लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
26 Mar 2020 - 10:33 pm

गेली ३० वर्ष मी घरुन काम करतोयं त्यामुळे जे लिहीलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहातो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते.

' जीवन म्हणजे इतकी वर्ष ' अशी अत्यंत चुकीची धारणा आयुष्यात कोणताही बदल घडू देत नाही, कारण जीवन म्हणजे ' एक दिवस गुणीले काही हजार वेळा ' असा हिशेब आहे. थोडक्यात ज्याला आयुष्यात रंग भरायचेत त्याला आजच्या चोवीस तासांच काँपोझिशन बदलायला लागतं. जर आजच्या चोवीस तासात तुम्ही गाण्यासाठी एक तास दिलात, तरच तुमच्या जीवनात गाणं प्रवेश करेल आणि मग ते रोजच्या आजमधे भिनत तुमचं आयुष्य बदलेल. आज तुम्ही जितका जमेल तितका योगा मन लावून केलात तर त्या स्ट्रेचमुळे मोकळं झालेलं शरीर तुम्हाला उद्या योगा करायला उद्युक्त करेल. अशाप्रकारे तुम्ही आजच्या चोवीस तासांच्या काँपोझिशनमधे जितका बदल घडवाल तितकं तुमचं आयुष्य बदलेल.

शिवाय आयुष्यात मजा यायला ते कायम इंटर-अ‍ॅक्टीव हवं, म्हणजे मला क्रिकेटची आवड आहे असं म्हणणाऱ्याला जगात सामने सुरू व्हायची वाट बघावी लागते. हेच तुम्ही स्वतः टेबल -टेनीस खेळत असाल तर तुमचा फोरहँडचा बसलेला फटका, जगातल्या कोणत्याही प्लेअरचा कुठल्याही फटका बघण्यापेक्षा, तुम्हाला खाचितच जास्त आनंद देतो. शिवाय तुम्हाला खेळात कौशल्य प्राप्त करायची संधी देतो. तव्दत, नुसतं वाचन जितका आनंद देईल त्यापेक्षा तुमचं स्वतःच लेखन तुम्हाला कैक पटीनी जास्त आनंद देतं; पण त्यासाठी लेखनकला अवगत करायला लागते आणि काही तरी सांगण्यासारखं अनुभव समृध्द जीवन असावं लागतं. कवितेचा व्यासंग आणि स्वतःचा अनुभव कवितेतून मांडणं हा एक वेगळाच कैफ आहे. त्यासाठी शब्दसमृद्धी, लयीचं भान, अनुभवाची उत्कटता अंगी भिनवावी लागते.

पाककला हा जीवनातला एक नितांत रम्य विषय आहे. पत्नीकडून पोळ्या करायला मी आता शिकणार आहे. पोळी जमली की निम्मं आयुष्य सार्थकी लागल्याचा फिल येईल. आपल्या आवडीच्या पाककृती पत्नीसमवेत करण्याची मजा काही औरच आहे.

इथले लॉक्ड इनवरचे दिवस मोजणारे लेख पाहिले, अशाप्रकारे वेळ घालवणं म्हणजे केवळ कालापव्यय आहे. ते सगळे पर्याय काहीच करायला नसतांना ठीक आहेत, पण हा कालावधी वाढला (आणि तीच शक्यता जास्त आहे) तर त्यातून यथावकाश डिप्रेशन येईल आणि हाती आलेली अपूर्व संधी निसटून जाईल.

व्यक्तीचं जीवन हे वृक्षाप्रमाणे बहरत जायला हवं, रोज नवं काही तरी शिकावं, नव्या विषयाचा मागोवा घ्यावा, आपला असलेला स्कील सेट आणखी कारगर करत न्यावा असं मला वाटतं आणि निदान मी तरी तसा जगत आलोयं. या निमित्तानं हा लेख कदाचित तुमचंही जीवन बदलू शकेल.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

26 Mar 2020 - 10:57 pm | सौन्दर्य

मला वाटते सध्या हयात असलेल्या लोकांसाठी असा हा पहिलाच अनुभव असावा. लेखात म्हंटल्याप्रमाणे किती दिवस उरलेत हे मोजण्यापेक्षा प्रत्यके गेलेल्या दिवसात मी काय मिळवलं ह्याचा हिशेब मांडणं जास्त चांगला ठरेल.

