाउन नंतर बरेच बदल घडले आहेत.
उत्पादन क्षेत्रात काम करणारा मिपाकर
ताप मोजण्याची आयड्या भारीये
थोडक्यात
मास्क
साधा मास्क लावुनही जास्त वेळ
माझे मत
तुम्ही रोज करोना ग्रस्तांना
एक मिस्ड कॉल देऊन अपॉईंटमेंट
हीच नेमकी भिती
परवाच सामान आणायला गेले होते
मास्क मुळे श्वास अडकल्यासारखे
करोना आणि इन्शुरन्स पॉलिसी
मोदक .....
होय आपल्या सगळ्या चालू पोलिसी
होय
माझ्या वैद्यकीय माहीतीनुसार
मेडिकल पॉलिसी मुळे
Santizer चा वास भयंकर येतो
मुक्तनासिकामुखशौर्याकर्षण
मॉल बहुदा 15जून पासून सुरु
पावसामुळे कोरोनाची वाटचाल कशी
कागदपत्रे हाताळण्याकरता काही
कागदपत्रे हाताळण्याकरता काही
कागदपत्रे हाताळण्याकरता काही
बिगबास्केट वरून मागवण्याचा
+१
मोदक भाऊ तिकडचा प्रतिसाद इकडे डकवत आहे.