रत्नाकर मतकरी यांना आदरांजली

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
18 May 2020 - 8:53 am

a

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले.

रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत. मात्र मतकरींनी त्यांच्या गूढकथांद्वारे मनोव्यापाराचा एक नवाच आयाम उघडून दिला.

जेवणावळ मधली जमलेली भूते, मला विक्रम दिसतो मधलं विलक्षण गूढनाट्य, लपाछपी मधले ते तीन विल्कूंची कहाणी जी मुळात मल्टिपर्सनलिटी डिसऑर्डर दाखवते, हेडस्टडी, ड्रॅक्युला, ती दोन मुलं मधली चमकदार, पाणीदार डोळ्यांच्या दोन मुलांभोवती फिरणारे थरारनाट्य, मंदा पाटणकरची गोष्ट, हातमोजे, जंगल, चिखल, टोक टोक पक्षी, फाशी बखळ, खेकडा मधल्या एका लहान मुलाने विलक्षण पद्धतीने उगवलेला सूड, म्हणे कोण मागे आले मधला थरार, रगांधळा, असाही एक कलावंत अशा कितीतरी विविध गूढकथा. मला तर त्यांच्या गूढकथा आल्फ्रेड हिचकॉक आणि स्टिफन किंगपेक्षाही सरस वाटतात.

ह्या माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाला आदरांजली. मराठी साहित्यात असा गूढकथाकार होणे नाही.

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

18 May 2020 - 9:14 am | चौकटराजा

मला युवावस्थेतच मतकरी यांच्या गूढकथा वाचण्याचे वेड लागले .आज त्यांच्या एका कथेचे नाव आठवत नाही पण तिचा शेवट अत्यंत चटका लावणारा होता .एका मुलाला भिकारी म्हणून बसविले जाते. त्याला दिवशी महारोगाचा पहिला लाल चट्टा आपल्या अंगावर आढळतो व आपल्याला आता अधिक भीक मिळणार याचा त्याला आनंद होतो अशी काहीशी गोष्ट होती." जौळ " ही त्यांची एक उत्तम कादंबरी ! त्याच्या " माझं काय चुकलं " या नाटकातील एका पात्रा च्या दवाखान्यात माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला . ( कारण ती एक सत्यकथा आहे ). मतकरीना दीर्घ आयुष्य लाभले व कारकीर्द ही ! दिलीप प्रभावळकर हे त्याचे फाईंड व त्यांची उत्तम अभिनेत्री असलेली मुलगी यांच्य बद्दल ही मला अत्यंत आदर आहे ! माझ्या अशा लाडक्या लेखकाला विनम्र पणे आदरांजली !

जौळ वर सिनेमाही निघाला होता. दुःखांत कादंबरी होती ही. ह्याशिवाय एडम सारखी मराठी साहित्यात अत्यंत धाडसी असणारी कादंबरीही त्यांनी लिहिली होती

चौथा कोनाडा's picture

18 May 2020 - 11:48 am | चौथा कोनाडा

"जौळ" वर "माझं काय चुकलं" हे नाटक आणि "माझं घर, माझा संसार" हा चित्रपट निघाला !
तिन्ही कलाकृती समिक्षकांनी नावाजल्या, रसिकांनी डोक्यावर घेतल्या !

या नावाचे २ खंड अहेत. त्यातल्या एका खंडात त्या भीक मागणार्‍या मुलाची कथा आहे.
इतर कथा देखील अप्रतीम आहेत.

सोन्या बागलाणकर's picture

18 May 2020 - 9:23 am | सोन्या बागलाणकर

माझ्या मनातलं बोललात प्रचेतसजी. मलाही मतकरींच्या गूढकथा आणि खासकरून शेवटच्या एक दोन ओळीत दिलेला ट्विस्ट फारच आवडतो. तुम्ही वर लिहिलेली सगळी पुस्तकं वाचली आहेत आणि मनापासून आवडली आहेत. या गुणी लेखकाला भावपूर्ण आदरांजली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2020 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझाही आवडता गुढकथाकार, आयुष्याच्या शेवटापर्यंत लेखन करीत राहणार्‍या मोठ्या माणसाला भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

18 May 2020 - 9:54 am | जव्हेरगंज

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले अशी बातमी आहे!!

चांदणे संदीप's picture

18 May 2020 - 10:00 am | चांदणे संदीप

गूढकथा, भयकथा या प्रकारापासून मी जरा लांबच आहे तरीही रत्नाकर मतकरी हे नाव लहानपणासून ऐकत आलेलो आहे.
भावपूर्ण आदरांजली.

सं - दी - प

निनाद's picture

18 May 2020 - 10:18 am | निनाद

लेखकाला श्रद्धांजली!

लहानपणी पाहिलेली निम्माशिम्मा राक्षस, अदृष्य माणूस बालनाट्ये अजून आठवतात.
मराठी वाचकवर्ग फार लहान आहे. त्यांचे लेखन इंग्रजीत असते तर क्लासिक्समध्ये जाऊन पुस्तकांचा प्रचंड खप झाला असता, नाटके गाजत राहिली असती. .