हे महत्त्वाचं आहे. कारण आजचा दिवसच कायम हाती आहे आणि ज्याचा आज बदलला त्याचाच उद्या बदलेल. आयुष्य ही अशा एकेका दिवसांची मालिका आहे; तो काही वर्षांचा प्रवास नाही.

शशिकांत ओक's picture

29 Mar 2020 - 12:00 pm | शशिकांत ओक

आयुष्य ही अशा एकेका दिवसांची मालिका आहे; तो काही वर्षांचा प्रवास नाही.

कमी शब्दात मांडलेला आशय

कोरोनाशी क्रिएटीव्ह मुकाबला कसा करावा याच्या युक्त्यांची / क्ल्युप्त्यांची देवाणघेवाण होणं हे सध्या अत्यावश्यक आहे.
त्याने एकमेकांचा हुरुप वाढेल
नविन काही करण्याची उर्मी निर्माण होइल.
तुम्ही अजुन काही उपाय सुचवलेत तर बरे होइल.
मी काही अभिजात इंग्रजी कवितांचा एक कविता घेऊन तिचाच हिन्दी मराठी उर्दु अनुवाद करण्याचा लंगडा प्रयत्न करतोय.
पण त्याने भाषेच्या डोहात डुबक्या मारण्याचा निखळ आनंद मिळतोय.

तीन्ही प्राणायाम मन लावून शिकणं आणि करणं; भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम-विलोम. त्यात कपालभाती करतांना घशातून श्वासोत्छ्वास कराल तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती शून्य; कारण लेटेस्ट संशोधनाप्रमाणे ते विषाणू प्रथम घशात थीक म्युकस निर्माण करतात आणि मग यथावकाश रेस्पिरेशन ब्लॉक करतात. जमेल तेवढी गरम पेयं पीणं हा या परिस्थीतीत घेता येणारा दुसरा आनंद आहे.

यानिमीतानं प्राणायाम शिकणं हा पहिला आनंद आहे आणि तो आयुष्यात फार मोठा बदल घडवेल कारण सगळं शरीर आणि मनःस्वास्थ्य श्वासावरच अवलंबून आहे.

सौन्दर्य's picture

27 Mar 2020 - 12:05 am | सौन्दर्य

मुलांचा अभ्यास घ्या ! खुप नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

जव्हेरगंज's picture

27 Mar 2020 - 12:24 am | जव्हेरगंज

छान लेख! या लेखाची प्रेरणा घेऊन आता स्वयंपाक शिकण्याचा इरादा ठेवतो..

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 8:36 am | संजय क्षीरसागर

प्रश्न आयुष्य संपण्याचा नाही, ते कसंही आणि केंव्हाही संपू शकतं. ते संपण्यापूर्वी आपण किती मजेत जगलो हे कौतुकाचं आहे.

काही वर्षांपूर्वी टेबल -टेनीस पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला माझ्या ऑरथो सर्जननी दिला होता. मी त्याला म्हटलं बेडवर पडलेल्या अवस्थेत जाण्यापेक्षा खेळता-खेळता जाणं मला अधिक आवडेल ! या गोष्टीला आता जमाना झाला, सध्या क्लब बंद आहे पण आजही तितक्याच पॅशनेटली खेळतो. कधी दिवस उजाडतो आणि खेळायला जातो ही सगळ्या प्लेअर्सची उर्मी असते !

छान पॉझिटिव्ह लेख. वेलकम बॅक.

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 8:40 am | संजय क्षीरसागर

इट इज डिबी हू मेड इट !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 8:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षीसेठ, उत्साह वाढविणारे लेखन. उशिरा रात्री लेखन वाचले. कवितेसाठी दोन चार ओळी उतरवल्या.
बाकी, लेखन आवडले. नियमित असेच उत्तम लिहित राहा. पुन्हा एकदा स्वागत.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 8:58 am | संजय क्षीरसागर

स्म्युलवर सोलो गाणी, आपण केलेल्या शायरीत गाण्याचा नवा छंद सध्या जोपासला आहे.

