झोप २

बुध्दू बैल's picture
बुध्दू बैल in जे न देखे रवी...
15 Feb 2008 - 9:26 pm

वडापावरावांच्या(आधीचे पाणीपुरी) झोप ह्या कवितेमुळे खडबडून जागा झालो व उत्साहाच्या भरात कविता सुचत गेली

स्वप्ननगरीत माझ्या मी
सोन्याने न्हाऊन निघालो
आईने पाणी शिंपडल्यावर
खडबडूनि जागा झालो

स्वप्ननगरीत माझ्या
ताकाचे प्याले मी प्यालो
जरा जास्तच प्यायल्यामुळे
खडबडूनि जागा झालो

जिंकूनि क्रिकेट वर्ल्डकप
मी माझ्या मायदेशी आलो
मॅच हरल्याच्या बोंबा ऐकून
खडबडूनि जागा झालो

जेव्हा खरोखर जाग आली
तेव्हा कळले झोपेत होतो
आई म्हणाली मला माझी
मी झोपेत बडबडत होतो

-(सूर्यवंशी) बुध्दू बैल

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

15 Feb 2008 - 10:48 pm | धनंजय

तुमच्याच वंशातला