वेदनाच मला मिळू दे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Nov 2019 - 11:34 pm

नकोत आनंददायी संवेदना
हे प्रभो वेदनाच मला मिळू दे
हरवू दे माझा मी पणा
त्यासाठी मजला धिर दे

सुख असे हे की डाचते मला ते
तेच ते कणखर मनाला पंगू बनवते
भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे

ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही
कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही
तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे

तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या
त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या
घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे

- पाषाणभेद
१७/११/२०१

भक्ति गीतशांतरसकविता

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

18 Nov 2019 - 11:24 am | दुर्गविहारी

कुंतीने श्रीकॄष्णाकडे केलेल्या मागणीची आठवण झाली.

यशोधरा's picture

18 Nov 2019 - 11:33 am | यशोधरा

मस्त. अतिशय आवडले.

मन्या ऽ's picture

21 Nov 2019 - 4:22 pm | मन्या ऽ

खरय! वेदना आणि दुःखामुळेच मिळणार्या सुखाची किंमत अनमोल असते..

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 7:18 pm | मुक्त विहारि

छान लिहिलंय

श्वेता२४'s picture

22 Nov 2019 - 10:48 am | श्वेता२४

.

छान झाली आहे पण वेदना मागून मन कठोर का करावे .. नकोच त्या , त्यापेक्षा दुःख झेलण्याची ताकद मागा

==================================================================

वृथा व्यथा मागू नये

मन कठोर करावयासी

मन निर्मळ गंगेजैसे

असे फक्त आप्तस्वकीयांसी

ढाळ अश्रू दुःखात दुज्या

देउनी खांदा त्या भाराप्रती

ओढ लागू दे जरा मनाला

ओथंबुनि जाऊ दे प्रीती

धर्म कोणता कोणा समजला ?

कळण्यातच सारे जन्म गेले

मनाचेही ऐसेच काहीसे

कधी कठोर तर मृदू झाले

द्यावयास तो वरती बैसला

मागून व्यथा पदरी

तू त्यातच फसला