ओ मेरे शाहे-खुबा, ओ मेरी जाने-जनाना या अप्रतिम गीतावर, नव्या अंदाज़ात केलेली ही शायरी >

मेरी मंजील हो, इन्तहा तुम हो,
दो कहाँ हम है - सब, तुम्ही तुम हो,
इश्क क्या रंग अब दिखाता है....,
हम भी देखेंगे, क्या बला तुम हो I

तेरी नफ़रतका हादसा हूँ मैं,
हर कदम हारी दासता हूँ मैं,
तेरी चाहत कमाल जादू है,
रंगदू मेरे रंग तुझे ये हासिल है |

तेरी नज़रोंकी छाँव हो जाऊं,
नज्म तेरी अदाकी हो जाऊं,
तेरा खयाल मेरी जन्नत है,
तुझको पाऊं तो इश्क हो जाऊं I

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेरी नज़रोंकी छाँव हो जाऊं,
नज्म तेरी अदाकी हो जाऊं,
तेरा खयाल मेरी जन्नत है,
तुझको पाऊं तो इश्क हो जाऊं I

ओहो, क्या बात है.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 9:10 am | संजय क्षीरसागर

कानात इअर फोन्स, स्म्युलचा वर्चुअल स्टुडिओ, डोळे मिटलेले आणि गाणं सुरू > जन्नत !

हे कडवं गातांना तर कहर होतो !

श्रीरंग_जोशी's picture

27 Mar 2020 - 9:09 am | श्रीरंग_जोशी

सध्याच्या घडामोडींकडे पाहणारे सकारात्मक विचार आवडले.

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 9:16 am | संजय क्षीरसागर

त्यामुळे निगेटिविटीचा कुठे स्पर्शच होत नाही.

पयशे मिळवण्याकरता करण्याचे उद्योग, घर चालवण्याचे उद्योग आणि कामं (= गृहिणींची), या शिवाय काही व्यवसाय किंवा छंद अगोदरच जोपासावे लागतात ते ऐनवेळी कामाला येतात. त्यातही बरेच पर्याय ठेवावे लागतात.

चौकस२१२'s picture

27 Mar 2020 - 10:01 am | चौकस२१२

आजची परिस्थिती
- आज पासून जे कोणी ऑस्ट्रेलियन नागरिक आणि कायमचे रहिवासी स्वगृही येतील त्यांना सरकार खर्चाने १४ दिवस हॉटेल किंवा लष्कराच्या छावणीत किंवा इतर ठिकाणी ठेवले जाईल, गेले काही दिवस स्वतःचं घरी राहण्याचे आवाहन नीट पाळले गेलं नाही त्यामुळे , एका दगडात २ पक्षी , हॉटेल रिकामी आहेत त्यामुळे त्यानं हि सरकारतर्फे आर्थिक मदत मिळेल आणि २ म्हणजे सरकारला नीट नियंत्रण/ निरीक्षण ठेवता येईल
यामागचे कारण असे कि ७५% रुग्ण हे बाहेरून आल्या मुळे झालेत ( २.६ करोड लोकसंख्या ३००० रोगी आणि १३ मृत्यू )
- भाडेकरूंना ( कुटुंबे किंवा छोटे उद्योग ) यांना आणि मालकांना भाडे, गृहकर्ज , विजेची बिले , यासाठी काय मदत करत येईल यावर लवकरच घोषणा होईल
- बेकारी भत्ता दुप्पट केला ( एकूण साधारण ५०,००० रु दर पंधरवड्याला + खास ३५,००० कारण भत्ता जाहीर )
- बीच आणि पार्क मध्ये गर्दी करू नका ( या बातमीनेच निसर्गप्रेमी आणि खेळ प्रेमी ऑस्ट्रेलियन हबकले आहेत पण इलाज नाही )
या सगळ्यात सध्याचे परवली चे शब्द
- सोशल डिस्टंसिंग
- फ्लॅटनिंग द कर्व
- स्टेज बाय स्टेज रिस्ट्रिक्टशन
कौतूकास्पद गोष्ट , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज स्तरावरील मुख्यमंत्री एका सुरात बोलता आहेत, काही डावे काही उजवे ..पण सूर एक

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 11:05 am | संजय क्षीरसागर

असंबंधित प्रतिसाद दिलायं !