चौथा कोनाडा's picture

18 May 2020 - 11:53 am | चौथा कोनाडा

त्यांच्या गुढकथा जबरदस्त होत्या, कबंध्म खेकडा, शेवटची बस या कथा अजुनाही लक्षात आहेत !
जौळ तर माझी लाडकी कांदबरी, वाचल्यानंतर सुन्न झालो होतो. घटना आपल्या जवळपास कुणाच्या तरी बाबतीत घडली आहे असं सावट पडून १५ दिवस अस्वस्थ होतो.

ह्या माझ्या अत्यंत लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली ! मतकरी पर्व झाकोळले.

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__

राघव's picture

18 May 2020 - 12:28 pm | राघव

_/\_

मित्रहो's picture

18 May 2020 - 12:31 pm | मित्रहो

श्रद्धांजली _/\_

दीर्घायु आणि दीर्घोद्याेगी मतकरींना चतुरस्रतेचे वरदान लाभले होते.

A Life lived well !

नूतन's picture

18 May 2020 - 1:18 pm | नूतन

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__

मोहनराव's picture

18 May 2020 - 1:19 pm | मोहनराव

भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__

मदनबाण's picture

18 May 2020 - 4:30 pm | मदनबाण

भावपूर्ण श्रद्धांजली !
गहिरे पाणी या नावाची मालिका झी मराठी वर पाहिल्याचे स्मरते !
Gahire Paani | Marathi TV Serial | Full Episode - 1 | ZEE MARATHI

चौथा कोनाडा's picture

18 May 2020 - 5:42 pm | चौथा कोनाडा

+१
सुंदर होती ही मालिका !

तुषार काळभोर's picture

23 May 2020 - 10:07 pm | तुषार काळभोर

गहिरे पाणी अतिशय सुंदर मालिका होती.
खेकडा (जे पुण्यातल्या साहित्य संमेलनात घेतलं होतं) मधल्या कथा अगदी धरपांसारख्या भीतीदायक नसल्या तरी आतून ढवळणाऱ्या होत्या.
त्यांच्या गुढकथांची जातकुळी वेगळीच होती.
रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली..

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__ . नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. +१००

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..!

अर्धवटराव's picture

18 May 2020 - 8:08 pm | अर्धवटराव

मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली.
__/\__ __/\__

गामा पैलवान's picture

18 May 2020 - 9:20 pm | गामा पैलवान

एकंदरीतच मी मराठी साहित्य फारसं वाचलेलं नाही. मतकरींचं काही वाचलेलं लेखन आठवंतही नाही. पण एक गोष्ट मात्र मनात पक्की रुतून बसली आहे. ती म्हणजे :

रत्नाकर मतकरी = उत्तम दर्जा

आदरांजली!

-गा.पै.

समयोचित चांगला लेख. खूप पूर्वी मतकरींचं लेखन, विशेषतः काही भयकथा वाचताना एकदम घबराट झाल्याचं आठवतं.

आदरांजली.

मतकरींनी घडत्या वयात अभिरुची घडवली. फारच परिणामकारक शैली !
माझ्या लेखनावर मतकरी आणि धारप यांचे संस्कार आहेत.
आदरांजली !!

कानडाऊ योगेशु's picture

19 May 2020 - 2:16 pm | कानडाऊ योगेशु

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रध्दांजली!!!!!
जेवणावळ वाचली होती तेव्हा शेवटच्या ओळीत बसलेला धक्का अजुनही विसरलेलो नाही आहे.
जौळचा पगडा ही बरेच दिवस डोक्यावर होता. अतिशय उत्तुंग प्रतिभेचा लेखक गेला.

आयर्नमॅन's picture

19 May 2020 - 8:32 pm | आयर्नमॅन

मनःपूर्वक आदरांजली

गोंधळी's picture

19 May 2020 - 9:24 pm | गोंधळी

भावपूर्ण श्रद्धांजली.

Prajakta२१'s picture

19 May 2020 - 9:51 pm | Prajakta२१

आदरांजली

कुमार१'s picture

20 May 2020 - 7:12 pm | कुमार१

आदरांजली!
त्यांच्या ‘अस्पर्श’ या कथेतील एक सुंदर वाक्य:

आपण केलेला स्पर्श आणि आपल्याला झालेला स्पर्श यात महदंतर असतं. पहिलं आपलं कर्तृत्व असतं, दुसरं आपलं भाग्य असतं.

अनिंद्य's picture

20 May 2020 - 8:33 pm | अनिंद्य

अगदी !

चौथा कोनाडा's picture

21 May 2020 - 11:24 am | चौथा कोनाडा

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2020 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाक्य जबरा.

-दिलीप बिरुटे

उपेक्षित's picture

21 May 2020 - 1:20 pm | उपेक्षित

मतकरी, धारप आणि सु.शि. यांच्यामुळे बालपण समृध्द झालेली आपली पिढी खरोखरच भाग्यवान होती.

तिघांनाही साष्टांग नमन _/\_

शशिकांत ओक's picture

22 May 2020 - 8:13 pm | शशिकांत ओक

'जौळ' या त्यांच्या कादंबरीच्या फॉर्मचा प्रभाव माझ्या मनांवर पडला असावा. कारण नंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या "अंधारछाया" कांदंबरीत तोच आत्मनिवेदनाचा फॉर्मॅट वापरला गेला.

झम्प्या दामले's picture

25 May 2020 - 1:30 pm | झम्प्या दामले

भावपूर्ण श्रद्धांजली.