कर्नाटका आणि महाराष्ट्रः सहोदर संस्कृती

रोहित रामचंद्रय्या's picture
रोहित रामचंद्रय्या in जनातलं, मनातलं
31 Oct 2019 - 9:43 pm

नमस्कार मंडळी|

मिसळपाव मध्ये हा माझा प्रथम लेखन आहे|

नवंबरचा महिना म्हण्जे, कर्नाटका आणी भारत देशाचा बहुतेक दा़क्षिणात्य राज्यांचा स्थापना सोहळा आहे| तसेच महाराष्ट्राचा दक्षिणेत असणारा कर्नाटकवासियांना सुद्दा राज्योत्सवाचा समय आहे |

कर्नाटका हा प्रदेशाचा उल्लेख पहिलच बार महाभारत काव्याचे भीष्म्पर्वात मिळतात| 'कर्नाटका' हा संस्कृत नावाचा मूळ शब्द 'कन्नडा' आहे| कन्नडा भाषेचा उपलब्द प्रथम लक्षण ग्रंथ 'कविराजमार्ग' मध्ये, कन्नडा हा शब्दाला इथल्या भाषा आणि भूप्रदेशाचा नाव असा वापर्ला गेला आहे|

हेच ग्रंथात, कार्नाटकाचा सीमा कावेरी तून गोदावरी पर्यंत होता असा उल्लेख आहे|

कन्नडा भाषा संबंधी काही विषय -

१. प्रथम उल्लेखित शब्द - 'इसिला' अशोक चक्रवर्तीच्या ब्रह्मगिरी शासन मध्ये|
२. प्रथम उपलब्ध शासन - क्रि.श ४५० च्या हल्मिडी शासन|
३. नर्मदा काटीवर उत्तरचा राजा हर्शावर्धन्ला हरावलेल्या प्रथम दाक्षिणात्य राजा म्हण्जे, चालुक्य राजा 'इम्मडि पुलिकेशी' हे कन्नडिगा होते|
४. प्रथम उपलब्ध गद्य ग्रंथ - क्रि.श. ८५० मध्ये शिवकोट्याचार्या लिखित वड्डाराधने|
५. आदिकवि - पंपा (क्रि.श ९५०) |

'ज्ञानेश्वरी' मधे 'तुप्प' 'पोट्टे' असा कन्नडा शब्दाचा वापर झालेला आहे असा संशोदकाचे मत आहे|
आज सुद्धा पुणे, मुंबईचा एलिफेंटा, आणि एल्लोरा येथे, कन्नडा साम्राज्याचा साक्षीभूत लेणि देवळ बघायला मिळतात|
मराठी संस्कृतीचे विद्यांस रा.चि.ढेरे यांने कन्नडा-मराठी संबंध विषयी खूप शोध केले आहे| काही शोधकांचे मत आहे की शिवाजी के मूलपुरुश 'बळियप्पा' नावाचा कन्नडा योद्धा होता| 'भोसले' हे कन्नडाचा 'होयसला' शब्दाचा अपभ्रंश आहे|

माझा हा लेखाचा उद्धेश इतकच आहे की, मराठी आणि कन्नडिगां ऐतिहासिक कालातून सहोदर सारखे वाघळले आहे|

आपल्या विश्वासी
रोहित

भाषाविचार

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

31 Oct 2019 - 10:25 pm | रमेश आठवले

ज्ञानेशवर महाराज यांनी लिहिले आहे - कानडा हा विठ्ठलु कर्नाटकु तेणे मज लावियले वेडु

आनन्दा's picture

1 Nov 2019 - 12:21 am | आनन्दा

स्वागत!

श्वेता२४'s picture

1 Nov 2019 - 10:52 am | श्वेता२४

लिहीत रहा

प्रचेतस's picture

4 Nov 2019 - 10:00 am | प्रचेतस

ह्या विषयावर 'मर्‍हाटी संस्कृती : काही समस्या' हे शं. बा. जोशी लिखित पुस्तक वाचणे रोचक ठरावे. मराठी भाषा कन्नड मधून उत्क्रांत झाली असा काहीसा त्यांचा वादग्रस्त सिद्धांत आहे.

रोहित रामचंद्रय्या's picture

7 Nov 2019 - 4:54 pm | रोहित रामचंद्रय्या

आपण जे सांगत आहे ते खरे आहे. पण आश्चर्य्दायी विचार म्हण्जे शं बा स्वत: मराठी मातृभाषी होते. स्वत: ठिळ्क सुद्धा हा विषयी बोलताना 'महाराष्ट्र आणि कर्नाटक' हे दोन्ही राज्यांचे मूळ संस्कृती कन्नड होते असा सांगितले आहे. शं बा तर कर्नाटकात बहुमु़ख्य संशोधक म्हणून जौरविण्यात आलेले आहे.