चौकस२१२'s picture

27 Mar 2020 - 10:05 am | चौकस२१२

कॉन्टॅक्त्त ट्रेसिंग हा अजून एक महत्वाचा शब्द

चित्रगुप्त's picture

27 Mar 2020 - 11:39 am | चित्रगुप्त

संक्षी सरजी, खूप काळानंतर तुमचा लेख बघून छान वाटले आणि थोडक्यात आटोपता घेतलेला हा लेखही आवडला. चोवीस तास घरातच रहाण्याच्या या अभूतपूर्व संधीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्याच्या प्रयत्नात मी पण आहे. आपल्या चित्रकलेला वेगळे वळण देणे /वेगळ्या माध्यमात काम करणे हे सध्याचे ध्येय आहे. आहे. मिपावरील अडकलेली मोनालिसाची कथा- मालिका पण पुन्हा हाती घ्यायची आहे.

मी रहातो त्या भागात चोवीस तास उच्छाद मांडणार्‍या माकडांच्या टोळ्या गेले पाच-सहा दिवस अजिबात दिसेनाश्या झालेल्या आहेत याचे अतिशय आश्चर्य वाटते आहे. मनुष्यप्राण्यावर आलेल्या मोठ्या आपत्तीची चाहूल लागून ती माकडे जंगलात निघून गेली असावीत काय ? रस्त्यावरली कुत्रीही दिसत नाहीयेत. याविषयी काही संशोधन झाले आहे का ?

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 11:54 am | संजय क्षीरसागर

मोनालिसा हा मोठा रम्य विषय आहे

सोत्रि's picture

27 Mar 2020 - 11:56 am | सोत्रि

Meditation

- (अंतर्मुखी) सोकाजी

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 12:01 pm | संजय क्षीरसागर

ही स्वरूपोलब्धीची सुवर्ण संधी आहे. त्यावर माझा एक साद्यंत लेख मनोगतवर येईल.

चौकटराजा's picture

27 Mar 2020 - 1:40 pm | चौकटराजा

मी कधीच करियर ओरिएन्टेड नसल्याने अनेक बाबतीत जिज्ञासा पुरी करणे , त्यात आपल्याला काही जमते का पहाणे याचे उद्योग केलेले आहेत. ६६ व्या वर्शी मी २ बेडरूमच्या घराला एकट्याने तीन कोट पेन्ट दिलाय . घरात एल ई डी रेसेस्ड लायटिगचे सर्व इन्स्ट्लेशन मी स्वतः एकट्याने केल्य. सर्व कामाची आवड व आपल्याला आयुश्यात काय करायचे नाही याची माझी पक्की व विचारपूर्वक केलेली लिस्ट माझ्यकडे आहे.

मी नवीन घेतलेल्या की बोर्डवर स्वःत चे नवीन ताल तयार करण्याची सोय आहे. पण ते जरा अजून मला जमलेले नाही .त्यानी दिलेले तालाचा फील मला सर्वच बाबतीत पटला आहे असे नाही. उदा ओ पी चे बन्दा परवर हे गाणे जर वाजवायचे तर त्यान्च्या "मार्च " या तालात डबल बेस नाही , सबब त्यान्चा ताल बदलून त्यात डबल बेसचा घुमारा आणता आला तर आनन्द होईल, ते करून पहाणार आहे. दुर्दैव असे की २०० गाळ्याच्या सोसायटीत या लेव्हलचा सन्गीताचा नाद असलेला मी एकटाच आहे. आमच्या मजल्यावर तर ६ मधे ५ सन्गीताच्या बाबतीत औरन्ग्झेब आहेत.

बाकी आपले पुनरागमन स्वागतार्ह ! इथे भेटत राहू !

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 1:49 pm | संजय क्षीरसागर

बंदा परवर मस्त गाणं आहे, ते स्म्यूलवर म्हणून इथे टाकायचा प्रयत्न करतो !

