विशाल कुलकर्णी साहेब. कृपया ह. घ्या.
काव्यांचे पसारे खुप झाले
कवितांचा खच आता नको ... !
विडंबनाचे रेचक थोडे घेऊया
गंभीर कवीतांचे अजीर्ण आता नको ... !
तेच तेच शब्द काव्यांमधे
शब्दांची घुसमट आता नको ... !
चला विडंबनकारांनो एक खेळ खेळु
गंभीर कवींचा धाक आता नको ... !
हरवले सारे कवीपण माझे
ईच्छा कविता लिहिण्याची आता नको ... !
जिथे तिथे सगळीकडे .., ते काव्य
हृदयाला छळणारे आता नको ... !
चल दुसर्या विभागात जावू
मोह काव्य विभागाचा आता नको ... !
प्रतिक्रिया
28 Mar 2009 - 6:15 pm | दशानन
लै भारी !
चल दुसर्या विभागात जावू
मोह काव्य विभागाचा आता नको ... !
आपल्यासाठी तात्याला आता नवीन विभाग करावा लागेल, तडिपार विभाग.... =))
28 Mar 2009 - 6:26 pm | मराठमोळा
खरे आहे..
तडीपार किवा विडंबनकारांसाठी नवा विभागच काढावा लागेल बहुदा..
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
28 Mar 2009 - 6:29 pm | अनंता
त्रिवार खरे आहे !!!
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
28 Mar 2009 - 9:54 pm | नितिन थत्ते
तुम्ही कविता नको म्हणताय आणि तिकडे कोणीतरी 'कवितेचा आजार' मागतंय.
खराटा
(रंग माझा वेगळा)
29 Mar 2009 - 9:43 am | यशोधरा
:)