चिन्मना's picture

7 Nov 2019 - 5:22 pm | चिन्मना

रोचक माहिती. असा काहीसा सिद्धांत आहे असे अजिबात माहित नव्हते. यावर अजून वाचायला आवडेल.

रोहित रामचंद्रय्या's picture

14 Nov 2019 - 11:16 am | रोहित रामचंद्रय्या

हऊ. खूप आश्चार्य्जनक विषय आणि अनोळखी माहिति आहे, जे सामान्य लोकांना कळत नसतात.
अधिक माहितिसाठी र.चि.ढेरे, शं बा सारख्या लेखकांचे पुस्तक वाचणे योग्य आहे.

रोहित रामचंद्रय्या's picture

7 Nov 2019 - 5:10 pm | रोहित रामचंद्रय्या

हा बद्दल अधिक माहितिसाठी https://books.google.co.in/books?id=p3BuAAAAMAAJ&q=%E0%A4%9F%E0%A4%BF%E0... हे पुस्तक वाचू शकतो

कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्याच्या संस्कृती जास्त फरक नाही.
राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक मध्ये प्रवेश केला तर काहीच फरक जाणवत नाही एवढी दोन्ही राज्य एकरूप आहेत.

उत्तरेला मध्य प्रदेश किंवा त्या पुढची राज्य आणि बाजूला गुजरात ह्या राज्यात वेशभूषा महारष्ट्र पेक्षा खूप वेगळी आहे .
उदाहरण स्त्रिया ची साडी नेसायची पद्धत पण कर्नाटक आणि महारष्ट्र मध्ये हा फरक नाही.
महाराष्ट्र मध्ये वापरात असलेली मोडी भाषा पण महारष्ट्र चे कर्नाटक शी असलेले जवळचे संबंध दाखवतात.
महाराष्ट्र का हिंदी भाषिक राज्यांकडे झुकला ते समजायला मार्ग नाही.
त्या मुळे नुकसान मात्र खूप झाले राज्याचे

जॉनविक्क's picture

14 Nov 2019 - 4:04 pm | जॉनविक्क

अन पेट्रोलही लिटरमागे स्वस्त मिळते बगा

चौकस२१२'s picture

14 Nov 2019 - 6:39 pm | चौकस२१२

"महाराष्ट्र का हिंदी भाषिक राज्यांकडे झुकला ते समजायला मार्ग नाही"
कारण बहुतेक देवनागरी लिपि अनि भाषिक जवळीक + उत्तरेतील मोहिमा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2019 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं मिसळपाववर मनापासून स्वागत. आपण मिपावर पहिल्याच भेटीत चांगलं लिहिलं आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक खरं तर या दोन राज्यांमधील भाषांच्या अनुषंगाने चर्चा होत गेली तर आपल्यालाच त्याची अधिकाधिक माहिती मिळत जाईल असे वाटते. अशोक स्तंभावरील काही शब्दांच्या उल्लेखावरुन काही अभ्यासकांनी कन्नड बोली भाषेचं अस्तित्व इ.स.पू. काळापासून असल्याचं सिद्ध केलं आहे. आपण उल्लेख केला तो हल्मिडि शिलालेखाचा जी अक्षरं कन्नडमधील पहिली अक्षरे मानली जातात. पहिलेपणाचे आणि वादाचे श्रीचावुंडराजें करविलें' जे जे विषय येतात त्यात आपल्या मायमराठीचा ”श्रीचावुंडराजें करविलें' हा कर्नाटक येथील भगवान बाहुबली- श्रीगोमटेश्‍वराच्या शिलालेखावरील पहिल्या वाहिल्या सौहार्दपूर्ण संबंधाची ओळख देतो असे वाटते. दोन मराठी, दोन कानडी, एक तमिळ असे एकूण पाच लेख तिथे खोदलेले आहेत आहेत असे आपणास इतिहास सांगतो. आपण उल्लेख केला त्या नवव्या शतकातल्या’कविराजमार्ग’ या उपलब्ध ग्रंथावरुन कन्नडचे लिखित संदर्भ परंपरा अभ्यासक सहाव्या ते सातव्या शतकापर्यंत नेवून ठेवतात. कर्नाटकच्या सिमा कावेरीपासून ते गोदावरीपर्यंत असल्याचं म्हटलं जातं. आपलं राज्य आणि आपल्या भाषेचा परंपरेचा प्रत्येकाला अभिमान असतो आणि ती परंपरा अधिक प्राचिन कशी आहे, हे सांगायला प्रत्येकाला आवडते. आम्ही मराठीभाषेची परंपरा थेट ’गाथा सप्तशती’ पर्यंत घेऊन जातो. कन्नड भाषा संकटात यायला लागली ती हिंदी आणि इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषेचंही तसंच.