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 1:54 pm | संजय क्षीरसागर

भारतीयं ताल आणि हार्मोनियम असलेला तो सर्वात मस्त की बोर्ड आहे > पॉवर बँक सप्लाय > लॅपटॉप साईज > पण बेस्ट की ज > सुपर्ब टोनल क्वालिटी

चौकटराजा's picture

27 Mar 2020 - 3:06 pm | चौकटराजा

माझ्या कसिओ 9000 इन मधे तीन ताल आहे पण अद्धा त्रिताल उदा कोई मतवाला आया मेरे द्वारे हे गीत रेगुलर तीन तालात वाजवले जाते पण " वजन वेगळे " असल्याने चमत्कारिक वाटते. तुमच्या की बोर्डात अद्धा आहे का ... ?

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 3:19 pm | संजय क्षीरसागर

पण बॉलीवूड गाण्यांना नेहेमी चालणारे ताल आहेत

चौकटराजा's picture

27 Mar 2020 - 7:18 pm | चौकटराजा

एकदा लेअर १ वर नर हर्मोनियम व लेअर २ वर वायलिन सेक्शन मिक्स करून पहा ! मस्त आवाज येतो !

चित्रगुप्त's picture

27 Mar 2020 - 7:12 pm | चित्रगुप्त

करियर ओरिएन्टेड नसल्याने अनेक बाबतीत जिज्ञासा पुरी करणे , त्यात आपल्याला काही जमते का पहाणे याचे उद्योग

... माझ्यामते हे फार महत्वाचे आहे. आमचा एक मित्र याला "फुरसतीपणाचे धंदे" म्हणायचा. माझ्याही आयुष्याचा अधिकांश काळ यातच व्यतीत झालेला आहे. समर्थ म्हणतात "आपणासि जाणावे आपण, यासि म्हणावे ज्ञान, येर ती पोट भरायाची विद्या" ..... या 'आपणासि आपण जाणण्या'साठी 'फुरसतीपणाच्या धंद्या'तच लगे रहो.

सौंदाळा's picture

27 Mar 2020 - 3:00 pm | सौंदाळा

लॉक डाऊनकडे बघायचा वेगळा द्रुष्टिकोन देणारा लेख आवडला

हा प्रश्न पडणार्यांचे मला नवल तर वाटतेच पण वाईटही वाटते..तुम्हाला काहीतरी छंद असेल , तर हा प्रश्न पडूच शकत नाही.अगदीच काही नाही तर तुमच्यातले कुतूहल जागे ठेवले तरी हा प्रश्न पडणार नाही. गॅलरीत जाऊन पक्षांचे आवाज ऐका..त्यांच्या मनसोक्त विहरण्याचे अवलोकन करा...किशोरची तीच गाणी ऐका, फक्त यावेळी गाण्याच्या ऑर्केस्ट्रा कडेच लक्ष द्या..RD आणि LP यांच्या music मधला फरक टिपा..किंवा गाण्याचे शब्द मन लावून ऐका..थोडक्यात जी गोष्ट करीत असाल तीच focus बदलून करा फक्त....एक ना अनेक...कितीतरी गोष्टी आहेत...क्रिएटिव्ह गोष्टी हुडका..त्याला मनसोक्त दाद द्या...काय मजा आहे व्वा...२१ दिवस फक्त मजा लुटा जगण्याची...

Jayant Naik's picture

27 Mar 2020 - 5:32 pm | Jayant Naik

मी माझ्या मित्रांना नेहमी एक वाक्य सांगतो. " तुम्ही काहीही केले नाही तरी वेळ आपोआप जातो." अती उत्तम लेख. बहुतांश लोकांना शांतता आणि एकांत याची भिती वाटते. हि भिती घालवण्याची हि नामी संधी आली आहे. याचा पूर्ण उपयोग प्रत्येकाने करावा. कुठेही जायचे नाही आणि काहीही करायचे नाही याची सवय करा. ओम शांती शांती शांती .

बहुतांश लोकांना शांतता आणि एकांत याची भिती वाटते

मला वाटते की बहुतांश लोकं स्वतःला घाबरतात, त्यांना स्वतःची ओळख करून घ्यायची नसते म्हणून त्यांना एकांत नको असतो.

इतरांना शिव्या घालणं , सगळ्या संकटांचे इतरांवर खापर फोडणे सोपे जाते मग.

पण उत्तम लेख. ज्यांना कुतूहल आहे, छंद आहेत त्यांना 21 दिवस काय 21 महिनेही कमी पडतील

इंटरनेटवर जरी प्रामुख्याने ट्रॅश पॉर्न असलं तरी त्याच बरोबरीला दर्जेदार एरॉटीक पॉर्न ही उपलब्ध आहे.
सुंदर कलात्मक दर्जेदार एरॉटीका चा पॉर्न चा आस्वाद घेणं हा ही एक उत्तम पर्याय आहे.

दुसर्‍याने जेवताना पाहून त्यात आनंद मानण्याऐवजी स्वतःच जेवणाचा आस्वाद का नाही घेत ? २१ दिवस घरी आहात तर वेगवेगळ्या रेसीपीज करुन बघा हव्या तर ! इथे शेअर नाही केल्या तरी चालेल :)

लॉक डाऊनकडे वेकेशन म्हणूनही पाहाता येईल हा मुद्दा आहे. आता ही सुट्टी तुम्ही स्वतःच्या विकासासाठी वापरू शकता. प्राणायाम आणि योगा शिकून, सकाळ-संध्याकाळ, मजेखातर त्याची प्रॅक्टीस केली तर ती शरीर आणि मनःस्वास्थ तर देईलच पण जन्मभर उपयोगी होईल.

एक छंद आणि एक स्पोर्टस अॅक्टीविटी आपल्या जगण्याचा पॅटर्न बदलतात. ते आत्मसात करण्याच्या दिशेनं काही पावलं तरी तुम्हाला टाकता येतील.

कोणत्याही पॅसिव टाईमपासनं फक्त वेळ जाईल आणि हा कालावधी लांबला तर पुढे डिप्रेशन येईल. त्यामुळे ज्यात तुमचं इंटर-अॅक्टीव पार्टीसिपेशन आहे अश्या, तुम्हाला आवडणाऱ्या छंदांचा वेध घ्या. वेळ नाही म्हणून इतके दिवस जे राहून गेलं ते करायला घ्या असं माझं म्हणणं आहे.

आणि मग लॉक-डाऊन किंवा नो लॉक-डाऊन, तो तुमचा जगण्याचा अंदाज़ होईल. तुमचं व्यक्तिमत्व बहुरंगी बनेल. या लेखाचा तुम्हाला खरा उपयोग होईल

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2020 - 10:05 am | संजय क्षीरसागर

आता प्रत्येक दिवस रविवार झाला आहे, ज्याची प्रत्येकजण अपेक्षा करत होता ती कल्पना आता प्रत्यक्ष झाली आहे.

थोडक्यात, जीवनात स्वर्ग अवतरला आहे. वर्तमानाशिवाय कुणाच्या हातात काहीही नाही. ही अनमोल संधी समजून पूर्णपणे उपभोगायची का भविष्याची नाहक चिंता करत स्वतःची घुसमट करून घ्यायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे

बोलघेवडा's picture

29 Mar 2020 - 11:25 am | बोलघेवडा

उज्जयी, भस्त्रिका, कपालभाती आणि नंतर अनुलोम विलोम या क्रमाने प्राणायाम केल्यास अद्भुत शांतीचा अनुभव येतो हे स्वानुभवावरून सांगतो. करून बघाच.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 11:05 pm | आयर्नमॅन

पत्नीकडून पोळ्या करायला मी आता शिकणार आहे. पोळी जमली की निम्मं आयुष्य सार्थकी लागल्याचा फिल येईल

पोळी शेंबडे पोरही करेल, कणिक व्यवस्थित मळायला जमणे म्हत्वाचे हे विसरू नका

संजय क्षीरसागर's picture

22 May 2020 - 8:57 am | संजय क्षीरसागर

यात वाद नाही पण आईने मळलेल्या कणकेच्या पोळ्या शेंबडे पोर करु शकणार नाही.