पहिलं लेखन, कादंबरी, अशी सर्वच ओळख करुन देत गेला तर ‘मराठीने केला कानडी भ्रतार’ असे का म्हटले जात असावे त्याचा आपल्याला अंदाज येईल. मराठी-कानडी यांना जोडणारा दुवा कोकणी भाषा आहे असेही म्हटल्या जाते. कानडा राजा पंढरीची गोष्ट अशीच. श्री विठ्ठल: एक महासमन्वय या ग्रंथात रा.चि.ढेरे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकचा विठ्ठ्लाच्या निमित्ताने संवाद साधला आहे. हे सर्व महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं नातं व्यक्त करणारं आहे.

आपण या सर्व विषयांवर लिहावं असा आग्रह धरेन. मला किती जमेल माहिती नाही पण आपल्या लेखनाला नक्की पोच देत राहीन. आपलं लेखन आवडलं लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

रोहित रामचंद्रय्या's picture

16 Nov 2019 - 5:01 pm | रोहित रामचंद्रय्या

आपल्या सहृदय लेखसाठी हृदयपूर्वक धन्यवाद.
मला चांगला मराठीत लिहिणे येत नाही. त्या प्रयत्न करीत आहे.

मला मराठी, महाराष्ट्र राज्यास ऋण आहे. त्या म्हण्जे माझा वृत्ति जीवन पुण्यातून सुरु झाला. मी टाटा टेक्नालजीस, हिंजवडी, पुणे आणी ठाणे येथे अडीच वर्ष काम केला.

त्या अवधीत मी मराठी ले़खक भा. नेमाडे यांच्याशी त्यांच्या स्वगृहात भेटण्याचा अवकाशदेखील मिळाला.

तसेच, चित्रपट गृहात, अतुल कुलकरणी यांचे 'चकवा' आणी नाना पाटेकर यांचे 'पक पक पकाक' हे दोन मराठी चित्रपट पाहिला होता.

आभार.

गामा पैलवान's picture

16 Nov 2019 - 10:41 pm | गामा पैलवान

रोहित रामचंद्रय्या,

तुमच्या प्रयत्नांचं कौतुक आहे. आगे बढो. तुम्हाला चांगलं मराठी येतंय. निदान लिहिता तरी व्यवस्थित येतंय. नेहमीच्या मराठीपेक्षा फारसं वेगळं नाही. तसंही पाहता मराठीच्या भरपूर बोली आहेत. त्यामुळे तुमची स्वत:ची एक मराठी विकसित होईल! :-)

आ.न.,
-गा.पै.

कर्नाटक आणि महारष्ट्र ही दोन राज्य सर्व बाबतीत समान आहेत.

त्यांच्या पुढे समस्या सुधा सामान आहेत.
बंगलोर आणि मुंबई ही दोन शहर सामान समस्ये शी jhunzat आहेत..
किरकोळ मतभेद विसरून ह्या दोन राज्यांनी सर्व संकटांचा मुकाबला करावा ..संकट पण समान आहेत

रोहित रामचंद्रय्या's picture

18 Nov 2019 - 12:20 am | रोहित रामचंद्रय्या

ढेरे

हे कन्नड भाषेचा अतिशय गाजलेला 'प्रजावाणी' पत्रिकेत डा रामकृष्ण मराठे यांनी लिहिलेला रा. चि. ढेरे यांचे परिचयात्मक लेखन. लेखक त्यांना 'कन्नड - मराठी संबंधाची शोधक' अशा म्हणते.

अनिंद्य's picture

18 Nov 2019 - 11:00 am | अनिंद्य

@ रोहित रामचंद्रय्या,

मराठी शिकून घेऊन लिहिणे किती कठीण आहे याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुमचे विशेष कौतुक वाटले.

कानडी-मराठी सहोदर संस्कृती आहेत, वादच नाही. देवाण-घेवाण जितकी होईल तितके चांगले आहे.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.

अनिंद्य.