आयर्नमॅन's picture

22 May 2020 - 10:42 am | आयर्नमॅन

तस्मात आपण आधी पोळ्या करणेच शिकून घेणे योग्य. कनिक मळणे जमायला जरा वेळ जाऊदे

एका प्रथितयश चित्रकाराने आपले अत्युत्कृष्ट चित्र सार्वजनिक ठिकाणी लावले होते आणि तेथे पाटी लावली होती कि या चित्रात चूक काय आहे ते दाखवा.

दोन दिवसांनी त्या चित्राच्या बाजूला असलेल्या फलकावर लोकांनी त्यातील शेकडो चुका अधोरेखित करून दाखवल्या होत्या.

अत्यंत निराश स्थितीत तो चित्रकार बसला असता त्याचे गुरुवर्य तेथे आले आणि त्यांनी त्याला नैराश्याचे कारण विचारले.

चित्रकाराने कारण सांगितल्यावर गुरुवर्य म्हणाले आता एक काम कर हा बाजूचा फलक काढून टाक आणि नवा फलक लावून त्यावर लिही कि हें चित्र सुधारून दाखवा.

असे केल्यावर पुढच्या पंधरा दिवसात त्या फलकावर एकही टिप्पणी आली नव्हती.

या गोष्टीचा वरील प्रतिसादांशी काहीहीसंबंध नाही

कुणास तो आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा

अगदी पुणेरी शालजोडीतला बरका डॉ. साहेब ... म्हणजे तुम्ही पुणेरी नसला तरी :)

सुरेख प्रातिनिधिक उदाहरण !

सत्य हे चित्र नाही, तो कॅन्वस आहे. हा कॅन्वस इतका सार्वभौम आणि अनंत आहे की प्रत्येक चित्राच्या आत-बाहेर तोच आहे. इतकंच काय चित्र आणि कॅन्वस हे एकरुपच आहेत. चित्र कॅन्वसपासून कधीही वेगळं होऊ शकत नाही. वास्तविकात, चित्र ही कायम अव्यक्त असणार्‍या कॅन्वसचीच अभिव्यक्ती आहे.

चित्रात काहीही चूक असली तरी कॅन्वस कायम पूर्ण आणि चित्रानं अनाबाधित आहे.

प्रत्येक साधकाची एकच चूक होतेयं, तो स्वतःला चित्र समजतोयं आणि त्याला आपण मुळात कॅन्वस आहोत याचं विस्मरण झालंय.

अर्थात, यानं कॅन्वसला काहीही फरक पडत नाही पण चित्र कायम अस्वस्थ राहतं.

यात विरोधाभास असा की अध्यात्मिक दिग्गजही साधकांना चित्र कसं योग्य होईल हेच शिकवतात. परिणामी साधक षडरिपूंवर विजय मिळवणं, अहंकार हटवणं, अनेकविध दैवतांचं अनुष्ठान करणं, परिक्रमा आणि तत्सम निरर्थक आणि क्लेषदायी साधना करणं यात सारं आयुष्य वेचतात. मग कुणाचं स्टँडींग किती यावर त्याची अध्यात्मिक तयारी काय हे ठरवलं जातं.

वास्तविकात चित्र सुधारण्यानं काहीही होणार नसतं कारण त्या प्रयत्नात आपण चित्र नसून कधीही न बदलणारा कॅन्वस आहोत हा उलगडा होण्याची शक्यता शून्य होत जाते.

साधक जेवढं चित्र सुधारण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो फ्रस्ट्रेट होत जातो. तो गुरुला विचारतो की मला अजून उलगडा का होत नाही ? गुरु त्याला सांगतो तू आणखी जोरात प्रयत्न कर कारण गुरुच्या गुरुनं त्याला हाच उपदेश केलेला असतो! आणि हे असं युगानुयगं चालू आहे.

तस्मात, सार्वत्रिक आणि सर्वकालीन होणार्‍या फंडामेंटल अध्यात्मिक चुकीचं हे सुरेख प्रातिनिधिक उदाहरण आहे !
_______________________________________________

जो स्वतः सत्य झाला आहे तो कुणालाही चित्र सुधारण्याच्या भानगडीत कधीही पाडत नाही.

तो फक्त एकच काम करतो > चित्राला आपण कॅन्वस आहोत हा उलगडा का होत नाही, त्याची नेमकी काय चूक होतेयं; ते दाखवतो !
_______________________________________________

एक सुरेख शेर आहे :

नफरतसे वो जो हमें देखते है अनजानेमें,
नही जानते की देखनाही इष्के-इब्तिदा है |

थोडक्यात, या प्रतिसादानं तुमच्या जीवनात, तुम्हाला रस नसलेल्या, अध्यात्मानं नकळत प्रवेश केला आहे. आणि मला शिकवण्याच्या नादात तुम्ही मला गुरु केलं आहे.

सुबोध खरे's picture

22 May 2020 - 7:12 pm | सुबोध खरे

मी जन्माने पुण्याचा नसलो तरी शिक्षणाने पुण्याचा आहे. पुणे विद्यापीठाची पदवी आणि डॉक्टरेट असून एकंदर ११ वर्षे पुण्यात वास्तव्य हि होते. आणि पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्राध्यापकीसुद्धा केली आहे.

ता क- याचा शालजोडीशी संबंध नाही.

चामुंडराय's picture

23 May 2020 - 7:30 am | चामुंडराय

अरे हो, तुमचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले हे विसलोच होतो.

आता प्रतिसाद बदलून...

"तरीच"

अष्टावक्राची फक्त एकच गोष्ट इतिहासात नमूद आहे.

जनकाच्या दरबारात सत्यावर चर्चा चालू होती. देशोदेशीचे नामवंत पंडित निमंत्रित केले होते आणि अष्टावक्राचे वडीलपण त्यात सामिल होते. चर्चा कमालीच्या दीर्घावधित गेली तेंव्हा आईच्या सांगण्यावरनं अष्टावक्र वडीलांना बघायला आला. इतक्या गंभीर आणि घनघोर चर्चेत अष्टावक्राच्या आगमनासरशी एकच हास्यकल्लोळ उडाला कारण अष्टावक्राचा देह जन्मजातच आठ ठिकाणी वाकलेला होता; त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीतून ते व्यंग प्रकट व्हायचं. सत्याची चर्चा सोडून सगळा दरबार आतुर होऊन, जणू विदुषकाच्या लीला बघायला मिळाव्यात, तसा अष्टावक्राकडे बघायला लागला.

अष्टावक्रानं फक्त जनकाकडे पाहिलं आणि एकच वाक्य बोलला " राजन, चांभारांच्या सभेत तू सत्याची अपेक्षा करतोयंस ! "

जनक असामान्य बुद्धीचा राजा होता. तो अष्टावक्राला असं म्हणाला नाही की तू चर्चेत सामिल हो आणि यांचा चूका दुरुस्त करुन दाखव. त्याला कळलं की आपली चूक झाली; ज्यांना देहापलिकडे कसलंही ज्ञान नाही त्यांना सत्य समजण्याची शक्यताच नाही. त्यानी सर्व पंडीतांना विनम्र अभिवादन केलं आणि सांगितलं की मला क्षमा करा, मी ही सभा बरखास्त करतो.

मग दुसर्‍या दिवशी अष्टावक्राला अगत्यानं दरबारात बोलावलं, स्वतः सिंहासनावरुन खाली उतरला, अष्टावक्राला सिंहासनावर विराजमान केलं आणि अत्यंत विनम्रपणे पृच्छा केली :

कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति ।
वैराग्यं च कथं प्राप्तमेतद् ब्रूहि मम प्रभो ॥ १-१

______________________________________________________________________________

संजय क्षीरसागर's picture

22 May 2020 - 11:14 pm | संजय क्षीरसागर

चर्चेशी डायरेक्ट संबंध आहे !

बाहेरच्या व्यवहारिक जगात वावरताना सदैव संवाद साधावा लागतो, सतत बोलावे लागते.

ह्या लॉक डाऊन च्या निमित्ताने एक दिवस सकाळ पासून ते रात्री पर्यंत मौन पाळता येईल काय?

प्रयत्न करून बघायला पाहिजे.

विपशन्येतील एक अनुभव खाती जमा होईल.

असा प्रयोग कोणी केला आहे का?